ब्लॉगर (Blogger.com) काय आहे, जाणून च्या संपूर्ण माहिती

मित्रांनो, आपण जर ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याकडे असलेले ज्ञान इंटरनेट च्या माध्यमातून प्रसारित करून त्यावरून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर Blogger.com या Blogging Platform बद्दल आपल्याला माहिती असायला हवी.

ब्लॉग हा वेबसाईटचाच एक प्रकार असतो. तुम्हाला जर विनामूल्य, एकही रुपया खर्च न करता ब्लॉग बनवायचा असेल तर ब्लॉगर हे एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. ब्लॉगर हे गुगल च्या मालकीचे Content Management Platform (CMS) आहे. यावर फ्री मध्ये ब्लॉग बनवता येतो, यासाठी गुगल अकाउंट ची आवश्यकता असते.

ब्लॉगर (Blogger.com) काय आहे, जाणून च्या संपूर्ण माहिती

आजच्या पोस्टमध्ये आपण Blogger.com ची माहिती घेणार आहोत. ब्लॉगर काय आहे, याचा इतिहास, फायदे, नुकसान आणि यावर ब्लॉग कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य महितीकडे वळूयात.

ब्लॉगर (Blogger.com)

Blogger हे एक फ्री Blog Publishing Platform आहे, याच्या मदतीने ब्लॉग बनवून यावर Text, Image, Videos, ई शेअर केले जाऊ शकते. आपल्याजवळ असलेले ज्ञान, लेखन कौशल्य ब्लॉगच्या मदतीने इतरांपर्यंत पोहोचवता येते. ब्लॉगर तुम्हाला ब्लॉग बनवण्यात वर तो चालवण्यात मदत करते. या Tool मुळे ब्लॉग बनवण्यासाठी Coding ची आवश्यकता राहिलेली नाही. Blogger, WordPress सारख्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे सर्व Automatic झालेले आहे.

ब्लॉगर वरती ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याकडे Google Account असणे अनिवार्य आहे. पोस्ट च्या शेवटला ब्लॉग कसा बनवायचा हे दिलेले आहेच. Blogger हे गुगल चे असल्यामुळे सुरक्षित आहे आणि फ्री सुद्धा आहे. वापरायला अगदी सोपे, फ्री आणि सुरक्षित असल्यामुळे हे लोकप्रिय Platform आहे. ब्लॉगिंग क्षेत्रात असलेल्या प्रत्येकाने एकदातरी हे वापरलेलेच असेल.

इतिहास

Blogger.com आजच्या काळात एक लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून समोर आले आहे. याची सुरुवात 1999 मध्ये Pyra Labs कंपनीने केली होती. 23 ऑगस्ट 1999 मध्ये Pyra Labs कंपनी हे ब्लॉगर लाँच केले. त्याआधी एकही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला ब्लॉगर चे नाव Blogspot.com हे होते.

यानंतर थोड्याच काळाने म्हणजे फेब्रुवारी 2003 मध्ये Google कंपनी ने Pyra Labs काढून हे विकत घेतले आणि Users साठी फ्री करून टाकले. गुगलने याचे नाव Blogspot.com वरून Blogger.com असे बनवले. ब्लॉगर मध्ये ब्लॉग बनवल्यावर जे सबडोमेन मिळते ते Blogspot.com ठेवलेले आहे.

वैशिष्ट्ये

ब्लॉगिंग क्षेत्रात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकदातरी ब्लॉगर वापरलेच असते. हे प्लॅटफॉर्म इतके लोकप्रिय का झाले? याच्यामागचे कारण आहे याची वैशिट्ये, ज्यामुळे हे इतर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म च्या तुलनेत खास आहे. तर चला हि वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत ते पाहुयात.

१) पूर्णपणे मोफत –

Blogger.com आजच्या काळात एक लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून समोर आले आहे. याची सुरुवात 1999 मध्ये Pyra Labs कंपनीने केली होती. 23 ऑगस्ट 1999 मध्ये Pyra Labs कंपनी हे ब्लॉगर लाँच केले. त्याआधी एकही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला ब्लॉगर चे नाव Blogspot.com हे होते.

यानंतर थोड्याच काळाने म्हणजे फेब्रुवारी 2003 मध्ये Google कंपनी ने Pyra Labs काढून हे विकत घेतले आणि Users साठी फ्री करून टाकले. गुगलने याचे नाव Blogspot.com वरून Blogger.com असे बनवले. ब्लॉगर मध्ये ब्लॉग बनवल्यावर जे सबडोमेन मिळते ते Blogspot.com ठेवलेले आहे.

2) फ्री डोमेन नेम –

ब्लॉगर वरती ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला डोमेन नेम सुद्धा देण्यात येते. येथे blogspot.com चे सब-डोमेन देण्यात येते, आणि हे पूर्णपणे फ्री असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या डोमेन वरती तुम्ही Google Adsense Approval घेऊ शकता. हे फ्री सब-डोमेन सोडून बाकी कोणत्याच फी सब-डोमेन ला Google Adsense मान्य करत नाही.

