Solid State Drive: सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय, प्रकार, फायदे, संपूर्ण माहिती

    Solid State Drive in Marathi – डेटा साठवणाऱ्या उपकरणांचा एक वेगळाच इतिहास आहे. संगणक मध्ये सर्वात पहिले हार्ड डिस्क चा वापर डेटा साठवण्यासाठी केला गेला. 1956 मध्ये IBM कंपनी ने जगातील पहिली हार्ड डिस्क निर्माण केली. RAMAC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्ड डिस्क ची स्टोरेज क्षमता फक्त 5 MB होती, या हार्ड डिस्क ला आता अनेक वर्षे होऊन गेले आहेत.

    आता हार्ड डिस्क मध्ये खूप Advanced बदल झालेले आहेत. आजच्या आधुनिक हार्ड डिस्क मध्ये जास्त स्टोरेज, कमी किंमत, लहान आकार असे महत्त्वाचे बदल झालेले आहेत, परंतु या हार्ड डिस्क ची एक समस्या अजूनही सोडवण्यास यश आलेले नाही ती म्हणजे Read and Write Speed. Read and Write Speed कमी असल्यामुळे याचा परिणाम संगणकाच्या वेगावर पडतो.

    या त्रुटी ला सोडवण्यासाठी एक नवीन स्टोरेज उपकरण बनवण्यात आलेले आहे, हेच ते सॉलिड स्टेट ड्राईव्ह, आपण याला SSD असेही म्हणतो. Solid State Drive बनवण्याचा मुख्य उद्देश संगणकाला वेगवान बनवण्याचा आहे. आजच्या या लेखामध्ये आपण Solid State Drive ची माहिती पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य माहितीकडे वळूयात.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय?

    सॉलिड स्टेट ड्राईव्ह हे नवीन पिढीतले Computer Storage Device आहे. Computer मधील डेटा Store करण्यासाठी हे उपकरण बनवण्यात आलेले आहे. लोकप्रिय असलेले Storage Device, हार्ड डिस्कला हे पर्यायी उपकरण आहे. हार्ड डिस्क च्या ऐवजी सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरल्याने संगणकाचा Operate करण्याचा वेग वाढतो, कारण HDD च्या तुलनेने SSD चा Read and Write Time खूप कमी असतो. संगणकाचा Operate वेग जास्त असल्याने वापरकर्त्यांना कमी वेळेत डेटा मिळवता येतो.

    डेटा स्टोर करण्यासाठी Solid State Drive मध्ये NAND Flash Memory System वापरण्यात आलेली आहे. NAND Flash Memory ही एक चिप असते, यामध्ये डेटा Store होत असतो. SSD ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे, यात कोणतेही Moving Part वापरण्यात आलेले नाहीत, यामुळे SSD चा Read and Write Time कमी असतो व कमी वीजेत सुद्धा SSD योग्यरीत्या कार्य करते.

    SSD चे काही तोटे सुद्धाही आहेत, ज्यामुळे अजूनही SSD हार्ड डिस्क ला मागे टाकू शकले नाही. होय, आज 2021 मध्येही HDD चा सर्वाधिक वापर होतो. Solid State Drive ची किंमत Hard Disk Drive पेक्षा जास्त आहे, यामुळे आजही Hard Disk खूप लोकप्रिय आहे. स्वस्त असल्यामुळे अधिकतर लोक हार्ड डिस्क कडेच वळतात. येत्या काही वर्षात सॉलिड स्टेट ड्राईव्ह ही हार्ड डिस्क ला मागे टाकेल हे मात्र नक्कीच खरे आहे.

SSD चे प्रकार

    सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive) चे अनेक प्रकार आहेत. सध्या बाजारात लोकप्रिय असलेल्या तीन मुख्य Types ची माहिती आपण घेऊयात.

1) SATA SSD-

    SSD मध्ये सर्वात जास्त SATA SSD वापरल्या जातात. 2.5 SATA SSD हे याचे सध्याचे Version आहे. SATA SSD मध्ये डेटा ट्रान्सफर प्रक्रियेसाठी SATA 3 Lane ही System वापरली जाते. AHCI Protocol वर या SSD ची कार्यप्रणाली चालते. 600 MBps या वेगाने डेटा ट्रान्सफर करण्याचा वेग या ड्राईव्ह चा असतो. डेस्कटॉप कॉम्पुटर ला वेगवान बनवण्यासाठी ही सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरली जाते.

