ब्लॉगर्ससाठी उपयुक्त असे 10 गुगल एसईओ टूल्स (Google SEO Tools)

SEO (Search Engine Optimization) हा ब्लॉग/ वेबसाईट रँकिंग मधील सर्वात महत्वाचा घटक आहे. SEO म्हणजे एक प्रक्रिया असते, जी योग्यरीत्या आपल्या ब्लॉगवर रितसरपणे केल्याने ब्लॉग रँक होण्यास मदत होते. आपली जर SEO मध्ये आवड असेल किंवा ब्लॉग रँक करायचा असेल तर आजचा लेख आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

WhatsApp Group Join Group

सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन मध्ये आपल्या ब्लॉगची रचना उत्कृष्ट असावी लागते. गुगल सर्च इंजिन च्या नियमानुसार ब्लॉगच्या डिजाईन वर सुद्धा रँकिंग अवलंबून असते. आपण पाहतच असाल की आजकाल ब्लॉगिंग मध्ये खूप स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी SEO कडे लक्ष देणे गरजेचे आहे. गुगल ने असे काही Google SEO Tools बनवलेले आहेत ज्यांचा वापर करून आपण उत्तम पध्दतीने SEO चे नियम पाळू शकता.

ब्लॉगर्ससाठी उपयुक्त असे 10 गुगल एसईओ टूल्स (Google SEO Tools)

आजच्या या लेखामध्ये आपण गुगल द्वारे निर्मित 10 महत्वाच्या Google SEO Tools ची माहिती घेणार आहोत. मला वाटते की हे दहा टूल्स सर्वांनी वापरून पाहायलाच हवे व त्यानुसार ब्लॉगमध्ये आवश्यक ते बदल करावेत. तर चला जास्त वेळ न घालवता Google SEO Tools ची माहिती घेऊयात.

1) Google Search Console

ब्लॉगर्स साठी उपयुक्त Google SEO Tools मधील Google Search Console हे सर्वात महत्वाचे SEO टूल आहे. ब्लॉगची Indexability, Performance, Organic Clicks याचे विस्तारित Analysis गुगल सर्च कंसोल द्वारे प्रदान केले जाते. ब्लॉगच्या सुरक्षा संबंधित अडी-अडचणी व त्यांना सोडवण्याचे उपाय या टूल मध्ये शिकवले जातात. यासोबतच Manual Actions जसे URL Removing, URL Disavow करण्यासाठी या टूल मध्ये सुविधा देण्यात आलेली आहे.

google search console, google webmaster

वेबसाईट ला गुगल व नेण्यासाठी या टूल ला जोडणे बंधनकारक असते, याशिवाय आपली वेबसाईट गुगल वर दर्शवली जात नाही. ब्लॉगचा सर्च इंजिन वरील तपशीलवार डेटा जसे, Impressions, Clicks, Average Position, Search Queries आणि अजून बऱ्याच गोष्टी या टूल द्वारे आपल्याला कळतात. वेबसाईट मधील Indexing Issues, Crawling Errors, Security Issues चे निराकरण करण्यास हे टूल मदत करते. Google Search Console ला Google Webmaster असेही म्हटले जाते. यामध्ये अनेक छोटे टूल्स देण्यात आलेले आहेत.

2) Google Search Console Insights

Google Search Console Insights हे गुगल चे एक नवे Google SEO Tools आहे, सध्या ही बीटा व्हर्जन मध्येच आहे काही दिवसात पूर्णपणे लाँच करण्यात येणार आहे. गुगल सर्च कंसोल इनसाईट्स हे गुगल सर्च कंसोल आणि Google Analytics या दोन्ही टूल्स कडून डेटा मिळवते व त्यानुसार हे कार्य करते. Google Search Console Insights वापरण्यासाठी Google Search Console आणि Google Analytics एकमेकांना लिंक असायला हवे.

search console insights

Google Search Console Insights मध्ये वेबसाईट चे Total Pageviews, Post wise Views, Popular Content आपण पाहू शकतो. वेबसाईट वरील लोकप्रिय पोस्ट व त्यांना मिळालेले Views येथे पाहता येतात. वेबसाईटवर ट्रॅफिक कोणत्या मार्गाने येते म्हणजे Referring Links, Social Media यांचे Detail मध्ये विश्लेषण येथे पाहण्यास मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारचे ट्रॅफिक वाढवण्यासाठी काही टिप्स येथे दिलेल्या आहेत.

