मॉनिटर म्हणजे काय, संपूर्ण माहिती मराठी

आपल्यापैकी असा एकही व्यक्ती नसेल ज्याने संगणक पाहिले नसेल, ज्या व्यक्तीने संगणक पाहिले त्याने मॉनिटर तर नक्कीच पाहिले असेल, कारण Monitor Information, Monitor in Marathi हे Desktop Computer चे सर्वात महत्वाचे Output Devices पैकी एक आहे. User ने केलेल्या क्रियांचे आउटपुट संगणक मॉनिटर द्वारे दर्शवत असते. मॉनिटर च्या स्क्रीन समोर बसून आपण Video Games खेळतो, Movies पाहतो आणि अजून बऱ्याच गोष्टी करतो.

WhatsApp Group Join Group

मॉनिटरमुळे User आणि Computer मधील Interaction शक्य होते. एक उच्च Graphics Quality असलेल्या स्क्रीन चा मॉनिटर User Experience वर प्रभाव पाडतो. पूर्वीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या मॉनिटर ची Display Quality कमी दर्जाची होती, पण कालांतराने डिस्प्ले क्वालिटी मध्ये सुधारणा होत गेल्या आणि High Graphics Quality चे LCD आणि LED Display चे मॉनिटर आले.

मॉनिटर Display ची गुणवत्ता मोजण्यासाठी Luminance, Contract Ratio, Resolution, Dot Pitch, ई मापदंड (Parameters) वापरली जातात. मॉनिटर हे एक महत्त्वाचे उपकरण आहे. याची माहिती संगणक वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असलीच पाहिजे, यासाठी मी या लेखात मॉनिटर ची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. तरी पूर्ण माहिती साठी लेख संपूर्ण वाचवा अशी विनंती!

संगणकाचे भाग व माहिती

मॉनिटर म्हणजे काय? (What is Monitor in Marathi)

मॉनिटर हे डेस्कटॉप कॉम्पुटर चे एक हार्डवेअर उपकरण आहे. मॉनिटर ला Technical भाषेत Visual Display Unit असे म्हणतात. हे संगणक चे अतिशय महत्वाचे Output Device आहे कारण, User ने माऊस व कीबोर्ड च्या साहाय्याने केलेल्या प्रत्येक क्रियेचे Live Output आपल्याला मॉनिटर च्या स्क्रीनवर दर्शवले जाते. मॉनिटर आउटपुट ला सॉफ्ट कॉपी च्या स्वरूपात दाखवते.

CPU (Central Processing Unit) आणि यूजर यांच्या मधील Interface म्हणून मॉनिटर कार्य करते. मॉनिटर ला CPU सोबत जोडण्यासाठी एक खास प्रकारची केबल वापरली जाते तिला विडिओ केबल असे म्हणतात. मॉनिटर आउटपुट ला Image, Text, आणि Video च्या रुपात दाखवते. Graphics कार्ड मॉनिटर ला Graphical Output Signal पाठवतो, या सिग्नल ला कॉन्व्हर्ट करून मॉनिटर स्क्रीनवर आउटपुट Show करते.

मॉनिटर ला उच्च दर्जाचे ग्राफिक्स Show करण्यासाठी High Quality Graphics Card ची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळी बनवण्यात आलेले मॉनिटर हे CRT (Cathode Ray Tube) पासून बनवलेले होते. CRT मॉनिटर चा आकार खूप मोठा असतो व हे वजनाने जड असतात, वीज सुद्धा याना जास्त खर्च होते. आजच्या 21 व्या शतकात LCD मॉनिटर चा शोध लागला आहे. LCD मॉनिटर हे Flat- Screen चे व वजनाने हलके आहेत आणि यांना वीज पण कमी लागते.

मॉनिटर चा इतिहास (History of Monitor in Marathi)

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की मॉनिटर चा शोध लागण्यापूर्वी संगणक अस्तित्वात होते. या काळात संगणकाचा आउटपुट मिळवण्यासाठी पंच कार्ड वापरले जायचे. फक्त आउटपुट साठी नव्हे तर, इनपुट देण्यासाठी ही पंच कार्डच वापरले जायचे. Punch Cards वर सूचना (Instructions) प्रिंट केल्या जायच्या व ते संगणकाला दिले जायचे. त्या सूचना वाचून संगणक आउटपुट बनवायचे आणि आउटपुट ला प्रिंट करून यूजर कडे पाठवायचे. मॉनिटर नव्हते त्या काळात अशीच प्रक्रिया चालू होती.

