फोन पे हे एक लोकप्रिय मोबाईल पेमेंट एप आहे. आपल्याला जर घरबसल्या मोबाईल च्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवायचे असतील तर फोन पे हे एप नक्की वापरले पाहिजे. तसे पाहिले तर इंटरनेट वरती मोठ्या संख्येत ऑनलाईन पेमेंट एप आहेत, परंतु त्यातील फोन पे, गुगल पे, पेटीएम, ई काही लोकप्रिय आणि विश्वासू एप आहेत. Phone Pe चा वापर करून आपण काही सेकंद मध्ये मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता.
गूगल पे वर अकाउंट कसे उघडायचे, संपूर्ण प्रक्रिया
आजच्या पोस्टमध्ये आपण फोन पे कसे सुरू करावे म्हणजे फोन पे वरती खाते कसे तयार करावे याची प्रक्रिया शिकणार आहोत. फोन पे हे App UPI प्रणालीच्या आधारे कार्य करते, यामुळे हे सुरक्षित आहे. तर चला आता आपण फोन पे अकाउंट कसे बनवायचे, How to Open PhonePe Account हे Step-By-Step शिकूयात.
PhonePe Account Opening: फोन पे अकाउंट कसे उघडायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
फोन पे वरती खाते बनवण्यासाठी आपण खालील स्टेप्स Follow करायच्या आहेत. तर चला सुरू करूयात.
Step 1 – Download And Install
PhonePe वरती खाते ओपन करण्यासाठी सर्वात आधी फोन पे हे App गुगल च्या प्ले स्टोर वरून फोन पे डाउनलोड करून इंस्टॉल करायचे आहे. फोन पे डाउनलोड करण्यासाठी वरील डाउनलोड बटन वर क्लिक करा.
Step 2 – Open App
PhonePe डाउनलोड झाल्यावर त्यावर क्लिक करून App ओपन करा आणि REGISTER NOW यावर क्लिक करा.
Step 3 – Create Account
आता आपल्यासमोर फोन पे खाते ओपन करण्याचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपला फोन नंबर, पूर्ण नाव आणि एक चार अंकी पासवर्ड टाकायचा आहे आणि CONTINUE वर क्लिक करायचे आहे.
फोन नंबर टाकताना काळजी घ्यायची आहे की आपला मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक असला पाहिजे. नंबर टाकल्यावर आपल्याला एक OTP प्राप्त होईल तो दिलेल्या जागेत टाकावा.
Step 4 – Select Language
या स्टेप मध्ये आपल्याला भाषा निवडायची आहे. आपल्याला ज्या भाषेत सोपे जाईल ती निवडा आणि DONE वरती क्लिक करा.
Step 5 – Account Created
अभिनंदन! आपण यशस्वीपणे फोन पे चालू केले आहे. फोन पे वरती आपले अकाउंट तयार झाले आहे. आता पुढे आपण फोन पे मध्ये बँक खाते जोडून ऑनलाईन पेमेंट सुरू करू शकता.
निष्कर्ष –
आजच्या PhonePe Account Opening: फोन पे अकाउंट कसे उघडायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, या पोस्टमध्ये फोन पे खाते उघडण्याची प्रक्रिया शिकून घेतली आहे. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना फोन पे खाते बनवण्यात काहीही अडचण येणार नाही.
आपल्याला जर आजचा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. या पोस्टबद्दल काहीही प्रतिक्रिया असेल तर कंमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि अश्याच प्रकारच्या टिप्स आणि ट्रीक्ससाठी मराठी ऑनलाईन या वेबसाईटला वारंवार भेट देत राहा.
Very nice