संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती

आताच्या आधुनिक जगात संगणकाचा वापर सर्वत्र केला जात आहे. विविध प्रकारचे संगणक प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहेत. या आधीच्या पोस्टमध्ये आपण संगणक हार्डवेअर आणि संगणक सॉफ्टवेअर बद्दल माहिती घेतली आहे. आता या पोस्टमध्ये आपण संगणकाचे प्रकार (Types of Computer in Marathi) व त्यांची माहिती पाहणार आहोत. संगणक ज्ञान हे सध्याच्या जगात सर्वात महत्वाचे मानले जात आहे, यामुळे मी या ब्लॉगमध्ये संगणकाची माहिती देत आहे.

WhatsApp Group Join Group

आपण अवती- भोवती पाहत असाल कि संगणक विविध ठिकाणी विविध कार्यांसाठी वापरले जात आहे. खरे तर संपूर्ण जग वेगवेगळ्या संगणकाने व्यापले आहे. संगणकाचे प्रकार Types of Computer in Marathi खूप आहेत. सामान्यतः संगणकांची तीन वैशिष्ट्य आधारित विभागणी केली गेली आहे. जसे यंत्रणा आधारित, हेतू आधारित, आणि आकार आधारित. तर चला या तीनही प्रकारा बद्दल Types of Computer in Marathi माहिती घेऊयात.

संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती (Types of Computer in Marathi)

संगणकाचे प्रकार कोणते आहेत, What are the types of computer in marathi, हे प्रश्न आपल्याला पडला असेल, तर चला याची माहिती घेऊयात. संगणक बनवण्यासाठी वेग- वेगळी यंत्रणा वापरली जाते, (Types of Computer in Marathi) त्यामुळे सर्वात पहिले आपण वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेच्या आधारावरील संगणकाचे प्रकार पाहुयात.

यंत्रणा आधारित (Based on Mechanism)

प्रत्येक संगणकाची कार्य करण्याची एक वेगळी यंत्रणा असते. थर्मो मीटर हे एक संगणक आहे यात Analog System चा वापर केला गेला आणि आपण हातात घालत असलेले घड्याळ पहिले तर त्यात डिजिटल सिस्टिम वापरली गेली आहे.

संगणकात वापरल्या जाणाऱ्या यंत्रने आधारित संगणकाचे खालील प्रकार पडतात.

१) ऍनालॉग संगणक (Analog Computer)

Analog Computer चा निर्माण अनालॉग डेटावर प्रक्रिया करण्यासाठी केलेला आहे. Analog डेटा हा सतत बदलणारा डेटा असतो, म्हणजे Analog डेटा ला ठरलेले मूल्य नसते. Analog डेटा चे मूल्य सतत बदलत असते, त्याची संख्या निर्धारित नसते. उदा… वेग, तापमान, दाब, वीज, ई. हे अनालॉग डेटा ची उदाहरणे आहेत.

Analog संगणकाची कार्य-क्षमता वेगवान असते. अनालॉग्ज संगणक मध्ये आउटपुट हा स्केल, आलेख च्या स्वरूपात आपल्याला मिळतो. Analog Computer मध्ये संख्या/ आकडे साठवले जात नाही, न साठवता सरळ आउटपुट मध्ये रूपांतर केले जाते. Analog Computer चा उपयोग तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, क्षेत्रात जास्त केला जातो.

उदा… स्पीडोमीटर, थर्मो मीटर, ई.

२) डिजिटल संगणक (Digital Computer)

डिजिटल कॉम्पुटर सूचनांवर अंकांच्या रुपात प्रक्रिया करते. या संगणक मध्ये Binary System वापरली जाते. Digital Computer सूचनांना अंकाच्या रूपामध्ये दर्शवण्यासाठी Binary System चा उपयोग करते. या प्रकारच्या संगणकाचा उपयोग गणितीय क्रिया करण्यासाठी केला जातो.

Digital Computer मध्ये मिळालेल्या सूचना Binary Number च्या स्वरूपात साठवून ठेवण्याची क्षमता असते. Binary Number मध्ये 0 आणि 1 हे दोनच संख्या असतात. गतीच्या तुलनेत हे Analog Computer पेक्षा थोडे हळू असतात, यांची अचुकता जास्त असते.

उदा… Calculator, हातातले घड्याळ, ई.

  • डिजिटल संगणक गणना करते आणि ऍनालॉग संगणक मापते.

३) हायब्रीड संगणक (Hybrid Computer)

Analog Computer आणि Digital Computer या दोघांचे एकत्रित वैशिष्ट्य असणारे संगणक म्हणजे हायब्रीड संगणक. हायब्रीड संगणक हे Analog आणि Digital पेक्षा अचूक आणि गतीवान असतात. हे संगणक अनालॉग आणि डिजिटल संगणकाचे मिश्रण असतात.

डिजिटल आणि अनालॉग चे मिश्रण असल्यामुळे हायब्रीड संगणकामध्ये गणितीय क्रिया करण्यासाठी Digital संगणक वापरले जाते आणि आउटपुट दर्शवण्यासाठी Analog संगणक वापरले जाते. हे संगणक वेगवान आणि अचूक आउटपुट प्रदान करतात.

उदा… पेट्रोल पंप मशीन, स्पीडोमीटर, ई.

उद्देश/ हेतू आधारित (Based on Purpose)

संगणक बनवताना एक गोस्ट लक्षात घेतली जाते कि हे संगणक कशासाठी बनवायचे आहे, याचा उद्देश काय आहे, आणि ये लक्षात घेऊन रचना केली जाते.

संगणकाच्या उद्देशावर आधारित संगणकाचे दोन प्रकार Types of Computer in Marathi पडतात.

१) सामान्य हेतू संगणक (General Purpose Computer)

General Purpose Computer म्हणजे सामान्य हेतूसाठी वापरले जाणारे संगणक. आपण दैनंदिन कामासाठी, शिक्षण, व्यवसायासाठी जे संगणक वापरतो ते सर्व सामान्य हेतू संगणक आहेत. तुम्ही हा लेख मोबाईल किंवा लॅपटॉप वर वाचत आहात, हे सुद्धा एक General Purpose Computer आहे.

General Purpose Computer प्रकारच्या संगणकामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया करण्याची क्षमता विकसित केलेली असते. यांचा वापर घरगुती, शिक्षण, व्यवसाय क्षेत्रात जास्त केला जातो. आज सर्वात जास्त सामान्य हेतू संगणकांचा उपयोग केला जातो.

उदा… डेस्कटॉप संगणक, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ई.

२) विशेष हेतू संगणक (Special Purpose Computer)

Special Purpose Computer विशेष हेतू साठी वापरले जाणारे संगणक. या प्रकारच्या संगणकांना एक विशिष्ट कार्य करण्याच्या हेतूने बनवलेले असते, म्हणजे हे संगणक सामान्य हेतू संगणक प्रमाणे अनेक कार्य करू शकत नाही. 

जसे हवामानाचा अंदाज लावणे, परिवहन नियंत्रण करणे, ई सारख्या कार्यासाठी विशेष हेतू संगणक वापरले जातात. विशेष हेतू संगणक हे सामान्य हेतू संगणक पेक्षा जास्त गतिमान असतात, परंतू हे सामान्य हेतू संगणक प्रमाणे अनेक कार्ये करण्यास सक्षम नसतात.

आकार आधारित (Based on Size)

संगणक कोठे वापरायचे आहे त्यानुसार त्याचा आकार सुद्धा ठरवला जातो. जर वापर मोठमोठ्या संस्था मध्ये करायचा असेल तर जास्त मोठे संगणक वापरले जाते, कारण अश्या ठिकाणी खूप जास्त शक्तिशाली संगणकांची गरज असते.

आपण घरी जे संगणक वापरतो ते छोटे असते कारण, घरगुती कामांसाठी जास्त शक्तिशाली संगणकांची गरज नसते. संगणकाच्या आकारावर आधारित संगणकाचे खालीप्रमाणे प्रकार Types of Computer in Marathi आहेत.

१) महासंगणक (Supercomputer)

जगातल्या सर्वात शक्तिशाली आणि वेगवान संगणकांना महा संगणक संबोधले जाते. जगातल्या मोठ-मोठ्या संस्था विशेष कार्यासाठी यांचा वापर करतात.

अमेरिकेची अंतराळ संस्था (NASA) मध्ये उपग्रह नियंत्रित करण्यासाठी महा संगणकाचा वापर केला जातो.

महा संगणक हे आकाराने इतके मोठे असतात की ते एका इमारती एवढी जागा व्यापतात. सेमूर क्रे यांनी बनवलेले “CDC 6600” हे जगातील पहिले महा संगणक आहे.

उदा… Tihnas-2, Exascale Super Computer, ई.

२) मेनफ्रेम संगणक (Mainframe Computer)

मेनफ्रेम संगणकाचा निर्माण एका वेळेस हजारो युजर्स ला नियंत्रित करण्यासाठी केला गेलेला आहे. एका वेळेस हजारो प्रोग्राम चालवण्याची क्षमता मेनफ्रेम संगणक मध्ये असते.

मेनफ्रेम संगणकाला AC असलेल्या खोलीत ठेवले जाते कारण जास्त लोड आल्याने संगणक गरम होतात ते थंड करण्यासाठी AC रुम उपयोगी पडते.

महा संगणक पेक्षा जास्त माहिती साठवण्याची क्षमता मेनफ्रेम संगणक मध्ये असते. विविध सरकारी संस्था, बँका, सोशल मीडिया संस्था मेनफ्रेम संगणकाचा वापर करतात.

उदा… Fujitsu’s ICL VME, Hitachi’s Z800, ई.

३) मिनीफ्रेम संगणक (Miniframe Computer)

मिनीफ्रेम संगणक हे जवळजवळ मेनफ्रेम संगणक सारखेच असते. मिनीफ्रेम संगणक एका वेळेस ५-२५० युजर्स नियंत्रित करू शकते. विविध संस्था, विभाग, हे या संगणकाचा वापर करतात.

मिनीफ्रेम संगणक हे मेनफ्रेम आणि मायक्रो संगणक यांच्या मध्यस्थ असते. हे मेनफ्रेम पेक्षा लहान आणि मायक्रो संगणक पेक्षा मोठे असते.

उदा… K-202, SDS-92, Texas Instrument TI-990, ई.

४) मायक्रो संगणक (Microcomputer)

डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन हे सर्व मायक्रो संगणक आहेत. मायक्रो संगणक हे सर्वत्र वापरात आहेत आणि यांचा वापर दिवसें दिवस मोठ्या संख्येने वाढत चालला आहे.

मायक्रो संगणकाला वैयक्तिक संगणक असेही म्हणतात. मायक्रो संगणकाला CPU, मेमरी, स्टोरेज, इनपुट, आउटपुट हे सर्व वैशिष्ट्य असतात.

उदा… डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, ई.

निष्कर्ष

संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती Types of Computer in Marathi आता मी तुम्हाला दिलेली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती समजली असेल.

आपणास जर काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारायला विसरू नका.

आपणास संगणकाचे प्रकार व त्यांची माहिती | Types of Computer in Marathi हा लेख कसा वाटला, मला कंमेंट द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment