भारत सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार आता तुम्हाला बँक खाते लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे बँक खाते बंद केले जाईल. जर तुमच्या बँकेच्या खात्यासोबत आधार कार्डची लिंक नसेल तर भविष्यात बँकेशी संबंधित महत्वाची कार्ये करण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे बँक खाते आधार कार्डला लिंक करणे आवश्यक आहे.
आपण जर आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक केले नसेल तर हि पोस्ट आपल्याला नक्की मदत करू शकेल कारण या पोस्टमध्ये आपण Aadhaar Card Bank Account Link करण्याच्या काही पद्धती पाहणार आहोत. यातील काही पद्धतीने तुम्ही घरबसल्या कॉम्पुटर किंवा मोबाईल वापरून Aadhaar Card Bank Account Link करू शकता. तर चला पाहुयात बँक खात्यासोबत आधार कार्ड कसे लिंक करावे?
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक कसे करावे? (Aadhaar Card Bank Account Link)
सरकारने बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. Aadhaar Card Bank Account Link करण्यासाठी अनेक प्रकारची माध्यमे आहेत जसे की ऑनलाईन, ऑफलाईन, इंटरनेट बँकिंग, वेबसाईट ई. आपण कोणत्याही माध्यमाचा वापर करून बँक खात्याशी आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता. तर चला सर्वात आधी इंटरनेट बँकिंग च्या माध्यमातून Aadhaar Card Bank Account Link कसे करायचे हे पाहुयात.
1) Internet Banking
आपल्याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचे असेल तर ते ऑनलाईन करू शकता. इंटरनेट बँकिंगच्या मदतीने आपण घरबसल्या Aadhaar Card Bank Account Link लिंक करू शकता त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- आपल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टल वरती Login Id आणि Password टाकून लॉगिन करा.
- Aadhaar Card Bank Account Link या सेक्शन वरती जा.
- आपल्याला लिंक करायचे आहे ते अकाउंट निवडा आणि आधार नंबर टाकून Submit करा.
- बँकेनुसार प्रक्रियेत थोडे बदल असू शकतात त्यामुळे फॉर्म नीट भरा.
- Submit वरती क्लिक केल्यावर Successful झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.
2) SMS Service
बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग म्हणजे SMS द्वारे, होय बँकेने दिलेल्या नंबरला SMS करून आपण आधार लिंक करू शकतो. SMS द्वारे आधार कार्ड लिंक करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.
- SMS द्वारे Aadhaar Card Bank Account Link करण्यासाठी सर्वात पहिले मोबाईल मध्ये SMS बॉक्स ओपन करा आणि पुढील फॉरमॅट मध्ये मेसेज टाईप करा – UID<space>Aadhaar number<space>Account number
- मेसेज मध्ये योग्य माहिती भर आणि तो मेसेज 567676 या नंबरला पाठवावा.
- थोड्याच वेळाने आधार लिंक करण्याची विनंती स्वीकारली गेल्याचा पुष्टीकरण संदेश येईल.
- आणि जर विनंती नाकारली गेली तर जवळच्या बँक शाखेला भेट द्या अशी सूचना देण्यात येईल.
3) Bank’s Mobile App
बँकेने ग्राहकांला मोबाईल वरती सुविधा देण्यासाठी Apps बनवलेले आहेत. आपण या Apps ने सुद्धा बँकेला आधार कार्ड लिंक करू शकतो. मोबाइल App द्वारे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.
- सर्वात पहिले तुमच्या बँकेचे मोबाइल App तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून इंस्टॉल करा.
- आता App ओपन करा उघडा आणि तुमच्या खात्यात लॉग इन करा.
- पुढे “Aadhaar Card Link” हा पर्याय शोधा आणि या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमच्या बँक खात्याची माहिती भरा.
- तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी (OTP) टाका आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
4) Missed Call Service
मोबाईल कॉल करून बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे हि एक सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेने दिलेल्या मोबाईल नंबर वरती कॉल करणे आवश्यक आहे. मोबाईल कॉल करून आधार लिंक करण्यासाठी, खालील चरणांचे स्टेप्सचे करा.
- आपली बँक जर फोनवर Aadhaar seeding सपोर्ट करत असेल, तर तुमच्या बँकेने दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या.
- तुम्हाला बँकेकडून पुन्हा कॉल येईल, जेथे तुम्ही IVR मधून पर्याय निवडू शकता.
- योग्य पर्याय निवडून तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा आणि त्याची पुष्टी करा.
- आपला आधार बँक खात्याशी लिंक झाल्यावर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल.
5) ATM Service
ATM वापरून बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे हे एक सोपे आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या ATM ला भेट द्यावी लागेल. ATM द्वारे आधार लिंक करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.
- Aadhaar Card Bank Account Link करण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या बँकेच्या ATM ला भेट द्या.
- आता मशीनमध्ये तुमचे ATM Card घाला आणि सुरक्षा PIN टाका.
- पुढे “Services” मेनू मधून “Registrations” पर्यायावर क्लिक करा.
- आता “Aadhaar Registration” पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि Okay बटन वरती क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- बँक खात्यासोबत आधार लिंक झाल्यावर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश मिळेल.
6) Branch (Offline)
आपण बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन खाते आधारशी लिंक करू शकता. ती प्रक्रिया कशी आहे हे खाली दिलेले आहे.
- सर्वात आधी तुमच्या बँकेच्या शाखेत आणि ग्राहक सेवा अधिकाऱ्याला भेटा.
- त्यांच्याकडून बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचा अर्ज घ्या आणि भरा.
- आता त्या अर्जावर तुमची सर्व आवश्यक माहिती भरा.
- फॉर्म सोबत आधार कार्डची मूळ प्रत आणि बँक खाते पासबुक जमा करा.
- नंतर बँक तुमची माहिती तपासेल आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले जाईल.
आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी पुढील पोस्ट वाचा – आधार कार्डशी बँक खाते लिंक आहे का नाही? असे करा चेक
निष्कर्ष –
बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे, Aadhaar Card Bank Account Link हि एक सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. यामुळे तुमच्या खात्याची सुरक्षा वाढण्यास मदत होते आणि तुम्ही बँकिंग सेवांचा आनंद सुलभतेने घेऊ शकता. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याच्या विविध पद्धती पहिल्या आहेत. तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल App द्वारे, किंवा तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता.
तुम्ही कोणतीही पद्धत निवडली, तरी त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक खात्याची पासबुक किंवा चेकबुक, आणि ओळखपत्र असलेच पाहिजे. Aadhaar Card Bank Account Link करण्याबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. याप्रकारच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईट वरती पुन्हा नक्की या.