क्रेडिट कार्ड काय आहे? (Credit Card Information in Marathi) हा प्रश्न अनेकवेळा आपल्या मनात येऊन गेला असेल. वृद्ध, तरुण किंवा विदयार्थी सर्वांचेच बँक मध्ये खाते असतात, त्यामुळे Credit Card हा शब्द अनेकदा कानी पडलाच असेल.
आपल्याला माहीतच आहे की बँक आपल्या खातेधारकांना वित्तीय देवाणघेवाण कमी वेळेत करता यावे यासाठी इंटरनेट बँकिंग, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, चेक बुक, ई अश्या सुविधा प्रदान करत असते. (Credit Card Information in Marathi) खातेधारकांना जास्तीत जास्त फायदा होईल अशी सुविधा बँक प्रदान करत असतात.
Status, Nibandh, Essay, Information in Marathi
बँक खातेधारकांसाठी अनेक सुविधा प्रदान करतात, त्यात एक सुविधा अशी असते की बँक खातेदारांना उधारी देते. होय, बँक आपल्या कस्टमर ला उधारी देते या सुविधेला क्रेडिट कार्डच्या मदतीने चालवले जाते. बँकेने दिलेली हि उधारी फेडण्यासाठी कस्टमर ला ठराविक वेळ दिला जातो. क्रेडिट कार्डचा वापर करून ही सुविधा पुरवली जाते. ही सुविधा नेमकी काय असते हे जाणून घेणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण Credit Card Information in Marathi पाहणार आहोत.
क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती | Credit Card Information in Marathi
डिजिटल बँकिंग हि बँकेद्वारे कस्टमर साठी पुरवण्यात येणारी एक सुविधा आहे. या सुविधेमुळे कमी वेळेत ऑनलाईन पद्धतीने वित्तीय देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. ही सुविधा पुरवण्यासाठी बँकेने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड असे दोन कार्ड प्रसिद्ध केलेले आहेत. डेबिट कार्ड हे व्यक्तीच्या सेविंग बँक खाते सोबत लिंक असते, (Credit Card Information in Marathi) डेबिट कार्ड वापरून पेमेंट केल्यावर व्यक्तीच्या सेविंग खात्यातील पैसे कापले जातात. याउलट क्रेडिट कार्ड चे असते, तर ते कसे? हे आपण खाली पाहुयात.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय? – What is Credit Card in Marathi
भौतिक स्वरूपात हे एटीएम कार्ड अर्थात Debit Card सारखे दिसणारे एक कार्ड आहे. क्रेडिट कार्ड हे वित्तीय संस्थांद्वारे जारी केलेले एक पातळ प्लास्टिक कार्ड आहे जे तुम्हाला ठरलेल्या ठराविक वेळेसाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देते. थोडक्यात, हे कार्ड तुम्हाला बँकेकडून ठराविक वेळेसाठी उधार पैसे उपलब्ध करून देते, जे तुम्हाला ठरलेल्या मुदत वेळेत भरावे लागतात अन्यथा व्याज भरणी करावी लागते.
Credit Card चे हे बिल भरण्यासाठी बँकेकडून पूर्व-निर्धारित वेळ असतो आणि त्यात रकमेची परतफेड करावी लागते. Credit Card प्रत्येकाला बँक देत नाही, यासाठी बँक व्यक्तीची सर्व आर्थिक माहिती घेते, सामान्य व्यक्तीला क्रेडिट कार्ड मिळणे कठीण असते परंतु नोकरी वर असलेल्या व्यक्तीला सहज दिले जाते. समोरचा व्यक्ती क्रेडिट कार्ड चे बिल भरण्यास आर्थिक द्रुष्ट्या सक्षम असेल तरच हे कार्ड दिले जाते.
तुमच्या सेविंग खात्यात रक्कम नसेल तरीही तुम्ही क्रेडिट कार्डच्या Credit Card Information in Marathi मदतीने पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डची रक्कम मर्यादा निश्चित असते आणि तुम्ही या कार्डाच्या मदतीने कोणत्याही खरेदीसाठी केवळ ठराविक रक्कम खर्च करू शकता. Credit Card हे बँकेने दिलेले कर्ज आहे ज्यातून तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला हे कर्ज दर महिन्याला बँकेला परत करावे लागेल.
क्रेडिट कार्ड कसे काम करते? – How Does Credit Card Works?
जसे की आपण वरती पाहिले आहे, Credit Card वापर्कत्यांसाठी काही रक्कम उधारीने देते ज्याचा वापर अनेक ठिकाणी करता येतो. Credit Card हे Merchant आणि प्रदाता बँकेच्या सहयोगाने कार्य करते. ज्यावेळेस कोणी बँकेकडून Credit कार्ड घेते, त्यावेळेस बँक त्या व्यक्तीला निर्धारित क्रेडिट देते. हे क्रेडिट चा वापर कसा होतो हे पाहण्यासाठी आपण How Credit Card Works हे पाहुयात.
वरती पाहिल्याप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाईन किंवा दुकानात खरेदी करण्यासाठी किंवा बिले भरण्यासाठी केला जातो. खरेदी झाल्यावर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला व्यापाऱ्याच्या POS मशीन वरती तुमचे क्रेडिट कार्ड स्वाईप करावे लागते. क्रेडिट कार्ड स्वाईप केल्यावर व्यापाऱ्याच्या म्हणजेच मर्चंट च्या बँकेला सूचना जाते व आपले क्रेडिट कार्ड ची माहिती मर्चंट च्या बँकेला मिळते. पुढे मर्चंट ची बँक आपले क्रेडिट कार्ड प्रदान केले आहे त्या बँकेला व्यवहार मंजूर करण्यासाठी सूचना पाठवते.
आता आपली क्रेडिट कार्ड प्रदाता बँक Credit Card माहिती Credit Card Information in Marathi तपासते व सर्व योग्य असेल तर पेमेंट मंजूर करते. त्यानंतर पेमेंट पूर्ण होते वर मर्चन्ट च्या खात्यात पैसे जमा होतात. पेमेंट यशस्वी झाल्यावर POS मशीन पावती तयार करते, ज्यात तुम्ही केलेल्या पेमेंट ची माहिती असते.
तुम्ही महिन्याभरात वापरलेल्या क्रेडिट ची देय तुम्हाला महिन्याच्या शेवटी भरावे लागते. त्यावेळेस एक सूची तुम्हाला मिळते, त्यात तुम्ही महिन्यात केलेल्या सर्व पेमेंट चे डिटेल असतात. देय भरण्यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त वेळ दिला जातो. जर तुम्ही देय भरण्यास उशीर केला तर काही ठराविक दरात व्याज आकारले जाते.
क्रेडिट कार्डचे प्रकार – Types of Credit Card in Marathi
क्रेडिट कार्ड अनेक ठिकाणी वापरले जातात. एअरलाइन तिकीट, रेल्वे तिकीट बुकिंग, कॅब बुकिंग, ई अश्या अनेक कार्यांसाठी हे कार्ड वापरले जाते. यामुळे या कार्ड चे काही प्रकार पडतात जे विशिष्ट कार्यांसाठी बनवलेले आहेत. तर चला आता Types of Credit Card पाहुयात.
1) Travel Credit Card
हे कार्ड अश्या लोकांसाठी आहे ज्यांना विविध ठिकाणी फिरायला जाण्यास आवड आहे. Travel Tickets साठी या कार्ड वर डिस्काउंट जातो. रेल्वे बुकिंग, एअरलाइन बुकिंग, बस बुकिंग, ई अश्या बुकिंग साठी जर या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर यात तुम्हाला ठराविक प्रमाणात डिस्काउंट, कॅशबॅक, रिडीम पॉईंट मिळतात.
2) Fuel Credit Card
वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे क्रेडिट कार्ड परवडते. वाहनात इंधन भरताना तुम्ही जर Fuel Credit Card वरून पेमेंट केले तर तुम्हाला कॅशबॅक, रिडीम पॉईंट मिळतात. पेट्रोल पंप सुद्धा क्रेडिट कार्ड धारकांसाठी Offers लावतात, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
3) Shopping Credit Card
शॉपिंग प्रेमींसाठी हे खास कार्ड आहे. ज्यांना शॉपिंग करण्याची खूप आवड आहे अश्या लोकांनी हे कार्ड घावे. यात शॉपिंग साठी तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट, कॅशबॅक, रिडीम पॉईंट दिले जातात. यासोबतच वोउचर सुद्धा असतात जे आपण नंतर वापरू शकता.
4) Secured Credit Card
ज्या व्यक्तींचा क्रेडिट स्कॉर खराब आहे किंवा खराब होण्याची शक्यता आहे त्यांनी हे कार्ड वापरावे. हे वापरल्यावर तुमचा क्रेडिट स्कॉर कमी होत नाही, यामुळे तुम्हाला लवकर कर्ज लागत असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता जास्त राहते.
5) Balance Transfer Credit Card
आपल्याला जर आपले क्रेडिट ट्रान्सफर करायचे असेल तर हे कार्ड लागते. या क्रेडिट कार्ड वर व्याज आणि पेनल्टी लागणार नाही कारण क्रेडिट ची परतफेड करण्यासाठी 6 ते 21 महिने वेळ दिला जातो. एकदा क्रेडिट ट्रान्सफर करण्यासाठी One Time Balance Transfer Fee घेतली जाते जी ट्रान्सफर करावयाच्या रकमेच्या 5% पर्यंत असू शकते.
वरती दिलेले क्रेडिट कार्ड चे काही लोकप्रिय प्रकार आहेत, याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड भारतात उपलब्ध आहेत. त्यांची माहिती आपण नंतरच्या लेखात पाहुयात.
क्रेडिट कार्डचे फायदे – Benefits of Credit Card in Marathi
Credit Card चे अनेक Advantages असतात, आपण Credit Card चा वापर जितक्या हुशारी ने कराल तितका फायदा आपल्याला होईल. Transaction करण्यासाठी Credit Card अनेक Offers प्रदान करतात, ज्यांचा योग्य वापर केल्यावर आपल्याला फायदा होऊ शकतो. Credit कार्ड चे काही महत्त्वाचे फायदे खाली स्पष्ट (Credit Card Information in Marathi) केलेले आहेत.
1) क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा असा की वापरले पैसे तुमच्या बँक खात्यातून जात नाहीत. बँकेने जी आपल्याला क्रेडिट रक्कम ठरवून दिलेली असते त्यातून हे पैसे कमी होतात. आपल्याला फक्त महिन्याच्या शेवटी Credit Restore करावे लागते.
2) हे वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा क्रेडिट स्कॉर तयार होतो जो व्यक्तीला कोणत्याही बँकेकडून त्वरित कर्ज मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. Credit Card ची परतफेड वेळेवर केली तर क्रेडिट स्कॉर चांगला राहतो आणि जर उशिरा केली ते कमी होतो.
3) हे कार्ड असेल तर तुम्ही कोणतीही मोठ्या किमतीची वस्तू EMI म्हणजेच हप्त्यावर घेऊ शकता. यामुळे आपल्या बँकेतील Savings Account मधील रक्कम तशीच राहते. एकरकमी पैसे न देता मासिक हप्त्याने पैसे फेडू शकता.
4) बहुतेक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी ऑफर देत असतात. जेव्हा तुम्ही तुमचे कार्ड स्वाईप कराल त्यापासून ते परतफेड करण्यापर्यंत तुम्हाला काही रिडीम पॉईंट्स दिले जातात ज्यांचा वापर आपण पुढील परतफेड च्या वेळेस करू शकता.
5) परतफेड करण्यासाठी देण्यात आलेला काही कालावधी व्याजमुक असतो, या कालावधीत आपल्यावर व्याज लागत नाही. 45-60 दिवसाच्या कालावधीत जर तुम्ही परतफेड केली तर तुम्हाला पुढे क्रेडिट मिळण्याची शक्यता वाढते आणि क्रेडिट स्कॉर सुद्धा चांगला राहतो.
6) आपण महिन्याभरात Credit Card च्या वरून केलेल्या सर्व पेमेंट ची नोंद असते. परतफेड करतेवेळी आपल्याला सर्व सूची दाखवली जाते व कार्ड स्वाईप करताना अलर्ट सुद्धा मिळत असतात. यामुळे आपल्याला कोणतीही शंका राहत नाही.
7) क्रेडिट कार्डमध्ये फसवणूक होण्याची शक्यता कमी असते आणि जर कदाचित झालीच तर बँकेत दावा दाखल करावा लागतो. दावा खरा ठरल्यास बँक आपल्याकडून त्या खरेदी चे शुल्क घेत नाही.
क्रेडिट कार्डचे तोटे – Disadvantages of Credit Card in Marathi
क्रेडिट कार्डचा वापर करताना जर काही चूक केली तर नुकसान होण्याची शक्यता असते. आजच्या ऑनलाईन जगात फसवणूक खूप वाढली आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीने सावध राहायला हवे. आम्ही खाली क्रेडिट कार्ड (Credit Card Information in Marathi) चे काही महत्वाचे disadvantages स्पष्ट केले आहेत.
1) क्रेडिट कार्ड आपल्याला मोठ्या प्रमाणात क्रेडिट रक्कम देतात. असे असल्यामुळे अनेकजण मर्यादा ओलांडून जास्त अनावश्यक खरेदी करतात. असे झाल्याने आपण कर्जाच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता जास्त असते.
2) हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित मानले जातात परंतु आजच्या ऑनलाईन जगात क्रेडिट कार्ड द्वारे सुद्धा फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे लोक आपली क्रेडिट कार्ड माहीती चोरू शकतात आणि तिचा दुरुपयोग करू शकतात. आपल्या कार्ड वरून जर कोणी फसवणूक करून व्यवहार केल्यास तीन दिवसांत बँकेला कळवणे आवश्यक असते.
3) क्रेडिट कार्डच्या रकमेची परतफेड करताना जर उशीर झाला तर जे व्याज लागते त्याचा दर खूप जास्त असतो, त्यामुळे आपण लक्ष देऊन परतफेड करणे आवश्यक आहे.
4) पेट्रोल, डिझेल सारखे इंधनासाठी किंवा रेल्वे बुकिंग च्या पेमेंटसाठी जर क्रेडिट कार्डचा वापर केला तर त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क भरावे लागते.
5) क्रेडिट कार्ड मधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते आणि यावर काही दराने व्याज सुद्धा लागू होते.
6) यासोबतच क्रेडिट कार्डवर काही वार्षिक दर लागू होतात जसे वार्षिक क्रेडिट कार्ड फी, परदेशी व्यवहारावरील शुल्क, रोख रक्कम काढण्यासाठी असलेले शुल्क, ई.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती
निष्कर्ष –
आजच्या लेखात आपण क्रेडिट कार्डची माहिती (Credit Card Information in Marathi) समजून घेतली आहे आणि मला आशा आहे कि तुम्हाला सर्वांना हि माहिती चांगल्या प्रकारे अवगत झाली असेल. क्रेडिट कार्ड वापरणे कायम फायदेशीरच असते, बँकेतील सेविंग खात्यातील पैसे काढण्याची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही. क्रेडिट कार्ड ने मिळालेल्या क्रेडिट वर तुम्ही सर्व खरेदी, बिल पेमेंट, तिकीट बुकिंग, ई कामे करू शकता. फक्त काळजी घ्या कि महिना झाल्यावर परतफेड करण्यास उशीर करू नका अन्यथा व्याज आकारले जाते. (Credit Card Information in Marathi)
तुम्हाला जर क्रेडिट कार्डची माहिती (Credit Card Information in Marathi) या पोस्टमध्ये काहीही शंका असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आपली अडचण आम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करुत. आजचा लेख कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. अश्याच विषयांवर अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन या वेबसाईटला पुन्हा भेट द्या. धन्यवाद!
I have a SBI VISA PLATINUM credit card. I have not activated this card. If I didn’t use this card,what will happen?? Will bank charge a penalty ?? Will bank charge any interest? Will this card be automatically cancelled??
Good information sir