एमएसएमई योजना काय आहे व काय होतो फुल फॉर्म?

MSME Full form in Marathi: देशाची अर्थव्यवस्था ही देशातील उद्योगांवर अवलंबून असते. भारत देश सध्या विकसनशील स्थितीत आहे, म्हणजेच देशात नवीन नवीन व्यवसाय सुरू होत आहेत. देशाच्या GDP मध्ये सर्वात जास्त योगदान देशातील लहान-मोठ्या उद्योगांचे असते. हे लक्षात घेता केंद्र सरकारने नवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी एमएसएमई ही योजना सुरु केली आहे.

एमएसएमई योजना भारत सरकारने 2006 मध्ये सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत उद्योगांना 3 भागात विभाजले गेले आहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. वस्तूंचे उत्पादन, वस्तूंवर प्रक्रिया, त्यांचे साठवण व संरक्षण करणारे छोटे छोटे उद्योगांचा यात समावेश आहे. याची विस्तारित माहिती या लेखमध्ये दिलेली आहे.एमएसएमई योजना भारतीय सरकार कडून संचालित केली जाते.

MSME द्वारे दरवर्षी लाखो लोकांसाठी रोजगाराच्या संध्या सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात, यासोबतच ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही याचा फायदा होतो. MSME योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सरकारकडून देण्यात आलेली आहे. MSME योजनेची संपूर्ण माहिती, MSME Information in Marathi आपण या लेख मध्ये पाहणार आहोत.

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती

एमएसएमई चा फुल फॉर्म मराठी – MSME Full Form in Marathi

    MSME ही एक सरकारी स्कीम आहे. MSME चा फुल फॉर्म “Micro, Small and Medium Enterprises” असा होतो. MSME चा मराठी अर्थ “सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग” असा होतो. MSME अंतर्गत सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. या योजनेद्वारे अनेक लहान मोठ्या उद्योगांना नफा मिळतो.

    MEME योजनेच्या मदतीने भारत सरकार छोट्या उद्योगांना आर्थिक सहाय्य देते. या योजनेची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायद्याअंतर्गत 2006 मध्ये करण्यात आलेली आहे. देशातील लहान, आणि मध्यम उद्योगांना विकसित करण्यासाठी व आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कार्य करते.

नवीन व्याख्या

    MSME New Definition 2021: MSME मंत्रालयाच्या स्थापनेच्या वेळी, उद्योगांचे वर्गीकरण त्यात वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या मूल्याच्या आधारे ठरवले जायचे. परंतु 2018 मध्ये GST लागू केल्यानंतर MSME मध्ये बदल केला गेला. आताच्या उद्योगांचे MSME द्वारे केले गेलेले वर्गीकरण खालीप्रमाणे

उद्योग चा प्रकारगुंतवणूकउलाढाल
सूक्ष्म१ कोटी५ कोटी
लघु१० कोटी५० कोटी
मध्यम ५० कोटी२५० कोटी

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

    MSME Registration Process: MSME ची नोंदणी करण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन आहे. मी खाली दिलेल्या स्टेप्स नुसार आपण नोंदणी करू शकता.

 • ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय च्या सरकारी वेबसाईटवर जावे.
 • यानंतर न्यू Registration वर क्लिक करायचे आहे.
 • आता आपला आधार कार्ड नंबर भरायचा आहे.
 • आपल्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल.
 • दिलेल्या जागी OTP इंटर करा.
 • इंटर केल्यावर आपल्या समोर New Registration चा ऑप्शन खुला होईल.
 • आता New Registration वर क्लिक करावे, मग आपल्यासमोर एक फॉर्म खुला होईल. हा फॉर्म अचूकपणे पूर्ण भरायचा आहे व Submit करायचे आहे.
 • सर्व प्रक्रिया बरोबर केल्यावर MSME Registration Certificate आपल्या ई-मेल वर पाठवले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

    MSME फॉर्म भरण्यासाठी म्हणजेच नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

 • अर्जदाराची केवायसी कागदपत्रे
 • व्यवसाय आस्थापना प्रमाणपत्र
 • बँक तपशील
 • व्यवसाय पॅन कार्ड
 • गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • भाडे किंवा लीज करार
 • जमीन मालकाकडून NOC प्रमाणपत्र

योजनेचे फायदे

    Benefits of MSME: MSME सरकारी योजनेत नोंदणी केल्याने उद्योगदाराला अनेक फायदे होतात, त्यातील काही खालीप्रमाणे-

 • कमी व्याजदराने कर्ज मिळण्यास मदत होते.
 • सरकारी टेंडर्स मिळण्यास मदत होते.
 • सरकारी परवाने, मंजुरी, मिळवणे सोपे होते.
 • प्रत्यक्ष कर कायद्या अंतर्गत सूट मिळते.
 • ISO प्रमाणपत्र खर्चाची भरपाई मिळते.

निष्कर्ष –

    मला आशा आहे की आपल्याला एमएसएमई योजनेची संपूर्ण माहिती, MSME Information in Marathi समजली असेल. MSME Full Form in Marathi या लेखामध्ये आपल्याला समजला असेल. आपणही जर व्यवसाय सुरु करणार असाल तर या योजनेत नोंदणी करू याचा लाभ नक्की घ्यावा.

  आजच्या MSME Full Form in Marathi लेखविषयी काहीही शंका असेल किंवा काही गोष्टी राहिल्या असतील तर मला कंमेंट करून कळवा. एमएसएमई योजनेबद्दल मित्रांना माहिती देण्यासाठी या लेखाला सोशल मीडियावर मित्रांसोबत शेअर करा. अश्याच अधिक माहितीसाठी आपल्या या मराठी ऑनलाईन या ब्लॉगला पुन्हा-पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

हे सुद्धा वाचा –

प्रधानमंत्री किसान मानधन योजना – PM Kisan Mandhan Yojana Marathi

1 thought on “एमएसएमई योजना काय आहे व काय होतो फुल फॉर्म?”

Leave a Comment