मसावी म्हणजे काय आणि कसा काढायचा, सोपी पद्धत

नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण HCF म्हणजेच मसावी काढण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत. मसावी कसा काढायचा हे आपल्याला अनेक परीक्षांमध्ये विचारले जाते, त्यामुळे मसावी काढण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत असली पाहिजे. यामध्ये आपल्याला दोन किंवा जास्त संख्या दिल्या जातात आणि त्यांचा मसावि म्हणजेच HCF काढण्यास सांगितले जाते.
मसावी म्हणजे अशी मोठ्यात-मोठी संख्या जीला दिलेल्या संख्यांनी भाग जातो. आता ही संख्या कशी काढतात ही प्रक्रिया आपण या लेखात शिकणार आहोत. यासोबतच HCF Full Form in Marathi म्हणजे HCF चा फुल फॉर्म काय होतो हे सुध्दा आपण या लेखात पाहणार आहोत. तर चला मसावी काढण्याची प्रक्रिया शिकण्याआधी मसावी म्हणजे काय हे पाहुयात.
लसावी म्हणजे काय आणि कसा काढायचा, सोपी पद्धत
मसावी म्हणजे काय – HCF Meaning in Marathi?
म.सा.वी म्हणजे महत्तम सामाईक विभाजक. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिला दिलेल्या दोन्ही संख्येने भाग जाईल. म.सा.वी ला इंग्लिश मध्ये HCF असे म्हणतात. चा “Highest Common Factor” असा होतो.

वरील उदाहरणात 12 व 18 या संख्येचा ल.सा.वी 6 आला आहे. याचा अर्थ असा की 6 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे जीने 12 व 18 ला एकाच वेळी भाग जाईल.
मसावी कसा काढायचा – How to Find HCF in Marathi?
ल.सा.वी काढण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे दिलेल्या संख्यांना एका मूळ संख्येने भाग देत जावा, जो पर्यंत भाग जातो तो पर्यंत. तर चला आता एका उदाहरणावरून हि पद्धत शिकुयात.
उदा… 60 आणि 36 चा मसावी काढा.

1) मसावी काढण्यासाठी आपल्याला या दोन्ही संख्यांना एका मूळ संख्येने भाग द्यायचा आहे. वरील 60 आणि 36 या संख्येला 3 ने भाग जातो म्हणून आपण 3 ने भाग दिला आहे.
2) 3 ने 60 ला भाग दिल्यावर 20 आले ते 60 च्या खाली लिहायचे आहे, तसेच 3 ने 36 का भाग दिल्यावर 12 आले ते 36 च्या खाली लिहायचे आहे.
3) आता 20, व 12 याना अजूनही भाग जातो म्हणून पुढे प्रक्रिया सुरू ठेवायची आहे. 20, 12 ला आपण 2 ने भाग दिला व उत्तर खाली लिहले.
4) 10, 6 यांनी अजूनही भाग जातो म्हणून प्रक्रिया सुरू ठवायची. पुढच्या स्टेप ला 5,3 शिल्लक राहिले. 5, व 3 अश्या संख्या आहेत ज्यांना आता कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, म्हणून आता प्रक्रिया थांबवायची.
5) वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे ज्या ज्या संख्येने भाग दिला आहे, त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. म्हणून 3,2,2 यांचा गुणाकार केला व आपल्याला 12 हा लसावी मिळाला.
मूळ संख्येंचा मसावी – HCF of Prime Numbers
मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला फक्त १ ने आणि त्याच संख्येने भाग जातो. विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी मूळ संख्येचा मसावी काढण्यास विचारले जाते, त्यामुळे सर्वाना मूळ संख्येचा मसावी काढणे आले पाहिजे.
११ व १३ चा लसावी काढा-
लसावी = १
जर उदाहरणात दिलेल्या सर्व संख्या मूळ असतील तर त्यांचा मसावी कायम १ असतो.
अपूर्णांकाचा लसावी – HCF of Fractions
अपूर्णांकाचा मसावी काढण्यासाठी खालील सूत्र वापरावे. मसावी काढताना अंशातील संख्येचा मसावी काढावा व छेदातील संख्येचा लसावी काढावा. अपूर्णकांचा लसावी काढताना याच्या उलटे करावे.
2/3 आणि 4/9 चा मसावी काढणे
नियमाप्रमाणे अंशातील संख्येचा मसावी काढावा, आणि छेदातील संख्येचा लसावी काढावा.
2 आणि 4 चा मसावी 2 आला
3 आणि 9 चा लसावी 9 आला
म्हणून 2/3 आणि 4/9 चा मसावी 2/9 आहे.
उदाहरणे…
१) 25, 40 चा मसावी काढा.

उत्तर – मसावी = 5
२) 48, 84 चा मसावी काढा.

उत्तर – मसावी = 4*3 = 12
३) 45, 30 चा मसावी काढा.

उत्तर – मसावी = 5*3 = 15
४) 60, 12, 36 चा मसावी काढा.

उत्तर – मसावी = 6*2 = 12
५) 24, 30, 42 चा मसावी काढा.

उत्तर – मसावी = 2*3 = 6
अश्या प्रकारे आपण मसावी काढू शकता, मसावी काढण्याच्या काही सोप्या पद्धती आता मी सांगितल्या आहेत. तरी आपल्याला काही अडचण असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता. HCF Full Form in Marathi या लेखात आपण मसावी काढण्याच्या पद्धती पाहिल्या आहेत. तुम्हाला जर या पोस्ट मध्ये काही नवीन शिकण्यास मिळाले असेल तर तुमच्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा.