बॅकलिंक म्हणजे काय आणि कश्या तयार करायच्या?

सर्वात प्रथम मी आपले मराठी ऑनलाईन या ब्लॉगवर स्वागत करतो. आपण आज बॅकलिंक बद्दल माहिती घेणार आहोत. ब्लॉग चालवत असाल किंवा ब्लॉग बनवण्याचा विचार करत असणाऱ्या कित्येक लोकांना बॅकलिंक म्हणजे काय हे माहीत नसते. बॅकलिंकमुळे ब्लॉगला काय फायदे होतात, बॅकलिंक कश्या बनवायच्या यापासून खूप व्यक्ती अज्ञात असतात. यामुळे खूप लोकांच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येत नाही किंवा खूप कमी येते व काही लोक ब्लॉगिंग सुद्धा सोडतात.

WhatsApp Group Join Group

उत्तम पद्धतीने सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) करण्यासाठी बॅकलिंक बनवणे हा एक प्रभावी मार्ग आहे. बॅकलिंक बनवल्याने ब्लॉगची सर्च इंजिन जसे गुगल मध्ये Ranking सुधारण्यास मदत होते, ब्लॉगची डोमेन ऑथोरिटी वाढते व सोशल मीडिया वरून रहदारी आणण्यास मदत होते. ब्लॉगिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला बॅकलिंक बद्दल माहिती असली पाहिजे त्यासाठी मी हा लेख लिहला आहे. तर चला वेळ न लावता सुरू करूयात.

बॅकलिंक म्हणजे काय?

एका वेबसाईट/ ब्लॉग कडून दुसऱ्या वेबसाईट/ ब्लॉग ला मिळालेली लिंक म्हणजे बॅकलिंक होय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या ब्लॉगला कोणत्या दुसऱ्या ब्लॉग ने लिंक दिली तर ती लिंक आपल्या ब्लॉगसाठी बॅकलिंक असते.

Backlink चा फायदा ब्लॉगची सर्च इंजिन रँकिंग वाढवण्यासाठी होतो. सर्च इंजिन च्या Algorithm नुसार, सर्च इंजिन ला ज्ञात असलेल्या वेब पेज वर आपली लिंक असल्यास सर्च इंजिन चे Crawler त्या लिंक च्या मार्गाने आपल्या साईट वर येते व साईट स्कॅन करते. एक चांगल्या Ranked Website कडून बॅकलिंक मिळवणे आपल्या ब्लॉगच्या Search Engine Ranking साठी फायद्याचे असते.

Ranked साईट वर आपल्या ब्लॉगची बॅकलिंक असल्याने आपल्या ब्लॉगची Domain Authority वाढते. सर्च इंजिन चे Crawler एका साईट वरून दुसऱ्या साईट वर जात असते, जर एकदा लोकप्रिय ब्लॉग आहे तेथे आपल्या साईट ची लिंक असेल तर आपला लेख सर्च इंजिन वर Rank होण्याची शक्यता वाढते.

बॅकलिंक चे प्रकार कोणते आहेत?

बॅकलिंक चे दोन प्रकार आहेत. एक प्रकार SEO साठी काही फायद्याचा नाही तर दुसरा SEO साठी फायद्याचा आहे. तर चला बॅकलिंक चे प्रकार समजून घेऊयात.

No-Follow बॅकलिंक चा आपल्या ब्लॉगला जास्त फायदा होत नाही. बॅकलिंक ला Nofollow टॅग असल्यास त्या बॅकलिंक चा सर्च इंजिन रँकिंग साठी फायदा होत नाही. Nofollow टॅग सर्च इंजिन ला सांगतो की या लिंककडे दुर्लक्ष करायचे आहे. सर्च इंजिन चे Crawler एका साईट वरून दुसऱ्या साईट वर जास्त असते, लिंक च्या मार्गाने. व याने Ranking वाढण्यास मदत होते.

Backlink ला जर Nofollow टॅग असेल तर सर्च इंजिन चे Crawler त्या लिंक ला Scan करत नाही, म्हणजे त्या लिंककडे दुर्लक्ष करते. Nofollow बॅकलिंक चा फायदा Traffic आणण्यासाठी होऊ शकतो. इंटरनेट वर काही वेबसाईट आहेत, तेथून आपण Nofollow बॅकलिंक घेऊन Traffic मिळवू शकतो. जसे फेसबुक, Quora, Medium.com येथून ट्रॅफिक मिळवू शकता.

Dofollow बॅकलिंक सगळ्यांनाच हव्या असतात. या बॅकलिंक ब्लॉगच्या Off- Page SEO मध्ये महत्वाची भूमिका निभावतात. ही बॅकलिंक जर लोकप्रिय असलेल्या वेबसाईट वरून असेल तर जास्त प्रभावी ठरते. सर्च इंजिन Ranking वाढवण्यासाठी या बॅकलिंक महत्वाच्या असतात. सर्च इंजिन चे Crawler या लिंक ला Follow करून दुसरी साईट Crawl करते.

जर आपल्या ब्लॉग ची लिंक लोकप्रिय असलेल्या साईट वर असेल Crawler त्या मार्गे आपल्या ब्लॉग वर येते. व त्यामुळे सर्च इंजिन आपला ब्लॉग रँक करते. बॅकलिंक जर संशयास्पद वेबसाईट कडून असेल तर ती आपल्या ब्लॉगच्या रँकिंग साठी नुकसान दायक ठरते. आपल्या ब्लॉगचा जो Topic आहे त्याच विषयाच्या किंवा संबंधित टॉपिक च्या साईट वरून बॅकलिंक असावी. बॅकलिंक किती आहेत हे महत्त्वाचे नसते तर बॅकलिंक कोणत्या वेबसाईट वरून आहेत हे महत्त्वाचे असते.

UGC Backlink म्हणजे User Generated Content Backlink. एखाद्या वेबसाईट वर तुम्ही जाऊन कमेंट मध्ये लिंक बनवली किंवा सोशल मीडिया वरती, किंवा ऑनलाईन ग्रुप्समध्ये तर त्या बॅकलिंक UGC Backlink मध्ये मोडतात. UGC Backlinks हे SEO साठी खूप महत्त्वपूर्ण असतात यामुळे वेबसाईटची लोकप्रियता वाढण्यास मदत होते.

Sponsored Backlink म्हणजे दुसऱ्या वेबसाइटवर तुमच्या वेबसाइटचा लिंक ठेवण्यासाठी तुम्ही त्या वेबसाइटच्या मालकाला पैसे देत असता. हे एक प्रकारचे Paid Backlink आहे जे तुमच्या वेबसाइटच्या SEO साठी फायदेशीर ठरू शकते.

Sponsored Backlink ला प्रायोजित लिंक किंवा सशुल्क लिंक असेही म्हणतात. हे लिंक सहसा तुमच्या वेबसाइटच्या सामग्रीशी संबंधित असतात आणि ते सहसा तुमच्या वेबसाइटच्या होमपेज किंवा इतर महत्त्वाच्या पृष्ठांवर ठेवले जातात.

बॅकलिंक कश्या तयार करायच्या?

बॅकलिंक मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. आपल्या ब्लॉग मध्ये जर High Quality Content असेल तर बॅकलिंक मिळण्याची शक्यता वाढते. दुसऱ्या साईट पासून बॅकलिंक मिळवण्यासाठी आपले Content कसे असावे किंवा आपण काय करायला हवे हे मी खाली काही मुद्द्यात दिले आहे.

1) बॅकलिंक मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपला ब्लॉग दर्जेदार असावा. ब्लॉग वरील पोस्ट परिपूर्ण असावी, त्यात मुद्देसूद माहिती लिहलेली असावी. अर्धवट पोस्ट लिहू नये. ब्लॉग वर आलेला प्रत्येक यूजर त्याला हवी असलेली माहिती मिळवून गेला पाहिजे. पोस्ट यूजर साठी लिहायची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

2) पोस्ट लिहण्या आधी आपल्या विषयाच्या Ranked असलेल्या पोस्ट तपासा, त्यात काय आहे, काय नाही हे पहा आणि मग स्वतः च्या मनाने मुद्देसूद पोस्ट लिहा.

3) आपल्या पोस्टला Category मध्ये विभाजित करा. जेणेकरून यूजर ला माहिती शोधण्यास सोपे जाईल. साईट चे Navigation सोपे ठेवा म्हणजे यूजर ला आपल्या ब्लॉग वर वावरने सोपे जाईल.

4) आपल्या विषयाशी संबंधित असलेल्या ब्लॉगच्या मालकांना आपल्या ब्लॉगबद्दल सांगा. त्यांना आपला ब्लॉग आवडला तर त्यांच्या ब्लॉग वर आपली बॅकलिंक जोडतील व त्यांचे यूजर आपल्या साईट वर येतील.

5) लोकप्रिय असलेल्या ब्लॉग वर Guest Post लिहा. Guest Post च्या शेवट ला आपले नाव व आपली लिंक टाकली जाईल. आपली Guest Post ज्यांना आवडेल व ते आपल्या ब्लॉगवर येतील.

6) ब्लॉगचे सोशल मीडिया जसे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, ई वर खाते बनवा. ब्लॉग संबंधित पोस्ट सोशल मीडिया वर टाका. यामुळे सोशल मीडिया द्वारे आपल्या ब्लॉग चे प्रमोशन होते.

प्रत्येक पोस्ट लिहताना आपण लक्षात ठेवले पाहिजे की पोस्ट यूजर साठी लिहायची आहे. यूजर ला परिपूर्ण माहिती मिळाली पाहिजे, म्हणजे त्यांना दुसऱ्या साईट वर शोधायची गरज लागणार नाही. असे केल्याने आपल्या ब्लॉगचा दर्जा वाढेल, व आपल्याला बॅकलिंक आपोआप मिळत जातील.

ब्लॉगच्या बॅकलिंक कश्या पहायच्या?

आपण वरती पाहिले की ब्लॉगला बॅकलिंक कश्या मिळवायच्या. बॅकलिंक मिळाल्यावर आपल्याला समजले पाहिजे की बॅकलिंक कोठून आली आहे. बॅकलिंक जर Toxic साईट वरून आली तर तिला वेळेत हटवणे गरजेचे असते, नाहीतर आपली पोस्ट गुगल काढून टाकू शकते किंवा रँकिंग कमी करू शकते.

बॅकलिंक तपासण्यासाठी Google Search Console हे सर्वांत चांगले साधन आहे. ब्लॉग बनवल्यावर त्याला Google Search Console मध्ये जोडावे लागते. याच्या Dashboard मध्ये Links हा एक पर्याय आहे यात आपल्याला सर्व बॅकलिंक पाहायला मिळतील. बॅकलिंक कोणत्या ब्लॉग वरून आल्यात हे कळेल.

बॅकलिंक तपासण्यासाठी काही Tools पण आहेत जसे, Ahrefs, Semrush, UberSuggest, ई.

निष्कर्ष-

मला आशा आहे की आपल्याला बॅकलिंक ची माहिती समजली असेल. आता आपण बॅकलिंक मिळवण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न सुरू केलेच असतील. तरी आपल्याला लेख संबंधित काहीही अडचण असेल तर मला कंमेंट करून नक्की कळवा.

आजच्या बॅकलिंक म्हणजे काय या लेखामध्ये आपल्याला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर हा लेख मित्रांसोबत शेअर करा. ब्लॉगिंग संबंधित अधिक माहितीसाठी या ब्लॉगला वारंवार भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद!

Leave a Comment