पीडीएफ (PDF) चा फुल फॉर्म काय आहे?

PDF Full Form in Marathi : या लेखात आपण PDF चे पूर्ण नाव पाहणार आहोत. आपण अनेक वेळा PDF शब्द ऐकला असेल पण त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहीत नसेल त्यासाठी आम्ही या लेखात PDF चा फुल फॉर्म ची माहिती या लेखात घेऊन आलो आहेत. कॉम्पुटर चा वापर वाढल्यामुळे PDF चा वापरही वाढला आहे त्यामुळे PDF शब्द ऐकणे साहजिकच आहे.

WhatsApp Group Join Group

marathispeak.in

PDF ही एक प्रकारची डिजिटल फाईल असते. फाईल चे विविध प्रकार असतात, त्यात PDF हा एक लोकप्रिय प्रकार आहे. आपण अनेक वेळा PDF फाईल मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये उघडली पण असेल. PDF ची माहिती असणे सामान्य ज्ञानासाठी महत्त्वाची असते, त्यामुळे आम्ही या लेखात PDF (PDF Full Form in Marathi), चा फुल फॉर्म व अर्थ पाहणार आहोत.

पीडीएफ (PDF) चा फुल फॉर्म (PDF Full Form in Marathi)

PDF चा फुल फॉर्म “Portable Document Format” असा होतो. PDF म्हणजे वापरण्यास सोपी अशी डॉक्युमेंट फाईल. PDF हा एक कॉम्पुटर फाईल चा फॉरमॅट आहे, यात ऑनलाईन स्वरूपात कागदपत्रे, साठवली जातात. PDF हा शब्द कॉम्पुटर शी संबंधित आहे. PDF फाईल ही Read आणि Share करण्यास खूप सोयीस्कर असते, त्यामुळे तिला Portable Document Format असे नाव आहे.

PDF चा निर्माण 1990 च्या आसपास झाला. 1993 मध्ये पीडीएफ बनवणाऱ्या Adobe कंपनीने PDF चे पहिले व्हर्जन लाँच केले. PDF चा निर्माण झाल्यापासून ऑनलाईन स्वरूपात कागदपत्रे Store करणे एकदम सोपे झाले. त्यानंतर PDF मध्ये खूप बदल करण्यात आले. आत्ता पीडीएफ हा सर्वात जास्त वापरला जाणारा डिजिटल फाईल चा फॉरमॅट बनला आहे.

PDF File उघडण्यासाठी मोबाईल, कॉम्पुटर मध्ये विविध सॉफ्टवेअर असतात. आज प्रत्येक स्मार्टफोन मध्ये PDF Reader आधीपासूनच दिलेला असतो. Adobe Reader, Google Drive, ई असे काही सॉफ्टवेअर आहेत त्यात PDF फाईल सहजपणे ओपन करता येते. PDF चा मुख्य वापर Documents शेअर करण्यासाठी केला जातो.

आजच्या काळात पुस्तके सुद्धा PDF फाईल मध्ये उपलब्ध आहेत. PDF फाईल ही पूर्णपणे सुरक्षित असते, त्यात कोणीही बदल करू शकत नाही. विविध वेब ब्राउजर जसे गूगल क्रोम, ऑपेरा मिनी, UC ब्राउजर, Mozilla FireFox यामध्ये PDF Open करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. आपल्याला जर PDF फाईल बनवायची असेल तर Microsoft Word बर बनवू शकता किंवा प्ले स्टोर वर काही एप्स आहेत, त्यांचा वापरही करू शकता.

निष्कर्ष –

मला आशा आहे की आपल्याला PDF Full Form in Marathi समजला असेल. आपण या लेखात PDF Meaning in Marathi बद्दल चर्चा केली आहे. आपल्याला जर PDF फाईल बनवायची असेल तर युट्युब ची मदत घेऊ शकता, किंवा काही अडचण असेल तर येथे कमेंट करून विचारू शकता.

आजच्या पीडीएफ (PDF) चा फुल फॉर्म | PDF Full Form in Marathi या पोस्ट मध्ये आपल्याला काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर या पोस्ट ला शेअर नक्की करा. PDF संबंधित काही अडचणी किंवा अभिप्राय असतील तर आम्हाला कंमेंट करून विचारू शकता. मराठी ऑनलाईन या ब्लॉगच्या पोस्ट सर्वात आधी वाचण्यासाठी Subscribe नक्की करा.

Leave a Comment