BGMI Update 2.8, मध्ये काय आहे नवीन?

BGMI म्हणजे Battlegrounds Mobile India, सध्याचा सगळ्यात लोकप्रिय मोबाईल गेम. आपल्या देशात लाखो गेमर्स दररोज हा गेम खेळतात. जवळपास 10 महिने बंदी असूनसुद्धा या गेमच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नाही. गेमचे निर्माते खेळाडूंसाठी सतत नवीन नवीन गोष्टी आणून त्यांना गेममध्ये व्यस्त ठेवत आहेत. BGMI चा मागील अपडेट (BGMI Update 2.7) ऑगस्ट महिन्यात रिलीज झाला होता त्यात आपल्याला ड्रॅगन बॉल थीम आणि अजून बरेच नवीन पाहायला मिळाले.

WhatsApp Group Join Group

आता BGMI चा पुढचा अपडेट म्हणजे BGMI Update 2.8 रिलीज करण्यात आलेला आहे. या अपडेट चे Beta Version लाँच झालेले आहे आणि मुख्य अपडेट सुद्धा आलेला आहे. BGMI खेळणारे लाखो लोक या अपडेट बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे आजच्या या पोस्ट द्वारे मी BGMI Update 2.8 Release Date आणि BGMI Update 2.8 Features बद्दल सांगणार आहे.

BGMI Update 2.8

BGMI चे निर्माते म्हणजे Krafton, यांच्याकडून दर 2 महिन्यांनी Fresh Patch Update रिलीज केला जातो. त्यानुसार ऑगस्टमध्ये Update 2.7 रीलज केला होता त्यात आपल्याला Dragon Ball Super Mode पाहायला मिळाला. अधिकरिक माहितीनुसार BGMI Update 2.8 हा ऑक्टोबर महिन्यात म्हणजे याच महिन्यात रिलीज केला आहे. विविध बातम्यांनुसार हा अपडेट 10 ऑक्टोबरच्या सुमारास लाँच केला जाईल.

BGMI चे जागतिक वर्जन अर्थात PUBG Mobile मध्ये हा अपडेट 7 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आहे, त्यामुळे भारतातील चाहते या अपडेटसाठी अजून उत्सुक झालेले दिसत आहेत. BGMI 2.8 Update साठी तुम्हाला आता जास्त वाट पहायची गरज नाही, लवकरच तुमच्या मोबाईल वरती हा अपडेट उपलब्ध आहे. हा Android आणि iOS वरती सोबत येण्याची शक्यता आहे.

सर्व गेमर्स या अपडेट ची आतुरतेने वाट बघत आहेत, परंतु अजून या BGMI Update 2.8 Release Date बद्दल अधिकारीक माहिती आलेली नाही, त्यामुळे नेमका कोणत्या दिवशी अपडेट येईल हे नक्की सांगता येत नाही. BGMI 2.8 Update मध्ये नवीन काय काय असेल याची तुम्हाला उत्सुकता लागली असेलच तर चला मग लीक झालेल्या माहितीनुसार BGMI 2.8 Update Features पाहुयात.

BGMI Update 2.8 मध्ये नवीन काय आहे?

PUBG Mobile जे BGMI चे जागतिक वर्जण आहे त्यात 2.8 अपडेट रिलीज झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला या अपडेट बद्दल माहिती मिळाली आहे. या अपडेटमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आलेली आहेत ती कोणती हे मी तुम्हाला खाली सांगणार आहे यात नवीन गेम मोड, काही नवीन weapons, आणि काही गेम सुधारणा करण्यासाठी टाकण्यात आलेले फिचर्स यांचा समावेश आहे. तर पहिली नवीन गोष्ट आहे Zombie Edge Mode जे या अपडेट चे सर्वात मोठे फीचर आहे तर चला पाहूया याबद्दल थोडेसे –

Zombie Edge Game Mode

ऑगस्ट महिन्यात रिलीज झालेल्या Update 2.8 मधे Dragon Ball Super Theme Mode आपल्याला पाहण्यास मिळाला आता या 2.8 अपडेटमध्ये हा Zombie Mode पाहण्यास मिळेल. हा Theme Mode तुम्हाला Erangel आणि Livik मॅप मधे खेळता येणार आहे. या मोड मधे Zombies, Mutants, Berserkers, Rippers या प्रकारचे झोंबी आहेत आणि त्यांना मारण्यासाठी नवीन weapons पण देण्यात आलेली आहेत.

New Superpowers

या अपडेटमध्ये 2 नवीन सुपर पॉवर देण्यात आले आहेत, Mutation Gauntletes आणि Mutation Blades. आता ह्या पॉवर कश्या काम करतात हे तुम्हाला गेम खेळल्यावरती समजेलच. दोन्ही पॉवर झोंबीच्या आहेत, मॅप मधे नवीन लोकेशन देण्यात आलेल्या आहेत आणि तेथील बॉस झोंबीला मारल्यावर या Superpowers तुम्हाला मिळतील आणि याच्या मदतीने तुम्ही enemy ला सहजपणे पराजित करू शकता.

New Weapons

BGMI 2.8 अपडेट मधे काही नवीन हत्यारे देण्यात आलेले आहेत. Combact Knife नावाचा चाकू दिलेला आहे जो झोंबीला Eliminate करण्यासाठी वापरू शकता आणि Firearms Upgrade करण्यात आलेला आहे. Crossbow ला Tactical Gunpowder हे attachment नवीन दिले आहे. याचा वापर करून बाण मारल्यावर आणि तो नेम चुकला तर 2 ते 3 सेकंद मधे त्या बाणाचा ब्लास्ट होईल आणि enemy जर त्याच्या रेंज मधे असेल तर त्याला damage होईल.

New Hoverboard

BGMI 2.8 Update मधे hoverboard येणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही कोठेही जाऊ शकता आणि हे पाण्यातसुद्धा चालते. याची स्पीड बाकीच्या गाड्यापेक्षा कमी असणार आहे आणि आपण याला बॅग मधे घेऊन फिरू शकतो आणि गरज लागल्यावर बाहेर काढून Hoverboard ने प्रवास करू शकतो.

Friendly Fire

आपल्याला माहीतच असेल की काही टीम मेट्स विनाकारण बॉम्ब टाकून त्रास देतात किंवा आपली गाडी फोडतात तर या अपदेटमध्ये हे सर्व बंद होणार आहे. आता तुमचा टीममेट तुम्हाला बॉम्ब ने त्रास देऊ शकत नाही आणि तुम्ही जर गाडीत असाल तर ती गाडी फोडू शकत नाही. या अपडेट पासून टीममेट्स एकमेकांना नुकसान पोहोचू शकणार नाहीत.

कसा करायचा BGMI Game Update?

BGMI गेम अपडेट कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती असेल पण जर आपल्यापैकी काहीना माहीत नसेल तर त्यांनी खालील माहिती वाचावी. गेम अपडेट करायचे सोपे आहे फक्त आपल्याकडे डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट पाहिजे. BGMI गेम अपडेट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील Play Store किंवा iPhone असेल तर Apple App Store ओपन करा.
  • आता Search Bar मध्ये BGMI सर्च करा.
  • पुढे BGMI गेम आपल्याला दिसेल, अपडेट रिलीज झाल्यावर तिथे Update चे बटन येईल त्यावर क्लिक करा.
  • अपडेट डाउनलोड आणि इंस्टॉल होईपर्यंत वाट पाहा. इंटरनेट स्पीड जास्त असेल तर अपडेट लवकर डाउनलोड होईल.
  • अपडेट इंस्टॉल झाल्यावर गेम ओपन करा आणि Download विभागातून New Resorses डाउनलोड करून घ्या.

अश्या प्रकारे तुम्ही BGMI गेम नवीन वर्जन वरती अपडेट करू शकता.

FAQ’s

1)  BGMI Update 2.8 कधी रिलीज झाला?

BGMI 2.8 Update 10 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेला आहे.

2) BGMI Update 2.8 मध्ये नवीन काय काय आहे? 

BGMI 2.8 Update मध्ये Zombie Mode, Hoverboard, New Weapons आणि New Superpowers आहेत.

3) BGMI Update 2.8 मध्ये Zombie Mode आहे का?

होय, BGMI 2.8 Update मध्ये Zombie Mode आहे.

4) BGMI Update 2.8 कसा डाउनलोड करायचा?

BGMI 2.8 Update डाउनलोड कसा करायचा हे मी वरती सांगितले आहे, ते पाहू शकता.

Leave a Comment