आरआईपी (RIP) चा फुल फॉर्म काय होतो?

WhatsApp Group Join Group

RIP Full Form in Marathi: सोशल मीडियावर सध्या एक नवीन शब्द प्रचलित झाला आहे. कोणाच्या मृत्यूची पोस्ट असेल तर त्यावर कंमेंट मध्ये अनेकवेळा आपण हा शब्द पहिला असेल, तो शब्द आहे RIP. RIP शब्दाचा सर्वात जास्त वापर आता सोशल मीडियावर होत आहे. व्हाट्सएपच्या स्टेटस मध्ये, इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट, मध्ये कोठेतरी आपण RIP शब्द ऐकलाच असेल. पूर्वी हा शब्द आपल्या देशात नव्हता परंतु आताच्या काळात खूप वेगाने पसरला आहे.

Neerfit

पाश्चिमात्य देशांच्या काही गोष्टी भारतात खूप लोकप्रिय होतात, त्यातीलच हा शब्द सुद्धा आहे. RIP शब्दाचा वापर का केला जातो हे अनेकांच्या मनात आले असेल. मराठी ऑनलाईन च्या या लेखमध्ये RIP Meaning in Marathi सोबतच RIP ची माहिती दिलेली आहे. RIP शब्द कोठून आला हे सुद्धा या लेखात आम्ही दिलेले आहे, त्यामुळे RIP Full Form in Marathi लेख संपूर्ण वाचावा अशी विनंती.

RIP चा फुल फॉर्म मराठी (RIP Full Form in Marathi)

आरआईपी (RIP Full Form in Marathi) या शब्दाचा फुल फॉर्म “Rest in Peace” असा होतो. Rest in Peace चा RIP Meaning in Marathi, मराठी अर्थ “आत्म्याला शांती मिळो” असा आहे. काही लोक याचा Return if Possible असा अर्थ समजतात, परंतु हे चुकीचे आहे. RIP शब्द वापरण्याचे तात्पर्य मृत्यू पावलेल्या मानवाच्या आत्म्यास शांती प्रदान करणे आहे. RIP शब्द वापरून व्यक्ती देवाशी प्रार्थना करतो की मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती प्राप्त होओ.

RIP Full Form in MarathiRest in Peace
RIP Meaning in Marathi आत्म्याला शांती मिळो

RIP शब्द हा लॅटिन भाषेतील Requiescat In Pace या शब्दापासून बदल होऊन आला आहे. RIP शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीला उद्देशून वापरला जातो. RIP हा इंग्लिश शब्द आहे, ज्यादाकरून इसाई धर्मातील लोक याचा वापर आत्म्याला शांती मिळवण्याच्या हेतूने करतात. इसाई धर्मात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर शरीराला दफन केले जाते आणि त्या कबर वर Rest in Peace लिहलेले असते.

RIP चा मराठी अर्थ (RIP Meaning in Marathi)

मराठी मध्ये RIP शब्दाचा अर्थ “आत्म्याला शांती मिळो” असा होतो. गेल्या काही दिवसांपासून भारतात या शब्दाने खूप थैमान घातले आहे. सोशल मीडियावर वर तर मेम्स मध्ये सुद्धा RIP शब्द वापरतात. आपल्या इकडे मौखिक पेक्षा सोशल मीडियावर खूप जास्त हा शब्द वापरतात. आता आपल्याला कळले असेल की RIP शब्द नेमका कधी आणि का वापरायचा.

सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा कोणाचे निधन होते त्यावेळेस RIP शब्द वापरला जातो कारण मृत्यूनंतरच व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या विश्रांती घेते. काही असाध्य रोगामुळे शरीर अंथरुणावर पडलेले असले तरी पृथ्वीवरील शेवटच्या दिवसापर्यंत आपले मन नेहमी सक्रिय असते. कोणते काम पूर्ण झाले नाही, कर्तव्ये पूर्ण झाली नाहीत, इत्यादीबद्दल आपले मन भटकत राहते. त्यामुळे अश्या वेळेस “आत्म्यास शांती मिळो” असे म्हटले जाते.

निष्कर्ष

तर आज आपण RIP चा फुल फॉर्म व RIP Meaning in Marathi काय आहे हे जाणून घेतले आहे. RIP शब्दाचा वापर आता सर्वत्र होत आहे त्यामुळे याची माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय हा शब्द खूप संवेदनशील आहे, अर्थ माहीत नसल्यामुळे जर चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखावू शकते.

RIP Full Form in Marathi आणि Meaning आपल्याला समजला असेल अशी मी आशा करतो. जर काहीही अडचण किंवा शंका असेल तर निःसंकोचपणे कंमेंट करून विचारा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जर RIP Meaning in Marathi हा लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा.

Leave a Comment