ब्लॉगिंग हे कल्पना व्यक्त करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर माहिती शेअर करण्यासाठी एक आवश्यक माध्यम बनले आहे. ब्लॉग पोस्ट चांगली आणि आकर्षक दिसण्यासाठी एक मुख्य घटक म्हणजे त्यात Images चा वापर करणे.
तुम्ही अनुभवी ब्लॉगर असाल किंवा नुकतेच सुरुवात करत असाल, तर तुम्हाला माहित असेलच की ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image जोडल्याने User Experience लक्षणीयरीत्या वाढवू शकतो आणि तुमचे Content अधिक आकर्षक दिसू लागते, त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण ब्लॉगर ब्लॉगमध्ये Images कश्या जोडायच्या हे शिकून घेऊयात.
ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image कशी जोडायची?
ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image कशी जोडायची हे जाणून घेण्यापूर्वी ब्लॉगमध्ये यांचे महत्त्व ओळखणे महत्त्वाचे आहे. Images केवळ तुमच्या ब्लॉग पोस्टला सुंदर बनवतात असे नाही तर अनेक महत्त्वपूर्ण हेतू देखील पूर्ण करतात:
- उच्च-गुणवत्तेच्या Images तुमच्या वाचकांचे लक्ष वेधून घेऊ शकतात आणि संपूर्ण लेखात त्यांना व्यस्त ठेवू शकतात.
- Images तुमच्या Content ला पूरक ठरू शकतात, ज्यामुळे कठीण संकल्पना समजण्यास सोपे होते.
- आकर्षक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाण्याची अधिक शक्यता असते, ज्यामुळे तुमच्या ब्लॉगची लोकप्रियता वाढते.
ब्लॉगर ब्लॉगमध्ये Images जोडण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
१) सर्वात आधी आपल्या ब्लॉगर अकाउंट वरती लॉगिन करा आणि आपल्या ब्लॉगच्या डॅशबोर्ड वरती जा.
२) आता ज्या पोस्टमध्ये Image टाकायची आहे ती ओपन करा किंवा Create New Post वरती क्लिक करा.
३) जेथे Image जोडायची आहे तेथे कर्सर नेऊन Insert Image बटन वरती क्लिक करा.
४) आता आपल्याला जी Image टाकायची आहे ती अपलोड करा, यासाठी तुम्ही Google Photos वापरू शकता किंवा Image ची URL टाकू शकता.
५) Image अपलोड झाल्यावर त्याला alt text टाका, alt text हे SEO साठी महत्वाचे असते. अश्या प्रकारे तुम्ही ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image add करू शकता.
आपल्या ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image जोडल्याने त्याचे visual appeal वाढते, वाचकांना ब्लॉगवर व्यस्त ठेवता येते, म्हणजेच User Experience सुधारतो. या ब्लॉग पोस्ट मध्ये देण्यात आलेल्या स्टेप्स चे अनुसरण करून, आपण आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये Images समाविष्ट करू शकता.
Images हव्या तितक्या प्रमाणात तयार करा, त्यांना चांगल्या प्रकारे Edit करा, मोबाइलवर image कश्या दिसता हे तपासा, आणि कॉपीराइट येणार नाही याची काळजी घ्या. तर चला आजची पोस्ट कशी वाटली कमेंट करून कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !