Internet Speed Test – सिम कार्ड घेताना सर्वात पहिले मनात येते की “ही कंपनी आपल्या भागात चांगली इंटरनेट स्पीड देईल का?” यासाठी आपण त्या कंपनी चे सिम कार्ड वापरणाऱ्या कोणी व्यक्तिच्या फोनवर इंटरनेट चालवून पाहतो व आलेल्या निकाल वरून आपला निर्णय ठरवतो. भारतात इंटरनेट स्पीड एवढी चांगली नाही जितकी पाश्चिमात्य देशात किंवा अमेरिकेत असते. भारतात उत्तम इंटरनेट स्पीड पुरवण्याचे प्रयत्न दूरसंचार कंपन्यांकडून केले जात आहेत.
कोणते सिम जास्त स्पीड देते हे तपासण्यासाठी स्पीड टेस्ट केली जाते. स्पीड टेस्ट करण्यासाठी इंटरनेट वर काही टूल्स, वेबसाईट, एप्स उपलब्ध आहेत. आपण आधी कोणते ना कोणते टूल वापरले असू शकते, पण या पोस्ट मध्ये मी एक असे टूल आणले आहे जे पूर्णपणे बरोबर माहिती दर्शवते. या टूलचे नाव आहे Speed Test by Ookla, आपण या लेख मध्ये या टूलच्या मदतीने इंटरनेट स्पीड कशी चेक करायची हे पाहणार आहोत.
इंटरनेट स्पीड कशी चेक करायची? (Internet Speed Test)
Internet Speed Test या आर्टिकल मध्ये आपण इंटरनेट स्पीड चेक करायची हे शिकणार आहोत. स्पीड चेक करण्यासाठी आपण Speedtest by Ookla हे टूल वापरणार आहोत. हे टूल इंटरनॅशनल ब्रॉडबँड इंवेस्टीगेशन एजन्सी (ULCA) द्वारे बनवण्यात आलेले आहे. तर चला आता स्पीड टेस्ट करण्याची प्रक्रिया समजून घेऊयात.
१) आपल्या फोन, लॅपटॉप, कॉम्पुटर मधील ब्राऊजर ओपन करावे, कारण ही एक वेबसाईट आहे त्यामुळे इंटरनेट ब्राउजर वरून तिला ओपन करावे लागते.
२) इंटरनेट स्पीड टेस्ट करण्यासाठी सर्वात पहिले ULCA च्या https://www.speedtest.net/ या वेबसाईट वर जावे. या वेबसाईटवर इंटरनेट स्पीड टेस्ट करण्याची सुविधा दिलेली आहे.
३) आता वेबसाईट वरील Go या बटन वर क्लिक करायचे आहे, मग तुमच्या समोर एक मीटर दिसेल ते स्पीड नुसार वाढेल. थोड्या वेळात तुमच्या मोबाईल ची इंटरनेट स्पीड दाखवली जाईल.
४) Speedtest by Ookla या वेबसाईट द्वारे दाखवण्यात आलेली इंटरनेट स्पीड Mbps मध्ये असते. एका सेकंदात होणारा डेटा ट्रान्सफर रेट Mbps मध्ये दर्शवला जातो.
इंटरनेट स्पीड टेस्ट (Internet Speed Test) कशी करायची हे आता आपल्याला समजले असेल अशी मी आशा करतो. आताच्या युगात इंटरनेट चे खूप महत्त्व आहे, त्यामुळे सर्वांनाच वाटते की आपले इंटरनेट फास्ट असावे. त्यासाठी हे टूल चा वापर करून आपण स्पीड तपासू शकता.
मी या लेखमध्ये एकाच टूल बद्दल सांगितले आहे, तसे पाहिले तर इंटरनेट वर खूप मोठ्या संख्येने इंटरनेट स्पीड मोजण्यासाठी टूल उपलब्ध आहेत. तर चला इंटरनेट ची स्पीड कशी मोजायची हे तुम्हाला कळले आहे. तरीही आपल्याला काही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट करून नक्की विचारा.
आजच्या या लेखाबद्दल कंमेंट मध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. इंटरनेट, तंत्रज्ञान संबंधित अधिक माहितीसाठी माझ्या मराठी ऑनलाईन या ब्लॉगला Subscribe करून ठेवा. धन्यवाद!