Instagram Video Download : आज एकविसाव्या शतकात इंटरनेट खूप विकसित झाले आहे. प्रत्येकजण एकमेकांसोबत सोशल मीडिया द्वारे जोडला गेला आहे. सोशल मीडिया चा अफाट वापर आज होत आहे. इंस्टाग्राम हे सुद्धा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम वर दर मिनिटाला लाखो फोटो, विडिओ अपलोड केले जातात कारण याची लोकप्रियता च एवढी आहे.
आपण इंस्टाग्राम वापरत असाल तर विविध फोटो, रिल्स विडिओ, मनोरंजन म्हणून पाहत असणार. प्रत्येकाची सवय असते की विडिओ, फोटो आवडले की लगेच सेव करून ठेवायचे, त्यासाठी इंस्टाग्राम मध्ये सेव करण्याचा पर्याय दिलेला आहे. पण एक अडचण आहे की इंस्टाग्राम च्या सेव पर्यायाने विडिओ, फोटो त्या एप मधेच सेव होतो, त्यामुळे आपल्याला परत पाहायचा असल्यास इंटरनेट असावे लागते.
यासाठी मी या पोस्टमध्ये एक मस्त ट्रिक सांगणार आहे, याच्या मदतीने आपण कोणत्याही इंस्टाग्राम विडिओ, फोटोला आपल्या स्मार्टफोन च्या मेमरी मध्ये स्टोर करू शकता व वाटेल त्या वेळी विना इंटरनेट पाहू शकता. तर ही ट्रिक माहीत करून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी लागेल हे लक्षात ठेवा. तर चला इंस्टाग्राम विडिओ, फोटो डाउनलोड कसे करायचे हे शिकूयात.
इंस्टाग्राम विडिओ कसे डाउनलोड करावेत (Instagram Video Download)
इंस्टाग्राम चे फोटो आणि विडिओ आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड Instagram Video Download करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. या लेखात आपण एप च्या साहाय्याने Instagram Video Download करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. या आधीच्या लेखात आपण इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड करायचे शिकलेलो आहोत.
तर चला आता इंस्टाग्राम वरील सुंदर Instagram Video Download स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करण्याची प्रक्रिया शिकूयात.
1) इंस्टाग्राम वरील फोटो आणि विडिओ डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वरून Instore हे एप डाउनलोड करावे.
2) आता ते एप Open करावे, सर्वात आधी ते आपल्या मोबाईल ची स्टोरेज वापरण्याची परवानगी मागते, ती परवानगी Instore ला द्यावी.
3) या स्टेप मध्ये आपल्याला आपल्या इंस्टाग्राम खात्यावर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे Instagram Login वर क्लिक करायचे आहे.
4) लॉगिन करण्याचा फायदा असा की आपण थेट या एप वरून Instagram Video पाहू शकता व डाउनलोड ही करू शकता.
5) जो फोटो किंवा विडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक दिलेल्या जागेत टाकून डाउनलोड बटन दाबावे.
6) आता ते डाउनलोड होण्यास सुरवात होईल, व नेट स्पीड नुसार थोड्या वेळाने डाउनलोड पूर्ण होईल. हे डाउनलोड झालेला विडिओ फोटो आता तुमच्या फोन मध्ये तुम्ही पाहू शकता.
Instagram Photo’s, Video’s कसे डाउनलोड करायची हे आता आपण शिकला आहात. आता कोणालाही विडिओ मागवायची गरज आपल्याला लागणार नाही, कोणताही विडिओ केव्हाही आता आपण डाउनलोड करू शकता. आपल्याला आजची इंस्टाग्राम Video आणि Photo डाउनलोड करण्याची ट्रिक कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
आजच्या या लेखात जर नवीन काही शिकण्यास मिळाले असेल तर या पोस्ट ला व्हाट्सअप्प सारख्या सोशल मीडिया चा वापर करून मित्रांसोबत नक्की शेअर करा. या सारख्या अजून टिप्स आणि ट्रिक्स शिकण्यासाठी व आमचे लेख सर्वात आधी वाचण्यासाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईट ला Subscribe करून ठेवा. धन्यवाद!