डिजिटल सातबारा कसा काढायचा | डिजिटल स्वाक्षरी 7/12 | Digital Sign Satbara Online

Digital Sign Satbara : आपल्याला माहितीच असेल की सातबारा उतारा काढण्याची प्रक्रिया किती किचकट असते, त्यासाठी तलाठी कार्यालयात खेटे घालावे लागतात. आता एक महत्वाची बातमी अशी आहे की, सातबारा उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज आता राहिलेली नाही. होय, हे खरे आहे. महाराष्ट्र सरकारने 7/12 उताऱ्यामध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, त्यातील डिजिटल स्वाक्षरी 7/12 Utara Online हा एक मोठा बदल आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यामध्ये 11 प्रमुख बदल केले आहेत. सरकारने 50 वर्षांच्या कालावधी ने हे बदल केले आहेत. डिजिटल स्वाक्षरी सातबारा आता Maha Bhumi Abhilekh द्वारे सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याचे वैशिष्ट्य ची बाब म्हणजे हा उतारा आपण खरबसल्या काढू शकतो व सरकारी कामातही हा उतारा वापरण्यास परवानगी आहे.

Hindi Mail

आजच्या या लेखात आपण ऑनलाईन पध्दतीने डिजिटल स्वाक्षरी 7/12 Utara Online कसा काढायचा हे जाणून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटात तुम्ही 7/12 Utara Online उतारा काढू शकता व सरकारी कामांसाठी वापरू शकता.तर चला डिजिटल स्वाक्षरी 7/12 Utara Online कसा पाहायचा हे सविस्तर जाणून घेऊयात.

डिजिटल सातबारा कसा काढायचा | डिजिटल स्वाक्षरी 7/12 | Digital Sign Satbara Online

Digitally Signed Satbara Online काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अधिकारीक सरकारी वेबसाईटवर जावे लागते व त्यांनतर पुढील प्रक्रिया करावी लागते, तर चला स्टेप नुसार सर्व प्रक्रिया समजून घेऊयात.

1) सर्वात आधी अधिकारीक सरकारी वेबसाईट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ यावर जावे.

2) आपण जर पहिल्यांदा सातबारा घेत असाल तर OTP Based Login वर Click करून आपल्या जवळ असलेला फोन नंबर टाकावा व Send OTP वर क्लिक करावे.

Digital Sign Satbara Online

3) आता आपल्या नंबर वर एक OTP प्राप्त होईल तो दिलेल्या रकान्यात योग्यप्रकारे भरावा व Verify OTP वर क्लिक करावे.

4) आपल्या समोर आता एक फॉर्म दिसेल त्यात आपल्याला हव्या त्या ठिकाणाचा पत्ता भरावा लागतो, येथे आपला जिल्हा, तालुका, गाव, निवडा.

Digital Sign Satbara Online

5) हे झाल्यावर आपल्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे व त्यातील सर्वे नंबर सुध्दा टाकायचा आहे.

6) सातबारा उतारा मिळवण्यासाठी 15 रुपये भरावे लागतात त्यासाठी Recharge बटन वर क्लिक करायचे आहे.

Digital Sign Satbara Online

7) एका सातबारा साठी 15 रुपये फी आहे, त्यानुसार आपण Payment करायचे आहे, आपल्याला योग्य ती पेमेंट पद्धत निवडून येथे पैसे भरा.

8) पैसे भरल्यावर सातबारा डाउनलोड साठी तयार होईल मग तुम्ही येथून डाउनलोड करून घ्यावा.

महत्वाचे...
 • डिजिटल Signed Satbara हा सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
 • डिजिटल स्वाक्षरी सातबारा डाउनलोड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी प्रत्येकी १५ रुपये फी घेतली जाईल.
 • डिजिटल स्वाक्षरी सातबारा हा फी भरल्यानंतर 72 तास डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहील.

निष्कर्ष –

डिजिटल 7/12 Utara Online कसा काढायचा हे आता आपल्यातील सर्वच शिकले आहेत असे मला वाटते. तरी पण कोणालाही आणि काहीही अडचण असेल तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.

आजचा डिजिटल सातबारा कसा काढायचा | डिजिटल स्वाक्षरी 7/12 | Digitally Signed Satbara हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

8 thoughts on “डिजिटल सातबारा कसा काढायचा | डिजिटल स्वाक्षरी 7/12 | Digital Sign Satbara Online”

 1. सातबारा डाऊनलोड केल्यावर प्रिंट काढावी लागेल ना
  रिप्लाय दया

  Reply
 2. फक्त s b i च्या account वर च रेचार्गे करू शकतो का

  Reply

Leave a Comment