एसईओ (SEO) म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजच्या इंटरनेटच्या युगात, कोणत्याही व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी एक चांगली वेबसाइट असणे आवश्यक आहे. परंतु, केवळ वेबसाइट असून चालणार नाही. ती वेबसाइट सर्च इंजिनमध्ये वरच्या क्रमांकावर असणे आवश्यक आहे. वेबसाईट ला सर्च इंजिन वरती रँक करणे महत्वाचे असते. ब्लॉगिंग क्षेत्रात यासाठी एक संकल्पना असते ज्याला SEO म्हणतात. आज आपण SEO ची माहिती, SEO चे प्रकार, SEO करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, याबद्दल माहिती घेणार आहोत.

आपण जेव्हा एखादा शब्द किंवा प्रश्न गुगल सारख्या सर्च इंजिन वरती सर्च करतो, तेव्हा त्या प्रश्नाशी संबंधित तुमची वेबसाइट सर्च इंजिनच्या यादीत सर्वात वरती यावी, यासाठी जी प्रक्रिया करावी लागते त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) असे म्हणतात. सोप्या भाषेत SEO म्हणजे, तुमच्या वेबसाइटला सर्च इंजिनमध्ये अधिक चांगल्या क्रमांकावर आणण्याची प्रक्रिया. तर चला SEO बद्दल खोलवर जाणून घेऊयात.

SEO (Search Engine Optimization)

एसईओ (SEO) म्हणजे काय?

Search Engine Optimization (SEO) हि एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुमच्या वेबसाईट किंवा ऑनलाईन कंटेंटला सर्च इंजिन रँक पोजिशन (SERP) मध्ये एक नंबरला आणले जाते. आपण जेव्हा सर्च इंजिन (जसे गुगल, बिंग, याहू) वरती काही सर्च करतो तेव्हा ते आपल्या सर्चशी संबंधित काही पेज ची आपल्याला दाखवते आणि त्या यादीत वरती येण्यासाठी वेबसाईटचा SEO चांगला असावा लागतो.

SEO मध्ये वेबसाईट च्या कंटेंट ची गुणवत्ता, किवर्डस ची रचना, बॅकलिंक, वेबसाईट स्पीड, ई कडे लक्ष देणे आवश्यक असते. कीवर्ड रिसर्च अचूकपणे करून ते पोस्टमध्ये नैसर्गिकरित्या समाविष्ट केले पाहिजेत. तसेच, तुमच्या साइटवरून इतर उच्च-गुणवत्तेच्या वेबसाइट वरती चांगले लिंक्स असणे आवश्यक आहे. SEO हा एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि तुमच्या साइटला सर्च इंजिन निकालांच्या शीर्षस्थानींवर ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

SEO का महत्वाचे आहे?

ब्लॉग किंवा वेबसाइटचा उद्देश लोकांना सेवा किंवा माहिती प्रदान करणे आहे. तुम्ही मेहनत करून बनवलेला ब्लॉग सर्च इंजिन मध्ये दाखवण्यासाठी SEO करणे आवश्यक आहे. SEO शिवाय, ब्लॉग शोध इंजिन परिणामांमध्ये दिसणार नाही. अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शोध इंजिन ऑप्टिमायझेशन आवश्यक आहे.

हे का महत्त्वाचे आहे? कारण Search Engine च्या पहिल्या पेजवर येणार्‍या वेबसाइट्सवर सर्वाधिक क्लिक्स होतात. म्हणजेच, तुमची वेबसाइट शोध इंजिन परिणामांमध्ये वर येते तशी तुमच्या वेबसाइटवर येणार्‍या लोकांची संख्या वाढते.

गुगलवर ब्लॉगला रँक करण्यासाठी तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन समजणे सोपे जाईल, परंतु ते काळजीपूर्वक केले पाहिजे. पद्धतशीरपणे काम करून, ब्लॉगला पटकन रँक करता येते. ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल तर SEO शिकणे आवश्यक आहे.

सर्च इंजिन काय असते?

Search Engine हा एक प्रोग्राम आहे जो इंटरनेटच्या अमर्यादित डेटाबेसमधून युजरचा प्रश्न (Keyword/Phrase) शोधतो आणि शोध परिणाम पेज ज्याला Search Engine Result Page (SERP) वरती त्याच्याशी संबंधित माहिती युजरला दाखवतो, जसे गुगल करते. प्रत्येक प्रश्न वर्ल्ड वाइड वेब (WWW) वर शोधला जातो.

इंटरनेटवर काहीही सर्च केले तर त्याबद्दल योग्य माहिती दाखवण्याचे काम सर्च इंजिन करत असते. Google, Yahoo, Bing हि काही लोकप्रिय सर्च इंजिन आहेत. SEO बद्दल समजण्याआधी सर्च इंजिन काय असते हे माहित असायला हवे. तर आता आपण सर्च इंजिन कसे कार्य करतात हे पाहुयात.

सर्च इंजिन कसे कार्य करतात?

शोध इंजिन च्या कार्यप्रणाली बद्दल बोलायचे झाले तर, सर्च इंजिनचे स्वतःचे अल्गोरिदम असतात. जेव्हा आपण सर्च इंजिनवर काहीही शोधतो तेव्हा सर्च इंजिन अल्गोरिदमद्वारे त्यांच्या वापरकर्त्यांना अचूक माहिती देऊ शकतात. सर्च इंजिन तीन चरणात कार्य करतात ते खालीलप्रमाणे –

  • क्रॉलिंग (Crawling) सर्वात आधी सर्च इंजिन हे इंटरनेट वरती उपलब्ध असलेल्या वेबसाईट स्कॅन करतात. त्यासाठी सर्च इंजिन चे (bots) वेबसाइटवर येऊन पेजेस स्कॅन करून रेकॉर्ड करतात त्या प्रक्रियेला क्रॉलिंग असे म्हणतात. वेबसाईट बद्दल माहिती गोळा करण्यासाठी हि प्रक्रिया केली जाते, याच्या आधारे वेबसाईट इंडेक्स आणि रँक केली जाते.
  • इंडेक्सिंग (Indexing) – दुसऱ्या स्टेप मध्ये सर्च इंजिन वेबसाइटवरील मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ इत्यादी माहिती सर्च पेज च्या यादीत जोडतात त्याला इंडेक्सिंग म्हणतात. सोप्या भाषेत गूगल वरती वेबसाईट येणे म्हणजे इंडेक्सिंग होय.
  • रँकिंग (Ranking) वेबसाईट इंडेक्स झाल्यावर रँकिंग ची प्रक्रिया सुरु होते. शोध इंजिन युजर ने सर्च केलेल्या विषयाशी संबंधित असलेल्या वेबसाइट्सची यादी तयार करते, हि यादी विविध रँकिंग घटकांच्या आधारावर बनवली जाते. युजर जेव्हा कोणती माहिती सर्च करतो त्यावेळी त्याला हि यादी दर्शवली जाते.

SEO चे प्रकार

ब्लॉगिंग असो किंवा डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात SEO किती मोठी भूमिका बजावते हे तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेल. म्हणूनच प्रत्येक ब्लॉगरसाठी SEO खूप महत्त्वाचा आहे. अशा अनेक पद्धती आहेत ज्या वापरून आपण SEO सुधारू शकतो. तर, आता SEO चे प्रकार कोणते आहेत हे जाणून घेऊया. SEO चे प्रकार खालीलप्रमाणे –

On-Page SEO

ऑन पेज एसईओ हा तुमच्या वेबसाईट वर करावा लागतो. यात तुमच्या वेब पेज मधील सर्व घटकांना सर्च इंजिनच्या दृष्टीने आकर्षक बनवायचे असते. यात तुमच्या पोस्ट च्या विषयाशी संबंधित कीवर्ड्स शोधून त्यांची योग्य ठिकाणी Placement करणे, Informative आणि Engaging Content लिहिणे, आकर्षक Images बनवणे, आणि वेबसाइटची रचना User Friendly बनवणे या गोष्टींचा यात समावेश असतो.

ही सर्व कामे करून सर्च इंजिनला तुमची वेबसाइट नेमकी कशाबद्दल आहे हे समजते आणि यामुळे वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात Organic Traffic मिळू शकते. म्हणजे लोकांना स्वतःहून तुमच्या वेबसाइटवर येण्याची इच्छा होईल आणि वेबसाईट अधिक लोकांपर्यंत पोहचेल. ऑन पेज एसईओ तुमच्या वेबसाइटचा पायाच असतो, त्यामुळे सर्वात पहिले वेबसाईट चा पाया मजबूत असायला हवा.

Off-Page SEO

Off Page SEO ला Off Site SEO देखील म्हणतात. Off-Page SEO मध्ये साइटच्या बाहेर केलेल्या सर्व गोष्टींचा समावेश होतो, जे वेबपेजचे रँकिंग वाढविण्यात मदत करतात आणि ज्याद्वारे साइटचा प्रचार केला जातो. लिंक बिल्डिंग, ब्लॉग कंमेंटिंग, गेस्ट पोस्टिंग अशी अनेक प्रकारची कामे यामध्ये केली जातात. बॅकलिंक बिल्डिंग हा यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

कालांतराने, सुरुवातीपासून आतापर्यंत ऑफ-पेज एसइओ पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. कोणत्याही वेबसाइटच्या SERP मध्ये टॉप रँकिंग मिळविण्यासाठी, तुम्हाला अल्गोरिदमच्या नियमांचे पालन करून ऑफ पेज एसइओ योग्यरित्या करावे लागते. हे आपल्या वेबसाइटवर येणारे ट्राफिक वाढवण्यासाठी आवश्यक असते.

Technical SEO

Technical SEO मध्ये आपल्याला ब्लॉग किंवा वेबसाइटच्या तांत्रिक समस्या सोडवाव्या लागतात. तुमच्या ब्लॉगमध्ये काही गंभीर तांत्रिक समस्या असल्यास सर्च इंजिन तुमच्या ब्लॉगला सर्च इंजिनमध्ये रँक करत नाही. यामुळे ब्लॉग गूगल आणि इतर सर्च इंजिन वरती रँक करत नाही आणि हवे तसे ट्राफिक येत नाही.

Technical SEO करण्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक ज्ञान घेणे आवश्यक आहे. हे शिकण्यासाठी युट्युब विडिओ बघणे फायद्याचे ठरेल. Technical SEO मध्ये तुम्ही मुख्यत्वे SSL, Mobile Responsiveness, Crawling, User Frindlyness, Website Speed, संबंधित समस्यांचे सोडवता आल्या पाहिजेत.

SEO संबंधित महत्वाचे शब्द

एसईओ (SEO) शिकण्याआधी आपल्याला SEO शी संबंधित असलेले काही नवीन शब्दांबद्दल माहिती असायला हवे. त्यामुळे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन समजणे सोपे जाईल. प्रत्येक ब्लॉगर ला खालील शब्द माहिती असायला हवेत.

  • किवर्ड (Keyword) – एका किंवा अधिक शब्दांचा समूह ज्याचा वापर लोक सर्च इंजिन वरती सर्च करताना करतात. तुमच्या वेबसाइटवरील माहितीमध्ये(Content) या किवर्ड्सचा समावेश करणे महत्वाचे आहे.
  • किवर्ड रिसर्च (Keyword Research) – लोक सर्च इंजिन नेमके काय शोधतात हे समजून घेण्यासाठी केलेले संशोधन म्हणजे कीवर्ड रिसर्च. वेबसाइटवर अशा किवर्ड्सचा वापर करणे ज्यांचा वापर लोक सर्च इंजिन वरती माहिती मिळवतात.
  • कंटेंट (Content) – Content म्हणजे तुमच्या वेबसाइटवरील माहिती होय जसे पोस्ट, इमेज, व्हिडिओज इत्यादी. ही माहिती उच्च दर्जाची, माहितीपूर्ण आणि तुमच्या किवर्ड्सशी संबंधित असावी.
  • कंटेंट ऑप्टिमायझेशन (Content Optimization) – तुमचे Content सर्च इंजिन आणि वापरकर्ते या दोघांसाठीही उपयुक्त बनवण्याची प्रक्रिया म्हणजे कंटेंट ऑप्टिमायझेशन होय.
  • बॅकलिंक (Backlink) इतर वेबसाइट्स तुमच्या वेबसाइटला लिंक करणे म्हणजे बॅकलिंक बनवणे. हे सर्च इंजिनला सांगते की तुमची वेबसाइट विश्वसनीय आहे आणि उपयुक्त माहिती प्रदान करते.
  • SERP (Search Engine Results Page) – जेव्हा तुम्ही Google, Bing, किंवा Yahoo सारख्या सर्च इंजिनवर काही शोधता तेव्हा तुम्हाला मिळणारे पानांवर असलेल्या निकालांना SERP असे म्हणतात.
  • मेटा डिस्क्रिप्शन (Meta Description) – शोध इंजिन निकालांवर (result) दिसणारा तुमच्या वेबपृष्ठाचा (webpage) थोडक्यात सारांश (sārānsh). हे वापरकर्त्यांना सांगते की तुमचे वेबपृष्ठ कोणत्या विषयावर आहे.
  • साईट मॅप (Sitemap) – वेबसाइटच्या सर्व Pages आणि त्यांच्यातील संबंधांची यादी म्हणजेच साइटमॅप (Sitemap) असे आहे. तुमच्या वेबसाईटवर असलेली प्रत्येक पानाची माहिती Search Engines जसे की Google ला सांगण्यासाठी साइटमॅपचा वापर केला जातो.

या शब्दांवरून SEO ची मूलभूत समज येईल. SEO विषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करावा. युट्युब वरती खूप माहिती उपलब्ध आहे ज्याच्या मदतीने तुम्ही शिकू शकता.

निष्कर्ष

आज मी तुम्हाला या लेखात SEO (Search Engine Optimization) बद्दल तपशीलवार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, या पोस्टद्वारे मी तुम्हाला SEO म्हणजे काय, वेबसाईट साठी हे का गरजेचे असते, SEO चे प्रकार, SEO Ranking Factors बद्दल सांगितले आहे.

आजच्या या लेखातून तुम्हा सर्वांना काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल अशी अपेक्षा आहे, या लेखाबाबत काही अडचणी किंवा शंका असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन.

ब्लॉगिंग आणि SEO संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट वरती पुन्हा येत राहावे. धन्यवाद.

Leave a Comment