Blue Aadhaar Card: काय आहे ब्लू आधार कार्ड? जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Blue Aadhaar Card Online Apply 2024 – ब्लू आधार कार्ड किंवा बाल आधार कार्ड हे असे आधार कार्ड आहे ते 0 ते 5 या वयोगटातील मुलांसाठी बनवले जाते. आजच्या पोस्ट द्वारे मी तुम्हाला ब्लू आधार कार्ड कसे काढायचे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. ब्लू आधार कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

आपल्याला माहितीच आहे की सध्या आधार कार्ड हे भारतातील सर्व नागरिकांसाठी अनिवार्य असलेले ओळखपत्र आहे. त्यामुळे मुलांना भविष्यात सरकारी योजना, शिक्षणात किंवा इतर गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे, त्यामुळे या पोस्टमध्ये मी Blue Aadhaar Card Online Apply 2024 याबद्दल माहिती दिली आहे. तर चला आधी पाहुयात की ब्लू आधार कार्ड काय असते?

ब्लू आधार कार्ड काय आहे? (Blue Aadhaar Card Marathi)

भारत सरकारने 2018 मध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी खास डिझाइन केलेले ब्लू आधार कार्ड सादर केले. हे आधार कार्ड निळ्या रंगाचे असते. लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा सरकारी लाभ मिळण्यासाठी, त्यांच्याकडे ब्लू आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

ब्लू आधार कार्ड बनवण्यासाठी, मुलांच्या बायोमेट्रिक डेटाऐवजी, हे कार्ड त्यांच्या पालकांच्या UID शी जोडलेल्या चेहऱ्याच्या प्रतिमेच्या आधारे बनवले जाते आणि जेंव्हा मुले 15 वर्षाची होतात तेव्हा हे आधार कार्ड अपडेट करावे लागते. अपडेट मध्ये मुलांचे स्वतःच्या डोळ्याचे आणि बोटांचे बायोमेट्रिक आधार कार्ड मधे जोडले जाते.

ब्लू आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रे (Documents For Blue Aadhaar Card)

आपल्याला जर आपल्या मुलांसाठी बाल आधार कार्ड म्हणजेच ब्लू आधार कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. Blue Aadhaar Card Apply करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत –

  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र
  • आई किंवा वडील/पालक यांचे आधार कार्ड

वरील आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर, तुम्ही तुमच्या मुलांचे ब्लू आधार कार्ड म्हणजेच बाल आधार कार्ड सहज काढू शकता.

ब्लू आधार कार्ड ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Blue Aadhaar Card Online Apply 2024)

आपल्याला जर आपल्या मुलाच्या बाल आधार कार्ड म्हणजेच ब्लू आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर खाली दिलेली प्रक्रिया वाचून तुम्ही आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. जर तुमच्या मुलाचे वय 0 ते 5 वर्षे दरम्यान असेल आणि तुम्हाला त्यांच्या आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर खालीलप्रमाणे अर्ज करा –

  • ब्लू आधार/ बाल आधार मिळवण्यासाठी प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
  • आता आधार कार्ड Registration पर्यायावर जाऊन मुलाचे नाव, आई वडील यांचा फोन नंबर, आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • यानंतर Registration फॉर्म भरल्यानंतर Appointment Slot वरती क्लिक करा आणि जवळच्या आधार केंद्रावर Appointment Book करा.
  • आता तुमच्या मुलाला आणि त्याचे जन्म प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे आधार घेऊन दिलेल्या दिवशी सेंटर वरती जायचे आहे.
  • केंद्रावर तुमच्याकडून आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया करून घेतली जाईल आणि काही दिवसाने आधार कार्ड तुम्हाला घरपोहच मिळेल.

निष्कर्ष –

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला ब्लू आधार कार्ड काय आहे आणि कसे काढायचे, Blue Aadhaar Card Online Apply 2024 याबद्दल संपूर्ण माहिती प्रदान केली आहे. वरती दिलेल्या स्टेप्स वाचून तुम्ही ब्लू आधार कार्डसाठी अर्ज करू शकता आणि तुमच्या मुलांसाठी ब्लू आधार कार्ड मिळवू शकता. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आधार कार्ड आवश्यक असते त्यामुळे आपल्या मुलाचे आधार कार्ड बनवून घ्या.

महत्वाचे लक्षात ठेवा की मुलांचे वय 0 ते 5 वर्षे आहे त्यांच्यासाठीच फक्त बाल आधार कार्ड असते आणि 15 वर्षाचे झाल्यानंतर ते बायोमेट्रिक देऊन अपडेट करावे लागते. मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी हा लेख शेवटपर्यंत वाचला असेल आणि तुम्हाला हा लेख खूप आवडला असेल, त्यामुळे तुम्ही आमच्या लेखाला नक्कीच शेअर करा, आणि काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा.

Leave a Comment