आजचे युग हे डिजिटल युग आहे. या युगात अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. लोकांचा वेळ वाचवण्यासाठी अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करण्याची सोय आता उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने मोबाईल रिचार्ज करणे, शॉपिंग करणे, नेट बँकिंग द्वारे पैसे पाठवणे, ही सर्व कामे आता घरी बसून अगदी काही सेकंदात करणे शक्य झाले आहे. या डिजिटल युगात आपण ओटीपी (OTP) हा शद्ब नक्कीच ऐकला असेल.
कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना किंवा कोणत्याही वेबसाईट वर नोंदणी करताना आपल्याला OTP पासवर्ड मोबाईल वर नक्की आला असेल. परंतु OTP म्हणजे नेमके काय असते किंवा हा OTP वापरण्यामागचा हेतू काय असतो?, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. यामुळेच आपण या लेखात OTP Password ची Information जाणून घेणार आहोत.
ओटीपी (OTP) म्हणजे काय? (OTP Meaning in Marathi)
ओटीपी (One Time Password) नंबर हा एक सुरक्षा कोड (Security Code) असतो ज्याचा वापर ऑनलाईन देवाणघेवाण किंवा नोंदनिकरणाच्या प्रक्रियेत सुरक्षेसाठी केला जातो. OTP चा सांख्यिकी किंवा अक्षरांचा कोड असतो, हा कोड जास्तीत जास्त 6 अक्षरांचा असतो.
आपण जेंव्हा Online Transaction करतो, किंवा कोणत्या वेबसाईट वर नोंदणी करतो त्यावेळी आपण प्रदान केलेल्या मोबाईल आणि ई-मेल वर एक पासवर्ड पाठवला जातो. तो पासवर्ड आपण टाकला तरच पुढील Online Transaction किंवा Registration ची प्रक्रिया पूर्ण होते. या पासवर्ड ला OTP क्रमांक म्हणतात. याला One Time Password म्हणतात कारण याचा वापर एका वेळेसच केला जातो.
OTP जर आपण योग्य नाही टाकला किंवा (OTP Meaning in Marathi) चुकीचा टाकला तर आपल्याला पुढील व्यवहार करण्यास परवानगी मिळत नाही. ऑनलाईन व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ओटीपी (OTP) नंबर चा वापर महत्वाचा ठरतो. Bank Account वर होणारे हॅकिंग हल्ले रोखण्यासाठी OTP फायदेशीर ठरतो. बँक द्वारे आपल्याला सांगितले जाते की, OTP कोणत्याही व्यक्तीला सांगायचा नसतो.
ओटीपी (OTP) चा फूल फॉर्म (OTP Full Form in Marathi)
ओटीपी (OTP) चा Full Form म्हणजेच Long Form, One Time Password असा होतो.
OTP Full Form | One Time Password |
मराठी अर्थ | एका वेळेस वापरला जाणारा संकेतशब्द |
ओटीपी (OTP) चे प्रकार (Types of OTP in Marathi)
ओटीपी (OTP) नंबर चे काही Types सुद्धा आहेत, OTP कोणत्या पद्धतीने पाठवला जातो त्याप्रमाणे OTP चे तीन प्रकार पडतात-
1) SMS OTP– OTP चा सर्वात जास्त वापर या प्रकारे होतो. हा OTP नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवला जातो. मोबाईल च्या संदेश (SMS) बॉक्समध्ये हा OTP पाठवला जातो.
2) Voice Calling OTP– Voice Calling OTP हा मोबाईल वर फोन करून सांगितला जातो. हा OTP सांगण्यासाठी आपल्याला एक Call येतो व त्यात OTP क्रमांक सांगितला जातो.
3) Email OTP– Email OTP हा Registered ई-मेल पत्त्यावर पाठवला जातो. आपल्या मोबाईल च्या Gmail मध्ये हा OTP प्राप्त होतो.
ओटीपी (OTP) चा वापर का केला जातो?
आपण कोठेही अकाउंट बनवण्यावर त्या अकाउंट ला एक पासवर्ड ठेवत असतो, जेणेकरुन त्या पासवर्ड शिवाय कोणीही आपल्या खात्यात प्रवेश करू शकणार नाही. हा पासवर्ड साधारण असतो, जर कोणाला हा पासवर्ड माहीत झाला तर तो आपले खाते अगदी सहजपणे उघडू शकतो व त्यात काहीही करू शकतो. हा गैरप्रकार रोखण्यासाठी OTP पासवर्ड चा वापर केला जाऊ लागला.
जेंव्हा कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या खात्यात किंवा आपल्या Account मधून Online Transaction करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण Register केलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल वर एक OTP पाठवला जातो आणि त्या व्यक्तीने जर OTP प्रक्रियेत बरोबर टाकला नाही तर त्याला पुढील प्रक्रिया करण्यास परवानगी मिळत नाही. सोप्या भाषेत, OTP द्वारे तपासले जाते की तुम्ही त्या खात्याचे अधिकृत मालक आहात की नाही!
OTP पासवर्ड हा एका फक्त वेळेस म्हणजे One Time वापरला जातो, व ठराविक वेळेपर्यंत वैध असतो. त्यामुळे कोणत्याही हॅकर ला वेळेत OTP शोधणे किंवा मिळवणे शक्य होत नाही व हॅकर अयशस्वी होतो. यामुळेच आपल्याला बँक द्वारे सुद्धा सांगण्यात आलेले असेल की OTP कोणालाही सांगू नये. काही हॅकर फोन करून सुद्धा ओटीपी विचारतात, त्यांच्यापासून सावध राहावे.
ओटीपी (OTP) चे फायदे (Advantages of OTP in Marathi)
OTP चे अनेक फायदे आहेत, त्यातील OTP चे काही फायदे दिलेले आहेत.
1) OTP प्रक्रिया आपल्याला ऑनलाईन फ्रॉड पासून वाचवते.
2) OTP मुळे आपले Online Transactions, Net Banking, Online Shopping सुरक्षिततेने पार पडते.
3) OTP मुळे आपले गुगल खाते, फेसबुक, इंस्टाग्राम असे सोशल मीडिया खाते सुरक्षित आहेत.
4) OTP हा Registered मोबाईल किंवा Email वरच येतो, चुकूनही दुसऱ्या मोबाईल वर पाठवला जात नाही.
5) एका वेळेस वापरल्यावर हा पासवर्ड निकामी होतो, त्यामुळे आपण एकदा OTP वापरल्यानंतर कोणाला OTP माहीतही झाला तरीहीत्याचा काही फायदा होणार नाही.
निष्कर्ष
आजच्या लेखामध्ये ओटीपी (OTP) नंबर ची संपूर्ण माहिती OTP Information in Marathi, (OTP Meaning in Marathi) समजून घेतली आहे. मला आशा आहे की आपल्याला ओटीपी (OTP) नंबर म्हणजे काय, What is OTP हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
आपल्याला जर या लेखामध्ये काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका. लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल.
ओटीपी (OTP) नंबर म्हणजे काय, What is ओटीपी (OTP) नंबर हा लेख कसा वाटला?, हे मला कंमेंट करून कळवा. अश्या टॉपिक संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट ला परत- परत भेट देत राहा.