सीसीसी (CCC) कोर्स ची संपूर्ण माहिती

कॉम्प्युटर चे ज्ञान असणे आता काळाची गरज आहे कारण सध्याचे जग हे कॉम्प्युटर चे आहे. आज सर्वकाही ऑनलाईन होत चालले आहे. आपल्याला जर आजच्या जगात टिकायचे असेल तर कॉम्पुटर शिकलेच पाहिजे. कॉम्प्युटर शिकण्यासाठी अनेक कोर्स उपलब्ध आहेत, जसे MSCIT कोर्स आहे. याची माहिती आपण नंतर पाहुत आधी आपण CCC Course Information पाहुयात.

CCC कोर्स बद्दल आपण कोठेतरी ऐकले असेल आणि CCC Course Information मिळवण्यासाठी आपण या वेबसाईट वर आला आहात. तर आजच्या या पोस्टमध्ये आपण CCC कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत. CCC बद्दल संपूर्ण माहिती CCC Information मिळवण्यासाठी ही पोस्ट संपूर्ण वाचावी.

सीसीसी (CCC) कॉम्प्युटर कोर्स ची संपूर्ण माहिती (CCC Course Information in Marathi)

सीसीसी (CCC) “Course on Computer Concepts” आणि CCC चा मराठी अर्थ “संगणक संकल्पनांवर आधारित कोर्स” असा होतो. कॉम्प्युटर ज्ञान प्रदान करणे हा CCC Course चा मुख्य उद्देश आहे. कॉम्पुटर ज्ञान आजच्या काळात खूप आवश्यक आहे, त्यामुळे CCC कोर्स बनवला गेलेला आहे.

CCC Course काय आहे? (CCC Course in Marathi)

CCC हा एक Government Certified कॉम्प्युटर कोर्स आहे. CCC Course ला NIELIT (National Institute of Electronics and Information Technology) ही संस्था चालवते. याला नाईलिट असेही म्हणतात, याचे पूर्वीचे नाव DOEACC (Department of Electronics and Accreditation of Computer Classes) असे होते. नंतर याचे नाव बदलून NIELIT करण्यात आले.

CCC कोर्स हा सरकार कडून मान्यताप्राप्त कोर्स आहे. याचे प्रमाणपत्र सरकारी नोकरी मिळवताना सुद्धा उपयोगी पडते, त्यामुळे आपल्यापैकी जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतील त्यांनी CCC कोर्स करून घ्या म्हणजे याचा फायदा तुम्हाला पुढे नक्की होईल.

कोर्सचे नावCourse on Computer Concepts
संस्थाNIELIT
कालावधी80 तास
परीक्षा मोडऑनलाईन
वेबसाईटhttps://www.nielit.gov.in/

CCC चा फुल फॉर्म (CCC Full Form)

सीसीसी (CCC) चा फुल फॉर्म “Course on Computer Concepts” असा होतो आणि CCC चा मराठी अर्थ “संगणक संकल्पनांवर आधारित कोर्स” असा होतो.

CCC Course कसा करावा (CCC Course Admission Process)

CCC Exam चा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. NIELIT च्या वेबसाईट वर CCC चे फॉर्म भरून घेतले जातात. परीक्षेचे फॉर्म फक्त ऑनलाईन भरावे लागतात, ऑफलाईन फॉर्म भरावा लागत नाही. CCC Exam ची फी फक्त 500 रुपये आहे. फॉर्म भरल्यावर परीक्षेची फी ऑनलाईन भरावी लागते. ऑनलाईन फी भरण्यासाठी अनेक मार्ग आहेत जसे RTGS, Credit Card, Debit Card, Net Banking, ई.

परीक्षेचा फॉर्म भरल्यावर काही दिवसांनी Admit Card येते. यासाठी आपल्याला वेबसाईटवर लक्ष ठेऊन राहावे लागते. Admit कार्ड आल्यावर आपल्याला परीक्षा कधी आहे ते समजते. CCC ची परीक्षा 100 गुणांची असते, प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असतो म्हणजे एकूण 100 प्रश्न असतात. CCC Exam उत्तीर्ण होण्यासाठी 50 गुण आवश्यक असतात.

उमेदवारांना पडलेल्या गुणांच्या आधारावर Grade दिलेली असते. ती खालीलप्रमाणे Calculate केली जाते.

