ABHA कार्ड म्हणजे Ayushman Bharat Health Account ज्या अंतर्गत तुम्हाला 14 अंकी ABHA क्रमांक प्रदान केला जातो जो तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टममधील सहभागी म्हणून ओळख देतो. आभा कार्ड हे वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याच्या नोंदी हॉस्पिटल, दवाखाने, विमा प्रदाते आणि इतरांसोबत डिजिटलपणे संग्रहित आणि सामायिक करण्यास अनुमती देते. ABHA हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे.
नागरिक कोणत्याही खर्चाशिवाय त्यांचा अद्वितीय ABHA ID तयार करू शकतात. आजच्या पोस्टमध्ये आपण आभा कार्डची माहिती घेणार आहोत. आयुष्मान भारत आरोग्य खाते हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्याची डिजिटल नोंद ठेवण्याचे काम करते. ज्यामध्ये ABHA कार्ड धारक वैद्यकीय संबंधित माहिती जसे की अहवाल, निदान, औषधांचे प्रिस्क्रिप्शन इत्यादी काही क्लिकवर ऍक्सेस करू शकतात, ज्यामुळे डॉक्टरांना भविष्यातील रूग्णांवर वैद्यकीय माहितीसह उपचार करणे सोपे होईल.
आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला आभा कार्ड काय आहे, (ABHA Card in Marathi) हे कसे बनवायचे, आभा कार्ड चे फायदे, ABHA Card Online Apply, ABHA Card Registration Process, Abha Card Download Online हि सर्व माहिती देणार आहे त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
आभा कार्ड (ABHA Card) म्हणजे काय? (ABHA Card in Marathi)
आभा कार्ड हे एक Digital Health Id Card आहे जे भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत जारी केले जाते. या कार्डमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती साठवली जाते. यामध्ये रुग्णाचे नाव, जन्मतारीख, पत्ता, संपर्क माहिती, आरोग्य विमा माहिती, वैद्यकीय इतिहास, उपचाराची माहिती इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आभा कार्डचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत.
आभा रुग्णांना त्यांच्या आरोग्याची माहिती सहज उपलब्ध करून देते. यामुळे रुग्णांना चांगले उपचार मिळण्यास मदत होते. तसेच, हे कार्ड रुग्णांना वेगवेगळ्या आरोग्य योजनांमध्ये सहभागी होण्यास मदत करते, ज्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत मिळतो. आभा कार्ड काढण्यासाठी, आधार कार्ड किंवा वाहतूक परवाना यापैकी एक Document असणेआवश्यक आहे. आभा कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने काढता येते.
ABHA Card साठी कोणती Documents लागतात?
भा कार्ड काढण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते –
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड नंबर
- पॅन कार्ड नंबर
- ड्रायविंग लायसन्स नंबर
वरील पैकी कोणतेही एक असेल तरी आभा कार्ड काढू शकता.
आभा कार्ड कसे काढायचे? (ABHA Card Online Apply)
आभा कार्ड नोंदणी करण्याची प्रक्रिया तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून पूर्ण करू शकता त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
१) आभा कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये abha.abdm.gov.in ही अधिकृत वेबसाइट उघडा.
२) वेबसाईटच्या होम पेजवर Create ABHA Number बटण दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
३) आता तुम्हाला आभा नंबर तयार करण्यासाठी Aadhaar Card किंवा Driving License हे दोन पर्याय दिलेले आहेत त्यातील एक निवडा.
४) पुढे एक पेज उघडेल त्यात आधार नंबर किंवा ड्रायविंग लायसन्स चा नंबर टाकावा आणि खाली I Agree वरती क्लीक करून Captcha Code भरावा आणि Next वरती क्लीक करावे.
५) आता तुमच्या आधार नंबर किंवा लायसन्स नंबर ला एक OTP येईल तो टाकावा आणि खाली तुमच्याकडे असलेला मोबाईल नंबर टाकावा, आणि Next वरती क्लीक करावे.
६) पुढे तुम्हाला माहिती विचारली जाईल ती नीट भरावी आणि ABHA Card Online Apply नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
आभा कार्ड डाउनलोड कसे करावे? (ABHA Card Download Online)
जर तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे आभा कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला healthid.ndhm.gov.in या वेबसाईट वरती जावे लागेल येथून तुम्ही तुमचे आभा कार्ड डाउनलोड करू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-
१) आभा कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये healthid.ndhm.gov.in ही अधिकृत वेबसाइट उघडा.
२) आता Login वरती क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल नंबर किंवा आभा नंबर टाका, Captcha भरा आणि Next वरती क्लिक करा.
३) तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाका आणि Next वरती क्लिक करा.
३) आता तुम्हाला तुमचे आभा कार्ड दिसेल आणि त्यावरती Download ABHA Card हा पर्याय असेल यावर क्लिक करा.
४) आता तुमचे आभा कार्ड तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करण्यात येईल. अश्या प्रकारे तुम्ही आभा कार्ड डाउनलोड करू शकता.
ABHA Card चे फायदे काय आहेत?
आभा कार्डचे फायदे खालीलप्रमाणे आहेत –
- ABHA Card तुम्हाला तुमच्या सर्व वैद्यकीय माहितीमध्ये फक्त काही क्लिक्ससह अहवाल, निदान आणि औषधांच्या तपशीलांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते.
- तुम्ही तुमचे वैद्यकीय नोंदी रुग्णालये, दवाखाने आणि डॉक्टरांशी सहजपणे शेअर करू शकता, ज्यामुळे नवीन ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळणे सोपे होईल.
- ABHA कार्ड तुम्हाला हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री (HPR) मध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते, जी भारतातील सर्व डॉक्टरांच्या तपशीलांचा संग्रह आहे.
- ABHA कार्ड आरोग्य सुविधा नोंदणी (HFR) मध्ये प्रवेश देखील प्रदान करते, यामुळे सर्व खाजगी आणि सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
FAQ’s –
१) आभा कार्ड काय आहे?
आभा कार्ड हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे जे भारत सरकारद्वारे जारी केले जाते. हे कार्ड नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती एकत्रित करते. आभा कार्ड हे रुग्णांसाठी त्यांच्या आरोग्याची माहिती सहज आणि सुरक्षितपणे शेअर करणे सोपे करते.
२) आभा कार्ड डाउनलोड कसे करावे?
आभा क्रमांक वापरून तुम्ही पीडीएफ स्वरूपात ABHA कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. यासाठी आभाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, कार्ड क्रमांक टाका, लॉग इन करा आणि आभा कार्ड डाउनलोड करा.
३) आभा कार्डसाठी नोंदणी कशी करावी?
ABHA कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि वेबसाइटवर दिलेल्या चरण-दर-चरण प्रक्रियेचे अनुसरण करून नोंदणी करावी लागेल.
४) ABHA चे पूर्ण नाव काय आहे?
ABHA Full Form हा Ayushman Bharat Health Account असा आहे.
५) घरबसल्या आभा कार्ड बनवता येते का?
होय, तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून आभा कार्ड काढू शकता त्यासाठी वरती पोस्टमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.