WhatsApp Channel काय आहे आणि कसा बनवायचा?

Whatsapp हे आजच्या काळातील एक सर्वात मोठे आणि लोकप्रिय मेसेजिंग ॲप बनले आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वच लोक याचा वापर करत असतील. WhatsApp मध्ये सतत नवीन नवीन फिचर्स येत राहतात, असेच एक नवीन फिचर आलेले आहे हे म्हणजे WhatsApp Channel. तुम्ही जर टेलिग्राम वापरले असेल तर तुम्हाला अंदाजा आला असेल, ज्याप्रमाणे आपण टेलिग्राम मध्ये चॅनेल बनवू शकतो तसे आता WhatsApp मध्ये बनवता येणार आहे.

WhatsApp Channel हे नवीन फीचर भारतात लाँच झालेले आहे, टेलिग्राम प्रमाणे WhatsApp मधे आता चॅनल बनवणे शक्य झाले आहे. WhatsApp Channel च्या मदतीने तुम्ही तुमच्या followers ला Text, Videos, Images, अश्या प्रकारचे मेसेजेस पाठऊ शकता. ज्याप्रमणे टेलिग्राममधे चॅनल बनवता येतात तसे आता व्हॉट्सॲप मधे पण बनवता येणार आहे, त्यामुळे आजच्या पोस्टमधे आपण WhatsApp Channel बद्दल माहिती घेणार आहोत, तर चला सुरु करूयात.

WhatsApp Channel काय आहे?

WhatsApp Channel हे WhatsApp मध्ये आलेले एक नवीन वैशिष्ट्य आहे जे लोकांच्या मोठ्या ग्रुपशी one way communication साधण्याची परवानगी देते. व्हॉट्सॲप चॅनेल Admin द्वारे तयार केले जाऊ शकतात आणि यामध्ये कोणीही सदस्य join होऊ शकतो. व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये, Text, Photo, Video, Audio आणि Documents पोस्ट करू शकतात. Channel ला join असलेले सर्व members या पोस्ट वाचू शकतात, प्रतिसाद देऊ शकतात आणि शेअर करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल आणि ग्रुप यामध्ये फरक आहे, ग्रुपमध्ये संभाषण दोन्ही बाजूने असते म्हणजे सर्वजण मेसेजेस पाठवू शकतात पण चॅनेल मध्ये फक्त admin कडे मेसेजेस पाठवायचा अधिकार असतो. याला one way communication म्हणतात. याचा अर्थ फक्त चॅनल admin पोस्ट करू शकतात आणि members फक्त त्या पोस्ट वाचू शकतात. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सर्व members पोस्ट करू शकतात आणि एकमेकांशी chatting करू शकतात.

कसा बनवायचा WhatsApp Channel?

WhatsApp Channel हे फीचर नुकतेच भारतात लाँच झाले आहे. याच्या मदतीने तुम्ही चॅनल तयार करून त्यावर तुमच्या सर्व फोलॉवर्सला सोबत मेसेजेस सेंड करू शकता. येथे आपण व्हॉट्सॲप वरती चॅनल कसा बनवायचा आणि कसा मॅनेज करायचा हे पाहणार आहोत.

1) WhatsApp Channel कसा तयार करायचा?

Android असो किंवा iOS दोन्हीवर चॅनल बनवायची प्रक्रिया सारखी आहे. त्यामुळे खालील माहिती ही सर्वांसाठी आहे. तर चला व्हॉट्सॲप वरती चॅनल कसा बनवायचा हे काही स्टेप्सच्या माध्यमातून पाहुयात.

  1. आपल्या Android किंवा iOS डिवाइस वरती WhatsApp ओपन करा आणि “Updates” या पर्यायावर जा.
  2. येथे, तुम्हाला “Channels” विभाग दिसेल आणि त्याच्या पुढे “+” चिन्ह असेल. या प्लस आयकॉनवर टॅप करा.
  3. आता, WhatsApp चॅनल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी “Create Channel” पर्यायावर टॅप करा.
  4. पुढे तुमच्या समोर एक सूचना येईल ती वाचा आणि “Continue” वरती क्लिक करा.
  5. येथे तुमच्या चॅनेलसाठी “Channel Icon, Channel Name, Channel Description” विचारले जाईल ते टाका आणि “Create Channel” वरती क्लिक करा.

आता तुमचा चॅनेल तयार झालेला आहे, चॅनेल तयार झाल्यावर, तुम्ही ते इतरांना join होण्यासाठी लिंक शेअर करू शकता.

2) WhatsApp Channel Link शेअर कशी करायची?

  1. चॅनल तयार केल्यानंतर तुम्हाला चॅनलच्या नावासमोर सर्वात वरती चॅनल लिंकचा पर्याय मिळेल.
  2. यासाठी तुम्हाला काही पर्याय दिसतील. ज्यामध्ये तुमच्या चॅनल लिंकचा पर्याय प्रथम असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलची लिंक कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.
  3. “Send Link Via WhatsApp” वर क्लिक करून तुम्ही तुमच्या WhatsApp चॅनलची लिंक तुमच्या WhatsApp Contacts सोबत शेअर करू शकता.
  4. “Copy Link” वर क्लिक करून तुम्ही WhatsApp Channel ची लिंक कुठेतरी पेस्ट करून शेअर करू शकता.
  5. शेअर लिंकवर क्लिक करून तुम्ही ते कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.

3) WhatsApp Channel Info कशी change करायची?

  1. सर्व प्रथम, WhatsApp चॅनेलवर क्लिक करा आणि वरील तीन डॉटवर क्लिक करा.
  2. यानंतर तुम्हाला Channel Info आणि Share असे दोन पर्याय मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला “Channel Info” वर क्लिक करायचे आहे.
  3. आता तुमच्या WhatsApp चॅनलची माहिती तुमच्या समोर येईल. ज्यामध्ये तुम्ही वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि “Edit” वर क्लिक करावे लागेल.
  4. यानंतर, चॅनेलची लोगो, नाव आणि Description आपल्याला दिसेल. तुम्हाला हवे ते तुम्ही बदलू शकता.
  5. “Save Changes” वर क्लिक करून तुम्ही केलेले बदल सेव्ह करा.

4) WhatsApp Channels फॉलो कसे करायचे?

  1. यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
  2. यानंतर “Updates” वर क्लिक करा.
  3. खालील “Channel” वर क्लिक करा.
  4. आता “Find Channel” वर क्लिक करा.
  5. यानंतर, तुम्हाला कोणाचे WhatsApp चॅनल फॉलो करायचे आहे. त्याचे नाव टाइप करा.
  6. किंवा तुम्हाला प्रसिद्ध Whatsapp चॅनेलची संपूर्ण यादी मिळेल ज्यावरून तुम्ही कोणालाही फॉलो करू शकता.

5) WhatsApp Channel डिलीट कसा करायचा?

  1. Whatsapp चॅनल डिलीट करण्यासाठी, प्रथम Whatsapp उघडा.
  2. यानंतर, अपडेट्सवर जा आणि तो चॅनेल निवडा जो तुम्हाला हटवायचा आहे.
  3. चॅनल उघडल्यानंतर, वरच्या उजव्या बाजूला तीन बिंदूंवर क्लिक करा.
  4. त्यानंतर “Change Info” वर क्लिक करा.
  5. आता शेवटी “Delete Channel” वर क्लिक करून चॅनल डिलीट करा.

तुम्ही चॅनेल लिंक, QR कोड किंवा इतर वापरकर्त्यांना चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी एक संदेश शेअर करू शकता. चॅनेलमध्ये मर्यादित सदस्य संख्या नसते, म्हणून तुम्ही कोणालाही सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता.

WhatsApp Channel ची मुख्य वैशिष्ट्ये

WhatsApp चॅनेल ची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत –

Enhanced Security – कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या चॅनल Admin ची सुरक्षा खूप महत्वाची असते. त्यामुळे Admin चा फोन नंबर, पत्ता इत्यादी वैयक्तिक माहिती इतरांपर्यंत पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. WhatsApp चॅनेलमधील admin आणि followers च्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली गेली आहे.

Advanced Channels Update – तुम्हाला तुमच्या Whatsapp Channel च्या खाली Find Channels चा पर्याय दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चॅनेलची संपूर्ण यादी मिळेल. या यादीत देशातील मोठ्या मोठ्या लोकांचे चॅनल्स दिलेले आहेत.

Reactions – तुम्ही WhatsApp चॅनलमधील कोणत्याही चॅनलच्या पोस्टवर थेट react करू शकता आणि स्टिकर्स आणि इमोजीसह फीडबॅक देऊ शकता. चॅनेल वरती पोस्ट केलेल्या कोणत्याही पोस्ट ला तुम्ही रिऍक्ट करू शकता जसे आपण टेलिग्राम वरती करू शकतो तसे.

Forwarding Access – Whatsapp चॅनलमध्ये, तुम्ही तुमच्या मित्रांसह इतर कोणत्याही चॅनेलची पोस्ट आणि त्याची लिंक सहजपणे फॉरवर्ड करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त तो मेसेज होल्ड करायचा आहे मग फॉरवर्ड चे बटन वापरून तुम्ही कोणालाही पुढे पाठवू शकता.

WhatsApp Channel चे उपयोग

WhatsApp Channel हा एक सार्वजनिक मंच आहे जे वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांशी संवाद साधण्याची परवानगी देते. हा व्यवसाय, संस्था आणि व्यक्तींसाठी माहिती शेअर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. WhatsApp Channel चे काही विशिष्ट उपयोग खालीलप्रमाणे आहेत –

Information Sharing – WhatsApp Channel हे माहिती आणि जागरूकता वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. व्यवसाय, संस्था आणि व्यक्ती चॅनेल वापरून त्यांच्या उत्पादने, सेवा, कार्यक्रम किंवा इतर विषयांबद्दल बातम्या आणि माहिती शेअर करू शकतात.

Customer Service – WhatsApp Channel हे Customer Service प्रदान करण्याचा एक चांगला मार्ग आहे. व्यवसाय चॅनेल वापरून ग्राहकांशी थेट संवाद साधू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, समस्यांचे निराकरण करू शकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात.

Sales and Marketing – WhatsApp Channel हे विक्री आणि Affiliate Marketing साठी महत्वाचे आहे. व्यवसाय चॅनेल वापरून त्यांच्या उत्पादने आणि सेवांबद्दल जाहिराती आणि ऑफर शेअर करू शकतात.

Social Networking – WhatsApp Channel हे लोकांना एकत्र येण्यासाठी आणि सामायिक आवडी आणि हितसंबंधांवर चर्चा करण्यासाठी एक मार्ग प्रदान करते. व्यक्ती चॅनेल वापरून नवीन मित्र बनवू शकतात, ग्रुप तयार करू शकतात आणि एकमेकांशी कनेक्ट राहू शकतात.

WhatsApp Channel हे एक शक्तिशाली साधन आहे जे विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकते. ते व्यवसाय, संस्था आणि व्यक्तींसाठी माहिती आणि सामग्री शेअर करण्याचा, ग्राहक सेवा प्रदान करण्याचा, विक्री आणि विपणन करण्यासाठी आणि सामाजिक नेटवर्किंग करण्यासाठी एक प्रभावी मार्ग प्रदान करते.

FAQ’s

१) WhatsApp चॅनेल कोण तयार करू शकतो?

WhatsApp चॅनेल कोणीही तयार करू शकतो फक्त त्याच्याकडे WhatsApp खाते पाहिजे.

२) WhatsApp चॅनेलमध्ये किती सदस्य असू शकतात?

WhatsApp चॅनेलमध्ये मर्यादित सदस्य संख्या नसते, म्हणजे unlimited सदस्य जॉईन होऊ शकतात.

३) WhatsApp चॅनेलमध्ये कोणत्या प्रकारची सामग्री पोस्ट केली जाऊ शकते?

WhatsApp चॅनेलमध्ये मजकूर, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि पोल पोस्ट केले जाऊ शकतात.

४) WhatsApp चॅनेलमध्ये कोण कोण join होऊ शकते?

WhatsApp चॅनेलमध्ये कोणीही सामील होऊ शकतो ज्याला चॅनेलचा लिंक किंवा QR कोड आहे.

५) WhatsApp चॅनेल फिचर कसे मिळवावे?

WhatsApp चॅनेल अपडेट जागतिक स्तरावर लाँच झाले आहे आणि सध्या लाइव्ह आहे. त्यामुळे, ते अद्याप तुमच्या डिव्हाइसवर आलेले नसल्यास, तुमचे WhatsApp अपडेट करा.

Leave a Comment