3) Google Analytics

वेबसाईट वरील ट्रॅफिक ची तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी सर्वात उपयुक्त Google SEO Tools म्हणजे हे Google Analytics. Google Search Console Insights पेक्षाही Detail मध्ये डेटा गुगल ऍनालिटिक्स देते. वेबसाईट चे पूर्ण ट्रॅफिक ट्रॅक करण्यासाठी आपण गुगल ऍनालिटिक्स ला ब्लॉग जोडलाच पाहिजे. गुगल ऍनालिटिक्स ला आपण इतर टूल जसे Google Search Console, Google AdSense, Google Ad Manager, Google Ads कनेक्ट करू शकतो.

google analytics

वेबसाईट चे ट्रॅफिक ट्रॅक करण्यासाठी Google Analytics सर्वात बेस्ट टूल आहे. यात साईट वरील Users, Realtime Users, User Location, Referring Links या सर्वांचे Detail मध्ये Analysis असते. यासोबतच Average Session Duration, Sessions, म्हणजे यूजर ने आपल्या साईट वर किती वेळ घालवला हे सुद्धा Google Analytics आपल्याला उपलब्ध करून देते.

गुगल वर लोकप्रिय असलेले टॉपिक सर्वांना माहीत असावे यासाठी गुगल ने हे टूल बनवलेले आहे. गुगल वर सर्च केल्या जाणाऱ्या Keywords चा लोकप्रियता ची माहिती या टूल मध्ये मिळते. ब्लॉग पोस्ट लिहण्यासाठी अनेक जणांना विषय मिळत नाहीत, त्यांच्यासाठी हे टूल खूप उपयोगाचे आहे. जर कोणतीही मोठी घटना घडली, किंवा कोणता सण असेल तर लोकं गुगल वर लगेच त्याविषयी सर्च करायला सुरू करतात आणि त्यामुळे ते विषय गुगल ट्रेंड्स मध्ये दर्शवले जातात.

google trends

आपल्यापैकी कोणालाही जर Trending Topics वर ब्लॉग लिहायचा असेल तर हे टूल नक्की वापरा. यावर राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, शैक्षणिक, खेळ मनोरंजन असल्या मोठ्या विषयातील ट्रेंडिंग टॉपिक मिळतील. Google Trends हे Keyword Research साठीही वापरले जाते. Google Trends मध्ये Keyword Search केल्यावर आपल्याला वेळेनुसार त्या किवर्ड ची लोकप्रियता दाखवली जाते.

5) Google Ads Keyword Planner

Google Ads Keyword Planner हे स्वतंत्र टूल नसून Google Ads मध्ये देण्यात आलेले एक वैशिष्ट्य आहे. Google Ads हे Google वरील जाहिराती Manage करण्यासाठी व्यावसायिक टूल आहे, यामध्ये एक पर्याय दिलेला आहे, त्यात हे कीवर्ड प्लॅनर टूल आहे. या टूल ने कोणत्याही किवर्ड चे Analysis करता येते.

google ads keyword planner

Keyword Planner हे Google SEO Tools तुम्हाला किवर्ड रिसर्च साठी उपयुक्त आहे. यात आपला किवर्ड टाकायचा आहे, हे टूल तुम्हाला त्या किवर्ड चे Monthly Traffic सांगते व त्या कीवर्ड च्या संबंधित असलेले काही कीवर्डस दर्शवते. इंटरनेट वर अनेक Keyword Research Tool उपलब्ध आहेत, पण त्यात फ्री टूल्स कमी आहेत. Keyword Planner हे पूर्णपणे फ्री आहे व हे टूल गुगल चे स्वतः चे आहे, त्यामुळे हे पूर्णपणे विश्वासू आहे.

6) PageSpeed Insights

ब्लॉगला लोकप्रिय होण्यासाठी Quality Content असणे आवश्यक असते, पण जर ब्लॉग लवकर Open होतच नसेल तर कंटेंट चा उपयोग काय? युजर्स ला आपल्या वेबसाईट वर वावरणे सोपे जावे यासाठी ब्लॉगची लोंडिंग स्पीड कमी असणे गरजेचे असते. एखादी वेबसाईट लवकर उघडत नसेल तर युजर्स त्यावर येण्यास टाळतात व दुसऱ्या ब्लॉगवर जातात, यामुळे आपल्या ब्लॉगची Rank खालावते.

pagespeed insights

ब्लॉगच्या SEO मध्ये स्पीड ला खूप महत्त्व आहे. यासाठी गुगल चे स्वतःचे PageSpeed Insights हे टूल आहे. यावर साईट ची URL टाकून आपल्याला त्या पेज ची स्पीड तपासू शकता. ब्लॉग च्या लोंडिंग स्पीड ला तीन रंगात दर्शवले जाते, लाल, हिरवा आणि केशरी. स्पीड हिरव्या रंगात असणे आवश्यक असते. स्पीड कमी असेल तर स्पीड कमी करणारे घटक जसे CSS, JS, External Code/Fonts हे सुद्धा PageSpeed Insights द्वारे आपल्याला कळते.

