एमएससीआयटी (MSCIT) कोर्स ची संपूर्ण माहिती

आजच्या 21 व्या शतकात सर्वकाही डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. सर्वकाही ऑनलाईन होत आहे, त्यामुळे आपणही डिजिटली साक्षर झाले पाहिजे आणि यासाठी कॉम्प्युटर चालवता आले पाहिजे. कॉम्पुटर ही आता काळाची गरज आहे. ज्याला कॉम्पुटर येत नाही तो माघे राहिला असे समजायला काहीही हरकत नाही.

कॉम्पुटर शिकण्यासाठी विविध संस्थेच्या वतीने अनेक कोर्स राबवले जातात, जसे CCC कोर्स. आजच्या पोस्टमध्ये आपण अश्याच एका लोकप्रिय कॉम्पुटर कोर्स ची माहिती घेणार आहोत. आज आपण MSCIT कोर्स ची माहिती घेणार आहोत. MSCIT हा कोर्स फक्त महाराष्ट्रात घेतला जातो, आणि खूप लोकप्रिय सुद्धा आहे.

एमएससीआयटी (MSCIT) कोर्स ची संपूर्ण माहिती (MSCIT Course Information in Marathi)

आजच्या लेखात तुम्हाला MSCIT कोर्स ची संपूर्ण माहिती देणार आहोत, आपल्यापैकी अनेकांना MSCIT कोर्स ची माहिती नसेल त्यामुळे या लेखाद्वारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे.

एमएससीआयटी (MSCIT) कोर्स काय आहे?

एमएससीआयटी (MSCIT) हा एक Computer Certification Course आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासन अंतर्गत चालवला जातो. एमएससीआयटी (MSCIT) हा कोर्स अश्या लोकांसाठी आहे ज्यांना माहिती तंत्रज्ञानात रुची आहे. कोर्स पूर्ण केल्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाते. एमएससीआयटी (MSCIT) कोर्स चा उपयोग कॉम्पुटर शिकण्यासाठी होतो. दहावी-बारावी झाल्यावर अनेकजण हा कोर्स करतात.

MSCIT कोर्स MKCL (Maharashtra Knowledge Corporation Limited) द्वारे चालवला जातो. 2001 मध्ये MKCL द्वारे या कोर्स ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना किंवा हा कोर्स करणारा प्रत्येक व्यक्तीला कंप्यूटर कसे चालवावे यापासून कंप्यूटर मध्ये असलेल्या विविध फंक्शन ची माहिती शिकवली जाते. हा बेसिक लेव्हल चा कोर्स आहे. या कोर्स चे प्रमाणपत्र भविष्यात नोकरीसाठी उपयोगी असते.

एमएससीआयटी (MSCIT) चा फुल फॉर्म (MSCIT Full Form)

MSCIT चा फुल फॉर्म “Maharashtra State Certificate in Information Technology” असा होतो. MSCIT चा मराठी अर्थ “महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी” असा आहे.

एमएससीआयटी (MSCIT) हा एक Computer Certification Course आहे जो महाराष्ट्र शासन अंतर्गत चालवला जातो.

कोर्सचे नावMaharashtra State Certificate in Information Technology
संस्थाMKCL
कालावधी२ ते ३ महिने
वेबसाईटhttps://www.mkcl.org/

एमएससीआयटी (MSCIT) कोर्स कसा करावा?

MSCIT कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा (Entrance Exam) नसते. MSCIT कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला ALC (Authorized Learning Centre) मध्ये जावे लागते. ALC हे सरकारकडून मान्यता असलेले learning centre असतात. यात आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो.

प्रवेश घेतल्यावर MSCIT Admission Form तुमच्याकडून भरून घेतला जातो. प्रवेश घेतल्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व जबाबदारी ALC Centre ची असते. प्रवेश घेतल्यावर आपल्याला रोज ठरलेल्या वेळेत ALC मध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. जवळपास २ ते ३ महिन्याचा हा कोर्स असतो. शेवटी एक फायनल एक्साम असते ती पास झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाते.

एमएससीआयटी (MSCIT) साठी पात्रता काय आहे?

एमएससीआयटी (MSCIT) कोर्स करण्यासाठी पात्रतेची काहीही अट नाही, हा कोर्स लहानापासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही करता येतो. सर्वजण या कोर्ससाठी पात्र असतात. सर्वसाधारणतः दहावी किंवा बारावी झाल्यावर विद्यार्थी हा कोर्स करतात. शिक्षणाची किंवा वयाची अट या कोर्ससाठी नाही. फक्त अट एवढीच आहे कि तुम्हाला माहिती तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा असली पाहिजे.

एमएससीआयटी (MSCIT) कोर्स फी किती आहे?

MSCIT कोर्ससाठीची फी 4000 ते 6000 पर्यंत असते. MSCIT-MKCL च्या वेबसाईट वरती फी बद्दल डिटेल मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आपण कोणत्या इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घेता त्यानुसार फी कमी जास्त असू शकते. सध्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला तर फी कमी असते आणि मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला तर थोडी जास्त फी लागते.

एमएससीआयटी (MSCIT) चा अभ्यासक्रम काय आहे?

MSCIT कोर्स मध्ये सुरुवातीला कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान दिले जाते. कम्प्यूटर च्या विविध भागांची ओळख करून दिली जाते. तसेच कम्प्युटर कसे चालू करायचे कसे बंद करायचे याची देखील माहिती दिली जाते.

त्यानंतर MSCIT कोर्स मध्ये पुढील विषय शिकवले जातात. एम.एस.सी.आय.टी या संपूर्ण कोर्समध्ये थेर (Theory), प्रॅक्टिकल (practical) आणि ERA शिकविले जाते.

  1. Windows 7
  2. Internet
  3. MS Word 2013
  4. MS Excel 2013
  5. MS PowerPoint 2013
  6. MS outlook
  7. ERA

निष्कर्ष –

कॉम्पुटर क्षेत्रात नवीन असणाऱ्यांसाठी MSCIT कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. Computer बद्दल बेसिक ज्ञान मिळवायचं असेल तर हा कोर्स नक्की करा. याच्या प्रमाणपत्राचा फायदाही तुम्हाला होईल. MSCIT कोर्स फक्त महाराष्ट्रात चालवला जातो, हा केल्यावर महाराष्ट्र सरकारचे प्रमाणपत्र मिळत असते.

मला आशा आहे कि आपल्याला एमएससीआयटी कोर्स ची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही जर काही राहिलेले असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता. आजची पोस्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. कॉम्पुटर, इंटरनेट, तंत्रज्ञान या विषयांवर माहितीसाठी या वेबसाईट वर पुन्हा पुन्हा येत राहा.

7 thoughts on “एमएससीआयटी (MSCIT) कोर्स ची संपूर्ण माहिती”

  1. धन्यवाद
    आणखी माहिती अशी हवी की
    अनु जाती साठी काही विशेषतः
    फी मध्ये सवलत आहे का

    Reply

Leave a Comment