केवायसी (KYC) म्हणजे काय व कसे करावे?

आज आपण KYC बद्दल माहिती घेणार आहोत. KYC Full Form in Marathi, KYC म्हणजे काय, KYC साठी कोणती कागदपत्रे लागतात व KYC ची गरज काय आहे हे सर्व आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. भारताच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया ने सर्व बँक, वित्तीय संस्थाने, असे सर्व गोष्टी जेथे वित्तीय व्यवसाय (Financial Transactions) होतो तेथे KYC अनिवार्य केले आहे.

WhatsApp Group Join Group

KYC चा फॉर्म आपल्याकडून बँकेत नक्कीच भरवून घेतला असेल. Bank Account सुरू करणे असो, किंवा Mutual Funds घेणे असो, किंवा ऑनलाईन डिमॅट खाते सुरु करणे असो, या सर्व ठिकाणी आपल्याकडून KYC Form भरून घेतला जातो. ऑनलाईन शॉपिंग साईट्स जसे अमेझॉन, फ्लिपकार्ट, मध्ये तर आपण ऑनलाईन पध्दतीने KYC फॉर्म भरून घेतला जातो. तर चला KYC म्हणजे काय हे आधी पाहुयात.

केवायसी म्हणजे काय? (KYC Meaning in Marathi)

KYC (KYC Meaning in Marathi) ही ग्राहकांची ओळख पडताळणी करण्याची एक प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्थाने, जसे बँक, द्वारे वापरली जाते. KYC (Know Your Customer) म्हणजे आपला ग्राहक जाणून घेणे. भारत सरकार ने 2002 मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती आणि 2004 मध्ये सर्व बँक ने ही प्रक्रिया अवलंबावी अशी घोषणा केली होती. KYC सर्वात प्रथम Reserve Bank of India मध्ये 2005 रोजी ग्राहकांसाठी KYC ची सुरुवात केली.

बँक खाते सुरू करते वेळी बँक आपल्याला काही कागदपत्रे मागते, त्यात आपली ओळख, पत्ता असलेले Document असते, यालाच KYC प्रक्रिया असे म्हणतात. ग्राहकांची ओळख तपासणी करण्यासाठी बँक कागदपत्रे मागत असते. KYC चा उपयोग फक्त बँकेत नाही तर, ऑनलाईन शॉपिंग साईट्स, Mutual Funds Account, डिमॅट अकाउंट ओपन करतानाही केला जातो.

नवीन सिम कार्ड घेताना आपले आधार कार्ड तपासले जाते याला सुद्धा KYC प्रक्रिया म्हणतात. वाढत चाललेली धोकेबाजी रोखण्यासाठी सरकारने हा निर्माण घेतला होता, यामुळे कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या नावाचा दुरुपयोग नाही करू शकणार व Money Laundering सारख्या बेकायदेशीर गोष्टींना आळा बसेल.

केवायसी फुल फॉर्म (KYC Full Form in Marathi)

KYC चा फुल फॉर्म “Know Your Customer” असा होतो. मराठी मध्ये याचा अर्थ (KYC Meaning in Marathi) “आपल्या ग्राहकास जाणून घ्या” असा होतो. सर्व बँक, किंवा असे ठिकाणे जेथे Financial Transaction केले जातात त्यांना सर्वांना ग्राहकाबद्दल माहिती घेण्याचा अधिकार असतो. ग्राहकांची माहिती घेऊन त्यांची ओळख पडताळणी केली जाते.

केवायसी चे प्रकार (Types of KYC in Marathi)

आपण वरती पाहिले की KYC प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने करणे शक्य आहे, यावरूनच KYC चे दोन Types पडलेले आहेत.

१) EKYC

ई-केवायसी चे पूर्ण नाव Electronic Know your Customer असा होतो. EKYC प्रक्रिया कागद विरहित असते. ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाते व यात भौतिक स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता नसते.

२) CKYC

CKYC चे पूर्ण नाव Central Know your Customer असा होतो. ही प्रक्रिया भारतातील सर्व बँकेत वापरली जाते, त्यामुळे याला Central KYC म्हणतात. CKYC प्रक्रियेत बँकेत कागदपत्रे जमा करून फॉर्म भरून द्यावा लागतो.

केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for KYC)

KYC प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने करता येते. हे यावर ठरते की आपण सेवा कोठून मिळवतो. बँकेत जर KYC Verification करायचे असेल तर ती प्रक्रिया Offline आहे म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन कागदपत्रे जमा करावी लागतात व फॉर्म भरावा लागतो. डिमॅट खाते उगडणे किंवा Mutual Fund मध्ये Invest करणे यासाठी ऑनलाईन KYC असते, यात कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतात.

KYC साठी लागणारे Documents खाली दिले आहेत –

  • १) आधार कार्ड
  • २) मतदान कार्ड/ओळखपत्र
  • ३) पॅन कार्ड
  • ४) पासपोर्ट
  • ५) वाहक परवानाही कागदपत्रे

KYC Verification साठी आवश्यक असतात. यातील जर कोणत्याही कागदपत्रावर आपला पत्ता नसेल तर आपल्याला दुसरा Document जोडावा लागेल ज्यात आपला पत्ता असेल.

केवायसी (KYC) Verification कसे करावे? (KYC Process in Marathi)

केवायसी (KYC) Verification करण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. केवायसी (KYC) Verification साठी मी वर दिलेले कागदपत्रे घेऊन बँकेत जावे लागते, मग ते आपल्याला एक फॉर्म देतात तो फॉर्म भरायचा व कागदपत्रे झेरॉक्स काढून त्यासोबत देऊन जमा करायचे. जवळजवळ सर्वच बँकेत याप्रमाणे KYC केली जाते.

Mutual Funds किंवा Demat Account उघडताना ऑनलाईन KYC Verification करावे लागते. हे करण्यासाठी वर दिलेले कागदपत्रे मोबाईल कॅमेरा वापरून स्कॅन करून घ्यावे लागतात. ऑनलाईन KYC Verification करताना ती कागदपत्रे अपलोड करायचे असतात. सर्व प्रक्रिया योग्य रीतीने पूर्ण केल्यावर ऑनलाईन KYC Verification यशस्वी होते.

केवायसी (KYC) करणे का गरजेचे आहे? (Importance of KYC in Marathi)

आपल्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल तर बँकांना आपल्या ग्राहकांकडून KYC करून घेण्याची गरज का पडली? जेंव्हा ग्राहक बँकेत खाते खोलतो त्यावेळेस तो वयक्तिक माहिती जसे नाव, पत्ता, ई बँकेला सांगतो. पण दिलेली माहिती खरी आहे का खोटी हे बँकेला माहिती होण्यासाठी ठोस पुरावा द्यावा लागतो. याने बँकेला कळते की ग्राहकाने दिलेली माहिती खरी आहे. यासाठीच सर्व वित्तीय संस्थानात KYC अनिवार्य केलेली आहे.

पैशांची धोकेबाजी, Money Laundering अश्या गोष्टींना रोखण्यासाठी KYC महत्वाची असते. KYC प्रक्रिया ने व्यक्तीची Financial History बद्दल कळते. KYC केल्याशिवाय बँकेत खाते खोलता येत नाही, Mutual Funds मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. केवायसी (KYC) Verification करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

ओटीपी (OTP): OTP म्हणजे काय, फुल फॉर्म, प्रकार, आणि फायदे

निष्कर्ष

मला आशा आहे की आपल्याला KYC Full Form in Marathi कळाले असेल. KYC Information in Marathi आता मी आपल्याला दिलेली आहे आणि ही विना अडचण सर्वांना समजली असेल. KYC करणे ही आपली जबाबदारी आहे, सर्वांनी KYC Verification केले असेच किंवा नसेल केले तर करून घ्या.

KYC (KYC Meaning in Marathi) च्या माहिती संबंधित काहीही शंका असेल तर खाली कंमेंट करून मला कळवा आणि लेख कसा वाटला हे कंमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लेख मध्ये काही नवीन शिकायला मिळाले असेल तर मित्रांसोबत हे लेख शेअर करा.

Leave a Comment