सॉफ्टवेअर म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Group

    आजचे 21 वे शतक हे कॉम्पुटर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट अश्या असंख्य इलेक्ट्रॉनिक स्मार्ट वस्तूंनी घेरलेले आहे. आताच्या काळात कॉम्पुटर ही मानवाची एक सवय बनून राहिली आहे, जग आता कॉम्पुटर च्या सहाय्याने चालत आहे. संगणकाने मानवाचे प्रत्येक कार्य सोपे बनवलेले आहे.

    अनेक छोट- मोठ्या उपकरणांना एकत्रित जोडून संगणक बनवले जाते. संगणकाच्या भागांना दोन मुख्य प्रकारात विभागले जाते- 1) हार्डवेअर, 2) सॉफ्टवेअर. या दोन्ही प्रकारामधील उपकरणे योग्य रित्या जोडून संगणक बनलेले असते. हार्डवेअर उपकरणे म्हणजे संगणकाचे शरीर असते आणि सॉफ्टवेअर आत्मा असतो.

    आजच्या या लेखामध्ये आपण सॉफ्टवेअर ची माहिती घेणार आहोत. मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप, किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो, त्याला कार्य करण्यास मदत करण्यासाठी त्यात सॉफ्टवेअर अनिवार्य आहे. सॉफ्टवेअर नसेल तर त्या उपकरणांची अवस्था निर्जीव मानवाच्या शरीराप्रमाने असते. तर चला जास्त वेळ न घालवता सॉफ्टवेअर म्हणजे काय असते हे समजून घेऊयात.

संगणकाचे भाग व माहिती

सॉफ्टवेअर म्हणजे काय (What is Software in Marathi)

    सॉफ्टवेअर म्हणजे सूचनांचा किंवा प्रोग्रॅम्स चा एक समूह आहे, जो कोणतेही कार्य करण्यासाठी संगणकाला आदेश देत असतो. उपभोगत्याने दिलेल्या इनपुट चे रूपांतर प्रोग्राम मध्ये करून सॉफ्टवेअर संगणकाला पाठवते. थोडक्यात सॉफ्टवेअर हे उपभोगता आणि संगणकामधील संभाषण साधण्यासाठी चे एक माध्यम असते.

    सॉफ्टवेअर हे भौतिक साधन किंवा वस्तू नसून लिखित स्वरूपात असते. सॉफ्टवेअर ला आपण डोळ्याने पाहू शकत नाहीत व हाताने स्पर्शही करू नाही शकत. संगणकाच्या प्रत्येक हार्डवेअर उपकरणात एक खास वैशिट्याचे सॉफ्टवेअर बसवलेले असते. सॉफ्टवेअर शिवाय कोणतेही उपकरण जसे माऊस, कीबोर्ड, हार्ड डिस्क, मॉनिटर, कार्य करत नाही.

    सॉफ्टवेअर मधील सूचना लिखित स्वरूपात असतात. संगणकाला लिखित स्वरूपात सूचना देण्यासाठी मानवाने अनेक भाषा बनवल्या आहेत, त्यांना प्रोग्रामिंग भाषा असे म्हणतात. Software Developers या भाषांच्या मदतीने विविध वैशिष्ट्य टाकून सॉफ्टवेअर बनवतात. सॉफ्टवेअर बनवणे किंवा डिजाईन करण्याच्या प्रक्रियेला कोडींग अथवा प्रोग्रामिंग असे म्हणतात.

    आपण सध्या हा लेख वेब ब्राउजर वर वाचत आहेत, हे सुद्धा एक सॉफ्टवेअर च आहे. मोबाईल मधील Apps, Games ही सर्व एक प्रकारची सॉफ्टवेअर आहेत. या व्यतिरिक्त कॉम्पुटर मध्ये Microsoft Word, Microsoft Office, Adobe Reader, आणि असे असंख्य सॉफ्टवेअर भरलेले आहेत. हार्डवेअर हे संगणकाचे शरीर असेल तर सॉफ्टवेअर हा मेंदू आहे जो प्रत्येक अवयवाला निर्देश देत असतो.

सॉफ्टवेअर चे प्रकार (Types of Software in Marathi)

    सॉफ्टवेअर (Software in Marathi) चा उपयोग विविध कामांसाठी केला जातो, त्यामुळे यांना विविध प्रकारांमध्ये विभाजित केले जाते. संगणकाच्या सॉफ्टवेअर चे दोन मुख्य प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे-

 • 1) System Software
 • 2) Application Software

    सॉफ्टवेअर च्या प्रकारांना विस्तारित रित्या समजून घेऊयात.

1) System Software

    हार्डवेअर उपकरणांचे नियंत्रण व संचालन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Software ला सिस्टिम सॉफ्टवेअर असे म्हणतात. हे सॉफ्टवेअर बाहेरील सॉफ्टवेअर ला सुद्धा नियंत्रित करते. संपूर्ण Computer System नियंत्रित करण्याचे काम System Software चे असते. System Software चे चार मुख्य प्रकार पडतात-

1) ऑपरेटिंग सिस्टिम – Operating System एक असा प्रोग्राम असतो जो इतर कॉम्पुटर प्रोग्राम ला संचालित करतो. सर्व हार्डवेअर पार्टस चे नियंत्रण Operating System द्वारे केले जाते. मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या Devices ला Operate करण्यासाठी खास प्रकारची Operating System बनवलेली असते.उदा… Android, IOS, macOS, Windows, Linux, ई

2) युटिलिटीज – Utilities हे एक प्रकारचे सुरक्षा आणि प्रबंधक प्रोग्रॅम्स असतात. संगणकाच्या कार्यक्षमतेला कायम ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी Utilities बनवलेले असतात. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये Extra Features जोडण्याचे कार्य Utilities करतात.उदा… Data Backup, Antivirus, Firewall, System Diagnosis, ई.

