आयटीआय कोर्स काय आहे हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडत असेल. मुख्यतः दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांना, कारण हे विद्यार्थी करिअर चे मार्ग शोधत असतात आणि त्याबद्दल माहिती मिळवत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते कि आपण चांगल्या कोर्स ला ऍडमिशन घ्यावे, चांगली नोकरी मिळवावी, स्वतः चा व्यवसाय सुरु करावा, आणि यासाठी तो अभ्यास करत असतो. कोणत्याही कोर्स ला प्रवेश घेण्याअगोदर त्या कोर्स बद्दल पूर्ण माहिती असणे खूप आवश्यक असते, कारण हा प्रश्न स्वतः च्या भविष्याचा असतो. या बाबतीत कोणीही जोखीम घेण्यास तयार नसते.
ITI Course घेण्यासाठी विध्यार्थी विविध मार्ग अवलंबतात. जसे मित्रांना-नातेवाइकांना विचारणे किंवा सर्वात लोकप्रिय मार्ग गुगल ला विचारणे. आपण सर्व जण गुगल वरून आला आहात आयटीआय कोर्स ची माहिती घेण्यासाठी. आजच्या पोस्ट मध्ये आपण ITI Course Information घेणार आहोत, हि आपल्याला १२ वी झाल्यावर करिअरच्या संधी निवडताना नक्कीच उपयोगी ठरेल. जर आपण दहावी किंवा बारावी चे विध्यार्थी असाल तर आपण हा लेख वाचलाच पाहिजे.
आयटीआय कोर्स म्हणजे काय?
आयटीआय (ITI) हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ITI चा Full Form हा “Industrial Training Institute” असा होतो, याला मराठीत “औद्योगिक प्रकाशन संस्था असे म्हणतात. आयटीआय हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते. या कोर्स मध्ये पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण कॉलेज आहेत. यांद्वारे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात.
महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे हा आयटीआय कोर्स खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. ITI मध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर, असे अनेक ट्रेड्स असतात. ट्रेड नुसार विद्यार्थ्याला त्या-त्या गोष्टीचे प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जाते. प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ट्रेड निवडण्याचा पर्याय असतो. आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET महाराष्ट्र च्या सरकारी वेबसाईट वर ऑनलाईन घेतली जाते, यात विध्यार्थी आपल्या आवडीनुसार कॉलेज व ट्रेड निवडून प्रवेश अर्ज करू शकतो.
आयटीआय ट्रेड्स चे प्रकार कोणते आहेत?
इंजिनीअरिंग मध्ये ज्याप्रमाणे विविध ब्रॅंचेस असतात अगदी त्याचप्रमाणे आयटीआय मध्ये अनेक ट्रेड असतात. प्रत्येकजण आवडीनुसार ट्रेड निवडू शकतो. आयटीआय मधील या ट्रेडस ला दोन टाइप्समध्ये विभाजले गेले आहे.
१) इंजिनीरिंग ट्रेड्स
यामध्ये सर्व तांत्रिक ट्रेड असतात. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाशी संबंधित ट्रेड यामध्ये येतात. तंत्रज्ञान, संगणक, अश्या विषयांमध्ये आवड असणारे विद्यार्थी हे ट्रेड निवडतात. Computer Hardware & Network Maintenance, Desktop Publishing Operator, Information & Communication Technology System Maintenance, हे काही Engineering Trades ची उदाहरणे आहेत.
२) नॉन-इंजिनीरिंग ट्रेड्स
आयटीआय च्या या प्रकारात सर्व नॉन तांत्रिक ट्रेड असतात. यामध्ये तांत्रिक विषय नसतात, त्यामुळे याना नॉन टेक्निकल ट्रेड असे म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयात आवड नाही त्यांद्वारे हे ट्रेड निवडले जातात. Carpenter, Painter, Sewing Technology, Dress Making, हे काही Non-Engineering Trades ची उदाहरणे आहेत.
आयटीआय कोर्स किती वर्षाचा असतो?
ITI कोर्स चा अवधी सर्व ट्रेड साठी सारखा नसतो. या कोर्स चा Duration ६ महिने ते २ वर्षापर्यंत असू शकतो. ट्रेड नुसार कोर्स चा अवधी वेगळा असतो. फिटर, इलेकट्रीशियन, वायरमन या ट्रेड चा कालावधी २ वर्षाचा असतो, तर Sewing, Plumber, Welder हे ट्रेड १ वर्षाचे असतात. इंजिनीअरिंग मध्ये सर्व ब्रॅंचेस साठी कालावधी ४ वर्षाचा असतो परंतु आयटीआय मध्ये असे नसून ट्रेड्स नुसार कोर्स चा कालावधी वेगळा असतो.
आयटीआय कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
आयटीआय ला प्रवेश घेण्याच्या तयारीत असाल तर आपल्याला ITI Course Eligibility माहित असायला हवी. म्हणजे भविष्यात काही अडचण यायला नको. तर आपल्याला जर आयटीआय कोर्स ला प्रवेश घेण्याचा असेल तर आपले वय १४ वर्ष असणे आवश्यक आहे व उमेदवाराचे वय ४० वर्षाच्या आत असायला हवे. यासोबतच आयटीआय साठी Education Eligibility सुद्धा लागते.
ITI Course साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावा, व किमान मार्कांची कोणतीही अट नाही. बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा आयटीआय ला प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश घेताना दहावी च्या मार्क्स वर घ्यायचा हा बारावीच्या हे आपण ठरावी शकता. जर विद्यार्थी बारावी मध्ये अनुत्तीर्ण असेल तर तो दहावीच्या गुणांवर प्रवेश मिळवू शकतो.
आयटीआय कोर्स ला प्रवेश कसा घ्यावा?
महाराष्ट्रात आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET (Directorate of Vocational Education and Training) Maharashtra द्वारे राबवली जाते. दहावी किंवा बारावी पास झालेले १४ वर्ष वय असलेले विद्यार्थी आयटीआय च्या Admission Process साठी Apply करण्यास पात्र असतात. DVET Maharashtra च्या सरकारी वेबसाईटवर प्रवेश प्रक्रिया असते. सर्वात आधी आयटीआय चे ऑनलाईन फॉर्म सुटतात आणि विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये प्रवेश होण्यासाठी हा ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
Admission Form मध्ये आयटीआय कॉलेज आणि त्यामध्ये उपलब्ध असलेले ट्रेड्स असतात. विद्यार्थ्याला स्वतः च्या सोयीनुसार आणि आवडीनुसार कॉलेज आणि ट्रेड ला प्राधान्य द्यावे लागते. हे झाल्यावर पहिल्या राऊंड ची लिस्ट जाहीर होते, त्यात मार्क्सनुसार विद्यार्थ्याला कॉलेज Allot केले जाते. ज्यां विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मधील कॉलेज ला प्रवेश घेण्याचा आहे त्यांनी त्या कॉलेज ला भेट देऊन आपले Admission घ्यावे लागते. आणि ज्यांना कॉलेज नको असेल त्यांनी दुसरा आणि तिसरा राऊंड मध्ये सहभाग घ्यावा लागतो.
एकूण तीन राऊंड होतात. कॉलेज ची Allotment आपण भरलेल्या कॉलेज आणि ट्रेड च्या क्रमाने होते. पहिल्या राऊंड मधील कॉलेज नको असेल तर पुढची प्रक्रिया सुरु ठेवता येते. हे तिन्ही राऊंड पूर्ण होऊन जर कॉलेज मध्ये जागा शिल्लक असतील तर खाजगी कॉलेज स्वतः च्या प्रक्रियेने विध्यार्थी घेतात, ज्यासाठी वेगळी फी असते. तर हि आहे आयटीआय प्रवेश प्रक्रिया. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सरकारी आयटीआय ट्रेनिंग संस्था असते व इतर खाजगी असतात.
आयटीआय कोर्ससाठी फी किती असते?
आयटीआय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ची सरकारी आणि खाजगी कॉलेज ची फी वेग-वेगळी असते. आयटीआय कोर्सची फी इंजिनिअरिंग च्या फी पेक्षा कमीच असते. साधारणतः आयटीआय सरकारी कॉलेज ची एका वर्षाची फी २ हजार ते ९ च्या मध्ये असते. ट्रेड नुसार फी वेग वेगळी असते. खाजगी कॉलेज ची फी खूप जास्त म्हणजे वर्षाची दहा ते पन्नास हजार पर्यंत असू शकते. सरकारी कॉलेज ची फी खूप कमी असते व जातीनुसार यात सवलत पण दिली जाते.
आयटीआय कोर्स झाल्यानंतर काय करावे?
विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न नक्की असतो की आयटीआय झाल्यावर पुढे काय करावे? आयटीआय चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Engineering आणि Diploma अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्यातून आपण पुढे शिक्षण सुरू ठेऊ शकता. ज्यादाकरून विद्यार्थी आयटीआय झाल्यावर नोकरी करतात. यामध्ये पण दोन प्रकार पडतात, पहिली सरकारी नोकरी आणि दुसरी जी खाजगी कंपनी मध्ये करतात ती Private Job.
आयटीआय झाल्यावर नोकरीसाठी Technical Sector आणि Non-Technical Sector च्या नोकऱ्या असतात. आयटीआय विद्यार्थ्यांसाठी MIDC मध्ये जास्त नोकऱ्या असतात. विद्यार्थ्यांच्या ट्रेड नुसार सेक्टर विद्यार्थ्यांना मिळतो, आणि त्यात ते नोकरी करतात. यासोबतच आपल्याकडे स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याची संधी असते. यात वेल्डर, इलेक्ट्रीशियन चे स्वतः दुकान टाकू शकता. याप्रमाणे आपल्यासमोर नोकरी, व्यवसाय किंवा पुढील शिक्षण हे पर्याय उपलब्ध असतात.
निष्कर्ष
आपल्याला आजची आयटीआय ची संपुर्ण माहिती, ही पोस्ट खूप आवडली असेल. मला आशा आहे की आपल्याला ITI ची माहिती पूर्णपणे समजली असेल. आपल्याला मनात ITI संबंधित कोणतीही शंका आता राहिली नसेल असे मला वाटते आणि जरी शंका असेल तर खाली कंमेंट करून विचारा.
या पोस्टमध्ये आपल्याला काही नवीन आणि महत्वाची माहिती मिळाली असेल तर ही पोस्ट आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. अजून कोणत्याही कोर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर कंमेंट करून सांगू शकता. शैक्षणिक, करियर संबंधित अधिक माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगवर पुन्हा नक्की या.
Shwipar padasathi ITI p magatat
Shwipar cha ITI kothe aahe
Computer hardware la addmission sathi Kay patrata Kay ahe
Mala iti late machine mahde karaycha ahe mhange eg bike kiva 4wheeler che block bore karne head repair karne, ya sathi konte trade ghyava
Please tell me what can I do now?
I am pass ssc exam by 80%
Mala plumber trade vishayi purn
mahiti pahije
ok
Very good
Mala plumber chi purn mahiti paheje
Electrition, Fitter,Sewing, yanchi
Mahiti pahije
Mala electricals purn mahiti pahije
ITI course ha aplyala dely college la main karava label ka
Hi
girls ITI made ky gheu shakta
ani girls la konte options ahe
mulinna iti made kay gheta yet
ani iti kiti year cha asto
hello reply plz
Hi Madam mala वायरमन कोर्स करायचा आहे त्यासाठी काय काय लागेल त्याची माहिती मला सेंड करा
Number lagla asel tr domecal non adhar marksit tc 5 pass photos
Mala electronic la kiti fee lagel mala karane aahe mahiti send Kara