How to Create Google Account (2023) – आज आपला देश डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. अशा इंटरनेटच्या या युगात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण स्मार्टफोन, कॉम्पुटर, लॅपटॉप वापरत आहेत. अश्या या युगात तुम्ही Gmail Account किंवा Email Account हे नाव नक्कीच ऐकले असेल. याला आपण गुगल अकाउंट असे सुद्धा म्हणतो, दोन्ही एकच आहे. Google चा कोणताही Product किंवा Service वापरण्यासाठी Google Account ची आवश्यकता असते.
एवढेच नाही जर Student असाल तर तुम्ही हे पाहिले असेल की जेव्हा तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीचा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला जीमेल आयडी देखील भरायला सांगितला जातो.Gmail ही Google द्वारे प्रदान केलेली विनामूल्य ई-मेल सेवा आहे. Gmail चे 2019 पर्यंत जगभरात 1.5 अब्ज Users झालेले होते. Users त्यांच्या वेब ब्राउझरवर किंवा गुगल चे Gmail App आहे यावरून Access करू शकतो. (How to Create Google Account)
Gmail ही एक विनामूल्य सेवा आहे ज्याद्वारे कोणालाही संदेश पाठविला जाऊ शकतो. जर तुम्हाला एखादा Message, Document किंवा तुमचा कोणताही महत्त्वाचा डेटा कुणाला पाठवायचा असेल, तर तुम्ही तो काही मिनिटांत ईमेलद्वारे सहज पाठवू शकता. यासाठी, तुम्हाला ज्या व्यक्तीला ईमेल पाठवायचा आहे, त्याचा ईमेल पत्ता तुम्हाला माहीत असला पाहिजे, ज्याला Email ID असे म्हणतात.
How to Create Google Account | ५ मिनटात गुगल खाते कसे तयार करावे, संपूर्ण प्रक्रिया | Create Gmail Account
आतापर्यंत तुम्हाला Gmail काय असते आणि ते कशासाठी वापरतात हे समजले असेल, आता आपण पाहुयात कि Gmail Account म्हणजेच Google Account कसे तयार करायचे? How to Create Google Account, आपण Gmail खाते कसे तयार करू शकता हे या पोस्ट मध्ये Step By Step दिलेले आहे. या पोस्ट मध्ये एक Gmail आयडी करून दाखवली आहे. तर मग चला पाहुयात नेमकी काय आहे How to Create Google Account ची प्रक्रिया.
1) Create Your Google Account
गूगल खाते तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर चे ब्राऊजर ओपन करायचे आहे आणि Create Google Account या लिंक वरती जायचे आहे. लिंक ओपन केल्यावर लगेच आपल्यासमोर जी-मेल तयार करण्यासाठीचा एक फॉर्म येईल.

2) Enter Your Name
आता आपल्यासमोर एक फॉर्म ओपन झाला असेल. तुम्हाला सर्वात आधी तुमचे नाव विचारले जाईल, ते योग्यरीत्या भरावे. पहिल्या बॉक्समध्ये FIRST NAME म्हणजे नाव आणि त्याच्या समोरील बॉक्समध्ये LAST NAME म्हणजे आडनाव टाकायचे आहे.

3) Enter Your Username
नाव टाकून झाल्यावर आता तुम्हाला Username टाकायचे आहे. हे युजर नेमच तुमचा इमेल असणार आहे. त्यामुळे युजरनेम टाकताना असा टाका कि तो तुमच्या लक्षात राहायला हवा. अवघड युजरनेम टाकू नका कारण तुम्हाला तुमचा ई-मेल परत मिळवायला त्रास नको.

तुम्हाला लागतो तो ई-मेल जर उपलब्ध नसेल तर तुम्ही Available इमेल्स मधून Select करावा किंवा दुसरा टाईप करावा. तुमच्या युजरनेमला @gmail.com लावले जाते आणि तोच तुम्हाला ई-मेल म्हणून दिला जातो.
4) Set Password
आता तुम्हाला तुमच्या Google खात्यासाठी एक मजबूत आणि सुरक्षित पासवर्ड निवडायचा आहे. पासवर्ड हा असा टाकावा कि तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, आणि इतका सोपा पण नका टाकू कि दुसरे कोणी तुमचे अकाउंट खोलू शकेल. पासवर्ड हा 8 Characters किंवा त्यापेक्षा मोठा असावा.

तुम्हाला पासवर्ड दोनदा टाकायचा आहे, दोन्ही वेळेस तोच पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी असे केलेले आहे. पासवर्ड टाकल्यावर Next बटन वरती क्लिक करावे.
5) Add Mobile Number
आता या स्टेप मध्ये मोबाईल नंबर विचारला आहे, तुम्हाला जर टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा तसाच सोडून पुढे जाऊ शकता. मोबाईल नंबर फक्त सुरक्षेच्या दृष्टीने विचारला जातो, आपला मोबाईल नंबर इतरांना दिसत नाही. विसरलेला पासवर्ड परत मिळवण्यासाठी Mobile Number चा उपयोग होतो.

6) DOB and Gender
या स्टेप मध्ये जन्मतारीख आणि लिंग विचारले जाते. विचारलेली माहिती योग्यरित्या भरावी आणि Next वरती क्लिक करावे.

7) Accept Privacy and Terms
हि शेवटची स्टेप आहे, यामध्ये तुम्हाला गूगल च्या नियम व अटी मान्य कराव्या लागतात. त्यासाठी आपल्या समोर आलेल्या पेज च्या शेवटी जाऊन I Agree वरती क्लिक करावे.

8) Gmail Successfully Created
अभिनंदन! तुमचे Gmail Account आता तयार झालेले आहे. आता तुम्ही ठेवलेल्या युजरनेम आणि पासवर्डच्या मदतीने तुम्हाला जीमेलमध्ये साइन इन करावे लागेल. (How to Create Google Account) तुम्ही जीमेलमध्ये साइन इन करताच, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेल्या सर्व Google Applications मध्ये आपोआप साइन इन व्हाल. आता तुम्ही Google Apps वापरण्यास सक्षम आहात.
निष्कर्ष –
मला आशा आहे कि आपल्याला आजची How to Create Google Account | गुगल खाते कसे तयार करावे | Create Gmail Account 2023 हि पोस्ट आवडली असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे Gmail अकाउंट बनवू शकता. जर तुम्हाला खाते तयार करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला तुमच्या समस्येवर नक्कीच उपाय मिळेल.
आजच्या How to Create Google Account पोस्टचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल, त्यामुळे जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर तो सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि मग तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा भेट नक्की द्या.