Jio Phone Next 2021 काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मित्रांनो, आपण जर सोशल मीडिया, किंवा यूट्यूब चा वापर करत असाल तर आपल्याला आजच्या या टॉपिक बद्दल थोडी ओळख तरी असेलच. Jio Phone Next ची घोषणा २४ जून च्या जिओ च्या Annual Meeting मध्ये केली होती, तेंव्हापासून हा स्मार्टफोन चर्चेचा विषय राहिला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जिओ फोन नेक्स्ट हा जगातील सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन आहे.

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Reliance Jio आणि जगातील सर्वोत्तम कंपन्यांमधील एक कंपनी गूगल यांनी एकत्रित या फोन चा निर्माण केलेला आहे. Jio Phone Next हा Android Operating System वर चालणारा एक स्मार्टफोन असणार आहे. या स्मार्टफोन ची घोषणा झाल्यापासून अनेक चाहते याबद्दल जाणून घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी हा लेख नक्कीच वाचला पाहिजे.

आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Jio Phone Next या भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बद्दल माहिती देणार आहे. Jio Phone Next ची Features, Launch Date, Price, बुकिंग कशी करायची, ही सर्व माहिती या लेखात दिलेली आहे. तरी पूर्ण माहिती वाचल्याशिवाय येथून जाऊ नये अशी विनंती!

Jio Phone Next काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jio Phone Next हा जिओ चा नवीन येणारा आणि सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन आहे. Jio Phone Next चा निर्माण Reliance Jio आणि Google ने पार्टनरशीप मध्ये केला आहे. भारतातील हा सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन असणार आहे असे सांगितले जात आहे. स्मार्टफोन मध्ये असलेले सर्व Features या स्मार्टफोन मध्ये दिलेले आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे ४ जी स्मार्टफोन असावा या हेतूने जिओ ने Jio Phone Next चा निर्माण केला आहे.

जिओ च्या आधीच्या फोन प्रमाणे हा असणार नाही हे जाहीर झाले आहे, हा फोन पूर्णपणे स्क्रीनटच आहे. विविध एप्स आणि गेम्स डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर सुदधा यात दिलेलं आहे. अनेक ठिकाणी सांगितले जात आहे की जिओ फोन नेक्स्ट हा ५ जी स्मार्टफोन आहे, तर खरे म्हणजे हा फोन ४ जी LTE नेटवर्क प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. बाजारात आल्यावर हा फोन धुमाकूळ घालेल ने नेमके खरे आहे.

Jio Phone Next Price 2021

Jio Phone Next बाजारात येण्या अगोदरच खूप लोकप्रिय झाला आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्यावर बाजारात खूप धुमाकूळ घालणार आहे, याचे महत्त्वाचे कारण सांगितले जाते आहे की याची किंमत. जिओ ने असे सांगितले आहे की हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल.
Jio Phone Next च्या किमतीबद्दल जिओ ने अजून काहीही जाहीर नाही केलेले परंतु विविध बातम्यांच्या चॅनेल्स नुसार याची किंमत ३०००-४००० दरम्यान सांगितली जाते आहे. खरी किंमत काय आहे हे लाँच झाल्यावरच कळणार आहे त्यामुळे चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Jio Phone Next Specifications

जिओ फोन चा निर्माण जिओ आणि गूगल ने केला आहे. या फोन मध्ये आपल्याला गूगल चे काही Features पाहण्यास मिळणार आहेत. Jio Phone Next हा Android Operating System वर कार्य करणारा स्मार्टफोन आहे. इंडियन मार्केट चा विचार करून या मध्ये काही Features दिले आहेत ते खालीलप्रमाणे-

Operating SystemAndroid 11 Go Edition
ProcessorQualcomm QM215
Network4G LTE
ConnectivityBluetooth Version 4.2, Wi-fi, HotSpot
Ram2/3 Gb
GraphicsAdreno 308 GPU
Storage16/32 Gb
Battery2500mAh
Display5.5 inch HD
Camera13MP Rear / 8 MP Front

वरती दिलेल्या फीचर्स मध्ये काही बदल होऊ शकतात कारण Jio Phone Next अजून लाँच झालेला नाही.
Jio Phone Next मध्ये Augmented Reality चे फीचर्स सुद्धा आहेत. यासोबतच Voice Assistant, Language Translation, Automatic Read Loud, Screen Text, Smart Camera असे काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत.

Jio Phone Next Launch Date

Jio Phone Next ची लाँच होण्याची तारीख १० सप्टेंबर सांगण्यात आली होती, परंतु अजूनही हा स्मार्टफोन लाँच झालेला नाही. मुकेश अंबानी यांनी Reliance Jio च्या झालेल्या बैठकीत याची सूचना दिली होती, परंतु दिलेल्या तारखेनुसार स्मार्टफोन लाँच करण्यात उशीर झालेला आहे.

नवीन माहितीनुसार दिवाळी सणाच्या उत्सवात हा फोन लाँच करण्यात येईल व सणामुळे Price मध्ये Discount देण्यात येणार आहे.

Jio Phone Next Booking

वरती सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या सिजन मध्ये फोन लाँच करण्यात येईल. फोन लाँच होण्याच्या आधीच बुकिंग सुरू होणार आहे अशी सूचना Reliance कडून देण्या आलेली आहे.

असे सांगितले जाते आहे की या पुढच्या महिन्यात Jio Phone Next ची बुकिंग सुरू होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट्स जसे Amazon, Flipkart वर Jio Phone ची Booking सुविधा उपलब्ध असणार आहे.

निष्कर्ष –

तर चला मित्रांनो, आपल्याला जिओ फोन नेक्स्ट बद्दल माहिती मी दिली आहे. जिओ फोन नेक्स्ट चे Features, Price, Booking, Launch Date हे सर्व या लेखात मी तुम्हाला सांगितले आहे. आपणास लेख संबंधित काहीही शंका असेल तर कंमेंट करून विचारू शकता.
जिओ फोन ची बुकिंग अजून सुरू झालेली नाही. Booking सुरू झाल्यावर आम्ही येथे बुकिंग कशी करायची हे सांगणार आहोत, तरी त्यासाठी आपण हा ब्लॉग Subscribe करून ठेऊ शकता. आजचा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment