Instagram Online Status Hide – आजच्या काळात प्रत्येकजण इंस्टाग्राम चा वापर करत आहे. इंस्टाग्राम मध्ये आपण आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी जोडलेले असतो. काही वेळा असे असते कि तुम्हाला ऑनलाइन यायचे असते परंतु कोणाला कळले नाही पाहिजे कि तुम्ही ऑनलाईन आहात. तर हे कसे करायचे हे मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगणार आहे . तर मी तुम्हाला सांगणार आहोत की इंस्टाग्राम वर ऑनलाईन असताना ऑफलाईन कसे दिसावे?
सर्व प्रथम, तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जर तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम चे Last Seen बंद करायचे असेल, तर असे केल्याने तुम्हीही तुमच्याशी कनेक्ट असलेल्या तुमच्या मित्रांचे Last Seen आणि Online Status पाहू शकणार नाही. ते किती वाजता ऑनलाइन आहेत हे तुम्हाला कळणार नाही आणि तुमचे त्यांना कळणार नाही. तर चला आता जास्त वेळ न लावता Instagram Online Status Hide कसे करायचे? हे पाहुयात.
Instagram Online Status Hide कसे करायचे?
आपल्याला इंस्टाग्राम वर ऑनलाईन असताना ऑफलाइन कसे दिसायचे किंवा इंस्टाग्रामवर Last Seen/Online Status कसे लपवायचे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
१) सर्व प्रथम तुम्हाला तुमचे Instagram ओपन करायचे आहे. आणि खालच्या कोपर्यात प्रोफाईल आयकॉन वरती क्लिक करायचे आहे.
२) यानंतर तुमचे प्रोफाइल तुम्हाला दाखवले जाईल. यामध्ये वरच्या उजव्या बाजूला तीन Line दिसतील, त्यावर क्लिक करावे.
३) आता Settings and Privacy हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
४) सेटिंग्ज पर्यायावर क्लिक केल्यानंतर, Messages and story replies हा पर्याय शोधा आणि पर्यायावर क्लिक करा.
५) आता Messages and story replies मधील Show Activity Status पर्यायावर क्लिक करा.
६) आणि इंस्टाग्राम Last Seen Hide करण्यासाठी Toggle बटन Off करा.
हे बटन बंद केल्यावर तुम्ही इंस्टाग्राम वरती ऑनलाईन असला तरी कोणाला कळणार नाही. अश्या प्रकारे वरील स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे Instagram Last Seen लपवू शकता. आजची पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा.