एमपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती

MPSC Information in Marathi: एमपीएससी ही महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात येणारी एक सिव्हिल सर्विस परीक्षा आहे. MPSC परीक्षेतुन विविध सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते. राज्याचा कारभार चालवण्यासाठी जे अधिकारी असतात जसे उप-जिल्हाधिकारी, तहसीलदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ई अधिकाऱ्यांची भरती MPSC परिक्षेमार्फत केली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात व दरवर्षी एमपीएससी परीक्षा देतात.
आपण अवती भोवती कोठेतरी MPSC बद्दल ऐकलेच असेल, कारण आपल्या मित्रांमध्ये, किंवा कोणी नातेवाईक MPSC ची तयारी करत असेल किंवा कोणी MPSC परीक्षा दिली असेल. महाराष्ट्र राज्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी एमपीएससीकडे वळतात. एमपीएससी मधून २७ प्रकारचे सरकारी अधिकाऱ्यांची पदे भरली जातात. आज आपण हा लेख वाचण्यासाठी आला आहात म्हणजे आपल्यालाही MPSC मध्ये रुची आहे.
MPSC Information in Marathi
येथे या लेखात मी एमपीएससी बद्दल ची सर्व बेसिक माहिती, MPSC Information in Marathi देण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीएससी परीक्षेत बसण्यासाठी पात्रता, परीक्षेचे स्वरूप, अशी मूलभूत माहिती या लेखात खाली दिलेली आहे. MPSC Exam बद्दल संपूर्ण माहिती (MPSC Information in Marathi) मिळवण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा अशी विनंती! तर चला जास्त वेळ न लावता आपला पहिला मुद्दा म्हणजे “एमपीएससी म्हणजे काय” हे पाहुयात.
एमपीएससी म्हणजे काय – MPSC Information in Marathi
एमपीएससी म्हणजे “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” किंवा सोप्या शब्दांत “राज्यसेवा” असेही म्हणतात. एमपीएससी ही एक राज्य सरकारची स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था विविध सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणारी MPSC ही एक परीक्षा आहे. MPSC परीक्षेतून २७ प्रकारच्या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये ही परीक्षा येते. MPSC Full Form हा “Maharashtra Public Service Commission” असा होतो.
MPSC Information in Marathi
MPSC Information in Marathi एमपीएससी मुख्यालय मुंबई मध्ये आहे. महाराष्ट्र राज्याचा कारभार चालवणाऱ्या महत्वाच्या पदांची भरती करण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. एमपीएससी परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मुलाखत. या परिक्षेमार्फत भरली जाणारी गट-अ व गट-ब ची मिळून एकूण २७ पदे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असतो, केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
एमपीएससी चा इतिहास – History of MPSC in Marathi
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटना अनुछेद ३१५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील गट-अ व गट-ब नागरी सेवक निवडण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आले. उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार योग्य ते पद प्रदान करण्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कर्तव्य आहे.
लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. लोकसेवा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून सरकारचे कामकाज सुरळीत पार पडण्यास मदत करते. लोकसेवा आयोग दरवर्षी परीक्षा आयोजित करून उमेदवार भरती करते.
एमपीएससी पात्रता – MPSC Exam Eligibility
एमपीएससी राज्यसेवा भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेसाठी ची पात्रता तपासणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोगाने विविध घटकांचा विचार करून ही पात्रता निर्धारित केलेली आहे. अर्ज प्रक्रिया साठी उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. MPSC Exam Eligibility खाली आपण पाहणार आहोत.
१) शिक्षण – MPSC Educational Eligibility
उमेदवाराला मराठी बोलता व लिहता येणे आवश्यक असते. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यालयाची पदवी असावी. पदवी कोणत्याही शाखेतून असली तरी चालते. Graduation च्या शेवटच्या वर्षात असलेले उमेदवारही MPSC पूर्व परीक्षा देऊ शकतात व Graduation पूर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा देऊ शकतात.
२) वयोमर्यादा – MPSC Age Limit
MPSC साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वय मर्यादा तपासणे आवश्यक आहे. एमपीएससी साठी उमेदवाराचे वय कमीत कमी १९ व जास्तीत जास्त ३८ असावे लागते. उमेदवाराच्या कॅटेगरी नुसार वयोमर्यादेत सवलती देण्यात आलेल्या आहेत.
Category | Number of Attempts |
Open | 6 |
SC/ST | Unlimited (वयाच्या मर्यादे पर्यंत) |
OBC | 9 |
३) राष्ट्रीयत्व – MPSC Nationality
MPSC परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असावा. बाहेरील देशातील नागरीक भारतीय राहत असतील तर ते ही परीक्षा देऊ शकतात त्यासाठी Eligibility वेगळी असते ती MPSC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
एमपीएससी आयोजित विविध परीक्षा – Different Exams Conducted By MPSC
आपण वरतीही पाहिले आहे की MPSC ही राज्य सरकारची एक संस्था आहे. MPSC द्वारे राज्यस्तरीय सिव्हिल परिक्षेसोबत दुसऱ्याही परीक्षा घेतल्या जातात. त्या खालीलप्रमाणे-
- 1) State Service Examination
- 2) Maharashtra Forest Service Examination
- 3) Maharashtra Agricultural Service Examination
- 4) Police Sub-Inspector Examination
- 5) Tax Assistant Examination
- 6) Assistant Motor Vehicle Inspector Exam
यासोबतच अजूनही काही परीक्षा आहेत ज्या एमपीएससी द्वारे घेतल्या जातात. यासोबतच अन्य काही सरकारी सेवांसाठीही महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेते.
एमपीएससी परीक्षा स्वरूप – MPSC Exam Pattern
MPSC Exam ची तयारी करण्यास सुरुवात करणार असाल तर Exam चे स्वरूप कसे असते हे माहीत असायला हवे. MPSC Exam चे स्वरूप UPSC Exam प्रमाणेच असते, म्हणजे MPSC ची भरती प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडते. तर चला तिन्ही टप्प्यांची माहिती (MPSC Information in Marathi) घेऊयात.
१) एमपीएससी पूर्व परीक्षा – MPSC Prelims Exam Pattern
मुख्य परीक्षणासाठी पात्र होण्याकरिता उमेदवाराला पूर्व परीक्षा पास करावी लागते. पूर्व परीक्षा देण्यासाठी पदवी पूर्ण असण्याची आवश्यकता नाही, पदवी च्या शेवटच्या वर्षातही पूर्व परीक्षा देता येते. पूर्व परीक्षेचे गुण फक्त मुख्य परीक्षेची पात्रता ठरवण्यासाठी उपयोगी असतात बाकी कोठेही त्यांचा उपयोग होत नाही. पूर्व परीक्षेचे स्वरूप लोकसेवा आयोगाने निर्धारित केलेले आहे ते खालीलप्रमाणे-
पेपर क्रमांक | प्रश्न संख्या | एकूण गुण | पेपर कालावधी |
पेपर १ | १०० | २०० | २ तास |
पेपर २ | ८० | २०० | २ तास |
२) एमपीएससी मुख्य परीक्षा – MPSC Mains Exam Pattern
पूर्व परीक्षेत पास झालेला उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतो. मुख्य परीक्षा ही खूप महत्त्वाची असते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार पूर्व परीक्षा पास असावा लागतो व उमेदवाराकडे पदवी चे प्रमाणपत्र असावे लागते. मुख्य परीक्षेचे गुण उमेदवाराला पदवी देताना ग्राह्य धरले जातात, त्यामुळे ही खूप महत्त्वाची मानली जाते.लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेले मुख्य परीक्षेचे स्वरूप खालीप्रमाणे-
पेपर क्रमांक | विषय | एकूण गुण | कालावधी |
पेपर १ | मराठी आणि इंग्लिश | १०० | ३ तास |
पेपर २ | मराठी आणि इंग्लिश | १०० | १ तास |
पेपर ३ | सामान्य अध्ययन-१ | १५० | २ तास |
पेपर ४ | सामान्य अध्ययन-२ | १५० | २ तास |
पेपर ५ | सामान्य अध्ययन-३ | १५० | २ तास |
पेपर ६ | सामान्य अध्ययन-४ | १५० | २ तास |
एकूण | ८०० |
३) एमपीएससी मुलाखत – MPSC Interview Pattern
मुख्य परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची मुलाखतसाठी निवड केली जाते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. उमेदवाराला पदवी देतानाही मुलाखतीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. एमपीएससी द्वारे घेतली जाणारी ही मुलाखत १०० गुणांची असते. यात पास होणारा उमेदवार MPSC उत्तीर्ण मानला जातो व सरकारी नोकरीसाठी पात्र असतो.
MPSC Information in Marathi
उमेदवाराला या तीनही पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार जर कोणत्याही परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला परत पहिल्यापासून म्हणजे पूर्व परिक्षेपासून सुरू करावे लागते.
दरवर्षी लाखो मुले ही परीक्षा देतात व यातून या पदांसाठी उमेदवार निवडले जातात. एमपीएससी मार्फत दोन प्रकारच्या सेवांची भरती केली जाते, गट-अ व गट-ब. त्याची नावे खालीलप्रमाणे-
गट-अ | |
Deputy Collector | उपजिल्हाधिकारी |
Deputy Superintendent of Police (DySP) | पोलीस उपअधीक्षक |
Assistant Commissioner of Police (ACP) | सहाय्यक पोलीस आयुक्त |
Sub-registrar Cooperative Societies | उपनिबंधक सहकारी संस्था |
Deputy Chief Executive Officer | उपमुख्य कार्यकारी अधिकारी |
Block Development Officer (BDO) | ब्लॉक विकास अधिकारी |
Tahsildar | तहसीलदार |
Assistant Regional Transport Officer (ARTO) | सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी |
Chief Officer (Nagarpalika) | मुख्याधिकारी (नगरपालिका) |
Assistant Commissioner of Sales Tax | सहाय्यक विक्रीकर आयुक्त |
गट-ब | |
Taluka Inspector of Land Records (TILR) | तालुका निरीक्षक भूमी अभिलेख |
Naib Tahsildar | नायब तहसीलदार |
निष्कर्ष –
MPSC Information in Marathi, एमपीएससी ची संपूर्ण माहिती आता आपल्याला समजली असेल. मला वाटते कि आता आपल्याला कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वर जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही, एमपीएससी बद्दल विस्तारित माहिती हि मी आपल्याला दिलेली आहे.
MPSC Information in Marathi आजच्या लेख संबंधित काहीही शंका असेल तर मला कॉमेंट करून नक्की विचारा व लेख कसा वाटला हे हि कमेंट मध्ये सांगा. एमपीएससी ची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि या पोस्टमध्ये नवीन काही माहिती (MPSC Information in Marathi) मिळाली असेल तर या पोस्ट ला मित्रांसोबत नक्की शेअर करा.
सर आपण एमपीएससी बद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Sir aapn Prilims examla pn attempt 6/9 vela ch deu shkto Kay?????
हो
छान माहिती दिलीत, धन्यवाद
Thanks for the information
आर्मी मधे असलेल्या साठी काय कोटा आहे, आनी वय मर्यादा काय आहे
Thanks sir for the information
Thank You Sir
Thank you. Dileli mahiti khup mahatvapurn hoti. Savistar samjun ghenyat madat milali. Khup Dhanyawad aaple.
Hey, to be honest, I just loved what you wrote in this post. While it is true that there are undreds of posts on this same topic but yours is certainly unique. The unique approach taken by the writer is probably the main reason I shared this post on both my Facebook and Twitter pages. As expected, people are reading it and giving me all sorts of positive feedback.
https://thestudycafe.com/mpsc-full-form/
माहिती खूप छान विस्तारित पणे दिली आहे. अशीच माहिती लोकांपर्यंत पोहनचली पाहिजे आपला आभारी आहे.
धन्यवाद
छान वाटली माहिती.पण उप-जिल्हाधिकारी किंवा इतर पदासाठी निवड कशी असते? एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर पद कुठलं हवं ते कोण ठरवतं आणि कसं?
पद हे परीक्षेत मिळालेल्या rank नुसार ठरते. Rank, परीक्षेत मिळालेल्या एकूण मार्क नुसार ठरते.
एमपीएससी परीक्षा कुठे होते