3) डिव्हाइस ड्रायव्हरसंगणकाचे पार्ट्स आणि सिस्टीम मध्ये कनेक्शन जोडण्यासाठी Device Driver असतात. Operating System सोबत मिळून Device Driver कार्य करतात. आपण जेंव्हा कीबोर्ड ला कॉम्पुटर सोबत जोडतो, तर कीबोर्ड चे कार्य सुरू ठेवण्यासाठी Computer System मध्ये आधीच कीबोर्ड ड्रायव्हर इंस्टॉल केलेला असतो.उदा… USB Drivers, ROM Drivers, VGA Drivers, Printer Drivers, Mouse Drivers, ई.

4) लँग्वेज ट्रान्सलेटर – प्रोग्रामिंग भाषा ही लिखित स्वरूपात असते, संगणकाला थेट ही भाषा समजत नाही, त्यामुळे Language Translator या भाषेला मशीन भाषेत रूपांतरित करते. संगणकाचे प्रत्येक सॉफ्टवेअर हे प्रोग्रामिंग भाषेत लिहलेले असते, परंतु संगणकाला फक्त Machine Language ज्ञात असते. यामुळे सॉफ्टवेअर आणि संगणक सिस्टीम ला Language Translator द्वारे जोडले जाते.उदा… Compiler, Interpreter, Assembles, ई.

2) Application Software-

    अँप्लिकेशन सॉफ्टवेअर ला End User सॉफ्टवेअर असे म्हटले जाते, कारण यांचा थेट संपर्क User शी असतो. हे सॉफ्टवेअर विशिष्ट कार्य करण्यासाठी यूजर द्वारे वापरले जाते. आपण याना Apps असेही म्हणतो. गाणे ऐकणे, विडिओ पाहणे, गेम्स खेळणे, या कार्यांसाठी Application Software वापरले जातात.

Application Software चे प्रकार-

1) Basic Application Software – Basic Application Software यांना सामान्य हेतू सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. हे सामान्य वापराचे सॉफ्टवेअर असतात. यांचा वापर दैनंदिन कार्यांसाठी जसे, गाणी ऐकणे, विडिओ पाहणे, गेम्स खेळणे, ई साठी केला जातो. उदा…

 • Word Processing Programs
 • Multimedia Programs
 • DTP Programs
 • Graphics Application
 • Presentation Programs

2) Specialized Application Software – Specialized Application Software यांना विशेष हेतू सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. हे विशेष कार्यांसाठी बनवले जातात. Music Players, Video Editors, Social Media Apps आणि आपण हा लेख वाचत आलेले वेब ब्राउजर सुद्धा या श्रेणी मध्ये येतात. उदा…

 • Billing System
 • Payroll Management System
 • Report Card Generator
 • Accounting Software
 • Reservation System

सॉफ्टवेअर कसे तयार करायचे (Creating a Software in Marathi)

    सॉफ्टवेअर बनवण्याचे कार्य कठीण असते, यासाठी चांगल्या अभ्यासाची व सरावाची गरज असते. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रोग्रामिंग भाषा शिकाव्या लागतात. सध्या Python, C, C++, Java अश्या अनेक प्रोग्रामिंग भाषा अस्तित्वात आहेत. एका व्यक्तीला सर्वच भाषा शिकणे बंधनकारक नसते. आवश्यकतेनुसार तो कोणतीही भाषा निवडुन शिकू शकतो. प्रोग्रामिंग मध्ये कुशल असलेल्या व्यक्तीला प्रोग्रामर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर असे म्हणतात.

    सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी कॉम्पुटर इंजिनिअरिंग करणे फायदेशीर आहे, कारण या कोर्स मध्ये विविध प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान दिले जाते. आपण जर कॉम्पुटर किंवा IT क्षेत्रात नसाल तरीही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता. प्रोग्रामिंग शिकण्यासाठी इंटरनेट वर हजारो कोर्सेस फ्री मध्ये उपलब्ध आहेत. सर्वात लोकप्रिय असलेले विडिओ App यूट्यूब वर प्रोग्रामिंग साठी चे अनेक चॅनेल्स आहेत. यांचा वापर करून आपण सॉफ्टवेअर बनवायला शिकू शकता. (Software in Marathi)

काही लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषांची नावे-

 • Python
 • Java Script
 • C Language
 • C#
 • C++
 • PHP
 • Java Language
 • Swift
 • Kotlin
 • TypeScript

निष्कर्ष

    आजच्या लेखामध्ये कॉम्पुटर सॉफ्टवेअर ची माहिती Computer Software Information in Marathi समजून घेतली आहे. मला आशा आहे की आपल्याला सॉफ्टवेअर म्हणजे काय हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्याला जर या लेखामध्ये काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका.

लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल. सॉफ्टवेअर म्हणजे काय हा लेख कसा वाटला?, हे मला कंमेंट करून कळवा. कॉम्पुटर, ब्लॉगिंग, इंटरनेट संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट ला परत- परत भेट देत राहा.

6 thoughts on “सॉफ्टवेअर म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment