सर्व ब्लॉगर्सला वाटते की आपला ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, ब्लॉगला खूप सारे ट्रॅफिक यावे. ब्लॉगला ट्रॅफिक आणण्यासाठी अनेक मार्ग असतात जसे सोशल मीडिया वरती शेअर करणे, गूगल वरून ऑरगॅनिक ट्रॅफिक आणणे, ई. ब्लॉगिंग मधे नवीन असलेल्या अनेकांना Google वरून ट्रॅफिक कसे येते हे माहीत नसते.
जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही गूगल वरती जाऊन सर्च करता आणि गूगल तुम्हाला एक यादी दाखवते त्यात बऱ्याच वेबसाईट असतात, आणि त्या मधे तुम्हाला लागणारी माहिती असते. गूगल वरून ट्रॅफिक आणण्यासाठी त्या यादीत तुमची वेबसाईट दिसायला हवी आणि त्यासाठी तुम्हाला तुमची साईट एका टूलमधे जोडावी लागेल त्याचे नाव Google Search Console.
गूगल सर्च कंसोल या टूलच्या मदतीने आपण आपली वेबसाईट गूगल वरती टाकू शकता. हे गूगल चे साधन आहे जे वेबसाईट ची गूगल सर्च वरील उपस्थिती मॉनिटर करते, सुधारण्यास मदत करते. याच्या मदतीने ब्लॉगची गूगल रँकिंग, वेबसाईट वरील तांत्रिक अडचणी, स्पीड, ई गोष्टी समजतात व त्यात सुधारणा करण्यास मदत होते.
ब्लॉगला Google Search Console मध्ये कसे Add करावे? (How to Add Blog to Google Search Console?)
आजच्या पोस्टमध्ये आपण ब्लॉगला किंवा वेबसाईटला गूगल वरती कसे आणायचे हे पाहणार आहोत. सोप्या भाषेत Google Search Console ला वेबसाईट कशी जोडायची हे आपण शिकणार आहोत. त्यामुळे आजची पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुमच्याकडून कोणती स्टेप राहणार नाही. तर चला सुरू करूयात.
स्टेप 1 – गूगल सर्च कंसोल टूल ओपन करा.
आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगला गूगल सर्चच्या यादीत आणण्यासाठी सर्वप्रथम गूगल वरती Google Search Console असे सर्च करा पहिल्या लिंक वर क्लिक करा किंवा थेट Google Search Console या वेबसाईट वरती जा.
वेबसाईट ओपन झाल्यावर Start Now बटन वर क्लिक करा आणि पुढे आपल्या ईमेल अकाउंट ची माहिती भरून लॉगिन करा.
स्टेप 2 – ब्लॉग/ वेबसाईट Add करा.
आपल्या ईमेल द्वारे लॉगिन केल्यानंतर “Add a Property” हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
ब्लॉग जोडण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिसतील पहिला Domain आणि दुसरा URL prefix. तर माझ्या मते दुसऱ्या पर्यायाचा वापर करावा कारण त्याद्वारे पुढील प्रक्रिया सोपी आहे.
आता URL prefix मधे साईट ची पूर्ण लिंक टाकायची आहे. जसे – https://marathionline.in आणि Continue वरती क्लिक करायचे आहे.
आपल्या साईटमध्ये www असेल तर ते जोडायला विसरू नका.
स्टेप 3 – ब्लॉगची मालकी verify करा.
गूगल वरती कोणतीही साईट जोडण्याआधी ती साईट तुमचीच आहे का हे तपासणे गूगल चे काम असते. त्यासाठी ही प्रक्रिया करावी लागते. ते करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
Verify करण्यासाठी HTML Tag हा पर्याय निवडा.
आता आपल्यासमोर एक कोड येईल तो कॉपी करून घ्या.
कॉपी केल्यावर तुमची साईट ज्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वरती आहे तेथे जा आणि खालील स्टेप्स फॉलो करा.
ब्लॉगर –
- ब्लॉगर डॅशबोर्ड ओपन करा.
- Theme पर्यायावर क्लिक करा.
- Customize शेजारच्या बाण वर क्लिक करून Edit HTML वरती क्लिक करा.
- पहिल्या टॅग चा खालील लाईन वरती तो कोड Paste करा आणि Save करा.
वर्डप्रेस –
- वर्डप्रेस डॅशबोर्ड ओपन करा.
- Appearance सेक्शन मधून Theme File Editor हा पर्याय निवडा.
- आता Theme Files मधून header.php वरती क्लिक करा.
- पहिल्या टॅग चा खालील लाईन वरती तो कोड Paste करा आणि Update File वरती क्लिक करा.
वरील स्टेप्स फॉलो केल्यावर Verify बटन वरती क्लिक करा. तुमची साईट verify झाल्यावर त्याचा संदेश तुम्हाला दिसेल. आता तुमची वेबसाईट गूगल सर्चमध्ये जोडण्यात येईल.
स्टेप 4 – Sitemap सबमिट करा.
कोणत्याही ब्लॉगला सर्च कंसोल मध्ये जोडल्यानंतर Sitemap Submit करावा लागतो. Sitemap हा एक कोड सारखा असतो जो सर्च इंजिनला सांगतो की वेबसाईट चे कोणते Pages सर्च वरती दाखवायचे आणि कोणते लपवायचे. SEO च्या दृष्टीने साइटमॅप खूप महत्वाचा असतो.
साइटमॅप सबमिट करण्यासाठी Indexing Section मधील Sitemaps हा पर्याय निवडा.
आता आपला Sitemap दिलेल्या जागी Paste करा आणि सेव करा.
Sitemap बरोबर असेल तर Status मधे Success असे लिहून येईल. यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
ब्लॉगसाठी साइटमॅप कसा Generate करायचा हे आपण नंतरच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
काही महत्वाचे मुद्दे –
- सर्च कंसोलला वेबसाईट add केल्यानंतर लगेच ती सर्च मध्ये दाखवली जात नाही त्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात.
- सर्च कंसोल मध्ये माहिती काही दिवसांनी दिसायला सुरू होते लगेच दिसत नाही.
- एकदा वेबसाईट जोडल्यानंतर परत जोडायची नाही, साइटमॅप सबमिट केलेला असेल तर आपोआप तुमच्या नवीन पोस्ट सर्च मधे येतील.
- पोस्ट इंडेक्स होत नसतील, म्हणजे गूगल वरती येत नसतील तर Inspect URL करून Request Indexing करू शकता, पण याने पोस्ट इंडेक्स होतेच असे नाही.
- तुमच्या ब्लॉगची Authority जशी जशी वाढत जाईल तश्या पोस्ट लवकर गूगल मधे येतील, त्यामुळे सतत माहितीपूर्ण पोस्ट टाकत राहा.