Favicon in Marathi – आपण अवती भोवती पाहतच असाल कि प्रत्येक कंपनी, ब्रँड, वेबसाईट ला एक स्वतः चा लोगो असतो, त्या लोगोवरून त्या कंपनी ची ओळख पटत असते. अगदी तसेच प्रत्येक वेबसाईट आणि ब्लॉग ला एक लोगो बनवावा लागत असतो. वेबसाईट किंवा ब्लॉगच्या लोगोला फेविकॉन असे म्हणतात.
आजच्या या पोस्टमध्ये आपण या फेविकॉन बद्दल माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कि Favicon म्हणजे काय?, Favicon कसे तयार करतात?, ब्लॉगर आणि वर्डप्रेस ब्लॉगमध्ये फेविकॉन कसा जोडायचा? आणि फेविकॉन लावल्याचे साईट ला काय फायदे होतात हे सुद्धा पाहणार आहोत. तर चला वेळ न लावता सुरु करूयात.
Favicon म्हणजे काय? (Favicon in Marathi)
फेविकॉन म्हणजे एक छोटा साईट आयकॉन होय. ब्राउजर विंडो मध्ये जेंव्हा आपण एखादी साईट उगढतो तेव्हा वेबसाईट च्या लिंक च्या डाव्या बाजूला एक आयकॉन दिसते त्याला फेव्हिकॉन असे म्हणतात. फेविकॉन मुळे साईट ची ओळख पटत असते. फेविकॉन चा आकार चौरसाकृती असावा लागतो.
फेविकॉन हा वेबसाईट च्या ब्रँडींग चे काम करतो. जसे आपण एखाद्या कंपनी ला तिच्या लोगोवरून ओळखतो, त्याचप्रमाणे फेविकॉन साईट ची एक ओळख बनतो. ब्लॉग किंवा साईट ला फेविकॉन लावल्याचे काय फायदे होतात हे आपण खाली पाहू. व्यावसायिक वेबसाईट साठी फेविकॉन खूप प्रभावशाली ठरतात, यामुळे ग्राहकांचा वेबसाईटवर विश्वास वाढतो.
Favicon चे फायदे (Advantages of Favicon)
- फेविकॉन हा साईट ची एक वेगळी ओळख निर्माण करतो.
- ब्लॉगला फेविकॉन लावल्याने साईट वापरकर्त्यांना एक वेगळा अनुभव मिळतो.
- ब्राउजर विंडो मध्ये खूप टॅब उगडलेले असतात, तेव्हा ब्लॉगची URL दिसत नाही फक्त फेविकॉन दिसते. त्यामुळे वापरकर्त्याला आपला ब्लॉग ओळखायला मदत होते.
- जेव्हा कोणी तुमच्या ब्लॉगला शॉर्टकट म्हणून होम स्क्रीन वर जोडते तेव्हा फेविकॉन हे एप आयकॉन म्हणून काम करते.
ब्लॉगला फेविकॉन लावल्याचे हे प्रमुख फायदे होतात.
Favicon कसा तयार करायचा? (Create Favicon in Marathi)
फेविकॉन काय आहे आणि फेविकॉन चे फायदे आपण पहिले आता पाहू कि फेविकॉन कसे बनवायचे. फेविकॉन बनवणे अतिशय सोपे आहे. फेविकॉन बनवून देणारे सॉफ्टवेअर इंटरनेट वर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
फेविकॉन जनरेटर हे सुद्धा चांगले सॉफ्टवेअर आहे. यावर तुम्हाला साईट लोगो अपलोड करायचा आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला त्याचा फेविकॉन मध्ये रूपांतर करून देईल. खाली फेविकॉन बनवण्यासाठी उपयुक्त अश्या सॉफ्टवेअर ची नवे देत आहे-
- Adobe Photoshop
- Gimp
- Canva (मोबाईल एप)
फेविकॉन चा एक ठराविक आकार, स्वरूप असते. ब्लॉगर आणि वर्डप्रेस या दोन्ही प्लॅटफॉर्म साठी जरा वेगळे स्वरूप आहे ते खालील प्रमाणे-
ब्लॉगर – आपण जर ब्लॉगर प्लॅटफॉर्म वापरत असाल तर यासाठी फेविकॉन ची साईज १००kb पेक्षा कमी असली पाहिजे आणि आयकॉन १:१ मध्ये म्हणजेच चौरस असला पाहिजे.
वर्डप्रेस – वर्डप्रेस साठी साईझ ची काहीही अट नाही. पण आयकॉन ची उंची आणि रुंदी दोन्हीही ५१२ पिक्सेल असली पाहिजे. वर्डप्रेस मध्ये आयताकृती प्रतिमा टाकली तरी चालते कारण यात प्रतिमेला एडिट करता येते. इमेज ला आकार देण्याची सुविधा वर्डप्रेस मध्ये देण्यात आलेली आहे.
ब्लॉगला Favicon कसा जोडायचा? (Adding a Favicon in Marathi)
ब्लॉगर –
- तुमच्या ब्लॉगर अकाउंट वर लॉगिन करा.
- “Settings” वर क्लिक करा.
- आता “Favicon” वर क्लिक करा.
- “Choose file” वर क्लिक करून फेविकॉन अपलोड करा.५) “Save” बटन वर क्लिक करा. आता तुमच्या ब्लॉगला फेविकॉन जोडला गेला आहे.
वर्डप्रेस –
- तुमच्या वर्डप्रेस अकाऊंट वर लॉगिन करा.
- मेनू मधून “Design” विभागातून “Customize” पर्यायावर क्लिक करा.
- “Site Identity” वर क्लिक करा.
- आता “Select site icon” वर क्लिक करा.
- तुमचा फेविकॉन येथे अपलोड करा.
- सर्व पर्याय पूर्ण करून “Save” करा. आता तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगला फेविकॉन जोडला गेला आहे.
आजच्या या पोस्टमध्ये मी फेविकॉन बद्दल संपूर्ण माहिती (Favicon in Marathi) सांगितलेली आहे. तरी जर तुम्हाला पोस्टसंबंधी काही अडचण असेल तर मला कॉमेंट द्वारे कळवा आणि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.