आधार कार्ड हे भारताच्या नागरिकांचे ओळखपत्र आहे. आधार कार्डचा 12 अंकी UID Number अनेक कारणांसाठी वापरला जातो. आजकाल बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे आणि KYC Verification करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, असे केले नाही तर तुमची अनेक महत्त्वाची कामे बंद होऊ शकतात. त्यामुळे बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
मागील पोस्टमधे आपण बँक खात्याला आधार कार्ड लिंक कसे करायचे हे पाहिले. आता आपण बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसे जाणून घ्यायचे हे पाहणार आहोत, त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. Aadhaar Bank Link Status Check करण्याचे 3 मार्ग आहेत पहिले UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, दुसरे mAadhaar App द्वारे आणि तिसरे USSD कोडच्या मदतीने. तर चला सुरू करूयात.
आधार कार्डशी बँक खाते लिंक आहे का नाही? असे करा चेक | Aadhaar Bank Link Status Check
तुम्ही जर अजून तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर लवकरच लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यासाठी तुम्ही आमची बँक खात्याशी आधार कार्ड लिंक कसे करावे? ही पोस्ट वाचू शकता. तर चला आपण पहिले UIDAI वेबसाईट वरून Aadhaar Bank Link Status Check कसे करायचे हे पाहुयात.
Aadhaar Bank Link Status Check Using UIDAI Website
तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही UIDAI च्या वेबसाईट ची मदत घेऊ शकता. UIDAI वेबसाईटद्वारे आधार बँक लिंक Status चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
- सर्वात पहिले UIDAI च्या आधिकरिक वेबसाईटला भेट द्या.
- आता My Aadhaar या Section मधील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे एक फॉर्म ओपन होईल त्यात आधार क्रमांक आणि Captcha Code प्रविष्ट करा आणि Login With OTP वरती क्लिक करा.
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो प्रविष्ट करून Login वरती क्लिक करा.
- आता खाली स्क्रोल करून Bank Seeding Status वरती क्लिक करा. येथे तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेले बँक खाते दाखवली जातील.
Aadhaar Bank Link Status Check Using mAadhaar
mAadhaar ॲप हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे विकसित केलेले एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे जे आधार कार्ड धारकांना विविध सेवा प्रदान करते. हे ॲप्लिकेशन Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याद्वारे Aadhaar Bank Link Status Check करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
- गूगल प्ले स्टोर किंवा Apple च्या ॲप स्टोर वरून mAadhaar हे ॲप डाउनलोड करा आणि ओपन करून तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करा.
- आता My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे Aadhaar Bank Link Status यावर क्लिक करा.
- आपला आधार क्रमांक टाकून Captcha कोड भरा आणि Request OTP यावर क्लिक करा.
- आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल तो प्रविस्ट करा.
- बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही पाहण्यासाठी Verify वरती क्लिक करा.
Aadhaar Bank Link Status Check Using USSD Code
USSD code हा एक अंक आणि चिन्हांचा कोड असतो ज्याच्या मदतीने आपण मोबाईल फोनवरून विविध सेवा मिळवू शकतो. USSD codes चा वापर आपण बँक आधार लिंक स्टेटस चेक करू शकतो ते कसे करायचे यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरून *99*99*1# हा नंबर डायल करा.
- आता आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविस्ट करा.
- पुढे पुन्हा आधार नंबर प्रविस्ट करा.
- आणि Send वरती क्लिक करा, आधार नंबर बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला दाखवले जाईल.
निष्कर्ष
आजच्या जगात, आधार कार्ड हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. बँक खाते उघडणे असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे असो, अश्या इतर अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आपण आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे आणि लिंक नसेल तर लिंक करून घ्या त्यासाठी आमची पुढील पोस्ट वाचा – बँक खात्याशी आधार कार्ड लिंक कसे करावे?
मला आशा आहे कि आपल्याला आजची Aadhaar Bank Link Status Check हि पोस्ट व्यवस्थितपणे समजली असेल. आपल्याला जर वरील प्रक्रिया करताना काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि पोस्ट महत्वाची वाटली असेल तर आपल्याला मित्रांसोबत नक्कीच शेअर करावी. अश्याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला पुन्हा भेट नक्की द्या. धन्यवाद!