Google Forms काय आहे, कसा तयार करावा, जाणून घ्या

Google Forms in Marathi – आजच्या डिजिटल युगात डेटा म्हणजेच माहिती गोळा करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे हे अनेक व्यवसाय आणि संस्थांचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. Google Forms हे गूगल चे एक फ्री ऑनलाइन टूल आहे. हे टूल युजर्सला सर्वे, प्रश्नावली आणि इतर प्रकारचे फॉर्म अगदी सहजपणे तयार करण्यास मदत करते. आज आपण गूगल फॉर्म कसा बनवायचा हे या पोस्टमध्ये पाहत आहोत.

तुमचा व्यवसाय असेल आणि तुम्हाला तुमच्या ग्राहकांचा फीडबॅक घेयाचा असेल, मार्केट रिसर्च करत करायची असेल किंवा फक्त सहकाऱ्यांकडून माहिती गोळा करायची असेल तर, Google Forms तुम्हाला हे करण्यास मदत करू शकते. Google Forms हे गुगलने निर्माण केलेले एक विनामूल्य ऑनलाइन टूल आहे जे युजर्सला Custom forms, Surveys आणि Quizzes तयार करण्यात मदत करते.

Google Forms काय आहे, कसा तयार करावा, जाणून घ्या

आज ऑनलाईन फॉर्म तयार करण्यासाठी सर्वात लोकप्रिय टूल म्हणून गुगल फॉर्म्स वापरले जात आहे. त्यामुळे आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये, मी तुम्हाला गूगल फॉर्म काय आहे, Google फॉर्म कसा तयार करायचा, याचे फायदे, वैशिष्ट्ये याबद्दल माहिती देणार आहे, त्यामुळे तुम्ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी अशी विनंती.

Google Forms काय आहे? (Google Forms in Marathi)

गुगल फॉर्म हे गुगलद्वारे प्रदान केलेले एक विनामूल्य Form Builder टूल आहे. याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म तयार करू शकता आणि तेही खूप कमी वेळेत. Google Forms हे एक वेब-आधारित टूल आहे जे युजर्सना कमी वेळेत आणि सहजपणे फॉर्म तयार करून देते. गुगल फॉर्म हे गुगलच्या Google Drive suite चा एक भाग आहे, यामध्ये Google Docs, Sheets आणि Google Slides चा समावेश आहे.

Google Forms हे फॉर्म तयार करण्यासाठी एक सोपा इंटरफेस प्रदान करतो. वापरकर्ते फॉर्ममध्ये आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे प्रश्न टाकू शकतात, जसे की MCQ, Short Answer, Checkbox आणि अजून खूप काही. यासोबतच गूगल फॉर्म मध्ये थीम्स सुद्धा उपलब्ध आहेत, त्या वापरून तुम्ही आकर्षक डिजाइन करून फॉर्म तयार करू शकता. फॉर्म्स मध्ये फोटो आणि विडिओ जोडण्याची सुविधा सुद्धा गूगल फॉर्म्स मध्ये देण्यात आलेली आहे.

मोठ्या संख्येने लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी गुगल फॉर्म हे एक उत्कृष्ट टूल आहे. फॉर्म शेअर करण्यासाठी हे एक लिंक देते ती लिंक तुम्ही कोणासोबतही शेअर करू शकता. समोरच्याकडे गूगल खाते नसेल तरीही तो फॉर्म भरू शकतो असा पर्याय सुद्धा गूगल फॉर्म्स मध्ये उपलब्ध आहे. तुम्हालाही जर फॉर्म बनवायचा असेल तर गूगल फॉर्म हा एक बेस्ट पर्याय आहे.

Google Forms ची काही वैशिष्ट्ये (Features of Google Form)

गूगल फॉर्म हे टूल आज खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याचे कारण म्हणजे या टूल ची वैशिष्ट्ये, जे या टूल ला खास बनवतात. तर चला Google Forms ची काही वैशिष्ट्ये पाहुयात ज्यामुळे हे टूल इतके लोकप्रिय झाले आहे.

  • वापरण्यास सोपे – गुगल फॉर्म मध्ये फॉर्म तयार करण्यासाठी एक सोपा इंटरफेस देण्यात आलेला आहे तो वापरून कोणीही अगदी सहजपणे फॉर्म तयार करू शकतो. तुम्ही मोबाईल वरून सुद्धा अगदी सहजपणे गूगल फॉर्म बनवू शकता. सोप्या इंटरफेसमूळे युजर्स सहजपणे प्रश्न जोडू शकतात आणि फॉर्म Customize करू शकतात.
  • विविध प्रकारचे प्रश्न – गुगल फॉर्म मध्ये MCQ, Short Answer, Checkbox आणि अजून बऱ्याच प्रकारचे प्रश्न पर्याय उपलब्ध आहेत. यांचा वापर करून तुम्ही विविध प्रकारचे फॉर्म्स बनवू शकता जे अनेक कामांसाठी उपयोगी पडतील.
  • सानुकूलनीय – गुगल फॉर्म युजर्सना विविध थीम्स प्रदान करते, तुम्ही फॉर्म्स मध्ये फोटो जोडू शकता, विडिओ जोडू शकता, अजून खूप काही करू शकता. गूगल फॉर्म्स च्या या वैशिष्ट्यांमुळेच हे इतके लोकप्रिय झालेले आहे.
  • माहितीचे विश्लेषण – जेव्हा तुम्ही फॉर्म बनवून लिंक शेअर करता, आणि फॉर्म च्या माध्यमातून तुम्हाला जे रिस्पॉन्स मिळतात म्हणजे माहिती मिळते त्याचे विश्लेषण सुद्धा तुम्ही येथे करू शकता, त्यासाठी गुगल फॉर्म मध्ये चार्ट्स आणि ग्राफ्स दिलेले आहेत. चार्ट आणि ग्राफ म्हणजे आलेखच्या स्वरूपात तुम्ही डेटा पाहू शकता.
  • इंटिग्रेशन – गुगल फॉर्म हा गुगल शीट्स आणि गुगल ड्राइव्ह सारख्या इतर गुगल टूल्ससह इंटिग्रेट केला जाऊ शकतो. यासोबत गूगल फॉर्म तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती सुद्धा जोडू शकता. Google फॉर्म शेअर करताना Embed as HTML असा पर्याय आहे तो वापरून तुम्ही वेबसाईट वरती गूगल फॉर्म जोडू शकता.

गूगल फॉर्म कसा तयार करावा? (How to Create Google Form)

Google Form बनवणे खूप सोपे आहे. तुम्हाला जर नवीन Google Form Create करायचा असेल तर मी खाली दिलेल्या स्टेप्स नुसार क्रिया करा. खालील स्टेप्स चा उपयोग करून तुम्ही अगदी काही मिनटात गूगल फॉर्म बनवू शकाल, तर चला सुरु करूयात.

स्टेप 1 – Google Account वरती Login करा.

login google account

Google Form बनवण्यासाठी तुमचे गूगल खाते असणे आवश्यक आहे. जर तुमचे Google खाते नसेल तर बनवून घ्या त्यासाठी आमची (गुगल खाते कसे तयार करावे, संपूर्ण प्रक्रिया) हि पोस्ट तुमची मदत करेल. Google Form बनवण्यासाठी Google Account अनिवार्य आहे. आता मोबाईल किंवा कॉम्पुटर वरून Google.com वर जा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या “Sign In” बटणावर क्लिक करा आणि तुमच्या गूगल खात्यात लॉगिन करा.

स्टेप 2 – Google Forms वर जा.

open google forms

आता तुम्ही तुमच्या Google खात्यात केलेले आहे, पुढे गूगल च्या सर्च बार मध्ये “Google Forms” टाइप करून किंवा थेट https://docs.google.com/forms वरती क्लिक करा. हे केल्याने Google Forms ची वेबसाईट ओपन होईल. आता तुम्ही पुढच्या स्टेपकडे वळू शकता.

स्टेप 3 – एखादे टेम्पलेट निवडा किंवा Blank वरती क्लिक करा.

Google Form विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते जे तुम्ही तुमचा फॉर्म तयार करण्यासाठी वापरू शकता. टेम्पलेट निवडण्यासाठी, स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या “Template Gallery” बटणावर क्लिक करा. तेथून, तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम टेम्पलेट निवडू शकता.

choose template

तुम्ही जर Blank वरती क्लिक केले तर, तुमच्यासमोर एक साधा फॉर्म ओपन होईल ज्याला तुम्ही नंतर Customize करू शकता. आता पुढच्या स्टेप वरती जावे.

स्टेप 4 – गूगल फॉर्ममध्ये प्रश्न Add करा.

आता तुम्ही फॉर्म बनवायला सुरु करू शकता. येथे फॉर्ममध्ये प्रश्न Add करायचे आहेत. सुरु करण्यासाठी “Untitled Question” वरती क्लिक करून प्रश्न टाकायला सुरु करा. येथे तुम्ही विविध प्रकारचे प्रश्न जोडू शकता जसे कि multiple-choice, short answer, paragraph, ई.

add question in google form

प्रश्न Add केल्यांनतर, तुम्ही उत्तर पर्याय टाकू शकता, लेआउट Edit करू शकता, Image किंवा Video जोडून Customize करू शकता.

स्टेप 5 – गूगल फॉर्म Customize करा.

तुम्ही Title, Description आणि Theme जोडून तुमचा फॉर्म Customize करू शकता. Title आणि Description जोडण्यासाठी, पेजच्या सर्वात वरती असलेल्या “Untitled form” वरती क्लिक करा आणि तुमच्या फॉर्म चे Title आणि Description व्यवस्थित भरा.

customize your google form

थीम Customize करण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या “Customize Theme” या बटणावर क्लिक करा. तिथून, तुम्ही थीम चे कलर, फॉन्ट, आणि इतर अजून काही बदलू शकता.

स्टेप 6 – गूगल फॉर्म Preview करा आणि Test करा.

तुमचा फॉर्म शेअर करण्यापूर्वी, सर्वकाही योग्य रीतीने दिसते आणि कार्य करते याची खात्री करण्यासाठी त्याचा Preview करणे आणि चाचणी करणे हे गरजेचे आहे. तुमचा फॉर्म इतरांना कसा दिसेल हे पाहण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या “Preview” बटणावर क्लिक करा.

preview and test google form

तुमच्या फॉर्मची चाचणी घेण्यासाठी, स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या “Send” बटणावर क्लिक करा आणि फॉर्म ची लिंक कॉपी करून ओपन करा. आता तुमचा फॉर्म ओपन होईल त्यात तुम्ही फॉर्म भरून सर्वकाही ठीक आहे का नाही हे तपासू शकता.

स्टेप 7 – गूगल फॉर्म शेअर करा.

share google form

एकदा तुम्ही फॉर्मची चाचणी घेतल्यानंतर, तुम्ही फॉर्म शेअर करू शकता. फॉर्म शेअर करण्याचे अनेक मार्ग आहेत, ते खालीलप्रमाणे –

  • लिंक शेअर करणे: स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात “Send” बटणावर क्लिक करा आणि लिंक कॉपी करा. त्यानंतर तुम्ही ईमेल, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे लिंक शेअर करू शकता.
  • फॉर्म Embed करणे: स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात “Send” बटणावर क्लिक करा आणि “Embed HTML” निवडा. त्यानंतर तुम्ही कोड कॉपी करून तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगमध्ये पेस्ट करू शकता.
  • सहयोगी जोडणे: स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील “More” बटणावर क्लिक करा आणि “Add Collaborators” निवडा. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्म चा ऍक्सेस इतरांनाही देऊ शकता.

Google Forms चे उपयोग (Uses of Google Form)

गूगल फॉर्म चा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. जसे कि माघे लोकडाऊन च्या काळात ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी अनेक शाळा, कॉलेजेस नी गूगल फॉर्म चा उपयोग केला. अश्या प्रकारे अनेक क्षेत्रात गूगल फॉर्म वापरले जातात. मी खाली गूगल फॉर्म नेमके कशासाठी वापरले जातात हे दिलेले आहेत ते पहा –

  • सर्वे – गुगल फॉर्म हे सर्वे करण्यासाठी एक उत्तम टूल म्हणून समोर आले आहे. युजर्स या टूल च्या मदतीने survey form तयार करू शकतात आणि लोकांच्या मोठ्या ग्रुप सोबत शेअर करू शकतात. गुगल फॉर्ममध्ये निनावीपणे प्रतिसाद गोळा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, जो संवेदनशील विषयांसाठी उपयुक्त ठरू शकतो.
  • नोंदणी – इव्हेंट किंवा प्रोग्रामच्या नोंदणीसाठी गुगल फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. वापरकर्ते नाव, ईमेल, फोन नंबर आणि बरेच काही यासारख्या विविध पर्यायांसह एक फॉर्म तयार करू शकतात.
  • अभिप्राय – ग्राहक किंवा कर्मचाऱ्यांकडून अभिप्राय गोळा करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. वापरकर्ते उत्पादन किंवा सेवेशी संबंधित विविध प्रश्न टाकून एक फॉर्म तयार करू शकतात आणि ग्राहकांचा प्रतिसाद गोळा करू शकतात.
  • क्विझ – विद्यार्थी किंवा कर्मचाऱ्यांसाठी क्विझ तयार करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. वापरकर्ते वेगवेगळ्या प्रश्नांसह एक फॉर्म तयार करू शकतात आणि गुगल फॉर्म कोणाचे किती बरोबर आले यावर हे मार्क्स सुद्धा देते.
  • ऑर्डर: उत्पादने किंवा सेवांच्या ऑर्डर गोळा करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. वापरकर्ते उत्पादनाचे नाव, मात्रा आणि बरेच काही यासारख्या विविध गोष्टी टाकून फॉर्म तयार करू शकतात आणि याचा उपयोग ग्राहकांकडून ऑर्डर मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

– FAQ’s –

प्रश्न – Google Forms म्हणजे काय?
उत्तर – गुगल फॉर्म हे गुगलद्वारे प्रदान केलेले एक विनामूल्य Form Builder टूल आहे. याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म तयार करू शकता.

प्रश्न – Google फॉर्म कसा तयार करायचा?
उत्तर – Google फॉर्म तयार करण्यासाठी, तुमच्या Google खात्यात साइन इन करा आणि Google Forms वर जा. तिथून, तुम्ही एक नवीन फॉर्म तयार करू शकता, वरती पोस्टमध्ये मी स्टेप नुसार प्रक्रिया सांगितली आहे.

प्रश्न – Google फॉर्म कसा शेअर करायचा?
उत्तर – Google फॉर्म शेअर करण्यासाठी, तुम्ही ईमेल किंवा इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे फॉर्मची लिंक पाठवू शकता किंवा तुम्ही वेबसाइट किंवा ब्लॉगवर फॉर्म जोडू शकता.

प्रश्न – Google फॉर्ममध्ये इमेज आणि व्हिडिओ जोडता येतात का?
उत्तर – होय, तुम्ही Google फॉर्ममध्ये इमेज आणि व्हिडिओ वैयक्तिक प्रश्नांमध्ये जोडू शकता किंवा त्यांना Description मध्ये जोडू शकता.

प्रश्न – Google फॉर्मचे रिस्पॉन्स कसे पाहायचे?
उत्तर – Google फॉर्मचे रिस्पॉन्स पाहण्यासाठी, फॉर्मच्या Response पर्यायावर जा. तेथून, तुम्ही रिस्पॉन्स पाहू शकता.

प्रश्न – Google फॉर्म वापरण्यासाठी विनामूल्य आहे का?
उत्तर – होय, Google फॉर्म हे विनामूल्य साधन आहे.

Leave a Comment