इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड कशी करावी?

Instagram Story Download : इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरात 130 करोड पेक्षा जास्त इंस्टाग्राम चे वापरकर्ते आहेत. इंस्टाग्राम वापरत असाल तर आपल्याला माहितीच असेल की व्हाट्सअप्प, फेसबुक प्रमाणे इंस्टाग्राम वरती Story टाकण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. इंस्टाग्राम स्टोरी ही व्हाट्सअप्प स्टेटस सारखी असते.

WhatsApp Group Join Group

इंस्टाग्राम मध्ये आपण अनेक लोकांच्या Instagram Story पाहिल्या असतील. आपल्याला जर कोणत्या मित्राची इंस्टाग्राम स्टोरी आवडली तर आपण त्याच्याकडून मागवून घेतो, पण जर त्यांनी दिली नाही तर? त्यासाठी आमच्याकडे एक पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करणे.

होय, इंस्टाग्राम वरील स्टोरी आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घेता येते. त्यासाठी एक App ला स्मार्टफोन मध्ये इंस्टॉल करावे लागेल. ते App कोणते, त्यावरून इंस्टाग्राम स्टोरी कशी डाउनलोड करायची हे सगळे माहिती करून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

इंस्टाग्राम स्टोरी कशी डाउनलोड करावी (Instagram Story Download)

इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्यासाठी अनेक एप्स, वेबसाईट उपलब्ध आहेत. परंतु येथे आपल्याला सर्वात कमी वेळात Instagram Story Download करता येईल असा पर्याय सांगितला आहे. इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून एक एप डाउनलोड करायचे आहे. त्या पूर्ण प्रक्रियेला समजून घेण्यासाठी खालील स्टेप्स नुसार जावे.

1) सर्वात आधी Google Play Store वर जाऊन Instagram Story Downloader एप डाउनलोड करून इंस्टॉल करावे.

instagram story, video, photo download

2) आता ते एप Open करावे, सर्वात आधी ते आपल्या मोबाईल ची स्टोरेज वापरण्याची परवानगी मागते, ती परवानगी Instore ला द्यावी.

3) या स्टेप मध्ये आपल्याला आपल्या इंस्टाग्राम खात्यावर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे Instagram Login वर क्लिक करायचे आहे.

Instagram Story download

4) लॉगिन करण्याचा फायदा असा की आपण थेट या एप वरून Instagram Story पाहू शकता व डाउनलोड ही करू शकता.

5) आता आपल्याला जी Instagram Story डाउनलोड करायची आहे त्याची लिंक दिलेल्या जागेवर टाकून डाउनलोड बटन दाबायचे आहे.

instagram story, video, photo download

6) डाउनलोड वर क्लिक केल्यावर Story डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे आपण कोणतीही इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करू शकता, कोणालाही मेसेज करून मागून घेणाची गरज नाही.

Instagram Story Download कशी करायची हे आता आपण शिकला आहात. आता कोणालाही स्टोरी मागवायची गरज आपल्याला लागणार नाही, कोणतीही स्टोरी केव्हाही आता आपण डाउनलोड करू शकता. आपल्याला आजची इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्याची ट्रिक कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

आजच्या Instagram Story Download या लेखात जर नवीन काही शिकण्यास मिळाले असेल तर या पोस्ट ला व्हाट्सअप्प सारख्या सोशल मीडिया चा वापर करून मित्रांसोबत नक्की शेअर करा. या सारख्या अजून टिप्स आणि ट्रिक्स शिकण्यासाठी व आमचे लेख सर्वात आधी वाचण्यासाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईट ला Subscribe करून ठेवा. धन्यवाद!

Leave a Comment