डिमॅट खाते म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

डिमॅट खाते काय असते, डिमॅट खात्याचे प्रकार किती व कोणते, डिमॅट खात्याचे फायदे, ही सर्व Demat Account Information in Marathi मी या लेखात आपल्याला देणार आहे. आपल्या पैकी ज्यांना शेअर बाजार मध्ये रुची/ आवड आहे त्यांनी डिमॅट अकाउंट बद्दल कोठेतरी ऐकलेच असेल. जुन्या काळात शेअर मार्केट चा सर्व व्यवहार कागदोपत्री चालत असे परंतू त्याचे तोटे लक्षात घेता आता हे डिमॅट अकाउंट द्वारे ऑनलाईन करण्यात आलेले आहे. निवेश बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट असणे आता अनिवार्य आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला निवेश बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते ओपन करणे बंधनकारक आहे. Demat Account शिवाय कोणताही व्यक्ती शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. Demat Account Information in Marathi अनेक लोकांना माहीत नसते, जी माहीत असणे खूप गरजेचे आहे. या कारणामुळे आपण या लेख मध्ये डिमॅट अकाउंट ची माहिती पाहणार आहोत.

डिमॅट खाते म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती – Demat Account Information in Marathi

डिमॅट अकाउंट चा उपयोग शेअर्स ची खरेदी विक्री करण्यासाठी केला जातो. ज्याप्रमाणे Bank Account मध्ये पैसे ठेवले जातात अगदी त्याच प्रमाणे Demat Account मध्ये शेअर्स ठेवले जातात. Demat चा फूल फॉर्म Dematerialize असा होतो. भौतिक स्वरूपातील Shares आणि Securities जसे प्रमाणपत्रे, ई चे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करून डिमॅट खात्यात ठेवण्याच्या प्रक्रियेला Dematerialization असे म्हणतात. डिमॅट अकाउंट च्या साहाय्याने कोणत्याही स्टॉक चे शेअर्स खरेदी विक्री करता येते. डिमॅट खाते हे बँक खात्याप्रमाणे असते.

आपण जेंव्हा बँकेतून पैसे काढतो, त्यावेळेस ते भौतिक स्वरूपात मिळतात, परंतु ज्यावेळेस ते बँकेत असतात त्यावेळेस ती Digital Currency च्या स्वरूपात असतात. डिजिटल करन्सी ही भौतिक नसते, यासारखेच डिमॅट खात्यात शेअर्स डिजिटल स्वरूपात साठवले जातात. डिमॅट खात्याच्या मदतीने कोणत्याही कंपनी चे शेअर्स खरेदी करता येतात, व डिजिटल पध्दतीने विकता येतात. या प्रक्रियेमुळे अनेक फायदे होतात की शेअर्स ची कागदपत्रे सांभाळून ठेवायची गरज लागत नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडते. आपल्याकडे मोबाईल आणि इंटरनेट असल्यावर घरबसल्या शेअर्स ची खरेदी-विक्री करता येते.

आपण अवतीभोवती पाहतच असाल की, आता जवळजवळ सर्व काही डिजिटल झालेले आहे, त्याप्रमाणे शेअर्स ची खरेदी-विक्री डिजिटल करण्यात आलेली आहे. डिमॅट अकाउंट मध्ये आपण शेअर्स खरेदी केल्यावर ते लगेच आपल्या खात्यात जमा होतात व विकल्यावर लगेच समोरच्या खात्यात जमा होतात. ही सर्व प्रक्रिया आपण घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर वरून करू शकतो ही खूप फायद्याची बाब आहे. या डिमॅट खात्याचे काही प्रकार आहेत ते आपण आता पाहुयात.

डिमॅट खात्याचे प्रकार – Types of Demat Account

भारतात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही प्रकारचे डिमॅट अकाउंट असतात, त्याची माहिती आपण आता पाहुयात. शेअर मार्केट मध्ये ट्रेंडिंग करण्यासाठी तीन प्रकारचे डिमॅट अकाउंट असतात. गुंतवणूक दारांच्या प्रोफाइल नुसार या अकाउंटसला बनवले जाते. तर चला या तीन Types ची शोडक्यात Demat Account Information in Marathi घेऊयात.

1) Regular Demat Account

रेग्युलर डिमॅट खाते हे भारतीय रहिवाशीसाठी असते. ज्यांना भारतीय कंपन्यांमध्ये निवेश करायचा आहे त्यांच्यासाठी या प्रकारच्या डिमॅट अकाउंट ची आवश्यकता असते.

2) Repatriable Demat Account

Repatriable Demat Account हे अनिवासी भारतीयांसाठी (NRI) आहे. या अकाउंट द्वारे परदेशात पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम असते. तथापि, या प्रकारच्या डिमॅट अकाउंट ला NRI Bank Account च्या खात्याशी जोडणे बंधनकारक आहे.

3) Non-Repatriable Demat Account

Non-Repatriable Demat Account हे सुद्धा अनिवासी भारतीयांसाठीच आहे, परंतु या प्रकारच्या डिमॅट खात्यामुळे परदेशात निधी हस्तांतरण करणे शक्य नाही. या प्रकारातील डिमॅट अकाउंट हे NRO Bank Account शी जोडणे बंधनकारक आहे.

डिमॅट खाते कसे कार्य करते – How Demat Account Works

Demat Account Information in Marathi, डिमॅट खाते कसे कार्य करते हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात असेल. हे जे डिमॅट खाते असे ते आपल्या बँक मधील Savings Account सारखे असते. आपण जी रक्कम बँकेत जमा करण्यास देतो ती Savings Account द्वारे बँकेत जमा केली जाते. ही रक्कम इलेक्ट्रॉनिक चलनाच्या स्वरूपात आपल्या Saving Account मध्ये साठवली जाते, अगदी याच प्रमाणे Demat Account कार्य करते. आपण विकत घेतलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमॅट खात्यात साठवले जातात.

इलेक्ट्रॉनिक शेअर्स ला आपण पाहू शकतो, जसे बँक अकाउंट बॅलन्स आपण ऑनलाईन पाहतो तसे. डिमॅट अकाउंट मध्ये कोणत्याही कंपनी चे शेअर्स ऑनलाईन पध्दतीने काही क्षणात विकत घेता येणे शक्य झाले आहे. शेअर्स विकत घेतल्यावर ते डिमॅट खात्यात पाहता येतात. याच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने शेअर्स विकता येतात. शेअर्स खरेदी केल्यावर डिमॅट खात्यात जमा केले जातात व विकल्यावर खात्यातून हटवले जातात. पूर्वी ही प्रक्रिया खूप वेळखाऊ व किचकट होती पण डिमॅट खाते आपल्यापासून ही अत्यंत सोपी झाली आहे.

डिमॅट खात्याचे फायदे – Benefits of Demat Account

भारतीय निवेश बाजार मध्ये निवेश करण्यासाठी डिमॅट अकाउंट असणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला डिमॅट खाते उघडायचे असेल तर डिमॅट खात्याचे खाली दिलेले फायदे नक्कीच वाचा. Demat Account Information in Marathi

1) डिमॅट खाते असल्याने शेअर्स ची चोरी होण्याची शक्यता शून्य झाली आहे, कारण डिमॅट खात्यात ठेवलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. पूर्वीप्रमाणे शेअर्स ची प्रमाणपत्रे नसतात, प्रमापत्रांची चोरी होत असे. डिमॅट खाते ऑनलाईन असल्यामुळे पूर्णपणे Secure आहे आणि आपण कोठूनही चालवू शकतो.

2) खरेदी केलेले शेअर्स विकण्यासाठी पूर्वीची प्रक्रिया खूप वेळ खाऊ होती व खूप मोठी सुद्धा. डिमॅट खाते आल्याने या प्रक्रियेला लागणारा वेळ फक्त मिनिट झाला आहे. डिमॅट खाते वापरून काही मिनिटात शेअर्स ची खरेदी-विक्री करता येते.

3) पूर्वी शेअर्स विषम संख्येत विकत नसत, म्हणजे ग्रुप मध्येच शेअर्स विकले जात. विषम संख्या जसे 21 मध्ये शेअर्स विकले जाऊ शकत नव्हते, कारण तसा नियम होता. डिमॅट अकाउंट मध्ये कितीही शेअर्स ची विक्री करणे शक्य आहे. डिमॅट खात्याच्या मदतीने फक्त एक शेअर सुद्धा विकता येतो.

4) डिमॅट अकाउंट ओपन केल्यावर आपण ते व्यक्तिगत स्वरूपात नामांकित करू शकतो. पूर्वी शेअर्स प्रमाणपत्र च्या स्वरूपात असायचे त्यावेळी हे शक्य नव्हते.

5) बोनस शेअर्स ला त्वरित जमा केले जाऊ शकते व राइट शेअर्स ला लगेच आपल्या बँक अकाउंट मध्ये क्रेडिट करता येते, पूर्वीप्रमाणे प्रमाणपत्रे बाळगण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही.

6) डिमॅट अकाउंटमुळे अनेक प्रकारे पैशाची थोडी-थोडी बचत होते. आपल्याला माहीतच असेल की प्रमाणपत्र, नोंदणी कागदपत्रे, यांचा ताळमेळ बनवण्यात थोडा खर्च येतो व वेळ पण जातो. डिमॅट अकाउंट ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या ओपन करता येते व चालवताही येते ते ही शून्य पैशात.

निष्कर्ष –

मला आशा आहे की डिमॅट अकाउंट बद्दल संपूर्ण माहिती, Demat Account Information in Marathi आता आपल्याला मिळाली असेल. डिमॅट खाते ची माहिती, Demat Account Information in Marathi आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण याबद्द्ल ज्ञान मिळेल व त्यांना दुसऱ्या कोणत्या वेबसाईट वर जाऊन पहायची गरज नाही लागणार.

वरील लेख वाचताना तुमच्या मनात एक शंका नक्की असेल की डिमॅट अकाउंट कसे ओपन करायचे, तर याबद्दल ची प्रक्रिया आपण पुढील लेखामध्ये विस्तारित समजून घेऊयात. तरीही या व्यतिरिक्त आपली काहीही शंका असेल तर खाली कंमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद !

2 thoughts on “डिमॅट खाते म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

    • आपण डिमॅट खाते कोठे ओपन करता त्यावर हे निर्धारित असते, त्यामुळे जे लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरच खाते सुरु करा, जसे Upstox, Choice, Zerodha, Angel Broking, etc

      Reply

Leave a Comment

अँड्रॉइड फोनमध्ये 5G कसे चालू करावे? ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे? फोन पे वर अकाउंट कसे उघडायचे, संपूर्ण प्रक्रिया गूगलच्या १० मजेशीर ट्रिक्स ज्या तुम्हाला माहित नसतील | Google Tricks