MarksGrade
0-50Fail
50-54D
55-64C
65-74B
75-84A
85+S

आता महत्वाचा प्रश्न येतो की CCC चा Syllabus कसा आहे आणि याचा अभ्यास कसा करायचा. CCC चा अभ्यास शिकवणाऱ्या काही खाजगी संस्था आहेत, आपल्याला तेथे प्रवेश घ्यावा लागतो. त्या Institutes CCC चा सर्व Syllabus शिकवतात सोबतच Exam Form भरून देण्याची जबाबदारी सुद्धा तेच घेतात. कोर्स सुरू केल्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व जबाबदारी त्यांची असते.

जर तुम्हाला वाटत असेल की CCC चा अभ्यास तुम्ही स्वतःहून करू शकता तर हे सुद्धा चालते. तुम्ही स्वतः घरून फॉर्म भरून स्वतः अभ्यास करू शकता. फक्त Exam Form, Admit Card हे सर्व तुम्हालाच करावे लागते, Admit Card साठी सतत वेबसाईट वर लक्ष ठेवावे लागते. सर्व जबाबदारी तुमची असते.

CCC Course अभ्यासक्रम (CCC Course Syllabus)

CCC Course चा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे-

 1. Introduction To Computer
 2. Introduction to Operating System
 3. Word Processing
 4. Spreadsheet
 5. Presentation
 6. Introduction to Internet and WWW
 7. E-mail, Social Networking, and e-Governance Services
 8. Digital Financial Tools and Applications
 9. Overview of Future Skills & Security

CCC हा कोर्स एकूण 80 तासाचा आहे, याला तीन प्रकारे विभाजित करण्यात आलेले आहे.

Theory25 hours
Tutorials5 hours
Practicals50 hours

CCC Course करण्याचे चे फायदे (Advantages Of CCC Course)

आपल्यापैकी ज्यांना कुणाला कॉम्पुटर शिकायचे असेल त्यांनी हा कोर्स करायलाच हवा. या कोर्स च्या माध्यमातून कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान दिले जाते जे प्रत्येकाला शिकणे गरजेचे आहे. CCC कोर्स केल्याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे –

 • CCC कोर्स केल्यानंतर तुम्हाला संगणकाचे बेसिक ज्ञान मिळते आणि तुम्ही संगणक चालवायला शिकता.
 • CCC कोर्स हा सरकार कडून मान्यताप्राप्त असल्याने तुम्ही सरकारी नोकरीसाठी CCC कोर्स च्या Certificate चा वापर करू शकता.
 • आपण जर विद्यार्थी असाल तर हा कोर्स करून चांगल्याप्रकारे संगणक वापरायला शिकू शकता आणि अभ्यासासाठी संगणक वापरू शकता.
 • CCC कोर्स केल्याने आपले अनेक कामे सोपी होतील कारण संगणकाचे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात खूप आहेत.

– निष्कर्ष –

कॉम्पुटर क्षेत्रात नवीन असणाऱ्यांसाठी CCC कोर्स CCC Course हा एक चांगला पर्याय आहे. Computer बद्दल बेसिक ज्ञान मिळवायचं असेल तर हा कोर्स नक्की करा. याच्या प्रमाणपत्राचा फायदाही तुम्हाला होईल. CCC कोर्स देशपातळीवर चालवला जातो, हा केल्यावर भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळत असते. तसा MSCIT हा फक्त महाराष्ट्रात आहे, त्यामुळे प्रमाणपत्र राज्य सरकारचे असते.

मला आशा आहे कि आपल्याला सीसीसी कोर्स ची संपूर्ण माहिती CCC Course Information मिळाली असेल. तरीही जर काही राहिलेले असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता. आजची पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. कॉम्पुटर, इंटरनेट, तंत्रज्ञान या विषयांवर माहितीसाठी या वेबसाईट वर पुन्हा पुन्हा येत राहा.

संबंधित पोस्ट
एलएलबी (LLB) कोर्स ची संपूर्ण माहिती
बीबीए (BBA) कोर्स ची संपूर्ण माहिती
आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती
एमएसडब्लू (MSW) कोर्स ची संपूर्ण माहिती
बीएसडब्लू (BSW) कोर्स ची संपूर्ण माहिती

6 thoughts on “सीसीसी (CCC) कोर्स ची संपूर्ण माहिती”

Leave a Comment