बिटकॉइन म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Bitcoin ही एक Digital Currency आहे आणि या चलनाचे भौतिक स्वरूप नसते. ज्याप्रमाणे रुपया, डॉलर ही चलन भौतिक स्वरूपात असतात तसे बिटकॉईन नसते. बिटकॉईन हे पूर्णपणे आभासी चलन आहे म्हणजे याचे स्वरूप डिजिटल असते. Bitcoin वर कोणत्याही सरकारचा किंवा बँक चा ताबा नसतो, हे पूर्णपणे मुक्त स्वरूपात कार्य करते. यात कोणत्याही सरकारला किंवा बँकेला हस्तक्षेप करता येत नाही.

आजकाल Bitcoin हे चलन खूप प्रचलित झालेले आहे. इंटरनेट विश्वात अनेक क्रिप्टो करन्सी आहेत, त्यातील बिटकॉईन ही सर्वात जास्त लोकप्रिय करन्सी आहे. Share Market, ट्रेडिंग मध्ये जर आपण असाल तर Bitcoin बद्दल आपण ऐकलेच असेल. अनेक लोकांना बिटकॉईन म्हणजे काय असते, बिटकॉईन कसे काम करते हे माहीत नाही.

बिटकॉइन म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती (Bitcoin in Marathi)

आजच्या या पोस्टमध्ये आपण Bitcoin बद्दल माहिती घेणार आहोत. Cryptocurrency मधील एक लोकप्रिय असलेले हे चलन आहे त्यामुळे याची माहिती असणे आवश्यक असते. हे लक्षात घेता मी या पोस्टमध्ये आपणास Bitcoin Information देत आहे. बिटकॉईन बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा.

बिटकॉइन म्हणजे काय?

बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. ज्याप्रमाणे रुपया, डॉलर ही चलन आहेत तसेच बिटकॉईन हे एक चलन आहे. परंतु डॉलर आणि रुपया सारख्या करन्सीच्या आपल्याला नोटा मिळतात तश्या बिटकॉईनच्या नसतात. बिटकॉईन हे चलन ऑनलाईन असते, संगणक सॉफ्टवेअर मध्ये हे चलन लॉक केलेले असते. बिटकॉइन ही Blockchain तंत्रज्ञान वर आधारित करन्सी आहे म्हणजे व्यक्तीने बिटकॉइन ची केलेली सर्व खरेदीविक्री Blockchain मध्ये संग्रहित होते.

Bitcoin चे व्यवहार ऑनलाईन चालतात. Bitcoin विकणारा आणि खरेदी करणारा, फक्त यांच्यातच व्यवहार होतो, यामध्ये कोणालाही हस्तक्षेप किंवा नियंत्रण करता येत नाही. सर्व व्यवहार ब्लॉकचेन नेटवर्कवर संग्रहित होतात. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी बिटकॉईन ला एक्सचेंज च्या स्वरूपात स्वीकारले आहे. Bitcoin प्रमाणे इथेरियम, लाइटकॉइन, रिपल, डॅश, ही काही क्रिप्टो करन्सी आहेत, परंतु हे बिटकॉइन च्या जवळपासही नाहीत.

बिटकॉइन चा शोध कोणी लावला?

बिटकॉइन चा शोध लावणाऱ्या व्यक्तीचे नाव सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) असे आहे. Satoshi Nakamoto याने 2009 मध्ये बिटकॉइन चा शोध लावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीची ओळख अजूनही गुपित आहे, फक्त नाव उघड झालेले आहे.

2008 या वर्षी एक .org डोमेन नेम कोणी अज्ञात व्यक्तीने खरेदी केले व त्यावर एक पेपर अपलोड केला. Bitcoin: A Peer-to-Peer Electronic Cash System असे या फाईल चे शीर्षक होते. यामध्ये लेखकाचे नाव म्हणून Satoshi Nakamoto असे दिलेले होते. यानंतर 9 जानेवारी 2009 मध्ये बिटकॉइन नेटवर्क सर्वांसाठी लाँच झाले.

बिटकॉइन कसे तयार केले जातात?

बिटकॉइन बनवण्याच्या प्रक्रियेला बिटकॉइन मायनिंग असे म्हणतात. बिटकॉइन ठराविक संखेपर्यंतच बनवले जाऊ शकतात कारण बिटकॉइन सॉफ्टवेअर चे लिमिट 21 Million एवढेच आहे. जो व्यक्ती बिटकॉइन मायनिंग करतो त्याला मायनर असे म्हणतात. मायनिंग हा एक स्पर्धात्मक व्यवसाय आहे, जसे जसे मायनर ची संख्या वाढत जाते तसा त्या क्षेत्रातील फायद्यात घट होत जाते.

बिटकॉइन मायनिंग ही एक प्रक्रिया आहे यात कॉम्पुटिंग पॉवर चा वापर करून Transaction प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेसाठी मायनर चे कॉम्प्युटर वापरले जातात. क्रिप्टोग्राफी च्या आधारावर ही मायनिंग प्रक्रिया केली जाते. यात ब्लॉक चेन एक पब्लिक लेजर शेअर करतो जेथे सर्व बिटकॉइन नेटवर्क असतात. बिटकॉइन चे सर्व Confirmed Transaction ब्लॉकचेन मध्ये असतात.

मायनर चे कार्य गणितीय व क्रिप्टोग्राफिक समीकरणे सोडवणे असते. हे समीकरण सोडवून मायनर याला Bitcoin Block च्या स्वरूपात रेकॉर्ड करतात. ही समीकरणे इतर कॉम्प्युटर तपासतात वर बरोबर असतील तर मायनर ला रिवार्ड दिला जातो. आताच्या काळात मायनिंग प्रक्रिया खूप खर्चीक झाली आहे आणि स्पर्धाही खूप झाली आहे.

बिटकॉइन कसे खरेदी करावे?

बिटकॉइन खरेदी का करतात हा प्रश्न अनेकांना पडला असेल कारण आपल्या स्थानिक चलनात सर्व व्यवहार करता येतात तर बिटकॉइन ची गरज का आहे. याचे उत्तर असे आहे की सर्वात जास्त बिटकॉइन ची खरेदी पैसे कमावण्याच्या हेतूसाठी केली जाते. बिटकॉइन खरेदी करणे आणि त्याची किंमत वाढल्यावर ते विकणे आणि त्यातून नफा कमावणे असा अनेकांचा व्यवसाय असतो. तर चला आता बिटकॉइन कसे खरेदी केले जातात हे पाहुयात.

ऑनलाइन पैसे कैसे कमाएFrom – Gyanitechraviji

बिटकॉइन खरेदी करण्यासाठी इंटरनेट वर खूप वेबसाईट उपलब्ध आहेत. आपण आपले स्थानिक चलन रुपया देऊन Bitcoin घेऊ शकतो. एका बिटकॉईन ची किंमत 37 लाख च्या आसपास असते जी सतत कमी जास्त होत राहते म्हणजे एक बिटकॉइन घेण्यासाठी तुम्हाला तब्बल 37 लाख रुपये द्यावी लागतील. ही रक्कम खूप मोठी आहे व हा खरेदी करणे सोपे नाही. त्यासाठी बिटकॉइन चे छोटे भाग करून त्याला सातोशी असे एकक देण्यात आलेले आहे.

थेट एक बिटकॉईन न घेता त्याचा छोटा भाग म्हणजे सातोशी घेणे तुम्हाला परवडेल. बिटकॉइन चा शोध लावणाऱ्या व्यक्तीच्या नावावरून सातोशी हे एकक देण्यात आले. आपल्या देशात बिटकॉइन खरेदी करण्यास सरकारकडून परवानगी आहे, त्यामुळे कोणीही बिटकॉइन खरेदी करू शकते. बिटकॉइन खरेदी करण्यासाठी भारतातील काही लोकप्रिय वेबसाईट ची नावे मी खाली दिली आहेत.

  • Wazirx
  • Unocoin
  • Zebpay

बिटकॉइन चे उपयोग काय आहेत?

बिटकॉइन चा उपयोग ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी केला जातो. विविध शॉपिंग वेबसाईट बिटकॉइन ला स्वीकारतात. Bitcoin व्यवहार P2P Network वरती चालते यामध्ये फक्त दोन व्यक्तीला व्यवहार झाल्याचे समजते. दोघांच्या मध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसतो. ऑनलाईन डेव्हलपर्स, NGO’s बिटकॉइन चा वापर करतात.

इतर चलनाप्रमाणे आपण बिटकॉइन चा वापर जगात कुठेही पैसे पाठवण्यासाठी करू शकतो. Bitcoin चा वापर पैसे कामवण्यासाठीही केला जातो. यामध्ये बिटकॉइन ची खरेदी आणि विक्री केली जाते. अनेकजण बिटकॉइन खरेदी करून ठेवतात आणि त्याची किंमत वाढल्यावर ते विकतात आणि त्यातून नफा कमावतात.

बिटकॉइन चे फायदे कोणते आहेत?

बिटकॉइन हे जगातील सर्वात महाग चलन आहे. हे चलन वापरण्याचे अनेक फायदे होतात Advantages of Bitcoin ते खालीलप्रमाणे-

  • बिटकॉइन मधून व्यवहार करताना Transaction Fee खूप कमी आहे, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड पेक्षा बिटकॉइनमध्ये Transaction फी कमी असते.
  • बिटकॉइन जगातील कोणत्याही व्यक्तीला कोठूनही पाठवता येतात.
  • बिटकॉइन चे खाते कधीच ब्लॉक होत नाही, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड कधीकधी बँकेकडून ब्लॉक केले जातात. ती समस्या येथे येत नाही.
  • बिटकॉइन च्या व्यवहारावर कोणत्याही सरकार किंवा बँकेचे नियंत्रण व निरीक्षण नसते त्यामुळे Transaction Fee कमी असते व बिटकॉइन चा वापर वाईट काम करणार्यांना यामुळे फायदा होतो.
  • बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो कारण पूर्वीपासून बिटकॉइन ची किंमत वाढतच चालली आहे. त्यामुळे ज्यांनी बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट केले आहे त्यांना फायदा होऊ शकतो.

बिटकॉइन चे तोटे कोणते आहेत?

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. बिटकॉइन चे फायदे सुद्धा आहेत आणि सोबतच याचे तोटे सुद्धा असतात, ते खालीलप्रमाणे-

  • बिटकॉइन सांभाळणे धोकादायक असू शकते कारण जर तुमचे बिटकॉइन खाते हॅकिंग चा शिकार झाले तर तुमचे सर्व Bitcoin जातील वर ते परत मिळवण्यास कोणीही मदत करू शकत नाही.
  • बिटकॉइन चा वापर बेकायदेशीर गोष्टी खरेदी करण्यासाठी केला जातो, कारण बिटकॉइन च्या व्यवहारावर कोणाचेही नियंत्रण नसते.

FAQ’s

एका बिटकॉइन ची किंमत किती आहे?

बिटकॉइन ही एक करन्सी असल्यामुळे याची किंमत स्थिर नसते याची किंमत कमी जास्त होत राहते. आजच्या स्थितीला एका बिटकॉइन ची किंमत 37,79,749 रुपये इतकी आहे आणि याला डॉलरमध्ये रूपांतरित केले तर जवळपास 50 हजार डॉलर ही एक बिटकॉइन ची आजची किंमत आहे.

बिटकॉइन वॉलेट काय असते?

बिटकॉइन ला डिजिटल स्वरूपात साठवून ठेवणाऱ्या कॉम्पुटर सॉफ्टवेअर ला बिटकॉइन वॉलेट असे म्हणतात. बिटकॉइन ची खरेदी-विक्री Bitcoin Wallet च्या मदतीने होते. बिटकॉइन ची विक्री केल्यावर मिळणारे पैसे बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा बिटकॉइन वॉलेट ची गरज पडते.

बिटकॉइन हे कोणते चलन आहे?

बिटकॉइन हे एक क्रिप्टो चलन आहे, जे डिजिटल स्वरूपात असते. बिटकॉइन चे कसलेही भौतिक स्वरूप नसते. याचे सर्व व्यवहार ऑनलाईन चालतात. Bitcoin प्रमाणे इथेरियम, लाइटकॉइन, रिपल, डॅश, ही काही क्रिप्टो करन्सी आहेत

भारतात बिटकॉइनला सरकारी परवानगी आहे का?

होय, भारतात बिटकॉइन चे व्यवहार करणे लीगल आहे. बिटकॉइनला भारतात परवानगी आहे.

निष्कर्ष

मला आशा आहे की आपल्याला बिटकॉइन म्हणजे काय आणि याची माहिती व्यवस्थितरित्या समजले असेल. यासोबतच बिटकॉईन इन्फॉर्मेशन इन मराठी सुद्धा चांगल्याप्रकारे आपल्याला कळली असेल. Bitcoin ही एक क्रिप्टो करन्सी आहे आणि हे जगातील सर्वात महाग चलन आहे. त्यामुळे याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्याला जर आजचा Bitcoin म्हणजे काय, हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही बिटकॉईन ची माहिती मिळेल. बिटकॉइन संबंधित काहीही शंका असेल तर खाली कंमेंट करून विचारू शकता आणि अश्याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी या ब्लॉगला पुन्हा-पुन्हा भेट देत राहा.

1 thought on “बिटकॉइन म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment