Reliance कंपनी ने 2016 मध्ये Jio SIM Card लाँच केले. सुरुवातीला काही महिने हे SIM कार्ड फ्री होते, त्यामुळे याची लोकप्रियता अफाट वाढली. सुरुवातीला जिओ ची इंटरनेट स्पीड खूप जास्त होती पण जसे उपभोगता वाढत केले तसे Jio Internet ला अडचणी येऊ लागल्या. Reliance चे Jio SIM हे त्याच्या कमी Price च्या Recharge Plan साठी प्रसिद्ध आहे. Users ची संख्या वाढल्याने कंपनीने ठीक- ठिकाणी टॉवर्स लावले व त्यामुळे इंटरनेट स्पीड मध्ये काही प्रमाणात वाढ झाली.
एवढे करूनही काही भागात Jio Internet Speed ला प्रॉब्लेम येतच आहे, यामुळे काही लोक Jio High स्पीड पासून वंचित आहेत. आपली जर इंटरनेट स्पीड चांगली येत नसेल तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचलाच पाहिजे. आजच्या या लेख मध्ये आम्ही Jio Internet च्या Speed वाढवण्यासाठी काही Tips सांगितल्या आहेत, यांचा वापर करून आपण जिओ इंटरनेट स्पीड वाढवू शकता.
जिओ इंटरनेट स्पीड कशी वाढवायची? (Increase Jio Internet Speed)
आपण जेव्हा नवीन स्मार्टफोन घेतो किंवा जुना फोन रीसेट करतो, त्यावेळी काही दिवस इंटरनेट स्पीड खूप जास्त मिळते, परंतु काही दिवस गेल्यानंतर नेट स्पीड कमी झाल्याची आपल्याला आढळून येते. आता असे का होते याची माहिती आपल्याला खाली मिळेल. Jio Internet Speed वाढवण्यासाठी आम्ही दिलेल्या Tips नुसार तुम्हाला फोन च्या सेटिंग मध्ये काही बदल करावे लागणार आहेत. हे करून आपल्या Jio Internet स्पीड मध्ये सुधारणा होईल, तर चला वेळ न घालवता सुरू करूयात.
1) सिम कार्ड पहिल्या स्लॉट मध्ये टाकावे.
आपल्याला हे माहीत असावे की कोणत्याही फोनमध्ये इंटरनेट चालवायचे असल्यास इंटरनेट चे सिम कार्ड पहिल्या पोर्ट मध्ये टाकावे. सिम कार्ड च्या पहिल्या स्लॉट ला High इंटरनेट स्पीड मिळवण्याच्या उद्देशाने बनवलेले आहे.
यामुळे आपण जेव्हाही जिओ सिम स्मार्टफोन मध्ये टाकाल, ते स्लॉट 1 मधेच असायला हवे. आपल्या फोन मध्ये जिओ इंटरनेट स्पीड कमी येत असेल तर Jio SIM कोणत्या स्लॉट मध्ये आहे याची एकदा पडताळणी करून घ्या, आणि सिम जर दुसऱ्या स्लॉट मध्ये असेल तर लगेच पहिल्या स्लॉट मध्ये टाकावे.
2) जिओ APN सेटिंग दुरुस्त करणे.
आपल्या स्मार्टफोन चे इंटरनेट अचानक बंद झाले किंवा स्लो झाले तर आपण सेटिंग मध्ये जाऊन APN Settings एकदा तपासले पाहिजे. आपण बऱ्याच वेळा लहान मुलांच्या हातात फोन देत असाल, त्यांना फोन मधले काही समजत नसल्याने त्यांच्याकडून चुकून APN मध्ये बदल होऊ शकतात.
APN चे पूर्ण नाव Access Point Name असे आहे, जिओ चा APN कसा सेट करायचा हे जर आपल्याला माहीत नसेल तर आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स काळजी पूर्वक Follow करा.
1) APN सेटींग सेट करण्यासाठी सर्वात आधी फोन मधील सेटिंग मध्ये जायचे आहे.
2) आता ‘Mobile Network’ हा पर्याय शोधून त्यात जायचे आहे.3) आपल्याला येथे APN किंवा Access Point Name हा पर्याय शोधायचा आहे.
4) आता New APN Settings जोडायची आहे, त्यासाठी “Add New APN” वर क्लिक करावे.
5) खाली दिलेले सेटिंग New APN मध्ये Add करायचे आहे.
Name- Jio4G
APN- jionet
Proxy- Not Set
Port- Not Set
Username, Password, Server, MMSC, MMS Proxy, MMS Port,- Not Set
MCC- 405
MNC- 864
Authentication Type- Not Set
APN Type- Default, sup, xcan
APN Protocol- IPv4/ IPv6
APN Roaming Protocol- IPv4/ IPv6
APN EnabledBaerer- Unspecified
MVNO Type- Not Set
MVNO Value- Not Set
3) वापरात नसलेले Apps हटवून टाकावे.
आपल्या फोन मध्ये किती Apps आहेत आणि त्यातले आपण किती वापरतो, याचा विचार बहुतेक जण करत नाहीत. परंतु जर आपल्या फोन मध्ये जिओ नेट स्पीड कमी येत असेल तर स्मार्टफोन मधील असंख्य Apps सुद्धा याला कारण असू शकतात. स्मार्टफोन मध्ये क्षमतेपेक्षा जास्त Apps असल्यास फोन हँग होतो, व हँग झाल्याने त्याचा परिणाम आपल्या इंटरनेट स्पीड वर होतो. याबरोबरच स्मार्टफोन च्या बॅटरी लाईफ सुद्धा कमी होते, या कारणामुळे ही समस्या सोडवणे गरजेचे असते.
स्मार्टफोन मधील सर्व Apps एकदा पाहून घ्यावे व आपल्याला जे लागत नाहीत ते Delete करावे म्हणजेच Uninstall करावे. काही Apps स्मार्टफोन सोबत Preinstalled आलेले असतात त्यांना आपण Uninstall करू शकत नाहीत, अश्या Apps ला Settings मध्ये जाऊन Disable करावे. वरील Steps सुरळीत रित्या केल्याने स्मार्टफोन च्या Battery Life आणि इंटरनेट स्पीड मध्ये सुधारणा होईल.
4) स्मार्टफोन मधील वायरस डिलिट करणे.
इंटरनेट च्या युगात Computer Virus ही एक सर्वात मोठी समस्या आहे. वायरस आपल्या फोन मध्ये कोठून येईल आणि कसा येईल हे सांगताच येत नाही. फोन मध्ये वायरस आल्याने फोन हँग होईला सुरुवात होते, इंटरनेट स्पीड वर सुद्धा परीणाम होतो आणि आपला डेटा सुद्धा Damage होऊ शकतो. आपण जर कोणत्या असुरक्षित वेबसाईट वर गेलो किंवा तेथून एखादे App, File डाउनलोड केले तर त्यात आपल्या फोन मध्ये Virus शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी वेबसाईट वर जाताना खात्री करून जावे.
आता येऊ मेन समस्येवर की वायरस ने जिओ इंटरनेट स्पीड कमी होते तर ती वाढवायची कशी? यासाठी आपल्याला तो वायरस फोन मधून काढून टाकण्यासाठी Virus Cleaner App किंवा Antivirus Software ची गरज आहे. काही स्मार्टफोन मध्ये वायरस स्कॅनर दिलेले असतात, जर आपल्या फोन मध्ये वायरस स्कॅनर नसेल तर गुगल प्ले स्टोर जर जाऊन इंस्टॉल करून घ्या व फोन मधील सर्व वायरस हटवून टाका.
5) वेब ब्राउजर दुरुस्त करावे.
इंटरनेट स्पीड कमी असल्याचे कारण, आपण वापरत असलेले वेब ब्राउजर असू शकते. आपण वेब ब्राउजर वापरताना असंख्य वेबसाईटवर जातो, Video, Images, Files डाउनलोड करतो. या सर्वांचा Data, Cache हे वेब ब्राउजर मध्ये स्टोर होत असतो व त्यामुळे App हँग होते. काही वेळेस ब्राउजर मध्ये खूप प्रमाणात Tabs ओपन असतात आणि या सर्वांचा परिणाम इंटरनेट स्पीड वर होतो.
वेब ब्राउजर ची समस्या सोडवण्यासाठी आपण काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सर्वात पहिले म्हणजे आपण सुरक्षित आणि सोपे असलेले ब्राउजर वापरले पाहिजे. जसे Google Chrome. ब्राउजर मधील Tabs, History, Cookies हे सर्व नियमितपणे डिलिट केले पाहिजे, तेव्हा आपल्या जिओ इंटरनेट ची स्पीड सुधारेल.
निष्कर्ष-
Jio Internet Speed कशी वाढवता येईल हे आपल्याला बऱ्यापैकी समजले असेल अशी मी आशा करतो. सध्या Jio Internet Speed मध्ये खूप समस्या येत आहेत त्यामुळे आम्ही हा लेख बनवला. जेणेकरून आपण ही समस्या बऱ्यापैकी सोडवू शकाल.
आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांचीही इंटरनेट स्पीड ची समस्या दूर होईल. लेख संबंधित काही अडचण असेल तर कंमेंट द्वारे विचारा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करूत.