ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Group

    ब्लॉग कसा तयार करावा: ब्लॉग म्हणजे वेबसाईट चा एक प्रकार आहे. ब्लॉग मध्ये सतत नवीन माहिती जोडली जात असते, परंतू वेबसाईट मध्ये असे नसते. वेबसाईट मध्ये माहिती (Content) स्थिर स्थितीत असतो. आपले ज्ञान किंवा आपल्याकडे असलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्लॉग हे महत्त्वाचे साधन आहे. ब्लॉग मध्ये आपण आपले Content टाकून मुबलक प्रमाणात पैसे कमवू शकतो.

    कोरोना वायरस च्या साथीच्या रोगामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झालेले आहे, यामुळे सर्वांना घरीच बसून काम करावे लागत आहे. लॉकडाऊन च्या काळात ब्लॉगिंगला खूप चालना मिळलेली आहे. प्रत्येकजण आपला ब्लॉग बनवून पैसे कमावण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच आम्ही हा लेख आणला आहे. आजच्या लेखामध्ये आपण ब्लॉग कसा तयार करावा, यावर संपूर्ण माहिती, How to Create a Blog in Marathi जाणून घेऊयात.

Related Post – मराठी ब्लॉग लिस्ट – All Marathi Bloggers List

ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती | How to Create a Blog in Marathi

    ब्लॉग बनवण्यासाठी Blogger.com, वर्डप्रेस, विक्स, ई असे अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यातील ब्लॉगर हे एक अतिशय लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. ब्लॉगर लोकप्रिय असल्याचे कारण म्हणजे हे पूर्णपणे फुकट आहे, हे वापरायला एक रुपयाचा सुद्धा खर्च करायची गरज नाही आणि दुसरे कारण म्हणजे हे वापरायला अतिशय सोपे आहे. (ब्लॉग कसा तयार करावा) सोपे असल्याने नवीन ब्लॉगर्स ला हे वापरायला मस्त वाटते व वेळ सुद्धा वाचतो.

    ब्लॉगर हे गुगल कडून फुकट मध्ये देण्यात आलेले ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. ब्लॉगर वापरण्यासाठी होस्टिंग ची गरज लागत नाही कारण येथे गुगल द्वारे फ्री मध्ये होस्टिंग देण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे डोमेन नेम, तर ब्लॉगर मध्ये blogspot.com हे सबडोमेन फ्री मध्ये आपल्याला मिळते. जर कस्टम डोमेन नेम जोडायचे असेल तर तीसुद्धा सुविधा ब्लॉगर मध्ये देण्यात आलेली आहे.

1) Create a Blog

    आता आपण ब्लॉगर वर ब्लॉग बनवायची प्रक्रिया जाणून घेऊयात. प्रक्रिया अतिशय सोपी आहे, फक्त काही गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. तर चला पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.

1) सर्वात आधी आपल्याला ब्लॉगर च्या अधिकारीक वेबसाईट blogger.com वर जायचे आहे.

2) आता Create New Blog या बटन वर क्लिक करावे. पुढे ब्लॉगचे नाव विचारले जाईल, आपल्या ब्लॉगच्या विषयावर आधारीत किंवा आपल्या आवडीचे कोणतेही नाव टाका (आपण पुढे नाव बदलू शकता).

3) नंतर आपल्याला ब्लॉगचा पत्ता टाकायचा आहे, जो एक डोमेन नेम असतो. येथे ब्लॉगच्या नावाचा पत्ता टाकायचा आहे. वाटल्यास आपण येथे एखादे डोमेन खरेदी करून जोडू शकतो किंवा हेच ठेऊ शकतो.

4) पुढच्या स्टेप ला नाव टाकायचे आहे, येथे आपले स्वतः चे नाव किंवा ब्लॉगचे नाव टाकावे. आपले नाव जर लपवून ठेवायचे असेल तर ब्लॉगचे नाव टाकावे.

आता आपला ब्लॉग पूर्णपणे फ्री मध्ये बनवून तयार झाला आहे, आपण ब्लॉग वर लेख प्रकाशित करण्यास सुरुवात करावी.

2) Blog Design

    ब्लॉग बनवण्यावर पुढची प्रक्रिया असते, ब्लॉगला आकर्षक बनवणे म्हणजेच डिजाईन करणे. ब्लॉगर च्या डॅशबोर्ड मध्ये Setup हा पर्याय आहे. यावर जाऊन आपण हवे ते Widgets हटवू शकतो किंवा नवीन Widgets जोडू शकतो. ब्लॉगची डिजाईन करताना आवश्यक असलेले Widgets जोडावे व गरज नसलेले काढून टाकावे, यामुळे ब्लॉगची स्पीड वाढण्यास मदत होईल.

