क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला, Cryptocurrency in Marathi क्रिप्टो करेंसी बद्दल माहिती माहिती देत आहे. क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि याचे व्यवहार कसे केले जातात, हे आपण या पोस्टमध्ये पाहुयात. आजकाल आपण आपल्या व्यवहारासाठी रुपया हे चलन वापरतो कारण आपल्या भारत देशाचे हे चलन आहे. याचप्रकारे यूएस मध्ये डॉलर, युरोपमध्ये युरो, अरब चा रियाल ही काही चलन आहेत.

WhatsApp Group Join Group

प्रत्येक देशाची चलन वेगवेगळी असतात. त्याचप्रमाणे जगातील विविध देशांत वेगवेगळी चलने आहेत, जी आजच्या युगात वापरली जातात. या चलनाला आपण आपल्या हातांनी स्पर्श करू शकतो, खिशात ठेवू शकतो आणि आपण बाजारात व्यवहार करतो पण क्रिप्टो करन्सी ही एक डिजिटल चलन आहे जी आपण हाताने स्पर्श करू शकत नाही फक्त आपण ते अनुभवू शकतो. क्रिप्टोकरन्सी हे एक इलेक्ट्रॉनिक चलन आहे. तर चला क्रिप्टो करन्सी बद्दल डिटेल मध्ये माहिती घेऊयात.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (What is Cryptocurrency In Marathi)

क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल चलन असतात जी Computer Algorithm वरती तयार केलेले आहेत. क्रिप्टो करन्सी चलनाला कोणीही मालक नाही म्हणजेच ही चलने कोणत्याही बँक किंवा सरकारच्या नियंत्रणात येत नाहीत. रुपया, डॉलर, युरो किंवा इतर चलनांप्रमाणे क्रिप्टो करन्सी हे चलन कोणत्याही राज्य, देश, संस्था किंवा सरकारद्वारे चालवले जात नाही. हे एक डिजिटल चलन आहे ज्यासाठी क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान वापरले जाते. सर्वसाधारणपणे कोणतीही वस्तू किंवा सेवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी या चलनांचा वापर केला जाऊ शकतो.

सर्वांना हे माहिती असायला पाहिजे की 2009 मध्ये जपानच्या एका इंजिनिअर सातोशी नाकामोटो ने जगातील पहिली क्रिप्टो करन्सी “बिटकॉइन” चा शोध लावला. सुरुवातीला क्रिप्टो करन्सी जास्त लोकप्रिय नव्हत्या परंतु कालांतराने याची किंमत खूप अफाट वाढली. बिटकॉइन पासून सुरुवात झाल्यावर अनेक क्रिप्टो करन्सी बनवल्या गेल्या, आज जगभरात एक हजार पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी आहेत ज्या Peer-to-Peer इलेक्ट्रॉनिक सिस्टिम च्या रुपात कार्य करतात.

क्रिप्टोकरन्सी कशी काम करते? (How does the Cryptocurrency Work’s in Marathi)

क्रिप्टो करन्सी ब्लॉकचेन च्या माध्यमातून कार्य करते. क्रिप्टो करन्सी च्या व्यवहाराची सर्व नोंद ब्लॉकचेन च्या स्वरूपात ठेवली जाते. Cryptocurrency चे सर्व व्यवहार शक्तिशाली कॉम्प्युटर च्या नियंत्रणात केली जातात त्याला Cryptocurrency Mining असे म्हणतात आणि यासाठी जे कॉम्प्युटर उपलब्ध करून देतात त्यांना मायनर्स असे म्हणतात.

Cryptocurrency मध्ये जेव्हा कोणतेही Transaction होते ते Blockchain मध्ये स्टोर होतात. प्रत्येक व्यवहार (Transaction) ला एका Block मध्ये ठेवले जाते. हा ब्लॉक ला मायनर्स कडून सुरक्षा मिळत असते. Miners चे कॉम्प्युटर्स या ब्लॉकच्या सुरक्षेसाठी गणितीय समीकरण सोडवून एक स्वतंत्र Hash कोड बनवतात ज्यामुळे प्रत्येक ब्लॉक ला एक विशिष्ट Hash Code मिळतो.

