कोरोना (CoVid-19) महामारीने मानवाचे सामान्य जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. कोरोना मुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली होती. कोरोना या भयंकर साथीच्या आजाराला टाळण्यासाठी आपल्या भारतातील शास्त्रज्ञांनी लस तयार केलेली आहे. कोरोना साठी बनवलेली ही लस घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण हे एकमेव साधन आहे जे आपल्याला कोरोना पासून वाचवते.
आपण सर्वांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड परिणाम पाहिला आहे, दुसऱ्या लाटेत लोकांचे खूप भयंकर हाल झाले. यासारखी लाट परत येऊ नये म्हणून लस घ्यावी लागते, लस घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. आपण जर लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर त्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे असायला हवे, कारण लस घेतल्याचा तो एक ठोस पुरावा आहे आणि विविध कामात त्याची आवश्यकता पडते.
कोरोना लसीकरण प्रमाणपत्र विविध मार्गाने उपयोगी पडते, आज जर तुम्हाला कोणत्या शहरात किंवा राज्यात जायचे असेल RTPCR चा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असायला हवा व लसीकरण पूर्ण असेल तर लसीकरण प्रमाणपत्र लागते. आज जवळजवळ 50% लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणजे लसीकरण प्रमाणपत्र असते, लस घेतल्यावर लगेच ते प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून घ्यावे लागते.
आजच्या या लेखात आपण Corona Vaccination Certificate Download करण्याचे विविध मार्ग पाहणार आहोत. सरकारने अनेक मार्गांद्वारे Corona Vaccination प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलेले आहे. या पोस्ट मध्ये आपण काही Corona Vaccination Certificate Download करण्याच्या काही सोप्या पद्धती पाहुयात.
कोरोना लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड | Corona Vaccination Certificate Download in Marathi
लसीकरण प्रमाणपत्र हे एक लीगल कागदपत्र आहे, यात आपली लसीकरण संबंधित महत्वाची माहिती असते. याचा उपयोग कोठे फिरायला गेल्यावर होतो, लसीकरण झाल्यामुळे आपल्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. आपण पहिला डोस घेतल्यावर Provisional Certificate मिळते व दोन्ही डोस पूर्ण झाल्यावर फायनल प्रमाणपत्र दिले जाते.
लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. भारत सरकारने लस घेतलेल्या व नोंदणी केलेल्या सर्व व्यक्तींच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. Corona Vaccination Certificate Download करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यातील काही सोपे पर्याय खाली स्पष्ट केले आहेत.
1) कोविन वेबसाईट – Covid-19 Vaccination Certificate Download From CoWin
Cowin ही कोरोना लसीकरणाची अधिकारीक सरकारी वेबसाईट आहे. लसीकरणाच्या सर्व नोंदी या वेबसाईट वर असतात. लसीकरण साठी Registration, Slot Booking सर्व या वेबसाईट वर केले जाते. Co Win वेबसाईट वरून Vaccination Certificate डाउनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-
- सर्वात आधी आपल्या वेब ब्राउजर वरून Co Win च्या Official Website वर जावे.
- आता आपला नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या साहाय्याने लॉगिन करावे.
- Dashboard वर गेल्यावर आपल्याला आपण किती डोस घेतले आहेत त्याची माहिती दिसेल. व त्या डोस च्या नावाखाली Certificate असा ऑपशन दिसेल.
- आपल्याला ज्या डोस चे प्रमाणपत्र हवे तेथील Certificate ऑपशन वर क्लिक करावे व दिलेली PDF फाईल डाउनलोड करावी.
- अश्या प्रकारे आपण Cowin वेबसाईट वरून कोरोना लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
2) आरोग्य सेतू ॲप – Covid-19 Vaccination Certificate Download From Aarogya Setu App
भारत सरकारने कोरोना साठी सर्वात पहिले बनवलेले ॲप हे आरोग्य सेतू आहे. कोरोना बद्दल माहिती लोकांना सांगण्यासाठी हे ॲप उपयोगी आहे. कोरोना पासून कसे सुरक्षित राहावे, कोरोना ची लक्षणे दिसल्यावर काय करावे, अश्या सर्व अडचणीत हे ॲप अनेकांना उपयोगी ठरले आहे.
Covid-19 ची Vaccine आल्यावर नोंदणी प्रक्रिया सुद्धा या ॲप मार्फत राबविण्यात आलेली आहे. अनेकांनी या ॲप वरून कोरोना लसीसाठी नोंदणी केलेली आहे. सरकारने या ॲप मधूनही लसीकरण प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलेले आहे. ते कसे मिळवायचे हे खाली दिलेले आहे.
- सर्वात आधी आरोग्य सेतू ॲप प्ले स्टोर वरून इंस्टॉल करून ओपन करावे, जर आपल्याकडे आधीच असेल तर ते ओपन करावे.
- पहिल्यांदा ॲप घेतले असेल तर नोंदणी करून लॉगिन करावे, आपण जर आधीच नोंदणी केलेली असेल तर डायरेक्ट लॉगिन करावे.
- आता CoWIN पर्यायावर क्लिक करावे.
- आता Vaccine Certificate वर क्लिक करावे, आणि 13 अंकी Beneficiary ID प्रविष्ट करावा.
- Beneficiary ID प्रविष्ट केल्यावर Get Certificate वर क्लिक करावे. आता आपले प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
3) Digi-Locker ॲप – Covid-19 Vaccination Certificate Download From Digi-Locker App
Digi-Locker हे सरकारी ॲप आणि वेबसाईट आहे, यावर आपण आपले वयक्तिक कागदपत्रे जसे, पॅन कार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, कास्ट प्रमाणपत्र, ई ऑनलाईन स्वरूपात सुरक्षित स्टोर करून ठेऊ शकतो. आपल्याला हव्या त्या वेळी Digi locker च्या खात्यात लॉगिन करून ते कागदपत्र डाउनलोड करू शकतो.
भारत सरकारने Digi-Locker App मध्ये पण Covid-19 Vaccination Certificate उपलब्ध करून दिलेले आहे. अगदी कमी वेळात आपण ते डाउनलोड करू शकतो. ते डाउनलोड कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
- Digi Locker App प्ले स्टोर वर जाऊन इंस्टॉल करावे, अथवा Digi Locker च्या Official Website वर जावे.
- आता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, त्यासाठी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर अशी बेसिक माहिती लागते. आपण जर आधीच नोंदणी केली असेल तर थेट लॉगिन करावे.
- आता Central Government च्या ऑपशन मधून Ministry of Health and Family Welfare (MoHFW) या पर्यायावर क्लिक करावे.
- Vaccine Certificate या पर्यायावर क्लिक करावे आणि 13 अंकी Beneficiary ID टाकावा व Download वर क्लिक करावे.
4) उमंग ॲप – Covid-19 Vaccination Certificate Download From Umang App
ॲपUMANG चा फुल फॉर्म Unified Mobile Applicatin For New Age Governance असा होतो. हे एक मोबाईल अँप्लिकेशन आहे. Umang अँप्लिकेशन च्या सहाय्याने विस्तृत सरकारी सेवा प्राप्त करता येतात. या एप च्या मदतीने EPF Withdrawal, Pension Withdrawl, असे कार्ये करता येतात.
Corona Vaccination Certificate Download करण्यासाठी कायम गर्दी असते त्यामुळे वेबसाईट बंद पडते व कामात अडथळा निर्माण होतो. हे थांबवण्यासाठी सरकारने अनेक प्लॅटफॉर्म वर हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहे, Umang App हे त्यातील एक आहे. Umang App वरून Corona Vaccination Certificate Download करण्याची प्रक्रिया खालीप्रमाणे-
- Umang App ओपन करावे, आधी डाउनलोड नसेल तर प्ले स्टोर वरून डाउनलोड करावे.
- App Open केल्यावर What’s New सेक्शन शोधा, आणि त्यावर क्लिक करावे.
- आता CoWIN वर क्लिक करा आणि पुढे Download Vaccination Certificate पर्यायावर क्लिक करावे.
- आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा, आणि OTP पडताळणी पूर्ण करा. Beneficiary Name चेक करा आणि आपले कोरोना लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करा.
5) व्हाट्सअप्प ॲप – Covid-19 Vaccination Certificate Download From Whatsapp App
Corona Vaccination Certificate Download करण्याचा हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. MyGov च्या Corona Helpdesk Chatbot च्या मदतीने लसीकरण प्रमाणपत्र व्हाट्सअप्प वर उपलब्ध करून दिलेले आहे. खालील प्रक्रिया वापरून आपण व्हाट्सअप्प वरून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
- आपल्या व्हाट्सअप्प वरून +91 9013151515 या क्रमांक वर “Hi” हा मेसेज पाठवा.
- आता आपल्यासमोर काही टॉपिक येतील, त्यातील Download Certificate या टॉपिक समोरील अंक टाइप करा करून सेंड करा.
- आता पुन्हा आपल्या समोर तीन पर्याय येतील, तेथे आपल्याला 3 अंक पाठवायचा आहे.
- या स्टेप मध्ये आपल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो OTP चॅट मध्ये पाठवायचा आहे.
- आपल्या मोबाईल वर ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची नावे आता आपल्याला दिसतील.
- ज्यांचा लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे त्या समोरील नंबर सेंड करा. आपले प्रमाणपत्र व्हाट्सअप्प चॅट मध्ये सेंड केले जाईल.
निष्कर्ष –
कोरोना लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड | Corona Vaccination Certificate Download in Marathi हे आता आपण शिकला आहात. आता आपण स्वतः लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. आपल्याला आजची Corona Vaccination Certificate Download करण्याची पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
आजच्या या लेखात जर नवीन काही शिकण्यास मिळाले असेल तर या पोस्ट ला व्हाट्सअप्प सारख्या सोशल मीडिया चा वापर करून मित्रांसोबत नक्की शेअर करा. या सारख्या अजून टिप्स आणि ट्रिक्स शिकण्यासाठी व आमचे लेख सर्वात आधी वाचण्यासाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईट ला Subscribe करून ठेवा. धन्यवाद!
Mahatvachi mahiti dilit..dhanyawad
Good & useful information given really thank u…!