ब्लॉगर मध्ये मेनू कसा तयार करावा?

ब्लॉग वर येणाऱ्या युजर्स ला टिकवून ठेवण्यासाठी ब्लॉग चे Navigation चांगले असावे लागते, त्यामुळे युजर्स ला हवी ती माहिती शोधण्यास सोपे जाईल व यूजर सहजपणे ब्लॉग वाचू शकेल.

आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट चे Navigation चांगले बनवण्यासाठी Menu आवश्यक असतो, कारण मेनू हाच एक पर्याय आहे ज्याने यूजर हवी ती माहिती कमी वेळात मिळवू शकेल.

वेबसाईट साठी उपयुक्त असलेला Menu हा एक घटक आहे, यामुळे आजच्या या लेखात आपण ब्लॉगर (Blogger.com) ब्लॉगमध्ये मेनू कसा बनवायचा हे शिकणार आहोत.

ब्लॉगर मध्ये मेनू कसा तयार करावा?

आपण शक्यतो Blogger. com वरती ब्लॉग बनवलेला असेल, या लेखात ब्लॉगर वर मेनू बनवायला आपण शिकून घेऊत, How to add Menu in Blogger जर आपला ब्लॉग वर्डप्रेस वर असेल तर वर्डप्रेस वर मेनू बनवायची प्रक्रिया आपण नंतर पाहुत. तर चला ब्लॉगर वर मेनू कसा Create करायचा हे शिकून घेऊयात त्याआधी मेनू काय असतो हे पाहुयात.

वेबसाइट मेनू हा वेबसाइट वरती नेव्हिगेट करण्यासाठी म्हणजे वावरण्यासाठी वापरकर्त्यांना मदत करणारा लिंक किंवा बटणांचा समूह असतो. मेनू सहसा वेबसाइटच्या वरती किंवा कोपऱ्याला ठेवले जातात आणि त्यात विविध पेजेस किंवा कॅटेगरी चा समूह असतो ज्यामुळे युजर ला वेबसाईट वरती माहिती शोधण्यास सोपे जाते.

वेबसाईट मध्ये मेनू बनवणे खालील फायद्यांमुळे गरजेचा असतो.

  • वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी – मेनू असल्यामुळे वेबसाईट चे नेव्हिगेशन सोपे राहते, म्हणजे युजर ला वेबसाईट वरती माहिती शोधायला सोपे जाते आणि त्यामुळे युजर जास्त वेळ वेबसाईट वरती राहतात.
  • SEO मध्ये सुधारणा करण्यासाठी – वेबसाईट ला चांगला मेनू असणे हे SEO साठीही फायद्याचे असते. याच्या मदतीने सर्च इंजिन ला आपल्या वेबसाईट ची रचना समजून घेणे सोपे जाते.
  • ब्लॉगचे ब्रँडिंग मजबूत करण्यासाठी – मेनू हा ब्लॉगच्या ब्रॅण्डिंगसाठी एक महत्वाचा घटक असतो. यामुळे वेबसाईट वरती युजर चा विश्वास बसतो.
  • CTA बटन जोडण्यासाठी – आपण वेबसाईटच्या मेनूमध्ये CTA (Call Through Action) बटणे समाविष्ट करू शकता जे वापरकर्त्यांना तुमच्या ब्लॉगशी जुडण्यास मदत करतात जसे Join Group, Follow on Instagram, Subscribe YouTube, ई.

ब्लॉगर मध्ये मेनू जोडण्याची प्रक्रिया

ब्लॉगर वर मेनू बनवणे अतिशय सोपे आहे, आपण फक्त 5 मिनिटात हवा तसा मेनू बनवू शकता, तर चला आता मेनू बनवण्याची प्रक्रिया पाहुयात.

  • मेनू बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले ब्लॉगर वर Login करायचे आहे व आपल्या ब्लॉग च्या Dashboard वर जायचे आहे.
  • त्यानंतर Dashboard वरून Layout या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • Layout मध्ये क्लिक केल्यावर आपल्याला HEADER MENU हा Widget शोधायचा आहे व Edit वर क्लिक करायचे आहे.
  • आता मेनू चे Title टाकायचे आहे, हे नाही टाकले तरी चालते. पुढे ADD A NEW ITEM वर क्लिक करावे.
  • येथे तुम्हाला Link List टाकावी लागते. Site Name मध्ये Category चे नाव टाकायचे आहे व त्या खाली त्याची लिंक टाकून Save करायचे आहे.

    तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिंक कोणती टाकायची? आपण प्रत्येक ब्लॉग पोस्ट ला Label देत असालच ना! त्या Label ची लिंक येथे टाकावी लागते. ती लिंक आपण ब्लॉग वरून मिळवायची आहे. खालीलप्रमाणे-

  • ब्लॉगर Dashboard वरील View Blog वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर एक पोस्ट Open करा, व पोस्ट संपते तेथे Tags दिसतील. ते Tags म्हणजे आपण दिलेले Labels असतात.
  • आपल्याला जो Label मेनू मध्ये जोडायचा आहे, त्यावर क्लिक करा, व जे नवीन पेज Open होईल त्याची लिंक Copy करा आणि Header Menu मधील Link List मध्ये टाका.

या प्रमाणे मेनू मध्ये हव्या सर्व त्या कॅटेगरी टाका आणि Save करा. आपल्या ब्लॉग मध्ये यशस्वीपणे Menu तयार झालेला आपल्याला दिसेल.

निष्कर्ष-

ब्लॉगर ब्लॉग मध्ये मेनू तयार करण्याची, Create Menu in Blogger पूर्ण प्रक्रिया आपल्याला समजली असेल असे मला वाटते. ब्लॉगर मध्ये मेनू तयार करताना जर काही अडचण येत असेल तर खाली कंमेंट मध्ये विचारू शकता, आपली समस्या दूर केली जाईल.

आजचा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व आपल्याला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर आपला अभिप्राय कंमेंट मध्ये नोंदवा. ब्लॉगिंग, SEO बद्दल अधिक टिप्स साठी या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा. धन्यवाद!

– संबंधित पोस्ट –
ब्लॉगर (Blogger.com) काय आहे, जाणून च्या संपूर्ण माहिती
ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा?
ब्लॉगर मध्ये कस्टम थीम कशी इंस्टॉल करावी?
ब्लॉगर ब्लॉगमध्ये Image कशी जोडायची?

Leave a Comment