2) M.2 SATA-

    हे पूर्णपणे SATA SSD चे Modified Version आहे. SATA SSD सारखेच M.2 SATA मध्ये SATA 3 Lane System वापरली जाते व AHCI Protocol वर M.2 SATA SSD कार्य करते. M.2 SATA SSD चा आकार कमी करण्यात आला आहे, यामुळे ही लॅपटॉप मध्ये वापरली जाते. आकार कमी असल्यामुळे कमी ऊर्जेवर M.2 SATA SSD व्यवस्थित चालते. M.2 SATA SSD डेस्कटॉप कॉम्पुटर ला जोडता येत नाही.

3) M.2 NVMe-

    M.2 NVMe ही M.2 SATA सारखीच असते. डेटा ट्रान्सफर प्रक्रियेसाठी यात PCI Express Lane ही System वापरली जाते. NVMe Protocol वर ही SSD कार्य करते. या SSD ची Bandwidth 4 Gbps इतकी आहे. M.2 NVMe ला लॅपटॉपशी कनेक्ट करण्यासाठी विशिष्ट सॉकेट लागते त्याला Gen 3×4 असे नाव आहे. Gen 3×4 सॉकेट जर डिव्हाइस मध्ये असेल तरच आपण M.2 NVMe इंस्टॉल करू शकता.

SSD चे फायदे

    SSD (Solid State Drive) कॉम्पुटर मध्ये वापरल्याने खालील फायदे आपणास पहावयास मिळतात.

1) Faster Read and Write Speed

    कॉम्पुटर अथवा लॅपटॉप ला वेगवान बनवण्यासाठी त्यात हार्ड डिस्क च्या ऐवजी सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरणे फायदेशीर असते. सॉलिड स्टेट ड्राईव्ह चा डेटा रीड आणि राइट करण्याचा वेग HDD च्या तुलनेने कित्येक पटीने जास्त असतो. सामान्यपणे SSD चा डेटा Read करण्याचा वेग 250 MBps ते 600 MBps एवढा जास्त असतो. किंमत नुसार SSD च्या Read and Write Speed मध्ये विविधता असते.

2) Power Efficiency

    Power Efficiency हा SSD (Solid State Drive) चा सर्वात उपयोगी फायदा आहे असे म्हणता येईल. Solid State Drive मध्ये कोणतेही Mechanical Device वापरलेले नसते त्यामुळे HDD च्या तुलनेत SSD ला कमी ऊर्जा लागते. SSD ही पूर्णपणे Electronic आहे, त्यामुळे HDD च्या तुलनेत कमी ऊर्जा वापरते. कमी Power वर चालण्याच्या वैशिट्यामुळे SSD डेस्कटॉप कॉम्पुटर सोबत लॅपटॉप मध्येही वापरली जाते.

3) Faster Boot Time

    कॉम्पुटर किंवा लॅपटॉप सुरू होण्यास लागणारा वेळ बूट टाईम असतो. SSD असलेले कॉम्पुटर किंवा लॅपटॉप खूप कमी वेळात म्हणजे 10-30 सेकंद मध्ये सुरू होते. या ड्राईव्हमुळे Operating System सुरू होण्यास लागणारा वेळ कमी होतो. जर हार्ड डिस्क असेल तर आपले कॉम्पुटर लवकर Start होत नाही.

4) Silent Operation

    आपण वरती पाहिले की हार्ड डिस्क मध्ये Mechanical उपकरणे वापरली जातात. हार्ड ड्राईव्ह मध्ये एक डिस्क असते आणि ती सतत फिरत असते, त्यामुळे यातून आवाज निर्माण होतो. सॉलिड स्टेट ड्राईव्ह मध्ये सर्व उपकरणे Electronic असतात. Electronic उपकरणे थोडाही आवाज करत नाहीत, त्यामुळे SSD मधून कोणताही आवाज येत नाही. शांतपणे SSD आपले कार्य करत असते.

5) Failure Rate

    SSD (Solid State Drive in Marathi) मध्ये डेटा सुरक्षिततेने स्टोर राहण्याची शक्यता जास्त आहे हार्ड डिस्कच्या तुलनेने. SSD चा डेटा स्टोर ठेवण्याचा अवधी 2 Million तास इतका आहे. याचा अर्थ असा होतो की सॉलिड स्टेट ड्राईव्ह मध्ये आपला डेटा सुरक्षित असतो. हार्ड डिस्कची डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते.

निष्कर्ष

    आजच्या लेखामध्ये कॉम्पुटर सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) ची माहिती समजून घेतली आहे. मला आशा आहे की आपल्याला सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय? हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

    आपल्याला जर या लेखामध्ये काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका. लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल.

    सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय?, हा लेख कसा वाटला?, हे मला कंमेंट करून कळवा. कॉम्पुटर, ब्लॉगिंग, इंटरनेट संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट ला परत- परत भेट देत राहा.

1 thought on “Solid State Drive: सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय, प्रकार, फायदे, संपूर्ण माहिती”

Leave a Comment