7) Web.Dev Measure

ब्लॉग रँक करण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन खूप महत्वाचे असते आणि त्यात On-Page SEO तर खुपच महत्वाचा असतो. Web.Dev Measure हे Google SEO Tools आपल्या ब्लॉगचे On-Page SEO साठी आवश्यक असलेले घटक तपासते. Web.dev Measure हे ब्लॉगचा Performance, Best Practices, SEO आणि Accessibility चेक करते.

web.dev measure

वरील प्रत्येक Parameter मध्ये वेबसाईट Improve करण्यासाठी उपयोगी टिप्स हे टूल आपल्याला देते. Web.dev Measure ज्या टेस्ट घेते त्या Google Lighthouse वर घेतल्या जातात व Simulated Mobile Device (Fast 3G Network and 4x CPU Slowdown) वर रण केल्या जातात. यामध्ये Tests History Save करून ठेवण्यासाठी Google Account मध्ये लॉगिन करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

8) Google Auto Suggest

ब्लॉगसाठी किवर्ड शोधण्यासाठी हे सर्वात उत्कृष्ट टूल आहे, तसे याला टूल नाही म्हणता येणार कारण हे गुगल सर्च इंजिन चे एक वैशिष्ट्य आहे. ब्लॉग पोस्ट कोणत्या विषयावर लिहावी किंवा पोस्ट ला शीर्षक काय द्यावे, या संकटात जर तुम्ही सापडला असाल तर Google Auto Suggest वापरून तुमची समस्या सुटणार आहे.

google autosuggest

वरील फोटो वरून आपल्याला समजले असेल की Google Auto Suggest नेमके काय आहे. वरती दाखवल्याप्रमाणे आपण आपला टॉपिक गुगल च्या सर्च बॉक्स मध्ये टाकायचा आहे, त्यानंतर गुगल Automatically त्या संबंधित अधिक Keywords Suggest करते. हे जे किवर्ड असतात ते युजर्स ने आधी सर्च केलेले असतात, जे जास्त वेळा सर्च केले गेलेले आहेत ते गुगल सजेस्ट करते.

9) Mobile Friendly Test

मोबाईल फ्रेंडली टेस्ट टूल हे आपल्याला मोबाईल डिव्हाईस द्वारे भेट देणाऱ्या युजर्स चा अनुभव निश्चित करण्यास मदत करते. ही चाचणी अनेक निकषांच्या आधारावर घेतली जाते, यात फॉन्ट साईझ, Content Width अश्या घटकांचा समावेश आहे. आपली वेबसाईट या निकषांवर Pass होते का Fail हे दर्शवले जाते.

mobile friendly test

जर वेबसाईट फेल होत असेल तर सुधारणा करण्यासाठी टिप्स दिल्या जातात. आपली साईट मोबाईल वर कशी दिसते हे पाहण्यासाठी एक स्क्रीनशॉट सुद्धा हे टूल दर्शवते, व साईट चा HTML कोडही दर्शवते.

10) Rich Results Test

रिच रिझल्ट टेस्ट टूलच्या मदतीने आपण पाहू शकतो की आपली साईट कोणत्या प्रकारच्या रिच रिझल्ट साठी पात्र आहे. रिच रिझल्ट टेस्ट च्या साहाय्याने वेब पेज कोणते Rich Result Generate करू शकतो हे पाहता येते.

rich result test

यासोबतच Search Results मध्ये आपल्या वेबसाईट चा Structured Data कसा दिसेल याचे पूर्वावलोकन हे टूल आपल्याला दर्शवते.

निष्कर्ष-

तर हे होते आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले 10 Google SEO Tools. मला वाटते की आपल्यापैकी सर्वांनी हे टूल्स वापरून पाहायलाच हवे. मला आशा आहे की आपल्याला आजचा लेख व्यवस्थितरित्या समजला असेलच.

आपल्याला ब्लॉगिंग संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल ते खाली कंमेंट करून नक्की विचारा, आम्ही आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूत. लेखात काही नवीन शिकायला मिळाले असेल तर हा लेख मित्रांसोबत शेअर करण्यास विसरू नका.

ब्लॉगिंग, SEO संबंधित अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी या ब्लॉगला वारंवार भेट देत राहा व मित्रांनाही या ब्लॉगबद्दल नक्की सांगा. धन्यवाद!

Leave a Comment