आपण अनेकदा BSW Course बद्दल ऐकले असेल. आपल्याला माहीतच आहे की आजच्या युगात शिक्षणाला खूप किंमत आहे. शिकलेल्या व्यक्तीलाच जास्त प्राधान्य दिले जाते. सर्वजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात करियर करत असतो.
आजच्या पोस्टमध्ये आपण BSW Course ची माहिती पाहणार आहोत. BSW बद्दल खूप कमी जणांना माहिती असते कारण हा कोर्स एवढा लोकप्रिय नाही. तर चला आता आपण BSW बद्दल माहिती घेऊयात.
BSW Course: काय आहे बीएसडब्लू (BSW) कोर्स? पात्रता, फी, आणि कसा घ्यावा प्रवेश?
आजच्या काळात तरुण पारंपारिक अभ्यासक्रम सोडून विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये आपले करियर बनवत आहेत कारण या क्षेत्रांमध्ये स्पर्धा कमी असते आणि त्यामुळे त्यांना भविष्यातील चांगल्या संधी मिळतात.आजच्या काळात सामाजिक कार्य सर्वात वेगवान आहे. करिअरचे पर्याय वाढत आहेत. यामध्ये युवक समाजासाठी चांगले काम करून स्वतःचे चांगले भविष्यही घडवत आहेत. तर चला BSW कोर्स नेमकी आहे काय हे पाहुयात.
बीएसडब्लू (BSW) कोर्स म्हणजे काय?
BSW हा ग्रॅज्युएशन पदवी Course आहे आणि हा Professional Level चा कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही बारावीनंतर करू शकता. BSW कोर्स ३ वर्षाचा आहे, परंतु वाटल्यास आपण हा कोर्स ६ वर्षात पूर्ण करू शकता. तुम्ही हा कोर्स Regular किंवा बाहेरून कसाही करू शकता. बीएसडब्ल्यू कोर्सच्या अभ्यासक्रमात समाजाचे कल्याणकारी कार्य शिकवले जाते. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था कशा चालवल्या जातात, त्यांचे काम कसे चालते. या कोर्समध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी शिकवल्या जातात आणि या कोर्समध्ये तुम्हाला समाजातील समस्यांचीही जाणीव करून दिली जाते.
BSW कोर्समध्ये तुम्हाला चांगले काम करून तुमच्या समाजातील वाईट गोष्टी आणि समाजातील लोकांच्या समस्या कशा दूर कराव्यात हे शिकवले जाते. आणि तुम्ही चांगले काम करून समाजातील लोकांना कशी मदत करू शकता, या सर्व गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातात. बीएसडब्ल्यू कोर्समध्ये, आपल्याला आपल्या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक समस्यांबद्दल आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक कल्याणकारी संस्थांबद्दल देखील शिकवले जाते.
BSW अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश सर्व तरुणांमध्ये समाजकल्याणाची भावना रुजवणे आणि प्रत्येकाला समाजकल्याणाची सर्व माहिती करून देणे हा आहे.
बीएसडब्लू (BSW) चा फुल फॉर्म
बीएसडब्लू (BSW) चा फुल फॉर्म “Bachelor of Social Work” असा होतो आणि याला मराठीत “बॅचलर ऑफ सोशल वर्क” असे म्हणतात. BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) ही एक ग्रॅज्युएशन पदवी आहे, यामध्ये समाजात येणाऱ्या नवीन समस्या आणि समाजातील लोकांना चांगले जीवन कसे प्रदान करता येईल याबद्दल शिकवले जाते.
बीएसडब्लू (BSW) कोर्स कसा करावा?
Bachelor of Social Work हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. BSW Course मध्ये प्रवेश मिळवण्याचे 2 मार्ग आहेत, प्रथम मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या 12 वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश मिळवू शकता, दुसरे म्हणजे तुम्ही Entrance Exam द्वारे प्रवेश मिळवू शकता.
१) बीएसडब्ल्यू कोर्समध्ये प्रवेश घेण्याचा पहिला मार्ग म्हणजे तुमचा बारावीमध्ये खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे कारण बारावीच्या गुणांच्या आधारे तुम्हाला बहुतेक कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. जर तुम्हाला बारावी मध्ये चांगले मार्क्स असतील तर अगदी सहजपणे तुमचे चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन होऊन जाईल.
२) दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही प्रवेश परीक्षेद्वारेही प्रवेश घेऊ शकता. तुम्ही पप्रवेश परीक्षेची तयारी तुमच्या १२ वीपासूनच सुरू करू शकता.
अनेक महाविद्यालये त्यांच्या कॉलेज मध्ये ऍडमिशनसाठी प्रवेश परीक्षा घेतात, त्यामुळे जर तुम्हाला BSW Course साठी प्रवेश घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतरच या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल.
बीएसडब्लू (BSW) कोर्ससाठी पात्रता
१) BSW कोर्स हा ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स आहे आणि हा कोर्स करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता अशी आहे की तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी केलेली असावी. बारावीत शाखा कोणतीही असेल तरी चालते.
२) बीएसडब्लू (BSW) या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला १२ वीच्या परीक्षेत किमान ५०% गुण मिळणे आवश्यक आहे.
बीएसडब्लू (BSW) कोर्सची फी
BSW Course ची फी यावर निर्धारित असते कि तुम्हाला कोर्स खाजगी कॉलेज मधून करायचा आहे का सरकारी कॉलेज मधून करायचा आहे. जर तुम्हाला सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर फी कमी लागते.
BSW Course जर आपल्याला खाजगी कॉलेज मधून करायचा असेल तर जास्त फी लागते. या कोर्ससाठी १० हजार ते ३० हजार पर्यंत फी असते.
बीएसडब्लू (BSW) केल्यानंतरच्या संधी
बीएसडब्ल्यू कोर्स (BSW Course Information in Marathi) हा सामाजिक कार्याचा अभ्यासक्रम आहे. हा कोर्स केल्यानंतर तरुणांना भरपूर संधी मिळतात, आज आपल्या देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक समुदाय मानवी हक्क आणि मानवी समाजाच्या विकासासाठी काम करत आहेत आणि यामध्ये अनेक चांगल्या संधी आणि नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. BSW केल्यावर खालील सरकारी विभागात काम करण्याची संधी असते –
- Counselling Sector
- Old Age Home
- Government Hospital
- NGO
- HR Industries Department
- Human Rights Agency
बीएसडब्लू कोर्स केल्यावर तुम्ही पुढे एमएसडब्लू (MSW) कोर्स करू शकता. एमएसडब्लू (MSW) कोर्स ची माहिती येथे वाचा.
निष्कर्ष –
आपल्याला आजची बीएसडब्लू (BSW) कोर्स ची संपूर्ण माहिती ही पोस्ट खूप आवडली असेल. मला आशा आहे की आपल्याला BSW Course ची माहिती पूर्णपणे समजली असेल. आपल्याला मनात BSW संबंधित कोणतीही शंका आता राहिली नसेल असे मला वाटते आणि जरी शंका असेल तर खाली कंमेंट करून विचारा.
BSW Course Information या पोस्टमध्ये आपल्याला काही नवीन आणि महत्वाची माहिती मिळाली असेल तर ही पोस्ट आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. अजून कोणत्याही कोर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर कंमेंट करून सांगू शकता. शैक्षणिक, करियर संबंधित अधिक माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगवर पुन्हा नक्की या.
BSW Course समाजात कोणत्या समाज सेवा आपण करु शकतो म्हणजे बाल अधिकार विधवा बायकाट अधिका
दहावी नंतर Bsw करता येतो का
अन्यथा दुसरा कोणता समाज सेवा कोर्स आहे का?
B.a.f.y. fail cya tc vr bsw corse krta yety ka
nahi
खूप छान समजावून सांगितले
धन्यवाद!
मला कलेक्टर होउन समाजातील सर्व घटकांना एकत्र करून त्याची मदत करायची आहे म्हणून मी हा कोर्स पूर्ण करीत आहे.
Khup chan
Nakkich honar tumhi
१२th la ८१%ahet mla Admision milel ki nahi…
100%