Hard Disk Drive: काय असते Hard Disk आणि प्रकार कोणते?

WhatsApp Group Join Group

आजच्या या लेखामध्ये आपण संगणकाच्या एका स्टोरेज उपकरणाची माहिती समजून घेणार आहोत. या स्टोरेज उपकरणाचे नाव आहे Hard Disk Drive (HDD). आज आपण पाहुत की हार्ड डिस्क म्हणजे काय?, हार्ड डिस्क चे प्रकार कोणते आहेत?, व हार्ड डिस्क मध्ये डेटा कसा साठवला जातो हे जाणून घेऊयात. तर चला जास्त वेळ न घालवता हार्ड डिस्क ची माहिती पाहुयात.

हार्ड डिस्क (Hard Disk Drive) म्हणजे काय असते?

हार्ड डिस्क हे डिजिटल माहिती साठवण्यासाठी व पुनप्राप्त करण्यासाठी वापरले जाणारे एक स्टोरेज उपकरण आहे. हार्ड डिस्क ही एक सपाट वर्तुळाकाळ चकती च्या आकाराची असते, या चकतीच्या पृष्ठभागावर चुंबकीय धातूचे लेपन केलेले असते. चुंबकीय धातुमध्ये (Magnetic Material) डेटा साठवून ठेवण्याचे वैशिष्ट्य असते. हार्ड डिस्क ही 250GB ते 14TB पर्यंत डेटा साठवू शकते. हार्ड डिस्क डेटाला कायमस्वरूपी साठून ठेवते, विजेच्या प्रवाहाला कायम कनेक्ट राहन्याची गरज हार्ड डिस्क ला नसते.

जगातील सर्वात पहिली हार्ड डिस्क 1956 मध्ये IBM कंपनी ने बनवली होती. या हार्ड डिस्क ची स्टोरेज क्षमता फक्त 5MB होती आणि यीचे वजन 250 किलो होते. प्रथम हार्ड डिस्क चे नाव RAMAC (Random Access Method of Accounting and Control) हे होते. IBM च्या हार्ड डिस्क मध्ये पुढे अनेक सुधारणा होत गेल्या व आताची आधुनिक हार्ड डिस्क उदयास आली. आधुनिक हार्ड डिस्क ची स्टोरेज क्षमता व वेग हजारो पटीने वाढली आहे.

Hard Disk Drive ला HDD असे म्हणतात. हार्ड डिस्क च्या वेगावरून कॉम्पुटर चा वेग ठरवला जातो. डेटा ला पुनप्राप्त करण्याची क्षमता हार्ड डिस्क च्या फिरण्याच्या गतीवर अवलंबून असते. आधुनिक हार्ड डिस्क चा फिरण्याचा वेग 1200 RPM ते 15000 RPM इतका आहे. सर्वसाधारणतः वापरल्या जाणाऱ्या लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्पुटर च्या हार्ड डिस्क ची फिरण्याची गती 5400 RPM ते 7200 RPM च्या दरम्यान असते.

हार्ड डिस्क मध्ये डेटा कसा साठवला जातो?

आपण संगणकावर काम करत असतो, काम झाल्यावर त्या फाईल, फोटो, किंवा विडिओ ला आपण सेव करून ठेवत असतो. सेव बटन दाबल्यावर आपला डेटा अस्थिर स्वरूपात हार्ड डिस्क मध्ये साठवला जातो. तर चला आता आपण ही डेटा साठवण्याची प्रक्रिया पार कशाप्रकारे पडते हे समजून घेऊयात.

हार्ड डिस्क मध्ये एक CD सारखी वर्तुळाकार प्लेट असते, या प्लेट ला वरून चुंबकीय धातूचे आवरण असते, या प्लेट ला Platter हे नाव आहे. Platter हे अब्जावधी समान भागांमध्ये विभाजले गेलेले आहे. यातील एका भागाला 1 Bit असे मोजतात. असे Platter मध्ये अब्जावधी Bit असतात. प्रत्येक भागात चुंबकत्व मिळवण्याची व गमावण्याची क्षमता असते.

Platter च्या Bit ला चुंबकत्व दिले म्हणजे Magnetize केले व हटवले म्हणजे Demagnetize केले. हार्ड डिस्क मध्ये डेटा बायनरी नंबर मध्ये साठवला जातो. बायनरी नंबर म्हणजे दोनच संख्या असतात 1, आणि 0. Platter च्या Bit मध्ये डेटा साठवण्यासाठी त्याला Magnetize आणि Demagnetize केले जाते. Magnetize केल्यावर 1 साठवला जातो आणि Demagnetize केल्यावर 0 साठवला जातो.

बायनरी नंबर सिस्टम ही एक प्रकारे कोडींग असते. अक्षरे, अंक, चिन्हे, याना बायनरी मध्ये कन्व्हर्ट करून हार्ड डिस्क साठून ठेवते. हार्ड डिस्क मध्ये Magnetism वैशिष्ट्य वापरले जाते कारण एकदा Magnetize केलेला Bit पुन्हा आपोआप Demagnetize होत नाही, त्यामुळे हार्ड डिस्क विजेशिवाय कार्य करू शकते. वीज नसल्यावर संगणकातील डेटाचे काहीही नुकसान होत नाही.