Punch Card चा वापर 1897 पासून कमी झाला. कार्ल फर्डिनांड ब्रॉन (Karl Ferdinand Braun) यांनी सर्वप्रथम मॉनिटर चा शोध लावला. Karl Ferdinand Braun या शाश्रज्ञांनी कॅथोड रे ट्यूब बनवल्या वर त्यापासून कॅथोड रे मॉनिटर बनवले. CRT ही सर्व बाजूने बंद असते व आतल्या बाजूने फॉस्फरस ने लेपलेले (Coated) असते. यामध्ये इलेक्ट्रॉन गण च्या मदतीने स्क्रीन वर Charged इलेक्ट्रॉन सोडले जातात व त्यातून प्रकाश निर्माण होतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून CRT मॉनिटर बनवण्यात आले.

CRT मॉनिटर हे रंगहीन होते. कालांतराने CRT मध्ये रंग जोडण्यात आले पण हे फक्त दोनच रंग होते, काळा आणि पांढरा. 1977 मध्ये जेम्स पी. मिचेल (James P. Mitchell) यांनी LCD चा शोध लावला. सन 2000 पासून मॉनिटर मध्ये LCD स्क्रीन वापरायला सुरुवात झाली. CRT मॉनिटर जड आणि जास्त वीज शोषणारे होते पण LCD आल्यावर ही समस्या कित्येक पटीने कमी झाली.

LCD मॉनिटर ला CRT च्या तुलनेत कमी वीज लागते व हे हलके असतात. LCD वजनाने हलके असतात कारण यांचा आकार चपटा असतो आणि याना ठेवण्यासाठी पण कमी जागा लागते. आता LCD पेक्षाही Advanced मॉनिटर OLED बाजारात आलेले आहेत, मॉनिटर ला कसे अजून उत्कृष्ट बनवले जाईल यावर खूप शाश्रज्ञ काम करत आहेत.

मॉनिटर चे प्रकार (Monitor Types in Marathi)

आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात खूप प्रकारचे मॉनिटर बाजारात उपलब्ध आहेत, जसे LED Monitor, LCD Monitor, OLED Monitor आणि अजून बरेच प्रकार आहेत, चला आता मॉनिटर च्या प्रकारांची माहिती Monitor Information in Marathi घेऊयात.

1) CRT Monitor-

CRT मॉनिटर हे Cathode Ray Tube पासून बनवले जातात. सामान्यपणे CRT ला TV स्क्रीन मध्ये जास्त वापरले जाते. CRT स्क्रीन आउटपुट ला Black आणि White रंगात दाखवते. CRT मध्ये एका बाजूला Electron Gun असते तर दुसऱ्या बाजूला Fluorescent Screen लावलेली असते.

Monitor ला CPU कडून निर्देश मिळाल्यावर Electron Gun चे काम सुरू होते. ही Gun स्क्रीन वर Charged इलेक्ट्रॉन चा मारा करते व त्यामुळे Electron प्रकाशमान होतात, अश्या पध्दतीने CRT मॉनिटर स्क्रीनवर चित्र बनवते.

CRT मॉनिटर चा उपयोग पूर्वी खूप केला जायचा परंतु LCD, LED आणि OLED आल्यामुळे CRT चा वापर खूप कमी झाला आहे. CRT मॉनिटर चा बिघाड झाल्यावर दुरुस्त करण्यास खूप खर्च येतो आणि हे वजनाने जड असतात व जास्त जागा व्यापतात, हे CRT मॉनिटर चे तोटे आहेत.

2) LCD Monitor-

LCD (Liquid Crystal Display) मॉनिटर हे Advanced Technology असलेले मॉनिटर आहेत. यात Monochrome Pixels वापरण्यात आलेली आहेत. Liquid Crystal Display ला Liquid Crystal Diode असेेही म्हणतात. यामध्ये Monochrome Pixels चा थर असतो जो दोन Transparent Electrode आणि दोन Polarizing Filters च्या मध्ये योजनाबद्ध जोडलेला असतो.

LCD मॉनिटर मध्ये Optical Effect बनवण्यासाठी प्रकाशाला Polarize करून Liquid Crystal Layer मधून सोडले जाते. या प्रकारे स्क्रीन वर Images बनतात. आताच्या काळात दोन LCD तंत्रज्ञान अस्तित्वात आहेत. यातील एक म्हणजे Active Matrix आणि दुसरे Passive Matrix.

सध्या LCD मॉनिटर हे खूप लोकप्रिय आहेत. याचे कारण असे की LCD मॉनिटर वजनाने हलके, कमी आकाराचे व कमी किमतीचे आहेत, CRT च्या तुलनेने. LCD मॉनिटर चा सर्वात मोठा फायदा असा की याना जास्त वीज लागत नाही, त्यामुळे याना बॅटरी वर चालवणे शक्य होते म्हणून LCD स्क्रीन लॅपटॉप मध्ये वापरता येत आहे.

3) LED Monitor-

LED मॉनिटर आजच्या वेळी बाजारात उपलब्ध आहेत आणि खूप ठिकाणी यांचा वापर केला जात आहे. LED आणि LCD मध्ये एकच फरक असतो. LCD मध्ये जी Backlight वापरली जाते ती CCFL असते आणि LED मध्ये Light Emitting Diode द्वारे Backlight उत्पन्न केली जाते.

LCD प्रमाणे LED सुद्धा Flat आणि Curved असतात. विजेच्या वापराबद्दल बोलायचे झाले तर LED स्क्रीन ला LCD आणि CRT च्या तुलनेत कमी वीज लागते, यामुळेच LED स्क्रीन ला पर्यावरण योग्य म्हणले जाते आणि LED चा कचरा सुद्धा जास्त प्रदूषण करत नाही.

LED चा जीवन वेळ तुलनेने जास्त असतो आणि LED स्क्रीन गरम होण्याचे प्रमाण एकदम कमी आहे. LED चा नकारात्मक बिंदू म्हणजे LED स्क्रीन महाग असते त्यामुळे बाजारात पसंती LCD ला जास्त आहे.

4) OLED Monitor-

OLED (Organic Light Emitting Diode) हे एक प्रकाश उत्सर्जन तंत्रज्ञान आहे. LCD आणि LED डिस्प्ले मध्ये Backlight ची आवश्यकता असते परंतु OLED मध्ये Backlight ची गरज नसते. यात LED वापरले जातात जे स्वतः प्रकाशमान असतात.

OLED मध्ये विजेचा प्रवाह सोडल्यावर सर्व LED लाईट मध्ये वीज जाते व आपण हव्या त्या Pixel ला बंद आणि चालू करू शकतो. OLED मॉनिटर इतके महाग असतात की ते सर्वसामान्य व्यक्तीला परवडत नाहीत.

OLED ची Graphics Quality खूप Advanced असते आणि CRT, LCD, LED च्या तुलनेत OLED मॉनिटर कमी विजेवर चालतात.

5) Plasma Monitor-

प्लाझ्मा मॉनिटर हे Advanced Technology Monitor आहेत. हे High Contrast चे असतात. यात दोलायमान रंग (Vibrant Colours) आणि तेजस्वीपणा (Brightness) असतो. प्लाझ्मा मॉनिटर हे Plasma Discharge च्या सिद्धांत वर कार्य करतात. Plasma Discharge मध्ये दोन काचाच्या फ्लॅट पॅनल च्या मध्ये प्लाझ्मा सोडला जातो, यात दोन पदार्थ असतात- Xenon आणि Neon.

प्लाझ्मा सोडल्यावर तो Pixels सारखा कार्य करतो. Pixel ला प्रकाशमान करण्यासाठी छोट्या जागेवर Charged Gas सोडला जातो व तेथील Pixel प्रकाशमान होतो. अश्या पध्दतीने Screen वर दृश्ये बनवली जातात. प्लाझ्मा मॉनिटर हे LCD पेक्षा जास्त तेजस्वी असतात.

यांचा वापर आकाराने मोठ्या असलेल्या TV स्क्रीन मध्ये केला जातो. आताच्या काळात प्लाझ्मा मॉनिटर बाजातून अदृश्य होत चालले आहेत कारण प्लाझ्मा मॉनिटर ची किंमत जास्त असते आणि या पेक्षा कमी किमतीत LCD मॉनिटर उपलब्ध आहेत.

प्रदर्शित रंगाच्या आधारावर मॉनिटर चे प्रकार

मॉनिटर ला त्याच्या रंगाच्या आधारावर तीन प्रकारात विभाजले गेले आहे. मॉनिटर प्रदर्शित रंगाच्या आधारावर मॉनिटर चे प्रकार खालीलप्रमाणे-

1) मोनो-क्रोम मॉनिटर– Monochrome हा शब्द दोन शब्दाचा मिळून बनला आहे. Mono म्हणजे एक (Single) आणि Chrome म्हणजे रंग (Colour), यामुळे याला Single Colour Display असे म्हणतात. हा मॉनिटर (Monitor in Marathi) Black आणि White रंगात आउटपुट दर्शवतो.

2) ग्रे-स्केल मॉनिटर– हे मॉनिटर Monochrome सारखेच असतात. यामध्ये आउटपुट ला Grey Shades मध्ये दाखवले जाते. यांचा वापर लॅपटॉप मध्ये आणि Desktop Monitor मध्ये केला जातो.

3) कलर मॉनिटर– एक मॉनिटर जो लाल, हिरवा, आणि निळा रंगाचा वापर करून आउटपुट प्रदान करतो, त्याला Colour मॉनिटर असे म्हणतात. हे मॉनिटर उच्च ग्राफिक्स ला उच्च Resolution मध्ये प्रदर्शित करण्यात सक्षम असतात. R, G, B रंगाचे मिश्रण करून 16 लाख रंग बनवण्याची क्षमता ठेवतात.

मॉनिटर चे भाग (Monitor Parts in Marathi)

मॉनिटर बनवण्यासाठी त्यात अनेक उपकरण जोडावे लागतात. प्रत्येक उपकरण मॉनिटर मध्ये वापरण्याचा एक हेतू असतो. मॉनिटर च्या आतमध्ये Display, Circuit Board, ई उपकरणे असतात. मॉनिटर च्या आतमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना मॉनिटर चे भाग असे म्हणतात.

1) डिस्प्ले-

डिस्प्ले हा मॉनिटर चा महत्वाचा भाग आहे. संगणक यूजर ला जो आउटपुट देतो ते User ला मॉनिटर च्या Display Screen वर दिसते. LCD मॉनिटर ची स्क्रीन काचेचे विविध थर देऊन बनवलेली असते, ज्यांना Liquid Crystal Display असे म्हणतात.

2) लॅपटॉप स्टँड-

Display ला सर्व बाजूने बंदिस्त ठेवण्यासाठी हे Laptop Stand बसवलेले असते. Screen ला कोणतीही हानी पोहचू नये या साठी लॅपटॉप स्टँड बसवलेले असते. Laptop Stand चा वापर मुख्यतः LCD स्क्रीन साठी केला जातो.

3) केबल-

मॉनिटर मध्ये दोन ठिकाणी केबल वापरल्या जातात. एक म्हणजे Video केबल आणि दुसरी म्हणजे Power Cable. Video Cable मॉनिटर ला ग्राफिक्स कार्ड सोबत जोडते आणि Power Cable मॉनिटर ला मुख्य ऊर्जा श्रोत सोबत जोडते.

4) सर्किट बोर्ड-

मॉनिटर ची कार्यप्रणाली इंटरफेस बोर्ड द्वारे नियंत्रित केली जाते. इंटरफेस बोर्ड हे मॉनिटर चे मुख्य Circuit Board असते. मॉनिटर चे लहान-लहान उपकरणे जसे Capacitor, Resistor, Amplifier ई या बोर्ड ला जोडलेले असतात.

5) बटणे-

मॉनिटर च्या समोर खालच्या बाजूला बटणे असतात. मॉनिटर चे काही Functions याद्वारे नियंत्रित केले जातात. मॉनिटर ला चालू- बंद करण्यासाठी Power बटन असते. डिस्प्ले मेनू ओपन करण्यासाठी Menu बटन असते. Magic Angle नियंत्रित करण्यासाठी Customized बटन असते. अजून Brightness, Enter, Auto ही बटणे मॉनिटर ला दिलेली असतात.

निष्कर्ष

मॉनिटर ची माहिती मराठी Monitor Information in Marathi आपल्याला बऱ्यापैकी समजली असेल, असे मला वाटते. मला शक्य आहे तेवढी माहिती मी या लेखात दिली आहे जेणेकरून आपल्याला एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळू शकेल.

तंत्रज्ञान संबंधित सर्व विषयांवर माहिती प्रदान करण्याचा माझा प्रयत्न आहे, जर आपल्याला ही माहिती हवी असेल तर या वेबसाईट/ ब्लॉग ला पुन्हा-पुन्हा भेट देत राहावे.

आजचा मॉनिटर चा Monitor Information in Marathi लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, शेअर केल्याने मित्रांनाही काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आपल्याला हा लेख कसा वाटला हे कंमेंट करून मला नक्की कळवा.

Leave a Comment