UPSC Information in Marathi : यूपीएससी अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, आणि भारतीय संघाच्या सशस्त्र दलांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करते. UPSC ही राष्ट्रीय स्तरावरील एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे ज्याद्वारे 24 सेवांमध्ये भरती केली जाते. IAS, IPS, IRS अश्या एकूण 24 सेवांची भरती यूपीएससी परिक्षेआधारीत केली जाते. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परिक्षांपैकी यूपीएससी एक आहे.
यूपीएससी ही एक स्वतंत्र संस्था आहे. यूपीएससी द्वारे दरवर्षी परीक्षा घेतली जाते. सर्वात लोकप्रिय असलेली ही परीक्षा आहे, त्यामुळे याची माहिती असणे आपल्यासाठी अति आवश्यक आहे. आजच्या या लेखात आपण UPSC माहिती मराठी, UPSC Information in Marathi पाहणार आहोत. तरी आपणास विनंती आहे की, मिळवण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
यूपीएससी (UPSC) म्हणजे काय? (UPSC Exam Information in Marathi)
UPSC यूपीएससी (संघ लोकसेवा आयोग) ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी लेव्हल अ आणि लेव्हल ब चे कर्मचारी भरती करण्यासाठी परीक्षा आयोजित करते. यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात, यातून ऐकून 24 पदांची भरती केली जाते. ही 24 पदे ही देशातील सर्वोच्च नागरी सेवा आहेत. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये UPSC चे नाव आहे.
यूपीएससी चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. यूपीएससी संस्थेची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी करण्यात आली व नंतर UPSC ला भारतीय संविधान नुसार मान्यता देण्यात आली. यूपीएससी संस्था पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असते, राज्य सरकारला यात हस्तक्षेप करण्यास अनुमती नसते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.
यूपीएससी (UPSC) चा इतिहास (History of UPSC in Marathi)
यूपीएससी ची कल्पना 1854 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी द्वारे सुचवली गेली होती. लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी यासाठी योग्यता आधारित सिव्हिल सेवा परीक्षा (UPSC) ची सुरुवात केली गेली. सुरुवातीच्या काळात ही परीक्षा लंडन मध्ये आयोजित केली जात असे, व याचा अभ्यासक्रम असा बनवला होता की फक्त ब्रिटिश उमेदवार यशस्वी होत असत.
अशी अवस्था असतानाही 1864 श्री. सत्येंद्रनाथ टागोर यूपीएससी मध्ये यशस्वी होणारे पहिले भारतीय व्यक्ती बनले. श्री. सत्येंद्रनाथ टागोर हे श्री. रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ होते. काही वर्षांनी पहिले महायुद्ध सुरू झाले व मौन्टेंग्यू चेम्सफोर्ड यांच्या सुधारणेमुळे यूपीएससी परीक्षा भारतात आयोजित केली जाऊ लागली व 1 ऑक्टोबर 1926 रोजी भारतात संघ लोकसेवा आयोग ची स्थापना करण्यात आली.
त्या वेळेस सर रॉस बार्कर, होम सिव्हिल सर्विस, युनायटेड किंगडम च्या सदस्य आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. 26 जानेवारी 1950 मध्ये भारताच्या संविधानाची सुरुवात झाली व यासोबतच संघ लोकसेवा आयोगाच्या मान्यता मिळाली.
यूपीएससी (UPSC) परीक्षेसाठी पात्रता (UPSC Exam Eligibility in Marathi)
यूपीएससी परीक्षेला बसण्याची तयारी करत असाल तर यूपीएससी साठी ची UPSC Exam Eligibility पात्रता आपल्याला माहीत असली पाहिजे. आपल्या कॅटेगरी नुसार पात्रता मध्ये बदल असतात. आपण येथे यूपीएससी ची पात्रता काय आहे हे पाहुयात.
1) शिक्षण (UPSC Educational Eligibility)
यूपीएससी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवीही ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता आहे सर्वोच्च पात्रता कोणतीही असू शकते. फक्त भारतीय नागरिक UPSC Exam साठी पात्र आहेत. फक्त भारतीय नागरिक UPSC Exam देऊ शकतात.
2) वयोमर्यादा (UPSC Age Limit)
पदवीधर असल्यासोबत विद्यार्थ्यांचे वय सुद्धा पात्रता टप्प्यात असले पाहिजे. उमेदवार च्या जातीनुसार वयोमर्यादा मध्ये विविधता आहे, ते समजण्यासाठी खालील टेबल आपल्याला उपयोगी ठरेल.