    ब्लॉगच्या डिजाईन मध्ये कस्टम थीम ला खूप महत्त्व आहे. ब्लॉगर वर असलेल्या ब्लॉग्स साठी इंटरनेट वर असंख्य थीम आणि टेम्प्लेट आहेत, यांना कस्टम थीम म्हणावे. गुगल वर “free blogger themes” असे सर्च केल्यावर आपल्याला बऱ्याच थीम मिळून जातील, त्यातील जी आवडेल ती आपण ब्लॉगला लावू शकता.

    इंटरनेट वर कस्टम थीम उपलब्ध आहेतच, पण ब्लॉगर डॅशबोर्ड मध्ये Customize हा पर्याय आहे. यावर क्लिक केल्यावर थोडे खाली स्क्रोल करून पाहा. येथे ब्लॉगर ने काही थीम दिलेल्या आहेत. यातली एखादी चांगली वाटली तर तीही आपण जोडू शकता. काही अडचणी असल्यास आम्हाला या ब्लॉगवर कोठेही कंमेंट करून विचारू शकता.

3) Blog Setup and Settings

    प्रत्येक ब्लॉग ला सुरुवातीला हे करावेच लागते आणि एकदाच करावे लागते, परत परत करायची गरज नसते. सेटअप मध्ये सर्वात पहिले आपल्याला ब्लॉगला Google Search Console मध्ये जोडावे लागते. Google Search Console हे गुगल चे एक साधन आहे. गुगल या सर्च इंजिन ला ब्लॉग जोडण्यासाठी येथे ब्लॉग ऍड करणे आवश्यक आहे. ब्लॉगला गुगल वरून किती क्लिक आले, किती इम्प्रेशन आले हे सर्व Google Search Console मध्ये दर्शवले जाते. (ब्लॉग कसा तयार करावा)

    दुसरे म्हणजे आपल्या ब्लॉग ला Google Analytics ला जोडावे लागते. हे सुद्धा गुगलचेच साधन आहे. ब्लॉग वर रहदारी (ट्रॅफिक) कोठुन आले, किती वेळ राहिले, केंव्हा आले, हे सर्व Google Analytics मध्ये कळते. आपल्या ब्लॉगवर येणाऱ्या ट्रॅफिक चे विश्लेषण करण्यासाठी Google Analytics उपयोगी आहे. ब्लॉग च्या सेटअप प्रक्रियेत Google Analytics ला ब्लॉग जोडयला विसरू नका.

    ब्लॉगर च्या ब्लॉग सेटअप मध्ये अजून एक क्रिया असते ती म्हणजे Blogger Settings. ब्लॉगर च्या डॅशबोर्ड मध्ये Settings हा पर्याय आहे. येथे काही SEO Friendly बदल करावे लागतात, जेणेकरून पुढे जाऊन ब्लॉगला काही Technical प्रॉब्लेम येणार नाही. या सेटिंग मध्ये Robot Tags, Sitemap, Meta Description असे सेटींग आहेत. हे SEO Friendly करणे गरजेचे असते.

4) First Blog Post

    आता तुमचा ब्लॉग बनवून, डिजाईन करून तयार झाला असेल. आता आपल्याला ब्लॉगवर टाकायचे आहे कंटेंट, म्हणजे ब्लॉगवर अशी माहिती टाकायची ज्यामुळे युजर्स ब्लॉगवर येतील. थोडक्यात ब्लॉग वर पोस्ट लिहायच्या आहेत. नवीन ब्लॉगर्स याच गोष्टीत अडकतात, कारण पोस्ट कोणत्या विषयावर लिहावी हे त्यांना सुचत नाही. त्यासाठी ब्लॉग बनवण्यापूर्वी ब्लॉगसाठी विषय निवडताना चांगला विचार करा. विषय निवडताना तुम्हाला ज्यात रस आहे तो निवडा, जेणेकरून तुम्ही त्यात आवडीने लिहू शकता.

    ब्लॉग मध्ये आपल्याला लेख लिहावे लागतात, ज्यांना ब्लॉग पोस्ट असे म्हणतात. ब्लॉग पोस्ट साठी विषय निश्चित केल्यावर पोस्ट चा आराखडा बनवा, व त्यानुसार माहिती एकत्र करा. ब्लॉग वर लेख लिहताना लक्षात ठेवा की पोस्ट सुटसुटीत व टापटीप असावी. यूजर ला लेख वाचायला आवडेल असे लिहावे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ब्लॉग यूजर साठी लिहायचा आहे.