हार्ड डिस्क मधील माहिती परत मिळवण्यासाठी प्लेट वर Read-Write Head बसवलेले असते. एका Platter साठी दोन Read-Write Head असतात. Platter च्या दोन्ही बाजूने डेटा स्टोर केलेला असतो, तो मिळवण्यासाठी दोन्ही बाजूने Read-Write Head असतात. या दोन्ही Head च्या मध्ये डिस्क असते जी गोल- गोल फिरते. Read-Write Head च्या मदतीने डेटा Read केला जातो. अश्या प्रकारे हार्ड डिस्क चे कार्य चालते.

प्रकार कोणते आहेत?

आपण वरती पाहिले की जगातील सर्वात पहिली हार्ड डिस्क ही IBM कंपनी ने बनवली होती व या हार्ड डिस्क ची स्टोरेज क्षमता 5 MB होती, हे वर्ष होते 1956. आता 2021 चालू आहे. हार्ड डिस्क मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आज विविध प्रकारच्या हार्ड डिस्क बाजारात उपलब्ध आहेत, तर चला आता हार्ड डिस्क च्या प्रकारांची Types of Hard Disk in Marathi माहिती पाहुयात.

1) PATA (Parallel Advanced Technology Attachment) – PATA ही जुन्या काळातील हार्ड डिस्क आहे. यीचा वापर सर्वात पहिले 1986 मध्ये केला गेला होता. PATA Hard Disc कॉम्पुटर सोबत ATA Interface Board च्या द्वारे जोडली जाते. ही हार्ड डिस्क एक वेळेस 2 उपकरणात वापरली जाऊ शकते. या प्रकारांमध्ये डेटा स्टोर करण्यासाठी चुंबकत्व वापरण्यात येते. यीचा डेटा Transfer Rate 133 MB/s आहे.

2) SATA (Serial Advanced Technology Attachment) – आज वापरात असलेल्या सर्वाधिक कॉम्पुटर आणि लॅपटॉप मध्ये SATA हार्ड डिस्क वापरली जाते. PATA च्या तुलनेत ही हार्ड डिस्क उत्कृष्ट आहेत. याचा डेटा ट्रान्सफर रेट 600 MB/s पर्यंत आहे. या हार्ड डिस्क चा फिरण्याचा वेग 7200 RPM इतका आहे.

3) SCSI (Small Computer System Interface) – SCSI हार्ड डिस्क कॉम्पुटर सोबत कनेक्ट होण्यासाठी छोट्या कॉम्पुटर सिस्टम इंटरफेस चा वापर करतात. या हार्ड डिस्क चा Data Transfer Rate 640 MB/s पर्यंत मर्यादित आहे व डिस्क फिरण्याची गती 10000-15000 RPM एवढी वेगवान आहे. एका वेळेस 16 उपकरण कनेक्ट करण्याची क्षमता यामध्ये असते.

4) SSD (Solid State Drive)SSD ही सर्वात नवीनतम हार्ड डिस्क आहे. बाकी सर्वांच्या तुलनेने ही सर्वात वेगवान आहे, त्यामुळे यीला लॅपटॉप मध्ये जास्त करून वापरतात कारण लॅपटॉप ला वेगवान बनवणे गरजेचे असते. SSD मध्ये डेटा स्टोर करण्यासाठी Flash Memory Technology चा उपयोग केलेला आहे. या हार्ड डिस्क चा एक खूप मोठा तोटा आहे की याची किंमत खूप जास्त असते.

HDD आणि SSD मधील फरक

Hard Disk Drive व Solid State Drive ला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खालील टेबल आपणास उपयोगी ठरेल. खाली मी HDD आणि SSD मधील फरक (Difference) दिलेले आहेत.

HDDSSD
1) HDD म्हणजे Hard Disk Drive होय.1) SSD म्हणजे Solid State Drive होय.
2) Hard Disk Drive ही Mechanical पार्टस पासून बनवली जाते.2) Solid State Drive पूर्णपणे Electrical पार्टस पासून बनवलेली असते.
3) हार्ड डिस्क कमी किमतीत उपलब्ध आहेत.3) Solid State Drive खूप महाग असते, HDD च्या तुलनेने.
4) हार्ड डिस्क चा आकार मोठा असतो व वेग SSD च्या तुलनेने कमी असतो.4) SSD चा आकार लहान असतो व वेग HDD च्या तुलनेने खूप जास्त असतो.
5) हार्ड डिस्क चा डेटा ट्रान्सफर रेट – 100 MB/s ते 200 MB/s5) SSD डेटा ट्रान्सफर रेट – 550 MB/s
6) HDD डेटा साठवण्याची क्षमता – 250 GB ते 14 TB6) SSD डेटा साठवण्याची क्षमता – 120 GB ते 4 TB

निष्कर्ष –

आजच्या लेखामध्ये कॉम्पुटर हार्ड डिस्क ची माहिती समजून घेतली आहे. मला आशा आहे की आपल्याला हार्ड डिस्क म्हणजे काय हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

आपल्याला जर या लेखामध्ये काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका. लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल.

हार्ड डिस्क (HDD) (Hard Disk in Marathi) म्हणजे काय? हा लेख कसा वाटला?, हे मला कंमेंट करून कळवा. कॉम्पुटर, ब्लॉगिंग, इंटरनेट संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट ला परत- परत भेट देत राहा.

1 thought on “Hard Disk Drive: काय असते Hard Disk आणि प्रकार कोणते?”

Leave a Comment