प्रत्येक ब्लॉकचा हॅश कॉड हा नेटवर्क मधील इतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर द्वारे Verify केला जातो. पडताळणी झाल्यावर Mine केलेली Cryptocurrency ही Miner ला रिवार्ड म्हणून दिली जाते. Miner ने सोडवलेले Cryptographic समीकरण पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला Consensus असे म्हणतात. अश्या प्रकारे Cryptocurrency चे व्यवहार चालतात जे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि कोणत्याही संस्था किंवा सरकारच्या नियंत्रणात नसतात.

क्रिप्टोकरन्सी चे प्रकार (Types of Cryptocurrencies in Marathi)

बिटकॉइन ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो चलन आहे. अनेकांना क्रिप्टोकरन्सी नाव ऐकल्यावर फक्त बिटकॉइन आठवत असेल, परंतु तुम्हाला माहिती नसेल की जगात एक हजार पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. आपण त्यातील काही लोकप्रिय क्रिप्टो करन्सी ची माहिती पाहुयात.

1) Bitcoin

सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त मौल्यवान क्रिप्टो करन्सी म्हणजे Bitcoin. जपानच्या एका इंजिनिअर सातोशी नाकामोटो याने 2009 मध्ये Bitcoin चा निर्माण केला होता. सुरुवातीला ही जास्त लोकप्रिय नव्हती परंतु कालांतराने याची किंमत खूप वाढली. इतर क्रिप्टो करन्सीप्रमाणे ही सुद्धा डिजितल स्वरूपात असते. Bitcoin ची आजची किंमत पाहायला गेलात तर ती 36 लाख रुपये च्या घरात आहे जी रोज कमी जास्त होत आहे.

2) Ethereum

Bitcoin प्रमाणेच ही एक डिजिटल करन्सी आहे, जी Open Source, Decentralized Blockchain Based Computing Platform आहे. Ethereum ला 2015 मध्ये Vitalik Buterin याने लाँच केले. Ethereum ला Ether असेही नाव आहे. Bitcoin नंतर ही सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी आहे. याची आजची किंमत 3 लाख रुपये आहे.

3) Litecoin

Litcoin ही एक Peer-to-Peer Cryptocurrency आहे. Litecoin या करन्सी ला ऑक्टोबर 2011 मध्ये Charles Lee द्वारे लाँच केले गेले. Charles Lee आधी गूगल कंपनीत कर्मचारी होऊन गेलेले आहेत. Litecoin चे व्यवहार बिटकॉईन च्या तुलनेत चार पट वेगाने होतात कारण Litecoin चा ब्लॉक तयार करण्याचा वेळ Bitcoin च्या तुलनेत चार पटीने कमी आहे. Litecoin ची आजची किंमत 11 हजार रुपये आहे.

4) Dogecoin

Dogecoin (DOGE) सुद्धा एक Cryptocurrency आहे, Bitcoin चा विनोद बनवण्यासाठी ही Cryptocurrency बनवली गेली होती. Dogecoin चा शोध Billy Markus याने 2013 मध्ये लावलेला आहे. Dogecoin च्या लोगो मध्ये कुत्र्याचा फोटो आहे. Dogecoin ची आजची किंमत 13 रुपये आहे.

5) Dash

Dash चे आधीचे नाव XCoin आणि Darkcoin असे होते. Dash शब्दाचा अर्थ Digital आणि Cash असा आहे. Dash ही Bitcoin प्रमाणे Open Source, Peer-to-Peer Cryptocurrency आहे. यामध्ये Bitcoin पेक्षाही जास्त Features उपलब्ध आहेत. Dash ची Mining करण्यासाठी जास्त शक्तिशाली कॉम्प्युटर ची गरज नाही लागत, Bitcoin साठी खूप शक्तिशाली कॉम्प्युटर लागतात. Dash ची आजची किंमत दहा हजार आहे.

