SDM कोण असतो आणि कसे बनायचे, संपूर्ण माहिती

आपल्याला देखील जर एसडीएम बद्दल माहिती घेण्याची असेल तर आपण बरोबर ठिकाणी आला आहात. आपल्याला SDM Full Form, SDM कोण असतो, SDM कसे व्हायचे? हे जाणून घेयाचे असेल तर ही पोस्ट तुम्हाला खूप मदत करू शकते कारण यामध्ये पोस्ट, आम्ही SDM बद्दल सांगितले आहे जेणेकरुन तुम्हाला एसडीएम बद्दल चांगली माहिती मिळेल.

SDM कोण असतो?

जिल्हा स्तरावर, जिल्हा दंडाधिकारी (DM) यांना जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी दिली जाते व त्या जिल्ह्यातील उपविभागातील काम एसडीएम अधिकाऱ्याकडे असते. डीएम प्रमाणेच एसडीएम हे देखील जिल्ह्याचे खूप मोठे अधिकारी आहेत ज्यांना अनेक अधिकार मिळतात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक उपविभागात एक SDM असतो जो सर्व तहसीलदारांवर नियंत्रण ठेवतो.

एसडीएमला विवाह नोंदणी करणे, विविध प्रकारचे परवाने काढणे, जमिनीचा हिशेब ठेवणे असे अधिकार मिळतात. यासोबतच त्यांच्या कार्यकक्षेत कायदा व सुव्यवस्थेचा समन्वय राखणे, शांतता प्रस्थापित करणे, प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणे आदी जबाबदारी एसडीएमवर असते.

SDM Full Form in Marathi

एसडीएम चा फुल फॉर्म Sub-District magistrate असा होतो. SDM ला मराठी मध्ये उपजिल्हाधीकारी असे म्हणतात. SDM हा कोणत्याही जिल्ह्याचा उपविभाग किंवा तहसील स्तराचा मुख्य अधिकारी असतो.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल कि SDM ची कामे कोणती असतात ते ती आपण खाली पाहुयात.

SDM अधिकारी कसे बनायचे?

SDM हा उच्च स्तरावरील अधिकारी असतो. याची नेमणूक सिव्हील परीक्षा च्या माध्यमातून केली जाते. SDM अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये MPSC (Maharashtra Public Service Corporation) ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत SDM सोबत अजून बऱ्याच अधिकारीक पदांची भरती केली जाते.
पात्रता

SDM बनण्यासाठी MPSC परीक्षा द्यावी लागते आणि त्यासाठी MPSC परीक्षेसाठी असलेली पात्रता असते. MPSC परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला मराठी बोलत व लिहता येणे बंधनकारक असते. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा व पदवी मान्यताप्राप्त विद्यालयाची असावी.

यासोबतच उमेदवाराचे वय कमीत कमी 19 व जास्तीत जास्त 38 असावे लागते त्यासाठी Cast नुसार सवलती आहेत आणि शेवटचे म्हणजे उमेदवार भारताचा नागरिक असावा.

परीक्षा स्वरूप

SDM बनण्यासाठी ची MPSC ही परीक्षा तीन टप्यात पूर्ण होते. पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शेवटला मुलाखत होते. MPSC बद्दल संपूर्ण माहिती आम्ही दुसऱ्या लेखात दिली आहे, ती तुम्ही नक्की वाचा.

SDM अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधा

उपजिल्हाधिकारी जे उच्च स्तरावरील पद असल्यामुळे सरकारकडून काही सुविधा दिल्या जातात. SDM अधिकाऱ्याला 56,100 रुपये पासून पगार सुरू होतो. SDM अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सरकारी सुविधा खालीलप्रमाणे-

  1. सरकार कडून राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिले जाते.
  2. सुरक्षा गार्ड आणि घरेलू नोकर, जसे कूक आणि माली
  3. सरकारी वाहन
  4. फुकट टेलिफोन कनेक्शन
  5. फुकट वीज
  6. सरकारी पेन्शन

सिपीडिओ (CPDO) काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

निष्कर्ष-

मला आशा आहे कि, आता आपल्याला SDM Information आणि SDM Full Form बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. आता आपल्याला कोणत्याही दुसऱ्या साईट वर शोधायची गरज राहिलेली नाही.

आपल्याला जर आजचा “SDM कोण असतो आणि कसे बनायचे, संपूर्ण माहिती” हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल किंवा कोणत्याही विषयावर माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करून मला नक्की कळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे अश्याच अजून माहितीसाठी मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe नक्की करा.

नवीन करिअरच्या संधी, शिक्षण व इतर माहिती मिळेल फक्त www.wifimarathi.in वर

1 thought on “SDM कोण असतो आणि कसे बनायचे, संपूर्ण माहिती”

Leave a Comment