    ब्लॉग पोस्ट लिहताना त्यात Keyword Placement, Keyword Research, हे SEO चे घटक येतात. पोस्ट लिहल्यावर पोस्ट ला एक Permalink द्यावी लागते, Labels जोडावे लागतात व Meta डिस्क्रिपशन टाकावे लागते. ब्लॉगर वर SEO Friendly पोस्ट कशी लिहावी हे आपण नंतर च्या लेख मध्ये पाहुयात.

5) Get Traffic

    ब्लॉग बनवल्यावर त्यावर भरपूर रहदारी मिळवणे ही एक आव्हानात्मक बाब आहे, यासाठी आपल्याला काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. (ब्लॉग कसा तयार करावा) ब्लॉगवर येणारे जास्तीत जास्त ट्रॅफिक हे सर्च इंजिन वरून असते म्हणजेच गुगल वरून असते, हे ब्लॉगच्या टॉपिक वर निर्धारित असते. गुगल वरून ट्रॅफिक आणण्यासाठी ब्लॉग गुगल सर्च इंजिन च्या नियमांचे अनुसरण करणारा असावा. यासाठी एक खूप मोठा विषय आहे त्याला SEO (Search Engine Optimization) असे म्हणतात.

    ब्लॉगला सर्च इंजिन मध्ये रँक करण्यासाठी काही ठराविक प्रक्रिया असतात ते करणे म्हणजे SEO करणे. SEO असतो Organic ट्रॅफिकसाठी, पण ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्याचे अजून काही मार्ग आहेत. एक लोकप्रिय मार्ग आहे सोशल मीडिया, यावरुन ट्रॅफिक आणण्यासाठी ब्लॉग चे सोशल मीडियावर खाते बनवून त्यात लिंक टाकावी लागते.

    सोशल मीडिया सोबतच काही फोरम साईट्स जसे Quora, Medium, Uttar, ई यावरही आपल्या ब्लॉगच्या पोस्ट शेअर करून ट्रॅफिक आणू शकता. ब्लॉगसाठी सर्वात परवडणारे ट्रॅफिक असते Organic Traffic, म्हणजे जे सर्च इंजिन वरून येते ते आणि हे आणण्यासाठी SEO कडे लक्ष द्यावे लागते. SEO मध्ये अनेक लहान बाबी आहेत जसे किवर्ड रिसर्च, बॅकलिंक बनवणे, कीवर्ड प्लेसमेंट, ई. ब्लॉगवर ट्राफिक कसे आणायचे हे आपण दुसऱ्या लेखमध्ये विस्तारित समजून घेऊया.

6) Ways to Earn Money

    आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हेतू ब्लॉग पासून पैसे कमावण्याचा असेल. (ब्लॉग कसा तयार करावा) ब्लॉग पासून पैसे कमावण्यासाठी ब्लॉगला आधी त्या योग्य बनवावे लागते, म्हणजे Quality Content, Traffic ब्लॉगवर असावे लागते तरच आपण चांगली कमाई करू शकाल. ब्लॉगपासून पैसे कमावण्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्यातून पैसे कमावण्यासाठी ब्लॉगवर ट्राफिक असायला हवे फक्त.

    गुगल अडसेन्स हा ब्लॉग वरून पैसे कमावण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. Google AdSense आपल्या ब्लॉगवर जाहिराती दर्शवते व त्या जाहिरात वर येणाऱ्या Clicks आधारित आपल्याला पैसे देते. Google AdSense च्या जाहिराती आपल्या ब्लॉगवर दर्शवण्यासाठी आपल्याला Approval घ्यावे लागते. आपला ब्लॉग जर Google AdSense Policy मध्ये योग्य बसत असेल तर Google AdSense Approval देते.

ब्लॉग वरून पैसे कमावण्यासाठी Google AdSense व्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. ते खालीलप्रमाणे-

  • Google AdSense
  • Affiliate Marketing
  • Sponsored Content
  • Refer and Earn

निष्कर्ष

    ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती | How to Create a Blog in Marathi हे आपल्याला आता समजले असेल. मला आशा आहे की आपल्याला आजचा लेख व्यवस्थितरित्या समजला असेलच. जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा.

    आपल्याला ब्लॉग कसा तयार करावा, ब्लॉगिंग संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल ते खाली कंमेंट करून नक्की विचारा, आम्ही आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूत. लेखात काही नवीन शिकायला मिळाले असेल तर हा लेख मित्रांसोबत शेअर करण्यास विसरू नका.

    ब्लॉगिंग, SEO संबंधित अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा व मित्रांनाही या ब्लॉगबद्दल नक्की सांगा. धन्यवाद!

6 thoughts on “ब्लॉग कसा तयार करावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

  1. वाचा मराठी कथा, कविता आणि बरंच काही

    https://www.parissparsh.in/

    Reply

Leave a Comment