स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क कसे सक्रिय करावे?

How to Activate 5G Network – खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता भारतात 5G तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. 1 ऑक्टोबर रोजी Indian Mobile Congress (IMC) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 5G Network लाँच केले. भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या जसे Airtel, Jio आणि Vi यांनी त्यांची 5G सेवा रोलआउट केली आहे. देशातील काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात आलेली आहे. अनेकजण 5G च्या High Speed Internet चा आनंद घेताना दिसत आहेत. सध्या 5G हे टेस्टिंग मोड मध्ये आहे, हळूहळू सर्व टेलिकॉम कंपन्या 5G च्या शर्यतीत उतरताना दिसत आहेत.

मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानात खूप प्रगती होत चालली आहे. आधी 2G, 3G नंतर 4G आणि आता आले आहे 5G. 4G पेक्षा 100 पटीने जास्त इंटरनेट स्पीड देऊ शकते हे 5G Network. याच्या मदतीने काही GB चा आकार आलेली फाईल तुम्ही काही सेकंदात डाउनलोड करू शकता. 5G मध्ये High Internet Speed सोबत Reliable Connectivity, Negligible Delay आणि Uniform User Experience तुम्हाला मिळतो. 4G शी तुलना केली तर 5G कितीतरी पटीने ऍडव्हान्स आहे.

5G Network ची येवढी स्पीड ऐकून तुम्हालाही 5G वापरावे असे वाटत असेल. तर चिंता करू नका आजची ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. या पोस्टमध्ये आपण स्मार्टफोन मध्ये 5G Service कशी Activate करायची हे पाहणार आहोत. जर तुम्हाला How to Activate 5G Network हे माहीत नसेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. या मध्ये मी 5G Network Enable कसे करायचे, याबद्दल माहिती दिली आहे.

स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क कसे सक्रिय करावे (How to Activate 5G Network)

स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी सर्वात Important आहे की तुमचा मोबाईल 5G Service Support करत असावा म्हणजे 5G असावा. Airtel आणि Jio च्या रिपोर्ट नुसार 5G सर्विस वापरण्यासाठी तुम्हाला नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही. वापरात असलेले 4G Sim, हे 5G Network प्रदान करण्यास सक्षम आहे.

5G सुरू करण्याची प्रक्रिया IOS आणि Android साठी वेगवेगळी आहे. तर मी खाली दोन्ही साठी वेगळे दिलेले आहे. तर चला आधी Android स्मार्टफोन मध्ये 5G Enable कसे करतात ते पाहुयात.

5G Network on Android

Android Smartphone मध्ये 5G Enable करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

 • स्मार्टफोन मधील Settings ओपन करा.
 • आता Network and Internet वरती क्लिक करा.
 • पुढे Mobile Network वरती क्लिक करा.
 • Available Networks मधून 5G Select करा.
 • जर तुम्हाला 5G पर्याय दिसत नसेल तर तुमचा फोन 5G सपोर्ट करत नाही म्हणजे तुम्हाला 5G वापरण्यासाठी नवीन 5G Smartphone घ्यावा लागणार.

5G Network on iPhone

iPhone 12 आणि त्याच्या नंतरचे मॉडेल्स 5G सपोर्ट करतात. iPhone मध्ये 5G आलेले नसेल तर फोन चे सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. iPhone मध्ये 5G सुरू करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

 • पहिले Settings वरती जा.
 • आता Mobile Data वरती क्लिक करा.
 • आणि Options मधून 5G On किंवा 5G Auto Select करा.

अश्या प्रकारे तुम्ही IOS स्मार्टफोन वरती 5G Enable करू शकता.

Airtel 5G Bands

ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या 5G Spectrum च्या लिलावात Airtel ने 5G साठी खालील Bands घेतले आहेत. User ला High Speed देण्याच्या हेतूने कंपनी ने जास्त Frequency चे Bands घेतले आहेत.

 • n8 : 900MHz
 • n3 : 1800MHz
 • n1 : 2100MHz
 • n78 : 3300MHz
 • n258 : 26GHz

Jio 5G Bands

Airtel च्या तुलनेत जिओकडे सध्या कमी 5G Bands आहेत. Jio कंपनी ने 5 ऑक्टोबर रोजी 5G लाँच केले होते. Jio चे 5G Bands खाली दिले आहेत.

 • n28 : 700MHz
 • n78 : 3500MHz
 • n258 : 26GHz

5G Network Speed Test

अमेरिकेतील Ookla या मोबाईल नेटवर्क संस्थेच्या रिपोर्ट नुसार भारतात सर्वात फास्ट 5G इंटरनेट हे Jio चे आहे. Jio जवळपास 600 Mbps इंटरनेट स्पीड प्रदान करते तर Airtel ची स्पीड कमी म्हणजे 516 Mbps इतकी आहे. पुढे काय होईल सांगता येत नाही परंतु आत्ता Jio ची 5G इंटरनेट स्पीड सर्वात जास्त आहे.

इंटरनेट स्पीड कशी चेक करायची?

Ookla रिपोर्ट नुसार भारतातील काही शहरातील 5G स्पीड तुलना –

CityJioAirtel
Delhi598.58 Mbps197.98 Mbps
Mumbai515.38 Mbps271.07 Mbps
Kolkata482.02 Mbps33.83 Mbps
Varansi485.22 Mbps516.57 Mbps

निष्कर्ष –

वरील स्टेप्स फॉलो करून आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये 5G Service Activate करू शकता. जर तुमचा फोन 5G असेल आणि तुमच्या Area मध्ये 5G Network उपलब्ध असेल तर लगेचच आपल्या फोनमध्ये 5G सुरू होईल आणि आपण High Speed Internet चा अनुभव घेऊ शकता. मला आशा आहे कि आपल्याला हि पोस्ट चांगल्या प्रकारे समजली असेल. पोस्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.

5G Service Activate करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर खाली कमेंट करून नक्की विचारा. तुमची अडचण सोडवली जाईल. आजची How to Activate 5G Network हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत सोशल मीडिया च्या माध्यमातून नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या New Technology संबंधित माहितीसाठी या वेबसाईटला पुन्हा भेट द्या. धन्यवाद!

Leave a Comment