3) कस्टम डोमेन –

ब्लॉगर वरती ब्लॉग बनवल्यावर तुम्हाला yoursite.blogspot.com असे डोमेन नेम फ्री देण्यात येते. पण जर तुम्हाला वाटले की तुमचे डोमेन नेम yoursite.com असे असावे. तर हे करण्याची सोय Blogger मध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी Custom Domain विकत घेऊन तुम्ही ते DNS Setting च्या मदतीने Blogger ला कनेक्ट करू शकता.

4) कस्टम डिजाईन –

ब्लॉग सुंदर दिसण्यासाठी ब्लॉगरमध्ये काही Templates दिलेले आहेत, त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा इंटरनेट वरती हजारो Blogger Templates आहेत आणि ते फ्री आहेत. आपण अनेक Templates वापरून योग्य ते निवडू शकता. हे Templates Install करून तुम्ही त्यात Customization म्हणजे बदल करू शकता.

5) सुरक्षा –

इंटरनेट च्या विश्वात सर्वात जास्त धोका हा Hackers पासून असतो. वेबसाईट जर हॅक झाली तर सर्व मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. Blogger.com मध्ये ही समस्या उदभवत नाही, कारण Blogger हे गुगलच्या सर्व्हर वरती आहे आणि सर्वांना माहीतच आहे की Google ची Security इतकी Strong आहे की याला कोणीही सहसा तोडू शकत नाही.

6) वापरण्यास सोपे –

ब्लॉगर हे नवीन ब्लॉगर्ससाठी अगदी बरोबर आहे. जर आपण वर्डप्रेस चा विचार केला तर यात Plugins, SEO, Speed साठी खूप खटाटोप करावा लागतो आणि यामुळे हे खूप किचकट होऊन जाते. ब्लॉगर मध्ये असे जास्त पर्याय नाही त्यामुळे ब्लॉगिंगमध्ये नवीन असणाऱ्या सर्वांसाठी ब्लॉगर बेस्ट आहे.

तोटे

प्रत्येक गोष्टीची एक नकारात्मक बाजू सुद्धा असते, त्यामुळे काही लोक त्यापासून लांब जातात. ब्लॉगर वापरण्याची काही तोटे सुद्धा आहेत त्यामुळे अनेकजण ब्लॉगर सोडून WordPress वरती जातात. ते खालीलप्रमाणे-

1) स्पीड –

ब्लॉगर वरच्या ब्लॉग ची स्पीड कमी असते, ती वाढवता येणे शक्य आहे परंतु स्पीड 90 च्या पुढे जात नाही. ब्लॉगरमध्ये स्पीड वाढवणे खूप कठीण आहे, त्यासाठी तुम्हाला कोडिंग यावी लागते. यामुळे बरेचसे लोक ब्लॉगर वरून वर्डप्रेस वरती शिफ्ट होतात. वर्डप्रेस वरती काही Plugins आहेत, जसे WP Rocket ज्याच्या मदतीने आपण अगदी सहजपणे Site speed वाढून 100 वरती नेऊ शकता.

2) SEO –

ब्लॉग रँक करण्यासाठी ब्लॉगचा SEO व्यवस्थितपणे करावा लागतो. ब्लॉगरमध्ये SEO Friendly Article लिहणे सोपे आहे परंतु यासाठी SEO चे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. वर्डप्रेस च्या बाबतीत जर तुम्हाला SEO येत नसेल तरीही तुम्ही SEO करू शकता. त्यासाठी वर्डप्रेस मध्ये Plugins दिलेले आहेत, ते SEO करण्यात मदत करतात आणि पोस्टचा SEO Score सुद्धा हे दाखवला जातो.

3) Customization –

ब्लॉगर मध्ये ब्लॉगची डिजाईन चांगली होत नाही असे नाही, परंतु याला लिमिट आहे. जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग मध्ये अनुभवी होत जाल तसे ब्लॉगर ची डिजाईन कमी वाटू लागेल. वर्डप्रेस वरती ब्लॉगरपेक्षा जास्त पर्याय आहेत त्यामुळे थीम चांगली डिजाईन करता येते.

4) इतर –

ब्लॉगर वापरण्याचे इतर काही तोटे –
1) एका Gmail Account वरती 100 ब्लॉगची लिमिट आहे.
2) WordPress प्रमाणे Plugins ची सुविधा नाही.
3) URL चा फॉरमॅट बदलता येत नाही.
4) ब्लॉगचा पूर्ण Access मिळत नाही, त्यामुळे ब्लॉगचा पूर्ण ताबा आपल्याकडे नसतो.
5) आपण जर Blogger Content Policy चे उल्लंघन केले तर आपला ब्लॉग डिलीट करण्यात येतो.

निष्कर्ष –

आता आपल्याला ब्लॉगर या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की आपल्याला सर्व माहिती योग्यरीत्या समजली असेल. ब्लॉगिंग संबंधित कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर मला नक्की कळवा.

तुम्हाला जर आजची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. ब्लॉगिंग, SEO बद्दल नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्या या ब्लॉगला पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद!

Leave a Comment