जात | कमाल वयोमर्यादा | किती वेळा देता येते? |
General | ३२ | ६ |
Economically Weaker Section (EWS) | ४२ | ९ |
SC/ST | ३७ | ११ |
OBC | ३५ | ९ |
Defense Services Personnel | ३५ | ९ |
Persons with Benchmark Disability | ४२ | ९ |
यूपीएससी (UPSC) आयोजित विविध परीक्षा (Different Exams Conducted By UPSC)
आपण वरतीही पाहिले आहे की यूपीएससी ही एक केंद्रीय संस्था आहे. यूपीएससी द्वारे विविध पदांसाठी खालील परीक्षा Different Exams Conducted By UPSC आयोजित केल्या जातात.
- 1) CSE (Civil Service Examination)
- 2) ESE (Engineering Service Examination)
- 3) CDSE (Combined Defense Service Exam)
- 4) IFS (Indian Forest Service)
- 5) NDA (National Defense Academy Examination)
आयोग द्वारे विविध सरकारी परीक्षांचे आयोजन केले जाते, ज्यात IPS, IRS, NDA, NA, ई परीक्षांचा समावेश आहे. यासोबतच अन्य काही सरकारी सेवांसाठीही केंद्र लोकसेवा आयोग परीक्षा घेते.
यूपीएससी परीक्षा स्वरूप (UPSC Exam Pattern in Marathi)
यूपीएससी भरती प्रक्रिया ही सर्व ठिकाणी तीन टप्प्यात पार पाडली जाते.
- 1) यूपीएससी पूर्व परीक्षा
- 2) यूपीएससी मुख्य परीक्षा
- 3) यूपीएससी मुलाखत
तर चला या तीनही टप्प्यांची विस्तारित माहिती घेऊयात.
1) यूपीएससी पूर्व परीक्षा (UPSC Prelims Exam Pattern)
यूपीएससी मुख्य परीक्षा ची पात्रता ठरवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास होतात फक्त तेच मुख्य परीक्षेसाठी पात्र असतात. यूपीएससी पूर्व परीक्षा मध्ये पास होण्यासाठी 33% गुण पडणे आवश्यक असते. या परीक्षेचे मार्क्स फक्त मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी वापरले जातात. उमेदवारांना पद देताना हे मार्क्स ग्राह्य धरले जात नाहीत.
यूपीएससी पूर्व परीक्षा स्वरूप खालीलप्रमाणे-
पेपर | प्रश्न संख्या | कालावधी | एकूण गुण |
पेपर-१: सामान्य अभ्यास १ | १०० | २ तास | २०० |
पेपर-२: सामान्य अभ्यास २ | ८० | २ तास | २०० |
2) यूपीएससी मुख्य परीक्षा (UPSC Mains Exam Pattern)
जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झालेले आहेत त्यांचीच मुख्य परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे मार्क्स हे पद देताना ग्राह्य धरले जातात. मुख्य परीक्षेचे मार्क्स पाहून मुलाखत साठी निवड केली जाते.
यूपीएससी मुख्य परीक्षा स्वरूप खालीलप्रमाणे-
पेपर | विषय | कालावधी | एकूण गुण |
पेपर-A | Compulsory Indian language | ३ तास | ३०० |
पेपर-A | English | ३ तास | ३०० |
पेपर-1 | Essay | ३ तास | २५० |
पेपर-2 | General Studies I | ३ तास | २५० |
पेपर-3 | General Studies II | ३ तास | २५० |
पेपर-4 | General Studies III | ३ तास | २५० |
पेपर-5 | General Studies IV | ३ तास | २५० |
पेपर-6 | Optional I | ३ तास | २५० |
पेपर-7 | Optional II | ३ तास | २५० |
Total | 1750 |
मुख्य परीक्षेमधील Paper A आणि Paper B चे मार्क्स Selection साठी धरले जात नाहीत, परंतु मुलाखत साठी पात्र होण्यासाठी या Paper A आणि Paper B मध्ये पास होणे आवश्यक असते.
3) यूपीएससी मुलाखत (UPSC Interview Pattern)
यूपीएससी परिक्षेमधील सर्वात शेवटचा टप्पा हा Interview चा असतो. यूपीएससी मुलाखत ही 275 मार्काची असते. यूपीएससी मुख्य परीक्षा पास होऊन आलेल्यांची मुलाखत घेतली जाते, व 275 पैकी जेवढे मार्क्स पडतील तेवढे दिले जातात.
मुलाखत चे 275 मार्क्स व मुख्य परीक्षेचे 1750 मार्क्स मिळून 2025 मार्क्स ची संपूर्ण यूपीएससी परीक्षा असते. या 2025 मार्क्स ग्राह्य धरून उमेदवारांना पदे दिली जातात.उमेदवाराला या तीनही पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार जर कोणत्याही परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला परत पहिल्यापासून म्हणजे पूर्व परिक्षेपासून सुरू करावे लागते.
यूपीएससी (UPSC) अभ्यासक्रम पीडीएफ (UPSC Syllabus PDF in Marathi)
आपण UPSC अभ्यासक्रम 2023 (UPSC Syllabus PDF in Marathi) नीट वाचावा. जेणेकरून तुम्ही परीक्षेची चांगली चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल. आपल्यापैकी जे UPSC 2023 परीक्षेची तयारी करत आहेत ते UPSC Syllabus PDF in Marathi डाउनलोड करू शकतात. UPSC अभ्यासक्रम PDF डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे,
यूपीएससी (UPSC) पदांची नावे (Different Posts in UPSC in Marathi)
दरवर्षी लाखो मुले हि परीक्षा देतात व यातून या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. UPSC मध्ये दोन प्रकारच्या Services ची भरती केली जाते, All India Services आणि Central Services. UPSC मधून भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे खालीलप्रमाणे –
1) All India Civil Services
- Indian Administrative Service (IAS)
- Indian Police Service (IPS)
- Indian Forest Service (IFoS)
2) Group ‘A’ Civil Services
- Indian Foreign Service (IFS)
- Indian Audit and Accounts Service (IAAS)
- Indian Civil Accounts Service (ICAS)
- Indian Corporate Law Service (ICLS)
- Indian Defence Accounts Service (IDAS)
- Indian Defence Estates Service (IDES)
- Indian Information Service (IIS)
- Indian Ordnance Factories Service (IOFS)
- Indian Communication Finance Services (ICFS)
- Indian Postal Service (IPoS)
- Indian Railway Accounts Service (IRAS)
- Indian Railway Personnel Service (IRPS)
- Indian Railway Traffic Service (IRTS)
- Indian Revenue Service (IRS)
- Indian Trade Service (ITS)
- Railway Protection Force (RPF)
3) Group ‘B’ Civil Services
- Armed Forces Headquarters Civil Service
- DANICS
- DANIPS
- Pondicherry Civil Service
- Pondicherry Police Service
निष्कर्ष
यूपीएससी ची संपूर्ण माहिती आता आपल्याला समजली असेल. मला वाटते कि आता आपल्याला कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वर जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही, यूपीएससी बद्दल विस्तारित माहिती हि मी आपल्याला दिलेली आहे.
यूपीएससी ची माहिती – UPSC Information in Marathi आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि या पोस्टमध्ये नवीन काही माहिती मिळाली असेल तर या पोस्ट ला मित्रांसोबत नक्की शेअर करा.
RELATED POSTS |
---|
एमपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती |
Amazing and great information.
Thx u for information
Upsc prelium exam opjective rahti jai kya
Yes objective type aste
All the best
Welcome
Thx u for information
Thx u for information
Thank you
Amazing and very important information thanks for giving information
Good information
Thank you for information.
I got all points.
Thank you for information.
Good information ❣️
Good information and new candidate
Very very helpful information
Thanks.
Thank you for Information .
Helpfull information thank you so much
Nice information
Thank you
Thank you sir. For helping to know actually upsc means what. Once again thank you.
Thank you for information. Helpful information.
ही परीक्षा कोणत्या भाषा मधे द्यावी लागते,
In which you feel comfortable I.e. hindi, english, marathi etc.
Thank you for information…
Good information and new candidate…
Thank u ☺️
Very excellent but I missed my 2nd attempt of upsc my all chance is 9 according to OBC category sir please tell me how many chances remaining
Upsc chy mukhya parikshetil GS che paper marathit deta yetat ka?
Verry nice
खूप छान आणि सविस्तर माहिती दिलेली आहे.
खुप खुप धन्यवाद.
Very nice
Welcome
Hiii