क्रिप्टोकरन्सी चे फायदे (Advantages of Cryptocurrency in Marathi)

Cryptocurrency एवढी लोकप्रिय आणि महाग आहे. याचे कारण म्हणजे यांचे फायदे, ज्यामुळे ही डिजिटल चलने एवढी लोकप्रिय झालीत. Cryptocurrency ची काही महत्वाची फायदे खाली दिली आहेत.

  1. क्रिप्टो करन्सी चे स्वरूप डिजिटल असल्यामुळे याच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते.
  2. Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे असते कारण Crypto Currency स्टोर करण्यासाठी अनेक Digital Wallet उपलब्ध आहेत.
  3. क्रिप्टो करन्सी वरती कोणत्याही संस्था, बँक किंवा सरकारचे नियंत्रण नसल्याने नोटबंदी किंवा चलनाची किंमत कमी होण्याचा धोका नसतो.
  4. Cryptocurrency चे व्यवहार खूप सुरक्षित चालतात, साधारण व्यवहार आणि क्रिप्टो करन्सी च्या व्यवहारात खूप फरक असतो.
  5. क्रिप्टो करन्सी चा वापर पैसे लपवून ठेवण्यासाठी खूप केला जातो आहे, पैसे लपवून ठेवणाऱ्या लोकांसाठी क्रिप्टो करन्सी हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे.

क्रिप्टोकरन्सी चे तोटे (Disadvantages of Cryptocurrency in Marathi)

काही देशात क्रिप्टो करन्सी ला बंदी घालण्यात आलेली आहे, याचे कारण तुम्हाला क्रिप्टो करन्सी चे तोटे वाचून लक्षात येईल.

  1. क्रिप्टो करन्सी चा वापर अनेकजण पैसे सरकार पासून लपवून ठेवण्यासाठी करतात आणि यामुळे अनेक देशांनी यावर बंदी घातली आहे.
  2. क्रिप्टो करन्सी हॅक होण्याची शक्यता जास्त असते जर आपले कॉइन कोणी हॅक केले तर ते परत मिळण्याची शक्यता शून्य असते.
  3. क्रिप्टो करन्सी स्टोर केलेली Wallet ID जर आपण विसरलात तर ती पुन्हा मिळत नाही त्यामुळे त्यातील पैसे आपण कधीच काढू शकत नाहीत.
  4. क्रिप्टो करन्सीमध्ये जर आपल्याकडून जर चुकून दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट गेले तर ते आपण परत मिळवू शकत नाहीत.

निष्कर्ष

मला आशा आहे की आपल्याला सर्वांना क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल. आजचे व येणारे पूर्ण जग कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचे आहे त्यामुळे यामधील विविध विषयांवर आपल्याला माहिती असायलाच हवी.

सर्वांना आजचा लेख आवडला असेल अशी मी आशा करतो आणि एक विनंती करतो की हा लेख आपण आपल्या सर्व मित्र व मैत्रिणींना व्हाट्सएप वरती किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करावा म्हणजे त्यांनाही Cryptocurrency बद्दल ज्ञान मिळेल आणि आम्हालाही सहकार्य मिळेल.

आजचा Cryptocurrency in Marathi चा लेख आपल्याला आवडला असेल तर खाली Comment Box मध्ये आपला अभिप्राय नक्की द्या किंवा काही शंका असेल तर बिनधास्त कंमेंट करा.

3 thoughts on “क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

    • क्रिप्टो करंसी मधे पैसे कसे काढता येतात १ या करंसी मधे फायदा को कोणता आहे ‘ आपले पैसे बॅन्केच्या खात्यात कसे Transfer केले जातात ?

      Reply
  1. मला याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे कमीत कमी गुंतवणूक कशी करावी आणि येथे मराठीतून पुस्तक उपलब्ध आहे का पीडीएफ स्वरूपात तर ते मला नक्की पाठवावे ही विनंती

    Reply

Leave a Comment