E Shram Card Online Apply 2024 : कामगार मित्रांनो, कष्टाचं जीवन आपण सगळेच जगतो. रोज़च्या खर्चाची चिंता, भविष्याची अनिश्चितता या सगळ्यांशी आपण रोजच झगडत असतो, पण आता सरकार तुमच्या पाठीशी आहे! असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुरू असलेली ई-श्रम योजना (e-shram yojana) तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
E Shram Card Yojana या योजने अंतर्गत तुम्ही मोफत ई-श्रम कार्ड (e-Shram Card) बनवू शकता. हे कार्ड तुमच्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महत्वाचं आहे. या कार्डमुळे तुम्हाला
- दुर्घटना मृत्यू झाल्यास २ लाख रुपयांचा विमा
- वृद्धापकाळात दर महिना ३ हजार रुपये इतकी पेंशन
- इतर सरकारी योजनांचा लाभ
ई-श्रम पेंशन ही योजना २०२४ मध्ये अजूनही सुरु असून तुम्ही सहजतेने ऑनलाईन नोंदणी करू शकता. आज या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला ई-श्रम कार्ड, E Shram Card Online Apply 2024, बद्दल सविस्तर माहिती देणार आहे. यामध्ये नोंदणीची प्रक्रिया, लागणारे कागदपत्र, कार्डाचे फायदे आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर चला पोस्ट सुरू करूयात.
काय आहे ई-श्रम कार्ड? E Shram Card Yojana 2024
ई-श्रम कार्ड योजना ही भारत सरकारची एक अत्यंत महत्वाची योजना आहे जी असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करते. या योजनेचा मुख्य उद्देश या क्षेत्रातील कामगारांना आर्थिक आणि सामाजिक हक्क मिळवून देणे हा आहे. या योजनेअतर्गत कामगारांना 2 लाखापर्यंतचा अपघात विमा आणि दर महिना 3000 रुपये पेंशन दिली जाते.
ई-श्रम कार्ड योजने अंतर्गत, 16 ते 59 वर्षे वयोगटातील, आणि EPFO, ESIC किंवा NPS सारख्या कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत नोंदणीकृत नसलेले, असंघटित क्षेत्रातील कामगार E Shram Card Online Apply 2024 करू शकतात. हे कार्ड बनवणे पूर्णपणे मोफत आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही.
ई-श्रम कार्ड धारकांना या योजनेद्वारे अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात. यात दुर्घटना विमा, वृद्धापकाळ पेंशन, शिक्षण शुल्क सवलत, कर्जावरील व्याज सवलत आणि इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ यांचा समावेश आहे.
ई-श्रम कार्ड चे फायदे Benefits of E Shram Yojana
आता आपण काही मुद्यांच्या मदतीने ई-श्रम कार्ड अंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात जी खालीलप्रमाणे आहेत –
- देशातील सर्व मजूर ई-श्रम कार्ड बनवू शकतात.
- या कार्ड च्या मदतीने तुमच्या मुलांना शिक्षण मिळेल.
- ई-श्रम कार्ड अंतर्गत, तुम्हाला ₹ 2 लाखांचा संपूर्ण अपघात विमा मिळेल.
- तुम्ही मानधन योजनेसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर वार्षिक 3,000 रुपयांची संपूर्ण आर्थिक मदत दिली जाईल.
हे आहेत ई श्रम कार्ड चे फायदे, याच कारणामुळे तुम्हाला समजले असेल कि ई श्रम कार्ड बनवणे खूप महत्वाचे आहे. आता आपण हे कार्ड बनवण्यासाठी कोणती पात्रता लागती हे पाहुयात.
ई-श्रम कार्डसाठी पात्रता E Shram Card Eligibility
ई श्रम कार्डसाठी अर्ज करण्यासाठी म्हणजेच E Shram Card Online Apply 2024 ई श्रम कार्ड मिळविण्यासाठी, खाली दिलेली केलेली पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे –
- लेबर कार्ड बनवण्यासाठी व्यक्तीचे वय १५ ते ५९ वर्षे दरम्यान असावे.
- हि योजना पूर्णपणे कष्टकरी मजुरांसाठी आहे, म्हणून ज्याला त्यासाठी अर्ज करायचा आहे तो आयकरदाता नसावा.
- अर्जदाराने असंघटित कामगाराच्या श्रेणीत येणे आवश्यक आहे म्हणजेच अर्जदार EPFO किंवा ESIC चा सदस्य नसावा.
- अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असावा आणि संघटित क्षेत्रातील कामगार असावा.
ई-श्रम कार्ड कागदपत्रे E Shram Card Documents
आपल्या E Shram Card Online Apply 2024 करण्यापूर्वी त्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात हे माहिती असायला पाहिजे ते खालीलप्रमाणे –
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आधार लिंक मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- ईमेल आयडी
ई-श्रम कार्ड नोंदणी प्रक्रिया E Shram Card Online Apply 2024
आता आपण E Shram Card Online Apply 2024 कसे करायचे हे पाहुयात. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजपणे E Shram Card Online Apply 2024 करू शकता. तर चला E Shram Card Online Apply करण्याची प्रक्रिया सुरू करूयात.
- 1) E Shram Card Online Apply 2024 करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला ई- श्रम पोर्टलच्या अधिकारी वेबसाईट वरती जायचे आहे.
- 2) वेबसाईट ओपन झाल्यावर त्यावरील Register on eShram हा पर्याय निवडावा.
- 3) वरील पर्याय निवडल्यावर आपल्या समोर Self Registration चे पेज ओपन होईल.
- 4) Self Registration फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरावी आणि पुढील प्रक्रियेकडे वळावे.
- 5) नोंदणी झाल्यावर आपल्या आधार क्रमांक आणि OTP च्या माध्यमातून KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
- 6) KYC झाल्यावर आपले बँक डिटेल्स द्या आणि Submit पर्यायावर क्लिक करा.
- 7) Submit वरती क्लिक केल्यावर आपला ई श्रम कार्डासाठी अर्ज पूर्ण होईल. आता आपल्याला आपले ई श्रम कार्ड त्वरित डाउनलोड करून घेयाचे आहे.
मी वरती दिलेली प्रक्रिया वाचून तुम्हाला E Shram Card Online Apply 2024 साठी पूर्णपणे नवीन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती सहज मिळाली असेल, मला आशा आहे की तुम्हाला हा लेख खूप आवडला असेल.
निष्कर्ष
आजच्या या लेखात, मी तुम्हाला ई श्रम कार्ड ऑनलाइन अर्ज 2024, E Shram Card Online Apply 2024 बद्दल संपूर्ण माहिती संपूर्ण तपशीलवार सांगितली आहे.
जर तुम्ही मजूर असाल आणि तुम्ही तुमचे आय-श्रम कार्ड अजून बनवले नसेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नावावर कार्ड बनवावे कारण या कार्ड अंतर्गत, मानधन योजनेअंतर्गत, 3000 पेंशन आणि 200000 चा अपघात विमा आणि इतर विविध प्रकारच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभ देखील दिले जातात.
मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी हा लेख शेवटपर्यंत वाचला असेल आणि तुम्हाला हा लेख खूप आवडला असेल, त्यासाठी तुम्ही आमच्या लेखाला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा.